जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2010/180 प्रकरण दाखल तारीख - 14/07/2010 प्रकरण निकाल तारीख – 19/11/2010 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील, - अध्यक्ष मा.श्रीमती.सुवर्णा देशमुख. - सदस्या श्री.केरबा पि.रामराव देशमुख, वय वर्षे 30, धंदा नोकरी, रा.व्यंकटाद्री निवास,गादेवार यांचे जवळ, अर्जदार. अंबेकरनगर,भाग्यनगर जवळ,नांदेड. विरुध्द. भारती एक्सए जनरल इन्शुरन्स कंपनी लि, तर्फे शाखाधिकारी/शाखा व्यवस्थापक, गैरअर्जदार पर्सिपोलिस 101 व 116, सेक्टर क्र.17, वर्धमान मार्केट समोर, वाशी,नवी मुंबई – 400703. अर्जदारा तर्फे वकील - अड.सुभाष दागडीया. गैरअर्जदारा तर्फे वकील - अड.बी.व्ही.भुरे. निकालपत्र (द्वारा- मा.श्रीमती.एस.आर.देशमुख, सदस्या) 1. अर्जदाराने नांदेड येथुन टुटेजा ऑटोमोटीव्ह यांच्याकडुन यामाहा एफझेडएस ही गाडी रु.68,989/- ला विकत घेतली त्यावेळेस टुटेजा ऑटोमोटीव्ह येथुन गैरअर्जदार यांचे प्रतीनीधी यांचे मार्फत गाडीचा अपघात विमा दावा उतरविण्यात आला होता. दि.26/12/2009 रोजी अर्जदार व त्यांचे मित्र यांचा अपघात मालेगांव रोडवर झाला त्याची विमा रक्कम अर्जदाराने गैरअर्जदार यांचेकडे मागीतली पण आजपर्यंत गैरअर्जदार यांनी न दिल्यामुळे अर्जदारास सदरील तक्रार मंचात दाखल करावी लागली. अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी की, अर्जदार हा नांदेड येथील रहीवाशी असून अंबेकरनगर येथे राहत आहेत. अर्जदाराचे काम व नौकरी सुरळीत व्हावी म्हणुन अर्जदाराने टुटेजा ऑटोमोटीव्ह यांचेकडुन यामाहा एफझेडएस दि.20/12/2009 रोजी रु.68,989/- विकत घेतली त्यावेळी टुटेजा ऑटोमोटीव्ह येथे गैरअर्जदार यांची प्रतीनीधी गाडीचा विमा उतरवीण्यासाठी उपस्थीत होते व त्यांनी अर्जदारास विमा पॉलिसी बाबत सर्व माहीती देऊन गाडी घेण्याचे निश्चित करायचे केले. म्हणजेच दि.17/12/2009 रोजी अर्जदाराकडुन गैरअर्जदार यांनी अर्ज घेतला व गैरअर्जदार कंपनीने दि.17/12/2009 ते 16/12/2010 या कालावधीसाठी अर्जदाराची गाडी इंन्शुअर्ड केली पण काही कारणाने अर्जदारास गाडीचे डिलीव्हर टुटेजा ऑटोमोटीव्ह यांचेकडुन दि.20/12/2009 रोजी देण्यात आली नाही. गैरअर्जदार यांचे एक्झेक्युटीव्ह ऑफिसने दि.26/02/2010 रोजी आभार पत्र दिले ते दाखल केले आहे. दि.26/12/2009 रोजी अर्जदार व त्यांचे मित्र बालाजी अडकिने हे दोघेजण काम उरकून परभणी ते नांदेडकडे येत असतांना मालेगांव रोडवरील किडस किंगडम शाळेजवळ नांदेडहून मालेगांवकडे जात असलेली इंडिका कार एमएच -22-3423 या कारने भरधाव वेगाने येऊन अर्जदाराच्या गाडीला समोरुन जोराची धडक दिली सदरील गाडी रॉंगसाईड होती. अर्जदार व त्यांचे मागे बसलेले बालाजी अडकिने हे दोघेही गंभीर जखमी झाले. इंडिका कारने दिलेल्या धडकेत मोटरसायकलचे जवळपास रु.35,000/- नुकसान झाले. अर्जदाराने अपघात यानंतर भाग्यनगर पोलिस स्टेशन नांदेड येथे गुन्हा क्र.364/09 दि.27/12/2009 रोजी नोंदविला. अर्जदाराच्या