जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, लातूर
ग्राहक तक्रार क्रमांक :167/2011 दाखल तारीख :23/06/2011
निकाल तारीख :13/02/2015
कालावधी :03वर्षे 08म.01दिवस
हनमंत भिमा हडगीले,
वय 45 वर्षे, धंदा शेती,
रा. महादेव नगर, खंडापुर ता.जि. लातूर. ...तक्रारदार.
-विरुध्द-
1) व्यवस्थापक,
दि. ओरिएंटल इंशुरन्स कंपनी लि.
अंबर प्लाझा दुसरा मजला, अहमदनगर 414001.
2) व्यवस्थापक,
लाईफ लाईन लाईफ केअर लि.
हॉटेल ब्रिजच्या बाजुस , शिवाजी चौक, लातूर. ..... गैरअर्जदार
कोरम : 1) श्रीमती ए.जी.सातपुते, अध्यक्षा.
2) श्री.अजय भोसरेकर, सदस्य
3) श्रीमती रेखा जाधव, सदस्या.
तक्रारदारातर्फे : अॅड.एम.पी.झुंजे (पाटील)
गै.अ.क्र.1 तर्फे : अॅड. एस.जी.डोईजोडे.
गै.अ.क्र.2 : स्वत:
::: निकालपत्र :::
(घोषित द्वारा: श्रीमती ए.जी.सातपुते, मा.अध्यक्षा.)
तक्रारदाराने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारा विरुध्द दाखल केली आहे. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात अशी की,
अर्जदार हे लातूर येथील रहिवाशी असून, गैरअर्जदार क्र. 1 ही इंशुरन्स कंपनी असुन, जनतेला विमा पुरविण्याचा व्यवसाय करते. गैरअर्जदार क्र. 2 हे गैरअर्जदार क्र. 1 ची विमा पॉलिसी ग्राहकांना देण्याचा व्यवसाय करते. अर्जदाराने गैरअर्जदार क्र. 1 कडून नागरीक सुरक्षा पॉलिसी गैरअर्जदार क्र. 2 कडून घेतली. अर्जदाराने दि. 10.10.2008 रोजी नागरीक सुरक्षा पॉलिसी क्र. 37420/65 या पॉलिसीद्वारे कायदेशिर विमा धारक झाला. गैरअर्जदार क्र. 2 यांनी अर्जदारास त्याच्या नावाने एल 2008/एमएच 08/117166-000000 असे कार्ड दिले. सदरील पॉलिसीची मुदत दि. 10.10.2008 ते दि. 09.10.2010 अशी मर्यादीत केली. अर्जदार हे गैरअर्जदार क्र. 2 यांच्याकडे एफ.ओ. या पदावर कार्यरत होते. अर्जदार दि. 23.12.2008 रोजी रात्रीचे 8.30 वाजता लातूर हुन महादेवनगर येथे जात असतांना, समोरच्या दिशेने अचानक एक ट्रक दुस-या ट्रकला ओव्हरटेक करुन अर्जदाराच्या दिशेने आला असता अर्जदाराने त्याचे वाहन रस्त्याच्या बाजुला घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी अर्जदाराचे वाहन घसरल्यामुळे अर्जदार खाली पडला, व अर्जदाराच्या अंगावर त्याची गाडी पडली. सदरच्या अपघातात अर्जदाराच्या डाव्या हाताचे दंडाचे व डाव्या पायाच्या पिंडरीचे हाड मोडले, अपघाता नंतर अर्जदारास शासकीय रुग्णालय लातूर येथे दाखल करुन, प्रथमोपचार देण्यात आले. त्यानंतर दि. 25.12.2008 ते दि. 03.02.2009 या काळात अर्जदारास उपचार व शस्त्रक्रिया करण्यासाठी लातूर येथील सिध्दी आर्थोपेडीक अॅन्ड ट्रामा केअर टिळकनगर लातूर येथे दाखल करण्यात आले. त्यासाठी त्यास शस्त्रक्रियेला रु. 50,461/- खर्च झाला. अर्जदाराने गैरअर्जदाराकडे विमा प्रस्ताव दि. 25.02.2009 रोजी दाखल केला. सदरच्या अपघातामुळे अर्जदाराचा डावा हात व डाव्या पायास अपंगत्व आले. अर्जदाराने साधारण 2 वर्षे वेळोवेळी गैरअर्जदाराकडे रु. 1,00,000/- ची मागणी केली, परंतु त्यास गैरअर्जदाराने दाद लागू दिली नाही. म्हणुन शेवटी वकीला मार्फत दि. 15.02.2011 रोजी नोटीस पाठवली. नोटीसीचे उत्तरादाखल असे कळवले की, गैरअर्जदार क्र.1 व 2 यांना, अर्जदाराचे कागदपत्र मिळाले नाही. तसेच अर्जदाराच्या कागदपत्रात त्रूटी असल्याचे सांगीतले. त्यानुसार अर्जदाराने सर्व त्रूटीची पुर्तता करुन गैरअर्जदाराकडे रु. 50,461/- ची मागणी केली व विमा पॉलिसीची रक्कम रु. 1,00,000/- , मानसिक व शारिरीक त्रासापोटी रु. 15,000/- व दाव्याचा खर्च रु. 5000/- द. सा. द. शे. 18 टक्के व्याजाने देण्यात यावा, अशी मागणी केली आहे.
