जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच लातूर यांचे समोर
ग्राहक तक्रार क्रमांक – 11/2012 तक्रार दाखल तारीख – 21/11/2012
निकाल तारीख - 09/02/2015
कालावधी - 02 वर्ष , 02 म. 18 दिवस.
गंगाबाई हरिश्चंद्र गवळी,
वय – 60 वर्षे, धंदा – घरकाम,
रा. जगळपुर, ता. चाकुर, जि. लातुर.
हा.मु. महादेव नगर, नवीन नांदेड नाका,
लातुर. ....अर्जदार
विरुध्द
- व्यवस्थापक,
युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लि.,
मेन रोड, गोरक्षण समोर, लातुर.
- महाव्यवस्थापक,
लातुर जिल्हा मध्यवती सहकारी बँक,
मेन रोड, लातुर.
- व्यवस्थापक,
लातुर जिल्हा मध्यवती सहकारी बँक,
आष्टामोड ता. चाकुर जि. लातुर.
- चेअरमन,
विविध कार्यकारी सेवा सोसायटी,
जगळपुर, ता. चाकुर जि. लातुर. ..गैरअर्जदार
को र म - श्रीमती ए.जी.सातपुते, अध्यक्षा.
श्री अजय भोसरेकर, सदस्य
श्रीमती रेखा जाधव, सदस्या.
तक्रारदारातर्फे :- अॅड. एल.डी.पवार.
गैरअर्जदार क्र. 1 तर्फे :- अॅड.एस.व्ही.तापडीया.
गैरअर्जदार क्र. 2 व 3 तर्फे :- अॅड.शोभा गोमारे.
गैरअर्जदार क्र. 4 तर्फे :- अॅड.एस.के.मोरे.
निकालपत्र
(घोषितव्दारा – श्रीमती रेखा जाधव,मा.सदस्या )
अर्जदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे गैरअर्जदारा विरुध्द दाखल केली आहे.
अर्जदारास मौजे जगळपुर ता. चाकुर जि. लातुर येथील रहिवाशी आहे. अर्जदाराचे मयत पती गैरअर्जदार क्र. 4 चे सभासद होते. अर्जदाराचे मयत पतीने हयात असताना जनता अपघात विमा या योजनेत गैरअर्जदार क्र. 4 मार्फत विमा रक्कम भरली होती. अर्जदाराचे मयत पती दि. 11/05/2010 रोजी सकाळी 7.00 वाजता मोटारसायकल क्र. एम.एच. 24-एच-0455 बसून शेताकडे जात असताना लातुर नांदेड रोडवर महाराणा प्रताप नगर जवळ पाठीमागून येणारी अम्बूलंस व्हॅन क्र. एम.एच. 04 – एच. 0593 त्या चालकाने त्याच्या ताब्यातील व्हॅन निष्काळजीपणे भरधाव वेगाने चालवून अर्जदाराच्या मयत पतीच्या मोटार सायकलला धडक देवून गंभीर जखमी केले. सदर अपघातात अर्जदाराच्या मयत पतीच्या डोक्याला गंभीर मार लागल्यामुळे उपचारासाठी सरकारी दवाखान्यात घेवून गेले असता डॉक्टरानी मृत घोषित केले. सदर घटनेची नोंद पोलीस स्टेशनला 70/10 ने केली. अर्जदाराने जनता अपघात विमा मिळण्यासाठी मुदतीत विमा प्रस्ताव कागदपत्रासहीत गैरअर्जदार क्र. 4 कडे दाखल केला. गैरअर्जदाराने अर्जदारास विमा रक्कम दिली नाही. म्हणून सदर तक्रार दाखल करण्यास कारण प्राप्त झाले.
अर्जदाराने तक्रारी अर्जात रक्कम रु. 1,00,000/- त्यावर अपघात झालेल्या तारखेपासुन 15 टक्के व्याज मानसिक व शारिरीक त्रासापोटी रु. 10,000/- तक्रारी अर्जाच्या खर्चापोटी रु. 5,000/- ची मागणी केली आहे.
