ग्राहक तक्रार क्र. 187/2013
अर्ज दाखल तारीख : 07/01/2014
अर्ज निकाल तारीख: 26/05/2015
कालावधी: 01 वर्षे 05 महिने 20 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1) प्रसाद पि. प्रभाकर भांगे,
वय -.30 वर्षे, धंदा – शेती,
रा.लोणी, ता.परंडा, जि. उस्मानाबाद. ....तक्रारदार
वि रु ध्द
1) व्यवस्थापक
ओम जय ट्रेडींग कंपनी,
राजे कॉम्पलेक्स, राजीवनगर,
औरंगाबाद रोड, उस्मानाबाद.
2) मा. व्यवस्थापक,
महिंद्रा अॅन्ड महिंद्रा फायनान्स कंपनी लि.
शिवानंद फर्निचर ग्राऊन्ड फ्लोअर,
आय.सी.आय.सी.आय बँक शेजारी,
बसवेश्वर चौकाजवळ, सेंन्ट्रल बिल्डींग, उस्मानाबाद.
ता.जि.उस्मानाबाद. ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2) मा.श्रीमती विद्युलता जे.दलभंजन. सदस्य.
3) मा.श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य.
तक्रारदारातर्फे विधीज्ञ : श्री. बी. ए. बेलूरे.
विरुध्द पक्षकारातर्फे क्र.1 तर्फे विधीज्ञ : श्री. आर.एस. मुंढे.
विरुध्द पक्षकारातर्फे क्र.2 तर्फे विधीज्ञ : श्री. आर.ए.पीलखाने
न्यायनिर्णय
मा.अध्यक्ष, श्री.एम.व्ही.कुलकर्णी यांचे व्दारा.
अ) विरुध्द पक्षकार (विप) क्र.2 कडून फायनान्स घेऊन विप क्र.1 कडून ट्रॅक्टर विकत घेतले असतांना विप यांनी ट्रॅक्टरचे आर.सी. बुक, पाच कोरे चेक, कोरे स्टॅम्प पेपर, तक्रारकर्ता (तक) ला परत न देऊन सेवेत त्रुटी केली म्हणून ते मिळण्यासाठी व भरपाई मिळणेसाठी तक ने ही तक्रार दिलेली आहे.
1. तक चे तक्रारीतील कथन थोडक्यात पुढीलप्रमाणे...
विप क्र.1 उस्मानाबाद येथील स्वराज ट्रॅक्टरचा अधिकृत विक्रेता आहे व विप क्र.2 हे वाहनांसाठी वित्तीय पुरवठा करणारी संस्था आहे. तक ने विप क्र. 1 कडून ट्रॅक्टर घेण्याचे ठरवले विप क्र.1 ने विप क्र. 2 कडून वित्तीय पुरवठा घेण्याची विनंती केली. ट्रॅक्टरची मूळ किंमत रु.4,18,000/- होती. तक ने विप क्र. 1 कडे रु.50,000/- जमा केले. दि.25/07/2013 रोजी विप क्र. 2 ने फायनान्स रु.3,68,000/- दिला तक च्या आवश्यक त्या फॅार्मवर सहया घेतल्या. विप क्र. 2 ने मासिक हप्ता किती अगर कर्ज किती हे सांगितले नाही. पासिंगचा खर्च, इन्शूरन्सचा खर्च, विप क्र. 1 ने करावायाचा होता. विप क्र. 1 ने ट्रॅक्टर पासिंगसाठी तक ला आर.टी.ओ. ऑफिसमध्ये बोलावले नाही. विप यांनी तक ला पुर्णपणे अंधारात ठेवले. विप आता पैशासाठी वारंवार तगादा लावत आहे. विप क्र. 1 चे कर्मचारी बाळासाहेब शिंदे, राहूल लोखंडे वगैरे घरी येऊन ट्रॅक्टर ओढून नेऊ अशी धमकी देत आहेत. ता.16/11/2013 तसेच ता.08/12/2013 रोजी सदरहू इसम तक चे घरासमोर बसून राहिले व संपूर्ण रकमेची मागणी केली. विप क्र. 1 यांनी टफ व विलवेट देण्याचे कबूल केले होते ते दिले नाही. आर.टी.ओ. पासिंग नसल्यामुळे तक ट्रॅक्टर रस्त्यावर नेऊ शकत नाही. तरी विप यांनी आर.सी. बुक पाच सही केलेले कोरे चेक, तीन कोरे स्टँम्प पेपर, इन्शूरन्स पॉलिसी, कर्जाचे स्टेटस रिपोर्ट तक ला द्यावे म्हणून ही तक्रार ता.13/12/2013 रोजी दाखल केलेली आहे.
