Maharashtra

Kolhapur

CC/10/230

Rajkumar Sayajirao Mohite. - Complainant(s)

Versus

Manager.I,C,I.C.I.Bank ltd.and others. - Opp.Party(s)

Umesh Mangave,

15 Dec 2010

ORDER


monthly reportDistrict Consumer Forum, Kolhapur
Complaint Case No. CC/10/230
1. Rajkumar Sayajirao Mohite.Are.Tal-Karvir.Kolhapur ...........Appellant(s)

Versus.
1. Manager.I,C,I.C.I.Bank ltd.and others.Rajaram Road.Bagal Chowk.Kolhapur2. Div.Manager.I.C.I.C.Bank.ltd.I.C.I.C.I Bank Tower.Bandra Kurla. Complex.Mumbai.3. I.C.I.C.I.Bank ltd.Atharv Recall Agencies Shekhar Shinde.Vasant Plaza.Rajaram Road.balgal Chowk.Kolhapur ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh ,PRESIDENTHONABLE MRS. Mrs.V.N.Shinde ,MEMBER
PRESENT :Umesh Mangave,, Advocate for Complainant
D.M.Patil., Advocate for Opp.Party D.M.Patil, Advocate for Opp.Party D.M.Patil., Advocate for Opp.Party

Dated : 15 Dec 2010
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

निकालपत्र :- (दि.15/12/2010) (सौ.वर्षा एन.शिंदे,सदस्‍या)
 
(1)        तक्रार स्विकृत करुन सामनेवालांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला यांना नोटीस लागू होऊन ते वकीलांमार्फत हजर झाले व त्‍यांनी लेखी म्‍हणणे दाखल केले. उभय पक्षांच्‍या वकीलांचा अंतिम युक्‍तीवाद ऐकणेत आला.  
 
           सदरची तक्रार ही सामनेवाला बँकेने कर्ज वसुलीची कायदेशीर प्रक्रिये राबवली नसलेने दाखल केली आहे.                  
 
(2)        तक्रारदाराची थोडक्‍यात तक्रार अशी:- अ) तक्रारदार हे तक्रारीतील नमुद पत्‍त्‍यावर कायमचे रहिवाशी असून ते ट्रकचा व्‍यवसाय करतात. यातील सामनेवाला क्र.1 ही आंतरराष्‍ट्रीय बॅक असून तिचे मुख्‍य कार्यालय मुंबई येथे आहे. सामनेवाला क्र.2 ही सामनेवाला क्र.1 ची कार्पोरेट ऑफिस असून सामनेवाला क्र.3 ही सामनेवाला क्र.1 करिता नियुक्‍त केलेली एजन्सी आहे. यांचेमार्फत सामनेवाला क्र.1 बॅंक वसुलीचे कामकाज करते.
           ब) यातील तक्रारदार यांचे मालकीची स्‍वराज माझदा या कंपनीची मालवाहक वाहन टी-3500/झेड टी 54 सुपर या वर्गामधील तयार केलेली त्‍याचा चेस नंबरOFGL4 G M 0106837 इंजिन क्र.SLTF 0101329ब्राऊन कलरची खरेदी करणे‍करिता सामनेवाला क्र.1 बॅंकेकडे वाहनकर्ज मागणी अर्ज केला होता. त्‍याप्रमाणे तक्रारदार यांनी 25 टक्‍के रक्‍कम भरणा करुन उर्वरित रक्‍कम रु.6,50,000/- इतक्‍या कर्जाची मागणी केली. सदरचे कर्ज सामनेवाला बॅकेने मंजूर केले. सदर कर्जास मासिक हपता रु.17,978/- इतका ठरवून दिलेला होता. तक्रारदार यांनी दि.06/01/2010 अखेर रक्‍कम रु.4,50,233/- इतकी रक्‍कम कर्जखाती जमा केलेली आहे. तदनंतर सामनेवाला क्र.1 बँकेने रक्‍कम रु.1,25,063/- इतक्‍या रक्‍कमेचे हप्‍ते थकीत असलेचे खातेउता-यावर दाखवून दि.25/01/2010 रोजी यातील सामनेवाला क्र.3 मार्फत तक्रारदाराचे सदर नमुद वाहन जबरदस्‍तीने ताब्‍यात घेतले. सदरचे सामनेवालांचे हे कृत्‍य पूर्णपणे बेकायदेशीर आहे. सामनेवालांनी सदर कारवाई करणेपूर्वी कोणतीही नोटीस दिलेली नव्‍हती व नाही. तसेच सदर वाहन जप्‍त करणेचा कोणत्‍याही कोर्टाचा आदेश नाही. असे असतानादेखील यातील सामनेवाला यांचेकडे तक्रारदार सदरचे वाहन पुन्‍हा तक्रारदारांचे ताब्‍यात देणेकरिता जाऊन भेटले असता सामनेवालांनी रक्‍कम रु.36,000/- भरणा करा मग गाडी ताब्‍यात देतो असे सांगितले. त्‍याप्रमाणे दि.26/01/2010 रोजी तक्रारदार यांचकडून रक्‍कम रु.36,000/- भरणा करुन घेतलेले आहेत. नमुद वाहनाच्‍या कर्जाची मुदत दि.05/04/2011 पर्यंत आहे. अशा मुदतीमध्‍ये सदर कर्जाची पूर्णफेड होऊ शकते. निव्‍वळ दांडगाव्‍याप्रमाणे व जोर जबरदस्‍तीने यातील सामनेवाला क्र.3 या एजन्‍सीची मदत घेऊन व त्‍यामध्‍ये गुंडगिरी व दादागिरी करणारे इसम असलेने त्‍यांच्‍या भितीमुळे सामनेवालांनी सदर वाहन ताब्‍यात घेतले आहे.
 