अर्जदाराने तक्रारी अर्जासोबत पुरावा म्हणून शपथपत्र दिले आहे. व त्यासोबत एकुण 04 कागदपत्रे दाखल केली आहेत.
गैरअर्जदार क्र. 2 व 3 ने लेखी म्हणणे दिले आहे. गैरअर्जदार क्र. 4 कडुन आलेली कागदपत्रे व विमा प्रस्ताव गैरअर्जदार क्र. 1 यास दिला आहे. गैरअर्जदार क्र. 2 व 3 ने सेवेत त्रुटी केली नाही. अर्जदाराचा विमा दावा गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांचे विरुध्द खर्चासह नामंजुर करावा.
गैरअर्जदार क्र. 4 ने लेखी म्हणणे दिले आहे. अर्जदार हा गैरअर्जदार क्र. 4 चा ग्राहक होत नाही. अर्जदाराने विमा दाव्यासाठी कागदपत्रे दिली होती. सदर कागदपत्रे गैरअर्जदार क्र. 3 कडे पाठवून दिली आहेत.
गैरअर्जदार क्र. 1 ने लेखी म्हणणे दिले आहे. अर्जदाराने सिध्द करावे की, अर्जदाराचे मयत पती गैरअर्जदार क्र. 4 सभासद होते. अर्जदाराचे मयत पतीचा दि. 11/05/2010 रोजी अम्बुलंस निष्काळजीपणे चालवून अर्जदाराच्या मयत पतीच्या मोटार सायकलला पाठीमागून धडक दिली हे अर्जदाराने सिध्द करावे. अर्जदाराने मुदतीत विमा प्रस्ताव व कागदपत्रे गैरअर्जदाराकडे दिली हे सिध्द करावे. अर्जदाराने सिध्द करावे की, गैरअर्जदाराच्या मागणीप्रमाणे कागदपत्रे दिली. गैरअर्जदारास तक्रार दाखल करण्यास कारण प्राप्त झाले नाही. अर्जदाराची तक्रार प्री-मॅच्यूअर्ड आहे. अर्जदाराचा विमा दावा पेंडींग आहे. अर्जदाराने त्याच्या व्यतीरिक्त अन्य वारसास तक्रारी पार्टी केली नाही, म्हणून सदरची तक्रार योग्य नाही. गैरअर्जदाराने सेवेत त्रुटी केली नाही. अर्जदाराने तक्रार मुदतीत दाखल केली नाही. अर्जदाराची तक्रार दंडासह खारीज करण्यात यावी.
अर्जदाराचा तक्रारी अर्ज व त्यासोबत दाखल केलेली कागदपत्रे, व पुरावा म्हणून शपथपत्र तसेच गैरअर्जदाराचे लेखी म्हणणे, अर्जदार व गैरअर्जदार यांचा युक्तीवाद याचे अवलोकन केले असता खालील मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तरे
- अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? होय
- गैरअर्जदाराने अर्जदाराच्या सेवेत त्रूटी केली आहे काय ? होय
- अर्जदार अनुतोष मिळण्यास पात्र आहे काय ? होय
- काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
मुद्दा क्र. 1 चे :- अर्जदाराचे मयत पतीने हयात असताना गैरअर्जदार क्र. 4, 3, 2 मार्फत गैरअर्जदार क्र. 1 कडून जनता अपघात विमा योजना ही पॉलीसी घेतली होती. त्यासाठी लागणारा प्रिमियम गैरअर्जदार क्र. 1 ने स्विकारल्यामुळे अर्जदार ही वारस या नात्याने लाभार्थी ग्राहक या संज्ञेत येते. म्हणून मुद्दा क्र. 1 चे उत्तर होय असे आहे.