2. तक्रारीसोबत तक ने दि.22/07/2013 ची रु.5,000/- ची पावती, दि.26/07/2013 ची रु. 25,000/- ची पावती, दि.22/10/2013 ची रु.10,000/- ची पावती, दि.15/11/2013 ची रु. 10,000/- ची पावती, दि.06/12/2013 ची नोटीसीची प्रत, स्टेट बँकेकडील चेकबुकचे कव्हर इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.
ब) विप क्र. 1 ने हजर होऊन ता.17/07/2014 रोजी लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. त्यात त्यांनी तक याला व्यवहाराबद्दल अंधारात ठेवले हे अमान्य केले आहे. विप क्र. 1 याने आपले कर्मचारी तक कडे पाठवले हे अमान्य केले आहे. या विप ने आर.टी.ओ. पासिंग करुन देण्यास टाळाटाळ केली हे अमान्य केले आहे. या विप विरुध्द खोटी तक्रार दाखल केली कारण डाऊनपेमेंट पैकी तक कडून रु.35,000/- येणे बाकी आहे व ते बुडवायचा तक चा विचार आहे त्यामुळे तक ची तक्रार रद्द व्हवी अशी मागणी केली आहे.
क) विप क्र. 2 ने दि.15/12/2014 रोजी लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. विप क्र. 2 चे म्हणणे आहे की ट्रॅक्टरची मुळ किंमत रु.4,50,000/- होती. विप क्र.2 ने कर्ज रु.3,60,000/- मंजूर केले. तक ने एकूण रु.98,597/- दि.27/07/2013 रोजी या विप कडे भरणा केले. त्यापैकी रु.90,000/- डाऊन पेमेंट म्हणून होते. कर्जाची परतफेड दर सहामाहीच्या दहा हप्त्यात, प्रत्येक हप्ता रु.59,400/- या प्रमाणे करावयाची होती. तक ने एकही हप्ता दिलेला नाही. तक ने ट्रॅक्टरचे आर.सी. बुक या विप कडे आणून दिले आहे. या विप ने कोणतीही गुंडगिरी केलेली नाही. तक ने कोरे चेक अगर कोरे स्टँम्प पेपर दिलेले नाहीत. थकीत हप्ते रु.1,18,800/- व दंड रु.13,299/- तक कडून येणे आहे. त्यामुळे सदरची तक्रार रद्द करावी अशी विनंती केली आहे.
ड) तक ची तक्रार त्याने दाखल केलेली कागदपत्रे, विप चे म्हणणे यांचे अवलोकन करता आमचे विचारार्थ खालील मुद्दे निघतात त्यांची उत्तरे आम्ही त्यांच्या समोर खाली दिलेल्या कारणांसाठी लिहिली आहेत.
मुद्दे उत्तरे
1) विप नी सेवेत त्रुटी केली आहे काय ? नाही.
2) तक अनुतोषास पात्र आहे काय ? नाही.
3) काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे.