           क) तक्रारदार यांचे उदरनिर्वाहाचे साधन सदरचा ट्रक व्‍यवसाय असून दि.25/01/2010 पासून आजपर्यंत सदरची मिळकत ही सामनेवाला क्र. 1 ते 3 यांचे ताब्‍यात आहे. जानेवारी ते मे महिना हा ट्रक व्‍यवसायाच्‍या दृष्‍टीने उत्‍पन्‍न होणेचा कालावधी असून सदर कालावधीमध्‍ये किमान दर दिवसा जास्‍तीत जास्‍त रु.2,000/- इतके सर्व खर्च जाऊन शिल्‍लक राहू शकतात. त्‍याप्रमाणे तक्रारदार यांना माल वाहतुकीसंबंधी ब-याच ऑर्डर मिळालेल्‍या होत्‍या. रक्‍क्‍म रु.2,000/- प्रमाणे तक्रारदारांचे नुकसान होत आहे. तसेच तक्रारदारांचे उदरनिर्वाहाचे दुसरे कोणतेही साधन नाही. त्‍यांच्‍या कुटूंबाचा चरितार्थ देखील चालविणे अडचणीचे होत आहे. तसेच वाहन जप्‍त केले असलेने गोवा व महाराष्‍ट्र चे परवाना नुतणीकरण करता आले नाही. तसेच पथकर भरणे देखील अडचणीचे झाले आहे. तक्रारदाराचे आतापर्यंत रक्‍कम रु.1,46,000/- इतक्‍या रक्‍कमेचे नुकसान झालेले आहे व येथून पुढे होत राहणार आहे.
 
