जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 355/2008. प्रकरण दाखल तारीख - 12/11/2008 प्रकरण निकाल तारीख - 16/01/2009 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे, - अध्यक्ष मा.श्रीमती सुजाता पाटणकर - सदस्या मा.श्री.सतीश सामते - सदस्य अंबादासराव पि.राजेश्वरराव कलंबरकर, वय, 64 वर्षे, व्यवसाय निवृत्त शिक्षक, रा.रविनगर, नांदेड. अर्जदार. विरुध्द. शाखा व्यवस्थापक, दि. नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. शाखा श्रीनगर, नांदेड. गैरअर्जदार. अर्जदारा तर्फे वकील - अड.के.एस.कुलकर्णी. गैरअर्जदार तर्फे वकील - अड.एस.डी.भोसले. निकालपञ (द्वारा-मा.श्रीमती.सुजाता पाटणकर,सदस्या ) गैरअर्जदार नांदेड जिल्हा सहकारी बँक यांचे सेवेतील ञूटी बददल अर्जदार यांनी खालील प्रमाणे तक्रार दाखल केली आहे, ती खालील प्रमाणे. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडे त्यांचे बचत खाते क्र. 9554 मध्ये दि.18 जुन 2005 पासुन जमा असलेली रक्कम रु.16,179/- जमा आहे ती रक्कम गैरअर्जदार यांना वेळोवेळी मागणी करुनही देत नाही. सदरील रक्कम उचलण्यासाठी बँकेत गेले असता अर्थीक व्यवहार सध्या बंद आहेत बँक चालु झाल्यानंतर तुमचे देण्यात येतील. अर्जदार यांना सदरील रक्कमेची आवश्यकता औषधोपचारासाठी अत्यंत आवश्यक आहे. गैरअर्जदार यांनी अर्जदार यांची रक्कम न देवुन सेवेत त्रुटी केली आहे म्हणुन अर्जदार यांनी ही तक्रार दाखल करुन त्यांना त्यांच्या खातेवर जमा असलेली रक्कम रु.16,179/- 5 % व्याजाने मिळावे अशी मागणी केली आहे. गैरअर्जदार हे वकिलामार्फत हजर झाले त्यांनी आपले लेखी म्हणणे मांडले आहे. गैरअर्जदार बँकेवर आर.बी.आय. ने 35 अ कलम लाऊन आर्थिक निर्बध घातले आहेत. त्यामुळे गैरअर्जदारास रु.1,000/- पेक्षा जास्त रक्कम भारतीय रिझर्व बँकेच्या पुर्व परवानगी शिवाय देता येत नाही. म्हणुन गैरअर्जदार यांनी सेवेत त्रुटी केलेली नाही. अर्जदारास रक्कम पाहीजे असल्यास औषधोपचारासाठी शैक्षणीक खर्चासाठी लग्नासाठी त्यासंबंधीची कागदपत्रे जोडुन विहीत नमुन्यातील अर्ज भरुन दिला तो प्रस्ताव रिझर्व बँकेकडे पाठविण्यास तयार आहे तसा प्रस्ताव अद्याप गैरअर्जदाराकडे अर्जदार यांनी दिलेला नाही. बँक पूर्ववत सूरु झाल्यानंतर अर्जदाराची रक्कम प्राधान्याने देण्यात येईल असे म्हटले आहे. म्हणून अर्जदाराची तक्रार नामंजूर करावी अशी मागणी केली आहे. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ, तसेच गैरअर्जदार यांनी पूरावा म्हणून शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकारानी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून व वकिलामार्फत केलेला यूक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. अर्जदार हे गैरअर्जदाराचे ग्राहक होतात काय? होय. 2. गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी सिध्द होते काय ? नाही. 3. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मुद्या क्र. 1 – अर्जदार यांनी अर्जासोबत गैरअर्जदार बँकेत रक्कम जमा असले बाबतचे पासबुक दाखल केले आहे,ही बाब गैरअर्जदार यांनी त्यांचे लेखी म्हणणे व शपथपत्रामध्ये नाकारलेली नाही. अर्जदार यांचा अर्ज,शपथपत्र त्यांनी दाखल केलेली कागदपत्र याचा विचार होता, अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे. मुद्या क्र. 2 अर्जदाराने त्यांचे खाते क्र.9554 रक्कम रु.16,179/- जमा केलेले आहेत. अर्जदार यांचे रक्कम रु.16,179/- जमा असल्याची बाब त्यांना मान्य आहे परंतु बँकेवर 35 अ कलम लावून बँकेवर निर्बध घातलेले असल्यामुळे त्यांना रु.1,000/- पेक्षा जास्त रक्कम देता येत नाही. व बँकेची परिस्थिती अतीशय हलाखीची आहे असे त्यांचे म्हणणे आहे. परंतु अर्जदाराची मागणी ही त्यांचे पुर्ण रक्कम व्याजासह मिळावी असे आहे. बँकेची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे अशा परिस्थितीत अनेक ठेवीदाराचे रक्कम वापस देणे शिल्लक आहे. मूदतीनंतरचे व्याज घेण्यावीषयी अर्जदारानी विचार करणे जरुरीचे आहे, परंतु अर्जदाराची मागणी ही कायदेशीर असल्याकारणाने व्याजाची रक्कम अर्जदाराच्या बचत खात्यात जमा करणे व नंतर बँक चालू झाल्यानंतर ती रक्कम प्राधान्याने देणे हेच योग्य होईल. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराची तक्रार खालील प्रमाणे मंजूर करण्यात येते. 2. अर्जदार यांनी हार्डशिप ग्रांऊडवर त्यांचा प्रस्ताव योग्य त्या कागदपत्रासह गैरअर्जदार यांचे सादर करावे. गैरअर्जदार यांनी अर्जदार यांचा हार्डशिप ग्राऊंडवरील प्रस्ताव भारतीय रिझर्व बँकेकडे मंजुरीसाठी पाठवावा मंजुर झालेली रक्कम अर्जदारास तात्काळ देण्यात यावी. 3. मानसिक ञासाबददल व दावा खर्चाबददल आदेश नाही. 4. संबंधीत पक्षकाराना निकाल कळविण्यात यावा. श्री.बी.टी.नरवाडे श्रीमती सुजाता पाटणकर श्री.सतीश सामते अध्यक्ष सदस्या सदस्य गो.प.निलमवार. लघूलेखक. |