जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 361/2008. प्रकरण दाखल तारीख - 18/11/2008 प्रकरण निकाल तारीख –03/02/2009 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे, - अध्यक्ष मा.श्रीमती सुजाता पाटणकर - सदस्या मा.श्री.सतीश सामते - सदस्य राजेंद्रकौर अमरसिंग सरदार वय, 65 वर्षे, धंदा -- रा.येळेगांव, ता.जि. नांदेड. अर्जदार विरुध्द. 1 मा. व्यवस्थापक, दि. नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. स्टेशन रोड, नांदेड. गैरअर्जदार 2. मा. व्यवस्थापक, दि. नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. शाखा लक्ष्मी नगर (देगांव येळेगांव) अर्जदारा तर्फे वकील - अड.शिवराज पाटील. गैरअर्जदार क्र. 1 व 2 तर्फे वकील - अड.एस.डी.भोसले. निकालपञ (द्वारा - मा.श्री.बी.टी.नरवाडे, अध्यक्ष ) गैरअर्जदार नांदेड जिल्हा सहकारी बँक यांचे सेवेतील ञूटी बद्यल अर्जदार यांनी खालील प्रमाणे तक्रार दाखल केली आहे. अर्जदार यांचे गैरअर्जदार यांचेकडे बचत खात्यात रु.38,717/- जमा आहेत. अर्जदार हे वयोवृध्द असल्यामूळे त्यांना उपराचारासाठी पैशाची आवश्यकता आहे. त्यामूळे त्यांनी गैरअर्जदार यांचकडे पैशाची मागणी केली, परंतु त्यांची मागणी पूर्ण केली नाही.रक्कम न देऊन गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना मानसिक ञास दिला आहे. म्हणून त्यांची मागणी आहे की, त्याचे खाते क्र.2378 मधील रु.38,717/- व्याजासह देण्यात यावेत. तसेच शारीरिक व मानसिक ञासापोटी आणि दाव्याच्या खर्चापोटी रु.10,000/- मिळावेत अशी विनंती केली आहे. गैरअर्जदार क्र. 1 व 2 हे वकिलामार्फत हजर झाले त्यांनी आपले लेखी म्हणणे मांडले आहे. गैरअर्जदार बँकेवर आर.बी.आय. ने 35 अ कलम लाऊन आर्थिक निर्बध घातले आहेत. अर्जदाराला जर रक्कमेची आवश्यकता असेल तर त्यांनी डॉक्टराचे प्रमाणपञ व उपचारासाठीची सर्व कागदपञे दाखल करुन प्रस्ताव दिल्यास तो प्रस्ताव मंजूरीसाठी आर.बी.आय. कडे पाठविण्यास बँक तयार आहे. मंजूर होऊन आलेली रक्कम बँक अर्जदारास देण्यास तयार आहे. रक्कम न देऊन बँकेने कोणतीही ञूटी केलेली नाही. म्हणून सदरची तक्रार फेटाळावी अशी मागणी केली आहे. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ, तसेच गैरअर्जदार यांनी पूरावा म्हणून शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकारानी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून व वकिलामार्फत केलेला यूक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी सिध्द होते काय ? नाही. 2. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र. 1 ः- अर्जदाराने खाते क्र.2378 मध्ये रु.38,717/- ठेवले होते ही बाब गैरअर्जदार यांना मान्य आहे. पण अर्जदार ही वयोवृध्द असल्यामूळे तिला रक्कमेची आवश्यकता पडली असेल ही बाब सूध्दा नाकारता येणार नाही. परंतु गैरअर्जदार बँकेवर आर.बी.आय. ने कलम 35 ए हे कलम लावून बँकेच्या आर्थिक व्यवहारावर निर्बध लादले असल्यामूळे बँक आर.बी.आय. च्या संमतीशिवाय ते रक्कम देऊ शकत नाही. त्यामूळे त्यांच्या सेवेतील ञूटी होत नाही. गैरअर्जदार बँकेने म्हटल्याप्रमाणे अर्जदाराने उपचाराचे कागदपञ व इतर कागदपञ दाखल करुन रक्कमे बाबतचा प्रस्ताव त्यांचेकडे सादर केल्यास तो प्रस्ताव बँक ताबडतोब आर.बी.आय.कडे पाठविण्यास तयार आहे. आर.बी.आय. ने मंजूर केलेली रक्कम अर्जदार यांना देण्यास तयार आहे. रक्कम न देऊन बॅकेने कोणतीही सेवेत ञूटी केलेली नाही. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज खालील प्रमाणे मंजुर करण्यात येतो. 2. अर्जदार यांनी योग्य व आवश्यक कागदपञासह रक्कमेबाबतचा प्रस्ताव गैरअर्जदार बँकेकडे सादर करावा व बँकेने तो प्रस्ताव त्यांचे मार्फत आर.बी.आय. कडे सादर करावा व आर.बी.आय. ने मंजूर केलेली रक्कम ताबडतोब अर्जदार यांना दयावी. 3. मानसिक ञासाबददल आदेश नाही. 4. दावा खर्च पक्षकारांनी आपआपला सोसावा. 5. पक्षकाराना आदेश कळविण्यात यावा. श्री.बी.टी.नरवाडे श्रीमती सुजाता पाटणकर श्री.सतीश सामते अध्यक्ष सदस्या सदस्य जे.यु.पारवेकर लघूलेखक. |