           ड) तक्रारदार यांनी सामनेवालांकडे वारंवार वाहन ताब्‍यात देणेविषयी मागणी करुनही दाद दिली नाही तसेच तक्रारदारांचा कोणताही तक्रार अर्ज स्विकारत नाहीत. शेवटी दि.23/03/2010 रोजी पाळंदे कुरिअर मार्फत पत्र देऊन गाडी ताब्‍यात मिळणेबाबत विनंती केलेली आहे. तसेच सदरचा अर्ज घेऊन तक्रारदार दि.19/03/2010, 20/03/2010, 22/03/2010 रोजी वारंवार सामनेवालांकडे गेले. परंतु सामनेवालांनी त्‍याची दखल घेतली नाही. उलट नमुद वाहन विक्री करुन रक्‍कम वसुल करणार असलेबाबत तक्रारदार यांना धमकावले व तेथून हाकलून लावले. तक्रारदार यांनी रक्‍कम रु.4,86,233/- इतकी भरणा केलेली असून सदर वाहनाची सध्‍याच्‍या बाजारभावाप्रमाणे होणारे मुल्‍यांकन रु.4,50,000/- इतके होऊ शकते. पंरतु सामनेवाला हे नमुद वाहन कमी रक्‍कमेस विक्री करु शकतात. त्‍यामुळे तक्रारदार यांना नमुद वाहनाची नितांत गरज असलेने व त्‍यावर त्‍यांच्‍या कुटूंबाचा उदरनिर्वाह असलेने सदर वाहन ताब्‍यात मिळणेकरिता तसेच सामनेवालांच्‍या या बेकायदेशीर व जबरदस्‍तीने केलेल्‍या कारवाईस प्रतिबंध करावा व झालेली नुकसान भरपाई वसुल होऊन मिळणेकरिता प्रस्‍तुतचा तक्रार अर्ज दाखल करणे भाग पडले आहे. सबब सामनेवालांनी नमुद वाहन ताब्‍यात घेतलेने तक्रारदाराने झालेले नुकसानीची रक्‍कम रु.1,46,000/-, मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्‍कम रु.25,000/-, प्रवास खर्च व इतर खर्चाची रक्‍कम रु.5,000/-, तक्रार अर्जाचा खर्च व वकील फी रु.7,500/- असे एकूण रक्‍कम रु.1,83,500/- सामनेवालांकडून वसुल होऊन मिळावेत अशी विनंती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे.   
 
(03)       तक्रारदाराने आपल्‍या तक्रारीच्‍या पुष्‍टयर्थ नमुद वाहन स्‍वराज मझदा या गाडीचेसामनेवाला बॅकेचे माहितीपत्रक, तक्रारदाराचे कर्जाचा खातेउतारा, तक्रारदाराने सामनेवाला यांना दिलेले पत्र, सदर पत्र कुरिअर मार्फत पाठविलेली कुरिअरची पावती, गाडीचे आर.सी.बुक, सामनेवाला यांनी तक्रारदारांना पाठविलेले पत्र इत्‍यादी कागदपत्रे दाखल केल्‍या आहेत.
 
(04)       सामनेवाला यांचे म्‍हणणेनुसार तक्रारदाराची तक्रार वस्‍तुस्थितीनुसार व कायदयाच्‍या दृष्‍टीकोनातून चालणेस पात्र नाही. तक्रारदार हा स्‍वच्‍छ हाताने मे. मंचासमोर आलेला नाही. तक्रारदार स्‍वत: त्‍यांचे तक्रारीत कबूल करतात की त्‍यांनी स्‍वराज्‍य मझदा ट्रक खरेदी करणेसाठी सामनेवालांकडून कर्ज घेतले होते. तक्रारदार व सामनेवाला यांचेमधील हा व्‍यवहार हा कमर्शिअल हेतूचा असलेने तक्रारदार हा ग्राहक होत नाही. तक्रारदार हा ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदीनुसार ग्राहक या संज्ञेत बसत नाही. तसेच सदरचा वाद हा ग्राहक वाद होत नाही. प्रस्‍तुतची तक्रार चालविणेचे अधिकारक्षेत्र या मंचास नाही.
 
           ब) सामनेवाला आपल्‍या लेखी म्‍हणणेत पुढे सांगतात, तक्रारदारचे कर्ज थकीत गेलेने  सामनेवाला यांना तक्रारदाराचा नमुद ट्रक ताब्‍यात घेणे व त्‍याची विक्री करण्‍याची कार्यवाही करावी लागली. सदरची कृती कायदयाच्‍या चाकोरीत व कर्ज कराराच्‍या अटी व शर्तीनुसार आहे. कर्जाचा एक जरी हप्‍ता थकीत गेला तर प्रस्‍थापित कायदयानुसार सामनेवाला बँक तक्रारदाराचा ट्रक ताब्‍यात घेऊ शकते. तक्रारदार हा थकबाकीदार असलेने त्‍याचे स्‍वत:च्‍या चुकीचा फायदा त्‍यास घेता येणार नाही. तक्रारदार हा स्‍वच्‍छ हाताने मंचासमोर आलेला नाही. तक्रारदाराने सदर मंचापासून फक्‍त वस्‍तुस्थितीच दडवलेली नसून बनावट कागदपत्रे प्रबंधकाकडून प्रमाणीत करुन दाखल केलेली आहेत. तक्रारदार रक्‍कम रु.18,000/- चे दोन मासिक हप्‍ते जमा केलेले आहेत असे दाखविण्‍याचा प्रयत्‍न करतोय. मात्र त्‍याने अशी रक्‍कम भरलेली नाही. सबब त्‍याचेविरुध्‍द फौजदारी कार्यवाही करणेत यावी.
 