गाडीचा अपघात झाला यानंतर अर्जदाराने गैरअर्जदार विमा कंपनीकडे नुकसान भरपाई क्लेम फॉर्म दाखल केले त्याचा क्र. सी 0018485 असा आहे. क्लेम फॉर्म दाखल केल्यानंतर अर्जदाराने अपघात झालेली गाडी ऑथोराईज्ड डिलर टुटेजा ऑटोमोटीव्ह यांचेकडे दुरुस्तीला टाकली त्याची माहीती गैरअर्जदार विमा कंपनी यांना दिली त्यानंतर अर्जदाराचा क्लेम मंजुर व्हावा म्हणुन अर्जदाराने सतत पाठपुरावा केला. ई मेल द्वारे अर्जदाराने 12/03/2010, 22/03/2010, 25/03/2010, 28/03/2010, 29/03/2010, 06/4/2010, 08/04/2010 रोजी मेल पाठवून गाडीचा क्लेम ताबडतोब सेटल करावा अशी विनंती केली. मधील काळामध्ये अर्जदाराची गाडी दुरुस्त झाली व टुटेजा ऑटोमोटीव्ह यांना अर्जदाराने रु.33,324/- जवळपास रु.35,000/- गाडीच्या दुरुस्ती बाबत दिले व त्यांच्याकडुन गाडी घेतली. गैरअर्जदार यांनी अर्जदाराचा क्लेम सेटल न केल्यामुळे दि.31/05/2010 रोजी वकीला मार्फत नोटीस पाठवली पण गाडीचे नुकसान भरपाई रक्कम लवकर मंजुर करावा व सर्व्हे रिपोर्टची कापी द्यावी अशी विनंती अर्जदाराने गैरअर्जदारांना केली. गैरअर्जदार यांनी पत्र पाठवून रेजीस्ट्रेशनच्या त्रुटीबद्यल विचारणा केली त्यानंतर दि.16/06/2010 रोजी आम्ही गाडीच्या क्लेमबाबत विचार करीत आहोत, अशा पध्दतीचे उत्तर गैरअर्जदारांनी अर्जदाराला दिले पण आजपर्यंतही अर्जदारास गैरअर्जदार यांनी कुठलाही क्लेम दिलेला नाही. अर्जदाराने अर्जासोबत शपथपत्र दाखल केलेले आहे तसेच गाडी खरेदीची पावती त्यानंतर गैरअर्जदार यांच्याकडुन विमा काढल्याबद्यलचे विमा पॉलिसीची प्रती दि.19/02/2010 रोजीचे गैरअर्जदार यांचे आभार पत्र,एफ.आय.आर.दि.12/03/2010,22/03/2010,25/03/2010,28/03/2010,29/03/2010,06/4/2010,08/04/2010 या तारखांना पाठविलेले ई मेल ची प्रत तसेच टुटेजा ऑटोमोटिव्ह यांचे इस्टीमेट रु.31,573/- व रु.1,750/-. अर्जदाराने दि.26/12/2009 तारखेपासुन रु.35,000/- 12 टक्क्याने तसेच मानसिक त्रास व शारीरिक त्रासाबद्यल रु.25,000/- व दावा खर्चाबद्यल रु.10,000/- मंजुर होण्याची विनंती केली. 3. दि.13/08/2010 पर्यंत केसमध्ये कोणीही हजर न झाल्यामुळे गैरअर्जदार यांच्या विरुध्द एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला. दि.25/08/2010 रोजी गैरअर्जदार हजर झाले व एकतर्फा आदेश रद्य करुन घेऊन वकीलपत्र दाखल केले. दि.07/10/2010 रोजी गैरअर्जदार यांनी त्यांचे म्हणणे मांडले ज्यामध्ये गैरअर्जदार यांच्या म्हणण्याप्रमाणे अर्जदाराने ड्रायव्हरचे लायसन्सची कॉपी दिली नाही. त्यामुळे त्यांना क्लेम मागण्याचा अधीकार नाही. तसेच इंजिन नंबर व चेसीज नंबर याबद्यलही अर्जदाराने माहीती दिली नाही. सदरचा अपघात झाल्यानंतर अर्जदाराने कुठलेही कागदपत्र दाखल केले़ नाही. तसेच टुटेजा ऑटोमोटीव्ह यांच्याकडुन गाडी दुरुस्त करुन घेतल्याबद्यल अर्जदाराने बिल दाखल केले नाही. तसेच दि.25/03/2010 रोजी एक रीसीप्ट व्हेरिफाय करण्यासाठी सर्व्हेअरने दिलेली होती त्या संदर्भात आर.