इ) कारणमीमांसा
मुद्दा क्र. 1 व 2
1. तक चे म्हणण्याप्रमाणे ट्रॅक्टरची किंमत रु.4,18,000/- होती व त्यापैकी विप क्र.2 कडून रु.3,68,000/- फायनान्स घेतले व रु.50,000/- स्वत:चे दिले. विप क्र.2 चे म्हणणेप्रमाणे कर्ज रु.3,60,000/- देण्यात आले. यावर तक ने रु.90,000/- डाऊनपेमेंट केले, फाईल खर्च रु.6,550/- व वैयक्तिक विम्याचे रू.2,047/- विप क्र. 2 कडे जमा केले. विप क्र. 1 चे म्हणणे आहे की डाऊनपेमेंट पैकी रु.35,000/- तक कडून त्याला येणे आहे. विप चे क्र.2 चे म्हणणे आहे की ट्रॅक्टरची किंमत रु.4,50,000/- होती. तक ने पैसे भरल्याच्या पावत्या हजर केल्या त्याप्रमाणे दि.22/07/2013 पासून दि.15/11/2013 पर्यंत एकूण रु.50,000/- विप क्र. 1 कडे भरले. जर ट्रॅक्टरची किंमत रु.4,50,000/- असेल तर विप क्र.1 चे म्हणणे कि डाऊनपेमेंटपैकी रु.35,000/- तक ने भरले नाही हे सुसंगत ठरते. ट्रॅक्टरचे कोटेशन टॅक्स इन्हाईस तक अगर विप क्र. 1 ने हजर केलेले नाही. तक ला किमान कोटेशन हजर करता आले असते.
2. विप क्र. 2 चे म्हणण्याप्रमाणे जे कर्ज रु.3,60,000/- अदा केले ते रु.59,400/- चे सहामाही दहा हप्त्यात फेडायचे होते. पहिला हप्ता दि.20/01/2014 रोजी द्यायचा होता तक ने एकही हप्ता फेडला नाही. ट्रॅक्टर रजिष्ट्रर झाले असून नं.एम.एच.25 एच.7357 पडला आहे. तक ने स्वत:च आर.सी. बुक विप क्र.2 कडे दिले आहे.
3. तक चे म्हणणे प्रमाणे विप चे कर्मचारी पैशासाठी वारंवार त्याचे घरी आले व ट्रॅक्टर ओढून नेणार म्हणाले म्हणून तक्रारीस कारण घडले तसेच विप क्र. 1 ने ट्रॅक्टर पासिंग केले नाही तसेच टफ व विलवेट दिले नाही. तक ने कोटेशन हजर न केल्यामुळे काय ऑफर होती हे कळणे शक्य नाही. विप क्र. 1 चे म्हणणे प्रमाणे तक ने डाऊनपेमेंट पैकी रु.35,000/- देण्याचे टाळले आहे, त्यात तथ्य आढळून येते. विप क्र.2 फायनान्सरने फायनान्सची रक्कम विप क्र.1 ला दिली असणार. विप क्र.2 चे म्हणण्याप्रमाणे डाऊनपेमेंटपैकी रु.90,000/- जमा झाले होते. तक ने पावत्या हजर केल्या व म्हंटल्याप्रमाणे फक्त रु.50,000/- जमा केले आहेत. म्हणजेच उर्वरीत डाऊनपेमेंटचे पैसे भरलेले नाहीत. जे विप क्र.1 ने भरले असणार तसेच कर्ज परत फेडीचा पहिला हप्ता दि.20/1/2014 रोजी डयू होता. तक ने एकही हप्ता आजपर्यंत भरल्याचे दिसून येत नाही. विप क्र. 2 ने ट्रॅक्टरचा नंबर एम.एच.25 एच.7357 असून तक ने स्वत: आर.सी. बुक हजर केल्याचे म्हंटले आहे. त्यामुळे विप यांनी सेवेत त्रुटी केली हे तक शाबीत करु शकला नाही. विप चे म्हणणे की पैसे बुडविण्यासाठी तक ने खोटी तक्रार दिली यात तथ्य आढळते. विप ने सेवेत त्रुटी केली हे तक शाबीत करु शकला नाही त्यामुळे तो अनूतोषास पात्र नाही म्हणून आम्ही मुद्दा क्र. 1 व 2 चे उत्तर नकारार्थी देतो व खालीलप्रमाणे आदेश करतो.
आदेश
1) तक ची तक्रार रद्द करण्यात येते.
2) खर्चाबाबत कोणतेही आदेश नाही.
3) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
अध्यक्ष
(श्री.मुकूंद.बी.सस्ते) (मा.विद्युलता जे. दलभंजन)
सदस्य सदस्य
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.