           क) वस्‍तुत: तक्रारदार हा सामनेवाला क्र. 1 व 2 यांचेकडे त्‍याचे व्‍यवसायासाठी लागणारे वाहन खरेदीसाठी कर्ज मिळणेबाबत संपर्क साधलेला होता. त्‍यानुसार दि.08/05/2007च्‍या हायपोथीकेशन करार कर्ज क्र.एलव्‍हीकेपीआर-00010380023 अटी व शर्तीसह केलेला होता. सबब सदर कराराच्‍या अटी व शर्तीनुसार नमुद वाहन तारण गहाण होते. सदर कर्जाची परत फेड रक्‍कम रु.17,978/- प्रतिमाह प्रमाणे 47 मासिक हप्‍त्‍यामध्‍ये करणेची होती. मात्र तक्रारदार वेळेवर हप्‍ते भरत नव्‍हता. तक्रारदार सदर कर्जाबाबत थकबाकीत गेलेने सामनेवालांनी कर्ज वसुलीसंदर्भात प्रक्रिया सुरु केली व त्‍यानुसार त्‍यास परिशिष्‍ट सी प्रमाणे कर्ज भरणा करणेसाठी नोटीस पाठवली. तरी तक्रारदाराने कर्ज रक्‍कम न भरलेने कराराच्‍या अटी व शर्तीप्रमाणे तक्रारदाराचे नमुद वाहन सामनेवालांनी ताब्‍यात घेतले व सदर बाबींसाठी कायदेशीर प्रक्रिया राबविलेली आहे. सामनेवालांनी कर्जाची थकीत रक्‍कम भरणेबाबत तक्रारदारास पुरेपुर संधी दिलेली आहे. तरीही तक्रारदाराने सदर रक्‍कमा न भरलेने त्‍यास विक्री पूर्व नोटीस पाठविलेली आहे. त्‍याप्रमाणे नमुद वाहन विक्री करुन सदरची रक्‍कम तक्रारदाराचे कर्ज खातेस भरणा केलेली आहे. तदनंतर दि.09/04/2010 रोजी नमुद वाहन विक्री केलेनंतर तक्रारदाराने थकीत रक्‍कमा देणेची तयारी दर्शविणारी नोटीस पाठविलेली आहे. तक्रारदाराने आपली जबाबदारी टाळणेसाठी बनावट कागदपत्रे दाखल केलेली आहेत. सामनेवालाने तक्रारदाराने दाखल केलेल्‍या तक्रारीस तसेच स्‍थगिती अर्जास परिच्‍छेद निहाय उत्‍तर दिलेले आहे.
 