टी.ओ.नांदेड यांच्याकडुन व्हेरिफीकेशन होऊन ती पावती त्यांनी दिलेली नाही अशा आशयाचे ए.आर.टी.ओ. यांचे पत्र गैरअर्जदाराने यांनी दाखल केले. अर्जदाराने कागदपत्र न दिल्यामुळे कंपनीने क्लेम सेटल केले नाही व त्या आधीच अर्जदार मंचात आपली तक्रार घेऊन आल्यामुळे सदरची तक्रार ही प्रीमॅच्यूअर्ड आणी खोटी आहे त्यामुळे अर्जदार हे क्लेम मागण्यास पात्र नाही तसेच अर्जदाराने आपले वाहनाचे सात दिवसांत रेजीस्ट्रेशन करायला पाहीजे होते ते केले नाही. अर्जदाराने गैरअर्जदार यांना रु.10,000/- कॉस्ट देऊन अर्जदाराचा दावा नामंजुर करावा अशी मागणी गैरअर्जदारांनी केली आहे. गैरअर्जदार यांनी शपथपत्र दाखल केले. अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेले कागदपत्र तपासल्यानंतर खालील मुद्ये स्पष्ट झाले. मुद्ये. उत्तर. 1. अर्जदार हा ग्राहक आहे काय होय. 2. गैरअर्जदार हे अर्जदार यांना नुकसान भरपाई देण्यास बांधील आहे काय होय. 3. काय आदेश ? अंतीम आदेशाप्रमाणे. कारणे. मुद्या क्र. 1 – 4. अर्जदार यांनी यामाहा एफझेडएस खरेदी करते वेळेस गैरअर्जदार यांचे प्रतिनीधी तेथे हजर होते व त्यांनी अर्जदाराच्या गाडीची पॉलिसी उतरविलेली होती. याबद्यल उभय पक्षात कुठलाही वाद नाही त्यामुळे अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत हे स्पष्ट होते. त्यामुळे मुद्या नं. 1 चे उत्तर सकारात्मक देण्यात येते. मुद्या क्र.2– 5. गाडी घेतल्यानंतर अर्जदारास डिलीवरी ही दि.20/12/2009 रोजी मिळाली व दि.26/12/2009 अर्जदाराच्या गाडीचा अपघात झाला. गाडीचा अपघात हा पॉलिसी कालावधी मध्येच आहे, याबद्यल कुठेही वाद नाही. खरे पाहीले असता, गैरअर्जदार कंपनी यांनी अर्जदारास अपघात नुकसान भरपाई देण्यास का विलंब केला याबद्यल कुठेही स्पष्टीकरण गैरअर्जदार यांनी दिलेले नाही. अपघात झाल्यानंतर अर्जदाराने पोलिस स्टेशन नांदेड येथे गुन्हा नोंदविलेला होता. एफ.आय.आर. दाखल केला. घटनास्थळ पंचनामा पाहीले असता, त्यामध्ये अर्जदाराने लिहीलेल्या अर्जात सर्व गोष्टी नोंद आहेत तसेच अर्जदाराची मोटरसायकलवर एफझेडएस यामाहा पासींग न झालेले गाडी व मागे 0225 असा टेपररी क्रमांक दिलेला दिसत आहे, अशाप्रकारे नोंद आहे. गैरअर्जदार यांनी अर्जदाराची मोटरसायकल ही दि.17/12/2009 ते 16/12/2010 या पॉलिसी कालावधीसाठी उतरविलेले असले तरी अर्जदाराच्या गाडीची डिलीव्हरी ही अर्जदारास दि.20/12/2009 रोजी झाली हे अर्जदाराने मोटरसायकलच्या खरेदी पावतीनुसार स्पष्ट होते. गैरअर्जदारांच्या म्हणण्याप्रमाणे अर्जदाराने कुठलेही कागदपत्र दाखल केलेले नाही व गाडीचे इंजिन नंबर व चेसीज नंबर दिलेले नाही पण प्रत्यक्ष पॉलिसी उतरवित असतांना या सर्व गोष्टी गैरअर्जदारांना माहीती असते तसेच गैरअर्जदार यांनी गाडीबद्यल रेजीस्ट्रेशनची त्रुटी व ड्रायव्हींग लायसन्स दाखल न केल्याच्या मुद्यावर भाष्य करतांना असे वाटते की, सर्व गोष्टी माहीत असून देखील गैरअर्जदार यांनी क्लेम देण्याबाबत हात