गैरअर्जदार क्र. 2 च्या म्हणण्या नुसार श्री हनमंत भिमा हडगीले हे आमचेच प्रतिनिधी म्हणुन फिल्डफोर्स मध्ये काम करीत होते. त्यांना ही सर्व क्लेम प्रोसीजर माहिती आहे, त्यांनी कंपनीचे टेबल न 102 चे लाईफ केअर कार्ड घेतले होते, त्याप्रमाणे त्यांच्यासाठी क्र. 37420/165 विमा राशी रु. 1,00,000/- कालावधी दि. 10.10.2009 ते 09.10.2010 घेतलेली होती. दि. 23.12.2008 रोजी त्यांचा दुर्दैवी अपघात झाला. त्याची नोटीस दि. 02.01.2009 रोजी मिळाली. त्याप्रमाणे आम्ही त्यांना दि ओरिएंटल इंशुरन्स कंपनी लि. अहमदनगरचा क्लेम फॉर्म दि. 08.01.2009 रोजी पाठवला. त्यांचा तो क्लेम फॉर्म आम्हास दि. 05.03.2009 रोजी मिळाला, त्यातील त्रूटी पुर्ण करण्यासाठी परत आम्ही दि. 06.03.2009 रोजी अर्जदारास परत क्लेम फॉर्म पाठवला. तो क्लेम फॉर्म आज पर्यंत मिळाला नाही, हीच वस्तुस्थिती आहे. दि. 06.03.2009 चा क्लेम फॉर्म आम्हाला मिळालेला नाही असे आम्ही दि. 08.03.2011 च्या नोटीसीच्या उत्तरात लिहीलेले आहे. तसेच श्री हडगीले आमचे लाईफ केअर कार्डधारक आहेत, त्यांना सेवा देणे हे आमचे कर्तव्यच आहे. क्लेम जर त्यांनी परत सादरच केला नाही, तर आमचा त्यात काही दोष नाही, आम्ही त्यांच्या सेवेत कोणतीही त्रूटी केली नाही.
गैरअर्जदार क्र.1 च्या म्हणण्या नुसार, अर्जदार हा गैरअर्जदार क्र. 1 कडे कोणतेही मुळ कागदपत्र पाठवलेले नाही, सर्व झेरॉक्स कॉपी आहेत, त्यामुळे सदरचा तक्रार अर्ज हा प्रथम अवस्थेत आहे, व त्यांनी अपंगत्वाचे प्रमाणपत्र देखील दाखल केलेले नाही, त्यामुळे अर्जदाराने कागदोपत्री पुरावा योग्य दिला नसल्यामुळे, अर्जदाराचा क्लेम फेटाळण्यात यावा. अर्जदाराला विमा सुरक्षित रक्कम रु. 1,00,000/- व दवाखान्याचा खर्च रु. 50461/- मानसिक त्रासापोटी रु. 15,000/- व दाव्यसाचा खर्च रु. 5000/- देण्याची काही गरज नाही. सदरची विमा पॉलिसी ही अहमदनगर जिल्हयातील असल्याने अर्जदाराने सदरचा क्लेम हा तेथील कार्यक्षेत्रात दाखल करायला हवा होता. म्हणुन गैरअर्जदाराला या न्यायमंचाचे कार्यक्षेत्र येत नाही, म्हणुन तो फेटाळण्यात यावा, तसेच अर्जदाराने न्यायमंचात दोन वर्षापेक्षा जास्त कालावधी नंतर सदरचा क्लेम दाखल केलेला असल्यामुळे, तो मर्यादीत कालावधीत येत असल्याने सुध्दा फेटाळण्यात यावा. सदरची तक्रार ही खोटी असल्यामुळे फेटाळण्यात यावी.
मुद्दे उत्तर
- अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? होय.
- गैरअर्जदाराने अर्जदाराच्या सेवेत त्रूटी केली आहे काय ? अंशत: होय
- अर्जदार अनुतोष मिळण्यास पात्र आहे काय ? अंशत: होय.