           ड) सदर अर्जातील कलम 1 व 2 मधील मजकूर सर्वसाधारण बरोबर आहे. याबाबत वाद नाही; कलम 3 मधील मजकूर खोटा आहे. तक्रारदाराने रक्‍कम रु.36,000/- भरलेली बाब सामनेवाला नाकारतात. कारण तक्रारदाराने बनावट खाते उतारा दाखल केलेला आहे. सदर कागदपत्रे बनावट असलेचे उघडया डोळयांनी निदर्शनास येते. कलम 4 मधील मजकूर खोटा असलेने नाकारलेला आहे. तक्रारदार थकीत रक्‍कमा भरणेस असमर्थ ठरलेने त्‍याचे वाहन ताब्‍यात घेऊन विक्री केलेली आहे. तक्रारदार कधीही सामनेवालांकडे थकीत रक्‍कमा भरुन घेणेबाबत आलेला नव्‍हता. कलम 6 ते 8 मधील मजकूर चुकीचा व आधारहीन असलेने नाकारलेला आहे. तक्रारदाराने नमुद केलेले नुकसान हे काल्‍पनिक आहे. सबब वाहनाची विक्री करुन आलेली रक्‍कम तक्रारदाराचे खातेवर भरली असलेने वाहनाच्‍या विक्रीसाठी स्‍थगिती दयावी हा प्रश्‍नच उदभवत नाही. तक्रारदाराची तक्रार कोणत्‍याही परिस्थितीत मंजुर करता येणार नाही. सबब सामनेवालांना तक्रारदाराकडून रक्‍कम रु.10,000/- खोटी तक्रार दाखल केल्‍यामुळे देणेबाबत आदेश व्‍हावा अशी विनंती सामनेवालांनी सदर मंचास केली आहे.
 
(05)       सामनेवालांनी आपल्‍या म्‍हणणेच्‍या पुष्‍टयर्थ नमुद कर्जाचा खातेउतारा, लोन रिकॉल नोटीस, असेट पझेशन किट, प्रिसेल लेटर, इत्‍यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत.तसेच ई मेल ऑक्‍शन डॉक्‍युमेंटस दाखल केलेले आहेत.  
 
(06)       तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे व सामनेवालांचे लेखी म्‍हणणे व दाखल कागदपत्रे तसेच उभय पक्षांच्‍या वकीलांचा युक्‍तीवाद इत्‍यादीचे बारकाईने अवलोकन केले असता पुढील महत्‍वाचे मुद्दे निष्‍कर्षासाठी येतात.
1. सामनेवालांनी सेवेत त्रुटी ठेवली आहे काय---नाही.
2. काय आदेश                                        --- शेवटी दिलेप्रमाणे
 
मुद्दा क्र.1 :- तक्रारदाराने त्‍याचे व्‍यवसायासाठी स्‍वराज्‍य मझदा हे वाहन टी-3500/झेड टी 54 सुपर या वर्गामधील तयार केलेली त्‍याचा चेस नंबरOFGL4 G M 0106837 इंजिन क्र.SLTF 0101329 ब्राऊन कलरचे वाहन खरेदीसाठी सामनेवालांकडे कर्जाची मागणी केलेली होती. त्‍याप्रमाणे 25 टक्‍के रक्‍कम भरणा करुन उर्वरित रक्‍कम रु.6,50,000/- इतक्‍या कर्जाची मागणी केली होती व ती मंजूर झालेली आहे. त्‍याप्रमाणे तक्रारदार व सामनेवाला यांचेमध्‍ये कर्ज करार क्र.एलव्‍हीकेपीआर-00010380023 झालेला आहे. सदर कर्जासाठी प्रतिमाह रक्‍कम रु.17,978/- इतका मासिक हप्‍ता होता याबाबत वाद नाही. सामनेवाला यांनी दाखल केलेल्‍या     खातेउता-यावरुन इन्‍स्‍टॉलमेंट पेड रक्‍कम रु.5,75,296/- इतकी नोंद असून पैकी मुद्दल रक्‍कम रु.4,03,525/- व व्‍याज रक्‍कम रु.1,71,771/- ची नोंद आहे. सदर कर्जासाठी रक्‍कम रु.17,978/- मासिक हप्‍ता असून सदर कर्जाची परतफेड 47 हप्‍त्‍यामध्‍ये करणेची होती. सदर कर्जाचा कालावधी हा दि.05/06/2007 ते 05/04/2011 असा नमुद आहे. तर कर्ज रक्‍कम  रु.6,50,000/- ची नोद दिसून येते. याबाबत सामनेवालांचा वाद नाही.
 
