जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच लातूर यांचे समोर
ग्राहक तक्रार क्रमांक – 228/2011 तक्रार दाखल तारीख – 26/08/2011
निकाल तारीख - 07/02/2015
कालावधी - 03 वर्ष , 05 म. 11 दिवस.
श्री चंद्रकांत ज्ञानोबा मरे,
वय : 36 वर्षे, धंदा – व्यापार,
रा. करकट्टा ता. जि. लातुर,
हा.मु.संभाजी नगर, लातुर,
ता. जि. लातुर. ....अर्जदार
विरुध्द
- व्यवस्थापक, अजिंक्य मोटार्स,
हनुमान मंदीराच्या समोर बार्शी रोड,
लातुर.
- शाखा व्यवस्थापक,
मिंडा, अॅटो लिमिटेड,
खासरा नं. 301/223,
मुकुंदपुर, दिल्ली- 110042. ..गैरअर्जदार
को र म - श्रीमती ए.जी.सातपुते, अध्यक्षा.
श्री अजय भोसरेकर, सदस्य
श्रीमती रेखा जाधव, सदस्या.
तक्रारदारातर्फे :- अॅड. एस.बी.जगताप.
गैरअर्जदार क्र. 1 तर्फे :- अॅड.ए.के.जवळकर.
निकालपत्र
(घोषितव्दारा - श्रीमती ए.जी.सातपुते, मा.अध्यक्षा )
अर्जदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे गैरअर्जदारा विरुध्द दाखल केली आहे.
अर्जदार हा लातुर येथील रहिवाशी असून तो शेती व प्लॉटचा खाजगी व्यापार करतो. अर्जदाराने गैरअर्जदार क्र. 1 कडुन सेल्फ स्टार्ट मोटार सायकल ज्याचा मॉडेल क्र. (सी.बी. शाईन एसी.बी.एम 12 एम.सी.ए) गजग्या रंगाच्या गाडीची नोंदणी करुन रु. 48,982/- रोख देवून गैरअर्जदार क्र. 1 कडे भरणा दि. 04/09/2010 रोजी करुन कायदीशीर खरेदी केली आहे. अर्जदाराने मोटार सायकल खरेदी केल्यानंतर डिसेंबर 10 अखेर मोटारसायकलची सेल्फ स्टार्टची बॅटरीमुळे माहे जाने 2011 मध्ये चालू होण्यास त्रास देऊ लागली बॅटरीमुळे वाहन चालू होत नव्हते. अर्जदाराने ही बाब गैरअर्जदारास सांगितली. गैरअर्जदार यांनी सेल्फ स्टार्ट बॅटरी रिचार्ज करुन अर्जदारास दिली. सदरील बॅटरी केवळ चारच दिवस चालली व नंतर बॅटरी बंद पडली. त्यानंतर अर्जदाराने गैरअर्जदार क्र. 1 यांना याबाबत पाठपुरावा दि. 02/02/2011 रोजी केला असता गैरअर्जदार क्र. 1 यांनी सदरील बॅटरी गैरअर्जदार क्र.1 कडुन गॅरंटीमध्ये बदलून देण्याचे आश्वासन दिले. दि. 02/02/2011 पासुन दिड महिना पाठपुरावा करुनही अर्जदारास बॅटरी बदलून मिळाली नाही. म्हणून दि. 21/03/2011 रोजी बॅटरी बदलून मिळणे बाबत लेखी कळविल्याचे पत्र दाखविले. त्यावर गैरअर्जदार क्र. 1 यांनी दि. 05/04/2011 पर्यंत बॅटरी देण्याचे आश्वासन दिले. परंतु आजपर्यंत अर्जदारास बॅटरी बदलून मिळाली नाही. म्हणून गैरअर्जदार क्र. 1 ने अर्जदाराच्या सेवेत त्रुटी केली आहे. म्हणून सदरचे केसमध्ये अर्जदारास नवीन बॅटरी दयावी मानसिक त्रासापोटी 10,000/-, अॅटोचे दररोजचे भाडे रु. 70 प्रमाणे रु. 3150/- आजपासुन प्रतिदिवसाचा खर्च रु. 70 प्रमाणे दि. 27/05/11 ते 17/08/11 पर्यंतचे रु. 5,600/- नोटिस व दाव्याचा खर्च रु. 2,000/- असे एकुण रु. 15,750/- देण्यात यावेत.
तक्रारदाराने तक्रारी सोबत मोटारसायकल वाहन नोंद, मोटारसायकलचे विमा पत्र, मोटारसायकल नोंदणीपत्र, बॅटरी बाबतचे पत्र, गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांना पाठविलेला डाकनोंद नोटीस पावत्या, गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांना पाठविलेल्या डाकनोंद परत पावतीद्वारे नोटीस प्रत इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.
गैरअर्जदाराच्या म्हणण्यानुसार सदर केस न्यायमंचात बसत नाही. अर्जदार हा ग्राहक होत नाही. तशीच सदरची तक्रार ही मुदतीत दाखल केलेली नाही. सदर केसमध्ये अर्जदाराने गैरअर्जदार क्र. 1 कडे बॅटरी बदलून देण्याची विनंती गैरअर्जदार क्र. 2 च्या कंपनीस कळवलेले आहे. तसेच गैरअर्जदार क्र. 1 हा त्या बॅटरी निमिर्ती करतही नाही. व डिलर नाही तसेच बॅटरी बदलून देण्याचा करार गैरअर्जदार क्र. 2 कडे आहे. बॅटरी बदलून गैरअर्जदार हे देवूच शकत नाही.