- काय आदेश ? अंतिम आदेशा प्रमाणे
मुद्दा क्र. 1 चे उत्तर होय असून, अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे व त्याचा विमा पॉलिसी नं. 37420/65 असून त्याचा कालावधी दि. 10.10.2008 ते 09.10.2010 असा आहे, व लाईफ केअर कार्ड एल/2008/एमएच-08/117166-000000 असा आहे.
मुद्दा क्र. 2 चे उत्तर अंशत: होय असे असून, गैरअर्जदार यांनी अर्जदाराच्या सेवेत कोणतीही त्रूटी केलेली नाही. गैरअर्जदार क्र. 2 कडे अर्जदार हा नौकरी करीत होता, ही बाब गैरअर्जदार क्र्. 2 यांनी मान्य केलेली आहे, व त्यानुसार हा आमचा ग्राहक आहे, हे ही त्यांना मान्य आहे. यातील गैरअर्जदार क्र. 1 व 2 हे दोन्हीही अहमदनगर येथील आहेत. त्यामुळे सदरच्या न्यायमंचाला कार्यक्षेत्र येत नाही. तसेच हनमंत भिमा हडगीले यांचे गैरअर्जदार क्र. 1 ने जे कागदपत्र दाखल केलेले आहेत, त्यानुसार अपंगत्वाचे प्रमाणपत्रावर 22 टक्के लेफ्ट व दुसरे 26 टक्के लेफ्ट असे मिळुन एकुण 48 टक्के अंपगत्व अरुणकुमार राव या अस्थिव्यंग तज्ञांनी दिलेला आहे, हे गणित न्यायमंचाला पटत नाही. अर्जदाराला पुर्ण अपंगत्व डाव्या हाताच्या दंडाला व डाव्या पायाच्या पिंडरीला नागरीक सुरक्षा पॉलिसीच्या नियमानुसार कमीत कमी अपंगत्व 40 टक्के पाहिजे. त्यामुळे या दोघांचे गणित 48 टकके होते, सदरची केस ही अपंगत्वाच्या नियमामध्ये व पॉलिसीच्या नियमामध्ये बसत नसल्यामुळे हे न्यायमंच अर्जदारास मोबदला देवु शकत नाही. तसेच अर्जदाराच्या पॉलिसीच्या कव्हर नोटच्या मागे असे लिहीलेले आहे की, नागरिक सुरक्षा योजना सेक्शन II ‘’दुर्घटना मे हॉस्पीटलायझेशन का खर्च, हॉस्पीटलसे डिस्चार्ज होणे पर हुआ खर्च इसमे गृहीत नही होता ,’’ फायदे हरसाल बीमा राशीसे ज्यादा 20 टक्के इतनी किसी कारणवश उस साल सुदैव से हॉस्पीटल मे दाखिल होने की बारी नही आयी तो यह राशी अगले साल ऐसे खर्च के लिए जोडी नही जाती सारांश हरसाल बीमा राशी के 20 टक्के इतनी ही राशी रहेगी. म्हणुन 20 टक्के अर्जदारास झालेला खर्च रु. 10292/- इतकी रक्कम हे न्यायमंच मंजुर करत आहे. व अपंगत्वाचे दिलेले प्रमाणपत्र या केसच्या व पॉलिसीच्या नियमा नुसार नसल्यामुळे अर्जदारास त्याचा कोणताही मोबदला हे न्यायमंच देत नाही. म्हणुन सदरच्या केसमध्ये झालेला उशीर पाहता, त्यास रु. 500/- कॉस्ट लावुन , त्याचा उशीर माफ करण्यता आलेला आहे. त्याची तक्रार हे न्यायमंच अंशत: दवाखान्याचा खर्च सेक्शन 2 पॉलिसीच्या अटी नुसार मान्य करत आहे.
सबब न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
आदेश
- अर्जदाराचा अर्ज अंशत: मंजुर करण्यात येत आहे.
- गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी अर्जदारास रक्कम रु. 10292/- (रुपये दहा हजार दोनशे ब्यानव फक्त) आदेश प्राप्ती पासुन 30 दिवसाचे आत दयावेत.
- गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी आदेश क्र. 2 चे पालन मुदतीत न केल्यास त्यावर तक्रारदार दाखल तारखेपासुन द.सा.द.शे. 9 टक्के व्याज देणे बंधनकारक राहील.
स्वा/- स्वा/-
(श्रीमती ए.जी.सातपुते) (श्रीमती रेखा जाधव)
अध्यक्षा सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच लातूर.
**//राजूरकर//**