           ब) सामनेवालांनी आपल्‍या म्‍हणणेमध्‍ये तक्रारदाराने तक्रार अर्ज कलम 3 मध्‍ये रक्‍कम रु.36,000/- इतकी कर्ज खातेवर दि.26/01/2010 रोजी सामनेवालांनी भरुन घेतलेचे नमुद केले आहे. सदरचा मजकूर सामनेवालांनी स्‍पष्‍टपणे नाकारलेला आहे. तसेच तक्रारदाराने सदर रक्‍कमा भरणा केलेबाबत खातेउता-यात दाखविलेल्‍या नोंदी या खोटया आहेत व बनावट खातेउतारा दाखल करुन केलेल्‍या आहेत. त्‍यामुळे त्‍यांचेवर फौजदारी कारवाई करावी असे आपले म्‍हणणेमध्‍ये स्‍पष्‍टपणे नमुद केले आहे. त्‍याबाबत दि‍.03/07/2010 रोजी सामनेवालांनी तक्रारदाराने तक्रारीसोबत प्रबंधकांनी प्रमाणित केलेला खातेउतारा दाखल केलेला असून सदरचा खातेउतारा हा बनावट आहे. सबब मूळ खातेउतारा दाखल करणेबाबत आदेश व्‍हावा. त्‍यामुळे सदर खोटया नोंदी केलेचे तसेच सदर नोंदी चुकीच्‍या रकान्‍यात दाखविल्‍याचे नमूद केले आहे. त्‍यानुसार सदर मंचाने सदर दिवशी मूळ खाते उतारा दाखल करणेबाबत आदेश पारीत केला. त्‍यानुसार तक्रारदाराने कर्ज खातेउतारा दाखल केलेला आहे. सदर अस्‍सल खातेउता-याचे अवलोकन केले असता पहिल्‍या पानावर ठिकठिकाणी व्‍हाईटनर लावलेचे दिसून येते. यामध्‍ये पेज, स्‍टेटमेंट डेटचे खाली, इन्‍स्‍टॉलमेंट ओव्‍हरडयूज, आदर ओव्‍हरडयूज, फिनोन होम तसेच सदर पानावर 8 मे, 5 जून, 5 जुलै, 14 जुलै,-2007 मधील रकान्‍यामध्‍ये व्‍हाईटनर लावलेचे दिसून येते. सदर खातेउता-याच्‍या शेवटच्‍या पानावर पेज खाली, दि.26/01/2010,ओडी चार्जेस या रकान्‍यामध्‍ये दोन ठिकाणी व्‍हाईटनर लावलेचे उघडया डोळयांनी दिसून येते. याचा विचार करता तक्रारदाराने दाखल केलेल्‍या खातेउतारा मूळ नोंदी असणारा नाही. त्‍यामुळे सदरची कागदपत्रे पुरावा म्‍हणून वाचता येणार नाहीत. तसेच रक्‍कम रु.36,000/- भरणा केलीबाबत तक्रारदाराने भरणा रिसीट दाखल केलेली नाही. याचा विचार करता तक्रारदार हा स्‍वच्‍छ हाताने सदर मंचासमोर आलेला नाही असे या मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.
 