तसेच सदरचे वाहन हे व्यापाराकरीता घेतलेले असल्यामुळे अर्जदार हा ग्राहक होत नाही. तसेच सदरची तक्रार ही गैरअर्जदार क्र. 2 कंपनी जी बॅटरी बनवते तिच्या विरोधात असायला हवी गैरअर्जदार क्र. 1 च्या विरोधात नाही. तसेच अर्जदाराने दिलेला हिशोब चुकीचा आहे. म्हणून अर्जदाराची तक्रार फेटाळण्यात यावी. गैरअर्जदार क्र. 1 हा आजही बॅटरी बसवून देण्यास तयार आहे जर गैरअर्जदार क्र. 2 ने अर्जदाराची बॅटरी गैरअर्जदार क्र. 1 कडे पाठविली. सदरची केस फेटाळण्यात यावी.
मुद्दे उत्तरे
- अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? होय
- गैरअर्जदाराने अर्जदाराच्या सेवेत त्रूटी केली आहे काय ? होय
- अर्जदार अनुतोष मिळण्यास पात्र आहे काय ? होय
- काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
मुद्दा क्र. 1 चे उत्तर होय असून अर्जदार हा गैरअर्जदार क्र. 1 व 2 चा ग्राहक आहे. अर्जदाराने गैरअर्जदार क्र. 1 व 2 कडून सदरची मोटारसायकल ही विकत घेतलेली आहे. ही बाब गैरअर्जदार क्र. 1 यास मान्य आहे.
मुद्दा क्र. 2 चे उत्तर होय असून अर्जदार हा गैरअर्जदार क्र. 1 कडुन गैरअर्जदार क्र. 2 च्या कंपनीची मोटार सायकल विकत घेतलेली आहे. ही बाब योग्य आहे की गैरअर्जदार क्र. 1 ही बॅटरी बनवणारी कंपनी नाही. मात्र गैरअर्जदार क्र. 1 ही त्या कंपनीचे मोटारसायकल विकते. त्यात की दोष आढळल्यास अर्जदार हा लातुरचा गैरअर्जदार क्र. 2 दिल्ली येथे जाणे बॅटरीसाठी निश्चितच होणार नाही. म्हणून गैरअर्जदार क्र. 1 गाडी विकताना त्या कंपनीची विकतो व जेव्हा त्यातील स्पेअर पार्टस बरोबर नसेल तर आपली जबाबदारी नाही. म्हणून गैरअर्जदार क्र. 2 कडे बोट दाखवतो हे योग्य नाही. गैरअर्जदार क्र. 1 व 2 च्या व्यवहाराची त्यांच्यातला करार झालेला असल्यामुळेच गैरअर्जदार क्र. 1 हा गैरअर्जदार क्र. 2 च्या गाडया विकत आहे. त्यात दोष निर्माण झाल्यास कोणताही लातुर येथील ग्राहक गैरअर्जदार क्र. 2 च्या दिल्ली येथे मागणी करणार नाही. म्हणून ही सुध्दा जबाबादारी गैरअर्जदार क्र. 1 ची आहे. ज्या ग्राहकाला गाडी विकली त्या ग्राहकाच्या मोटार सायकलीत जो दोष निघाला त्याची पुर्णत: त्याने गैरअर्जदार क्र. 2 कडुन मागवून करावी. आपली जबाबदारी नाही म्हणून फेटाळू नये हा व्यवहार नव्हे. तसेच अर्जदार हा शेतकरी आहे. त्याने मोटारसायकल विकत घेतली म्हणजे ती व्यापारासाठी हेही म्हणणे योग्य होणार नाही. आज गाडी मोटारसायकल वा इतर वाहन दळणवळणाचे साधन म्हणून प्रत्येकास वापरण्याची मुभा आहे. त्यामुळे हे व्यापारासाठी वापरले जाते हे गैरअर्जदार क्र. 1 चे म्हणणे चुकीचे आहे. तसेच गैरअर्जदार क्र. 2 कडुन सदर केसमध्ये कुणीही हजर झालेले नाही. म्हणून गैरअर्जदार क्र. 2 यांना नोटिस तामिली मंचामधुन झाली नाही. मात्र त्यांनी स्वत: दि. 27/05/2011 रोजी पाठवलेली पोच क्र. 1073 व पोच क्र. 1074 गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांना दिलेली आहे. याचा अर्थ अशी अर्जदाराची बॅटरीची तक्रार आहे. ही बाब गैरअर्जदार क्र. 2 यांना माहिती आहे. म्हणून हे न्यायमंच अर्जदाराचा अर्ज मंजुर करत आहे. गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी अर्जदारास तात्काळ बॅटरी 30 दिवसाच्या आत बसवून दयावी. तसेच मानसिक व शारिरीक त्रासापोटी रु. 1,000/- व दाव्याचा खर्च रु. 500/- गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी वैयक्तीक वा संयुक्तीक दयावा.
सबब हे न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारित करत आहे.
आदेश
1) अर्जदाराची तक्रार अंशत: मंजुर करण्यात येत आहे.
2) गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, अर्जदारास बॅटरी आदेशाची प्रत
प्राप्तीपासुन 30 दिवसाच्या आत तात्काळ बसवून दयावी. अन्यथा बॅटरीच्या किंमतीवर
10 टक्के व्याज लागेल.
3) गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, अर्जदारास मानसीक व शारिरीक
त्रासापोटी रु. 1,000/-(अक्षरी एक हजार रुपये फक्त) व तक्रारीच्या खर्चापोटी रु.
500/-(अक्षरी पाचशे रुपये फक्त)आदेशाची प्रत प्राप्तीपासुन 30 दिवसाच्या आत
वैयक्तीक वा संयुक्तीक देण्यात यावेत.
(श्री.अजय भोसरेकर) (श्रीमती ए.जी.सातपुते)
सदस्य अध्यक्षा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, लातूर.