मुद्दा क्र. 2 चे :- अर्जदाराचे मयत पती यांना जगळपुर ता. चाकुर जि. लातुर येथे गट क्र. 239 मध्ये 3 हेक्टर 67 आर जमीन होती. सदर 7/12 च्या उता-यावरुन दिसुन येते. अर्जदाराचे मयत पती दि. 11/05/2010 रोजी मोटार सायकल क्र. एम.एच. 24 – एच. 0455 वर बसुन शेताकडे जात असताना लातुर नांदेड रोडवर महाराणा प्रताप नगर जवळ पाटीमागून येणारी अंम्बूलन्स कं. एम.एच. 04 – एच. 0593 चे चालकाने निष्काळजीपणे चालवून अर्जदाराच्या मयत पतीच्या मोटार सायकलला धडक मारल्यामुळे अपघात झाला हे दि. 11/05/10 रोजीच्या घटनास्थळ पंचनाम्यावरुन दिसुन येते. सदर घटनेची पोलीस स्टेशनला नोंद क्र. 70/10 करण्यात आली. अर्जदाराच्या मयत पतीचा शवविच्छेदन अहवालामध्ये मृत्यूचे कारण गंभीर स्वरुपाच्या जखमा असल्याचे दिसुन येते. गैरअर्जदार क्र.2 ने गैरअर्जदार क्र. 1 कडे दि. 21/06/10 रोजीच्या पत्रानुसार विमा प्रस्ताव कागदपत्रासह दिल्याचे दिसुन येते. अर्जदाराने विमा प्रस्ताव गैरअर्जदारास मुदतीत दिल्याचे सिध्द होते. गैरअर्जदार क्र. 4 ने ठरावाची प्रत दि. 15/06/10 रोजी दिली आहे. त्यात अर्जदाराचे मयत पतीचा सभासद क्र. 55 असल्याचे दिसुन येते. अर्जदाराच्या मयत पतीचा मृत्यू अपघाती असल्याचे सिध्द होते. अर्जदाराने गैरअर्जदाराकडे विमा मुदत कालावधीत विमा प्रस्ताव देवून सुध्दा अर्जदार विमा मिळण्यास पात्र असताना गैरअर्जदाराने विमा रक्कम न देवून सदरचा विमा प्रस्ताव प्रलंबित ठेवून सेवेत त्रुटी केल्याचे दिसुन येते. म्हणून मुद्दा क्र. 2 उत्तर होय असे आहे.
मुद्दा क्र. 3 चे :- अर्जदाराचे मयत पतीचा मृत्यू अपघाती असल्यामुळे अर्जदार हा जनता अपघात विमा योजना रक्कम रु. 1,00,000/- व मानसिक, शारीरीक तसेच तक्रारी अर्जाच्या खर्चापोटी रु. 8,000/- मिळण्यासा पात्र आहे.म्हणून मुद्दा क्र. 3 चे उत्तर होय असे आहे.
सबब हे न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारित करत आहे.
आदेश
1) अर्जदाराची तक्रार अंशत: मंजुर करण्यात येत आहे.
2) गैरअर्जदार 1 यांना आदेश देण्यात येतो की, अर्जदारास रक्कम रु. 1,00,000/-(अक्षरी
एक लाख रुपये फक्त) आदेशाची प्रत प्राप्तीपासुन 30 दिवसाच्या आत देण्यात यावेत.
3) गैरअर्जदार 1 यांना आदेश देण्यात येतो की, आदेश क्र. 2 चे पालन मुदतीत न
केल्यास अपघात घडलेल्या तारखेपासुन त्यावर द.सा.द.शे. 9 टक्के व्याज
देण्यास जबाबदार राहतील.
4) गैरअर्जदार 1 यांना आदेश देण्यात येतो की, अर्जदारास मानसीक व शारिरीक
त्रासापोटी रु. 5,000/-(अक्षरी पाच हजार रुपये फक्त) व तक्रारीच्या खर्चापोटी
रु.3,000/- (अक्षरी तीन हजार रुपये फक्त) आदेशाची प्रत प्राप्तीपासुन 30
दिवसाच्या आत देण्यात यावेत.