           क) तक्रारदाराने सदर कर्जापोटी दिलेले चेक दि.08/01/2010 चा चेक क्र.56181339032 बाऊन्‍स झालेची नोंद दिसून येते. तक्रारदार हा मासिक हप्‍ते भरणेस असमर्थ ठरलेला आहे हे स्‍पष्‍टपणे दिसून येते. त्‍यामुळे सामनेवाला बँकेने सदर कर्ज वसुलीसाठी दि.12/01/2010 रोजी रक्‍कम रु.1,07,085/- देय आहे. तसेच पुढीलही हप्‍ते देय आहेत. सबब कराराप्रमाणे एकूण रक्‍कम रु.4,09,598.95 पै. त्‍यावरील व्‍याज व इतर आकार सदर नोटीस मिळालेपासून 7 दिवसांचे आत भरणा करणेबाबत कळवलेचे स्‍पष्‍टपणे दिसून येते. त्‍याप्रमाणे सामनेवाला बॅंकेने दाखल केलेले असेट पझेशन किट क्र.0515903 दि.25/01/2010 नुसार सदर कर्ज करारानुसार थकीत गेलेले वाहन स्‍वराज्‍य मझदा वाहन क्र.एमएच-09-बीसी-5072 ताब्‍यात घेणेबाबत अथर्व रिकॉल एजन्‍सी गिरीष नाईक यांनी वाहन ताब्‍यात घेणेबाबत आदेश दिला होता व सदरचा आदेश दि.25/01/2010 रोजी सदर एजन्‍सीला मिळालेला आहे व त्‍याप्रमाणे असेट पझेशन किट परत केलेबाबतची शेखर शिंदे यांची सहीची नोंद आहे. त्‍याचप्रमाणे दि.25/01/2010 रोजीचे तक्रारदाराचे सहीचे नमुद वाहन ताब्‍यात दिलेबाबतचे सरेंडर लेटर प्रस्‍तुत प्रकरणी दाखल केलेले आहे. तसेच दि.25/01/2010 रोजी सामनेवालांनी करवीर पोलीस स्‍टेशन यांना याबाबत कळवलेचे दाखल कागदपत्रांवरुन दिसून येते. त्‍यास सदर वाहन ताब्‍यात घेताना कोणत्‍या स्थितीत होते याबाबत माहितीच्‍या नोंदी असणारे फाईल कॉपी नं.0515903 प्रस्‍तुत प्रकरणी दाखल केलेले आहे. यावरसुध्‍दा तक्रारदाराने सदर वाहन सरेन्‍डर केलेबाबतची तक्रारदाराची सही दिसून येते. दि.27/01/2010 रोजीचे (विक्रीपूर्व) प्रिसेल लेटर तक्रारदारास पाठवून दिलेचे दाखल कागदपत्रावरुन दिसून येते. सदर पत्रामध्‍ये तक्रारदारास सदर कर्ज खातेबाबत रक्‍कम रु.4,26,110/- 24 टक्‍के ओव्‍हर डयू चार्जेससहीत 7 दिवसांचे आत रक्‍कम अदा करुन वाहन ताब्‍यात घेणेविषयी तक्रारदारास कळवलेचे दिसून येते. तदनंतर दि.09/04/2010 रोजी (विक्रीपश्‍चात) पोष्‍टसेल नोटीस तक्रारदारास पाठवून दिलेचे दिसून येते. यामध्‍ये कराराप्रमाणे मासिक हप्‍ते तक्रारदाराकडून भरले गेले नसलेने तसेच थकीत हप्‍ते भरणा करणेबाबत तक्रारदार असमर्थ ठरला आहे. त्‍याचप्रमाणे चेकचाही अनादर झालेला आहे. त्‍यामुळे नाईलाजास्‍तव दि.25/01/2010रोजी वाहन ताब्‍यात घ्‍यावे लागलेबाबत नमुद केलेचे दिसून येते.तसेच सामनेवाला सदर कर्ज प्रकरणाबाबत तडजोड करणेस तयार होते. तशी संधीही दिलेली होती. मात्र तक्रारदाराने रक्‍कम भरली नाही तसेच कोणताही प्रतिसाद न दिलेने नमुद वाहनाची खुली विक्री करुन आलेली रक्‍कम रु.3,55,000/- तक्रारदाराचे कर्ज खातेवर भरणा केलेली असून अदयापही रक्‍कम रु.1,03,111/- सदर कर्ज खातेवर येणे आहे व सदर रक्‍कम 2 टक्‍के व्‍याजासहीत भरणा करणेबाबत तक्रारदारास कळवलेचे दिसून येते.तसेच तसेच सामनेवालांनी ई मेल दाखल केलेला आहे. सदर ई मेल हा दि.06/07/2010 रोजीचे ई मेल ऑक्‍शन डॉक्‍युमेंट दाखल केलेले आहेत.
 