वर केलेले आहे. गैरअर्जदार यांनी नियुक्त केलेले सर्व्हेअर प्रवीण सेलमोनकर यांनी दिलेल्या रिपोर्टनुसार सदरील गाडीचे चेसीज नंबर व इंजीन नंबर दिले तसेच गाडीचा अपघात होण्यापुर्वीची स्थिती या गोष्टीबद्यल माहीती अर्जदाराच्या अपघातग्रस्त गाडीचा सर्व्हे रिपोर्टमध्ये आहे. अर्जदाराने ही गाडी टुटेजा ऑटोमोटीव्ह यांचेकडे दुरुस्त केली असल्यमुळे त्या ठिकाणी जाऊन सर्व्हे झालेले आहे. अशा प्रकारची नोंद सर्व्हे रिपोर्टमध्ये आहे सर्व्हेअर दि.10/01/2010 रोजी नियुक्त केलेला होता त्यांनी सर्व्हे रिपोर्ट दि.14/02/2010 रोजी केलेला होता. पण त्यांनी काढलेले लॉस असेसमेंटची रक्कम ही रु.25,090/- अशी होती या सर्व गोष्टी गैरअर्जदार यांना माहीत होती तरी देखील गैरअर्जदार यांनी अर्जदाराचा क्लेम का सेटल केला नाही हा विचार केला असता, ही सेवेतील त्रुटी आहे या निर्णयापर्यंत हे मंच आलेले आहे. अर्जदाराने टुटेजा ऑटोमोटिव्ह यांचेकडुन विकत घेतलेली गाडी ती नवीन आहे तीचा विमा उतरवितांना गैरअर्जदाराने सर्व गोष्टी तपासले आहे. तांत्रिक प्रश्न रजीस्ट्रेशन हे आज ना उद्या होणारी गोष्ट आहे. त्यामुळे अर्जदाराची नुकसान भरपाई दावा त्या कारणांवरुन किंवा लायसन्सची कॉपी दिली नाही या कारणांवरुन फेटाळणे सारखे नाही. गैरअर्जदार यांनी जर सर्व्हे रिपोर्ट बारकाईने पाहीले असते तर त्यांना इंजिन नंबर व चेसीज नंबर तसेच ड्रायव्हींग लायसन्सबद्यल पर्टीक्युलर्स हे सर्व स्पष्ट झाले असते अर्जदारास दि.13/01/2003 ते 12/01/2023 पर्यंत लायसन्स मिळालेले होते. लायसन्स प्रदान करणारे अधीकारी ए.आर.टी.ओ. यांनी दिलेले होते या गोष्टी सर्व्हे रिपोर्टमध्ये असतांना गैरअर्जदार यांनी अर्जदाराचे अपघात नुकसान भरपाई विमा दावा मंजुर केला नाही. म्हणुन दि.14/10/2010 पासुन 9 टक्के व्याज दराने रु.25,090/- ही रक्कम गैरअर्जदारांनी अर्जदारास एक महिन्याच्या आंत द्यावी तसेच मानसिक त्रास म्हणुन अर्जदारास रु.3,000/- व दावा खर्च म्हणुन रु.2,000/- ही रक्कम एक महिन्याच्या आंत द्यावी. असे न केल्यास संपुर्ण रक्कमेवर 10 टक्के व्याज दराने रक्कम फिटेपर्यंत व्याज द्यावे. 6. वरील सर्व बाबींचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश. 1. अर्जदाराचा तक्रारअर्ज मंजुर करण्यात येतो. 2. हा निकाल लागल्या पासुन एक महिन्याच्या आंत गैरअर्जदार यांनी अर्जदारास अपघाताची नुकसान भरपाई रु.25,090/- ही रक्कम दि.14/10/2010 पासुन 9 टक्के व्याज दराने एक महिन्याच्या आंत द्यावी. 3. गैरअर्जदार यांनी अर्जदारास मानसिक त्रास म्हणुन रु.3,000/- व दावा खर्च म्हणुन रु.2,000/- एक महिन्याच्या आंत द्यावी. असे न केल्यास संपुर्ण रक्कम 10 टक्के व्याज दराने रक्कम फिटेपर्यंत व्याज द्यावेत. (श्री.बी.टी.नरवाडे पाटील) (श्रीमती.सुवर्णा.देशमुख) अध्यक्ष सदस्या गो.प.निलमवार.लघूलेखक
| [HON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh] MEMBER[HON'BLE President B.T.Narwade] PRESIDENT | |