           ड) सदर कागदपत्रांचे बारकाईने अवलोकन केले असता सामनेवालाने कर्ज वसुलीसाठी कायदेशीर प्रक्रिया राबवलेचे स्‍पष्‍टपणे निदर्शनास येते. सदर वाहनाची विक्री होईपर्यंत तक्रारदाराने सामनेवालांकडे थकीत रक्‍कम भरणेबाबत तयार आहे अथवा त्‍याला संधी दयावी अशाप्रकारचा पत्र व्‍यवहार केलेचे दिसून आलेले नाही. मात्र दि.23/03/2010 रोजी सामनेवालांना दि.25/01/2010 रोजी गाडी ताब्‍यात घेतली आहात. त्‍यामुळे दरमहा रक्‍कम रु.1,000/- नुकसान झालेले आहे. सदर गाडी ताब्‍यात घेणेपूर्वी 5 महिन्‍याचे हप्‍ते थकीत होते. सदर हप्‍ते भरणा करणेस आलो असता भरुन घेणेस नकार दिला. तसेच रक्‍कम रु.90,000/- भरणेस तयार असून गाडी ताब्‍यात दयावी तसेच दि.05/04/2011 पर्यंत कर्जाची पूर्णफेड करीन याबाबत कळवलेचे दिसून येते. सामनेवालांनी दि.12/01/2010 रोजी नोंद रिकॉल नोटीस पाठविलेचे दिसून येते. त्‍यास तक्रारदाराने दि.23/03/2010 अर्ज देऊन संपर्क साधलेला आहे. मधल्‍या काळात तक्रारदाराने कोणताही संपर्क साधलेचे निदर्शनास आलेले नाही. तसेच दि.27/01/2010 रोजी (विक्रीपूर्व) प्रिसेल नोटीस तक्रारदारास‍ दिलेली आहे. तदनंतरही तक्रारदाराने कोणताही लेखी पत्रव्‍यवहार केलेचे दिसून येत नाही. तक्रारदाराने फक्‍त जाऊन भेटलो असता रक्‍कम भरुन घेणेस नकार दिला या केलेल्‍या कथनास कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. सबब तक्रारदाराचे नुसत्‍या कथनावर विश्‍वास ठेवता येणार नाही. सदर गाडी सामनेवालांनी ताब्‍यात घेतले त्‍यावेळी तक्रारदाराने पाच हप्‍ते थकीत असलेचे सदर अर्जात मान्‍य केलेचे दिसून येते. सदरची सर्व कागदपत्रे तक्रारदारानेही दाखल केलेली आहेत. याचा अर्थ सामनेवालांनी तक्रारदारास पाठविलेली कागदपत्रे तकारदारास मिळालेली आहेत. त्‍याचे ज्ञान तक्रारदारास होते.
 
           इ) सामनेवालांनी दाखल केलेल्‍या ई मेल ऑक्‍शन कागदपत्रांचे अवलोकन केले असता दि.20/03/010 रोजी मोहमंद अब्‍बास यांनी लावलेली अत्‍युच्‍च बोली रक्‍कम रु.3,55,000/- ला सदर वाहनाची विक्री केलेली आहे. सदर वाहनाची विक्री झालेनंतर तक्रारदाराने दि.23/3/2010 रोजी थकीत रक्‍कम भरणा करणेस तयार असलेबाबतचा अर्ज सामनेवालांकडे दिलेला दिसून येतो. तत्‍पुर्वी तक्रारदाराने कोणताही लेखी पत्रव्‍यवहार केलेचे निदर्शनास आलेले नाही.
 
           र्इ) एक हप्‍ता जरी थकीत गेला तरी सामनेवालांना संपूर्ण कर्ज वसुल करणेचे अधिकार कायदयाने प्राप्‍त होतात. मात्र सदर कर्ज वसुली कायदेशीर प्रक्रिया राबवून करणे क्रमप्राप्‍त आहे. वरील विस्‍तृत विवेचन व दाखल कागदपत्रांचा विचार करता सामनेवाला यांनी कर्ज वसुलीची योग्‍य ती कायदेशीर प्रक्रिया राबवलेचे दिसून येते. वरील विस्‍तृत विवेचनाचा विचार करता सामनेवाला यांनी कोणतीही सेवात्रुटी केलेचे दिसून येत नाही या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.                               
 
मुद्दा क्र.2 :- वरील विस्‍तृत विवेचनाचा विचार करता सामनेवालांनी कोणतीही सेवात्रुटी केली नसलेने हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
 
                           आदेश
 
1) तक्रारदाराची तक्रार नामंजूर करणेत येते.
 
2) खर्चाविषयी आदेश नाही.

[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT