Maharashtra

Bhandara

CC/18/87

ATMARAM JANARDAN PANCHBHAI - Complainant(s)

Versus

MANAGER. THE NEW INDIA ASURANCE CO. LTD AND OTHER 1 - Opp.Party(s)

MR. M.D. KHOBRAGADE

31 Mar 2021

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION,BHANDARA
Near Akhil Sabhagruha, Ganeshpur Road,Bhandara
PINCODE-441904
 
Complaint Case No. CC/18/87
( Date of Filing : 20 Dec 2018 )
 
1. ATMARAM JANARDAN PANCHBHAI
R/O. YENODA. TAH. PAWANI. BHANDARA
BHANDARA
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. MANAGER. THE NEW INDIA ASURANCE CO. LTD AND OTHER 1
OFFICE CODE. 160305. ARMORIKER COMPLEX. SHOP NO. 25 1st FLOOR. GANESH WARD. GANDHI SQUARE. TAH.PAWANI. BHANDARA - 441910
BHANDARA
MAHARASHTRA
2. REGIONAL MANAGER. THE NEW INDIA INSURANCE CO. LTD. NAGPUR
MANDAL KARYALAYA.3 .160300. 1st FLOOR. PATNI BHAVAN. GANDHIBAG. NAGPUR. 440002
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. NITIN M. GHARDE PRESIDING MEMBER
 HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 31 Mar 2021
Final Order / Judgement

            (पारीत व्‍दारा श्रीमती वृषाली गौरव जागिरदार, मा.सदस्‍या)

                                                                                  (पारीत दिनांक– 31 मार्च, 2021)

 

01.  तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या कलम 12 खाली विरुध्‍दपक्ष क्रं-1 मॅनेजर, दि न्‍यु इंडीया एश्‍योरन्‍स कंपनी लिमिटेड, पवनी, जिल्‍हा भंडारा आणि इतर एकयांचे विरुध्‍द विमाकृत मृतक गाईचे विमा दाव्‍याची रक्‍कम मिळण्‍यासाठी दाखल केलेली आहे.

 

02.तक्रारीचा थोडक्‍यात आशय खालील प्रमाणे-

       तक्रारकर्ता हा उपरोक्‍त नमुद पत्‍त्‍यावर राहत असून त्‍याचे मालकीची  होलस्‍टीन संकरीत काळसर रंगाची गाय जिची किम्‍मत रुपये-60,000/- होती आणि तिचा विमा विरुध्‍दपक्ष क्रं 1 व क्रं 2 विमा कंपनी कडे अधिकृत विमा एजंट श्री मनिष यशवंतराव धाबेकर याचे मार्फतीने काढला होता. सदर विमा पॉलिसीचा क्रं-160305471160400000540 असा असून गायीचा ईयर टॅग क्रं-M.L.D.B./N.I.A./13550 असा होता. विम्‍याचा कालावधी हा दिनांक-01 मार्च, 2017 ते 29.02.2020 असा होता. सहाय्यक आयुक्‍त, अॅनीमल हजबन्‍डरी, पवनी यांचे कार्यालयात सदर गायीचा टॅग क्रं-M.L.D.B.-A.H.-M.H.-370041389948 असा नोंदविलेला आहे. दिनांक-15.06.2018 रोजी विमाकृत गायीची प्रकृती खराब झाल्‍याने तिला पशुवैद्दकीय दवाखाना, पवनी येथे उपचारासाठी नेले असता ती दिनांक-29.06.2018 रोजी ती मृत्‍यू पावली. गाईचे प्रकृती संबधात त्‍याने वि.प.क्रं 1 व क्रं 2 विमा कंपनीचे एजंट श्री मनिष धाबेकर यांना दुरध्‍वनी वरुन कळविले होते. त्‍याचे गाईचे दोन्‍ही कांनाना टॅग लावलेले होते, त्‍यातील एक टॅग विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने दिलेला होता तर दुसरा पशुवैद्दकीय अधिकारी, पवनी यांनी दिलेला होता. परंतु विरुध्‍दपक्ष क्रं 1 व क्रं 2 विमा कंपनीने दिलेला टॅग कानातून हरविला असल्‍याने त्‍याने ही बाब विमा कंपनीचे एजंटला या आधीच दुरध्‍वनी वरुन कळविली होती.

       त्‍याने पुढे असे नमुद केले की, विमाकृत गायीचे मृत्‍यू नंतर त्‍याने विरुध्‍दपक्ष क्रं 1 व 2 विमा कंपनीचे कार्यालयात नुकसान भरपाईसाठी दिनांक-16.07.2018 रोजी अर्ज सादर केला होता. विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने केलेल्‍या मागणी प्रमाणे संपूर्ण दस्‍तऐवजाची पुर्तता केली होती तसेच गायीचे कानाचा टॅग सुध्‍दा विमा कंपनीकडे दिला होता परंतु पॉलिसीच्‍या नोंदी प्रमाणे मृतक गाईचा टॅग क्रं-13550 असा होता आणि विरुध्‍दपक्ष विमा कंपनीकडे प्राप्‍त कानाचा टॅग क्रं-370041389948 हा वेगळा असल्‍याने नुकसान भरपाई देता येणार नाही असे वेळोवेळी वि.प.क्रं 1 व क्रं 2 विमा कंपनीतर्फे सांगण्‍यात येत होते. वस्‍तुतः विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने दिलेला टॅग हरविल्‍याची बाब तक्रारकर्त्‍याने विमा एजंटला यापूर्वीच कळविली होती. तक्रारकर्त्‍याने दिनांक-10.09.2018 रोजीचे पत्रान्‍वये  विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने त्‍याला  टॅग क्रं 13550 उपलब्‍ध करुन देण्‍यास सुचित केले होते.  सदर टॅग हरविलेला असल्‍याने तो टॅग उपलब्‍ध करुन देणे त्‍याला शक्‍य नव्‍हते. वस्‍तुतः पशु वैद्दकीय अधिकारी, पवनी यांनी दिलेला टॅग आणि विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने दिलेला टॅग हे एकाच मृत पावलेल्‍या गायीचे होते परंतु विमा पॉलिसीची रक्‍कम देणे लागू नये म्‍हणून हरविलेल्‍या टॅगची मागणी विरुध्‍दपक्ष विमा कंपनी वारंवार करीत आहे. तक्रारकर्त्‍याने वकीलांचे मार्फतीने रजिस्‍टर पोस्‍टाने  दिनांक-26.09.2018 रोजीची नोटीस विरुध्‍दपक्ष विमा कंपनीला पाठविली असता त्‍यांनी दिनांक-31.10.2018 रोजीचे उत्‍तर पाठवून कोणतेही सबळ कारण न देता विमा राशी देण्‍यास टाळाटाळ केली. तक्रारकर्त्‍याचा मुख्‍य व्‍यवसाय हा दुग्‍ध व्‍यवसाय आहे.विमा राशी न मिळाल्‍यामुळे त्‍याचे आर्थिक नुकसान होत असून शारिरीक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे, म्‍हणून शेवटी त्‍याने प्रस्‍तुत तक्रार विरुध्‍दपक्ष विमा कंपनी विरुध्‍द जिल्‍हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल करुन त्‍याव्‍दारे विरुध्‍दपक्ष क्रं 1 व क्रं 2 विमा कंपनी कडून विमाकृत गायीचे नुकसानी बाबत नुकसान भरपाईची रक्‍कम रुपये-60,000/- वार्षिक 12 टक्‍केव्‍याजासह मिळावी तसेच त्‍याला झालेल्‍या शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रासाबद्दल नुकसान भरपाई रुपये 25,000/- आणि तक्रार खर्च रुपये-10,000/- अशा रकमांची मागणी विरुध्‍दपक्ष क्रं 1 व क्रं 2 विमा कंपनी विरुध्‍द केलेली आहे.

 

03.   विरुध्‍दपक्ष क्रं 1 व क्रं 2 विमा कंपनी तर्फे एकत्रीत लेखी उत्‍तर पान क्रं-49 ते 56 वर दाखल करण्‍यात आले. त्‍यांनी लेखी उत्‍तरा मध्‍ये तक्रार चुकीची, आधारहिन असल्‍याने खारीज करण्‍यात यावी असा आक्षेप घेतला. त्‍यांनी तक्रारकर्त्‍यास कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नाही. विमा पॉलिसीचे अटी व शर्ती प्रमाणे विमा दावा दाखल करताना मृतक गाईचे कानाचा टॅग सादर करणे बंधनकारक आहे परंतु तक्रारकर्त्‍याने मृतक गाईचे कानाचा टॅग सादर केलेला
नाही आणि त्‍यामुळे त्‍याचा विमा दावा हा खारीज होण्‍यास पात्र आहे. विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने तक्रारकर्त्‍याने पान क्रं 20 वर पशुधन विकास अधिकारी व्‍हेटरनरी पॉलिक्लिनीक, पवनी, जिल्‍हा भंडारा यांचे जे व्‍हॅल्‍युएशन सर्टीफीकेट दाखल केलेले आहे त्‍यामध्‍ये गायीचे कानाचा टॅग क्रं 13550 असा नमुद केलेला आहे आणि तक्रारकर्त्‍याने विमा दाव्‍या सोबत जो टॅग सादर केलेला आहे त्‍या टॅगचा क्रमांक हा वेगळा आहे. तक्रारकर्त्‍याचे विमा कंपनीचा गायीचा टॅग हरविल्‍या बाबत विमा कंपनीला कळविले नव्‍हते, जर त्‍याने तसे कळविले असते तर नविन टॅग पुरविला असता परंतु गाईचे मृत्‍यू पर्यंत टॅग हरविल्‍या बाबत तक्रारकतर्याने मौन धरले आणि आता  विमा कंपनी विरुध्‍द तो आरोप करीत आहे. तक्रारकर्त्‍याचे गाईचा विमा यापूर्वी सहाय्यक आयुक्‍त, अॅनीमल हजबन्‍डरी यांचेकडे काढला होता परंतु सदर बाब त्‍याने विरुध्‍दपक्ष विमा कंपनी पासून लपवून ठेवली. एकदा गायीचा विमा अन्‍य विमा कंपनीकडे किंवा सरकारकडे काढला असेल तर विमा रक्‍कम देय होत नाही. तक्रारकर्त्‍याचे गाईची प्रकृती दिनांक-15.06.2018 रोजी खराब होती आणि तिचा मृत्‍यू दिनांक-29.06.2018 रोजी झाला होता ही बाब दस्‍तऐवजी पुराव्‍या अभावी नामंजूर केली. तक्रारकर्त्‍याचे गायीचा विमा काढला होता आणि विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने पुरविलेल्‍या टॅगचा क्रं 13550 असा होता ही बाब विमा कंपनीला मान्‍य आहे. तक्रारकर्त्‍याने दुरध्‍वनी विरुन विमा एजंटला विमा कंपनीचा टॅग हरविल्‍याचे कळविले होते ही बाब नामंजूर केली. तक्रारकर्त्‍याने विमा कंपनीने पुरविलेला टॅग हरविल्‍याची बाब विरुध्‍दपक्ष विमा कंपनीला लेखी स्‍वरुपात देणे आवश्‍यक होते. तक्रारकर्त्‍याने विमा कंपनीने पुरविलेला टॅग सादर केला नाही, उलट दुस-या ऑथारिटीने पुरविलेला टॅग सादर केला. त्‍यांनी विशेषत्‍वाने नमुद केले की, तक्रारकर्त्‍याची गाय दिनांक-29.06.2018 रोजी मृत्‍यूपावली होती आणि त्‍याने दिनांक-10.09.2018 रोजी पत्र लिहून दुस-या टॅगची मागणी केली होती. तक्रारकर्त्‍याचे गायीचा दिनांक-29.06.2018 रोजी मृत्‍यू झाला होता या बाबीची त्‍याला कल्‍पना असताना तो गायीचे मृत्‍यू नंतर गायीचा टॅग हरविल्‍या बाबत दुस-या टॅगची मागणी कसे करणार हा प्रश्‍न निर्माण होतो. तक्रारकर्त्‍याने विमाकृत गायीचे कानाचा टॅग दाखल केलेला नाही. त्‍याने विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने पुरविलेला टॅग हरविल्‍याची बाब लेखी स्‍वरुपात कळविणे आवश्‍यक होते परंतु तसे त्‍याने केलेले नाही. सबब तक्रारकर्त्‍याची तक्रार खर्चासह  करण्‍यात यावी  अशी विनंती विरुध्‍दपक्ष विमा कंपनी तर्फे करण्‍यात आली.

04.  तक्रारकर्त्‍याने  तक्रारीचे पृष्‍टयर्थ दस्‍तऐवज यादी पृष्‍ट क्रं- 13 व 14 नुसार एकूण-17 दस्‍तऐवजाच्‍या प्रती दाखल केल्‍यात. पृष्‍ट क्रं- 58 ते 61 वर त्‍याने  शपथेवरील पुरावा दाखल केला तर पृष्‍ट क्रं 64 व 65 वर विमा एजंट श्री मनिष यशवंता धाबेकर याचे पुराव्‍याचे शपथपत्र दाखल केले. पृष्‍ट क्रं-67 ते 69 वर लेखी युक्‍तीवाद दाखल केला आहे.

05   विरुध्‍दपक्ष क्रं 1 व क्रं 2 विमा कंपनी तर्फे एकत्रीत लेखी उत्‍तर पान क्रं-49 ते 56 वर दाखल करण्‍यात आले. तसेच पान क्रं 70 व 71 वर पुराव्‍याचे शपथपत्र दाखल केले. तसेच विमा एजंट श्री मनिष यशवंत धाबेकरयाने विरुध्‍दपक्ष विमा कंपनीला दिनांक-17.10.2018 रोजी लिहिलेल्‍या पत्राची प्रत पान क्रं 72 व 73 वर दाखल केले. विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने पान क्रं 95 वर पुरसिस दाखल करुन त्‍यांचे लेखी उत्‍तर आणि शपथपत्रयालाच लेखी युक्‍तीवाद समजावा अशी पुरसिस दाखल केली. विरुध्‍दपक्ष कंपनीचे वकीलांनी पान क्रं 96 वरील पुरसिस प्रमाणे मा.वरिष्‍ठ न्‍यायालयाच्‍या निवाडयांची यादी व निवाडे दाखल केलेत.

06.  विरुध्‍दपक्ष विमा कंपनी तर्फे तक्रारकर्त्‍याचा साक्षीदार विमा एजंट श्री मनिष धाबेकर याची उलट तपासणी घेण्‍या बाबतचा अर्ज दिनांक-30.08.2019 रोजी करण्‍यात आला, जो पान क्रं 74 वर दाखल आहे. सदर अर्जावर जिल्‍हा ग्राहक आयोगाने दिनांक-25.09.2019 रोजी आदेश पारीत करुन सदरचा विमा कंपनीचा अर्ज मंजूर केला, सदरचा आदेश पान क्रं 76 वर दाखल आहे. आदेशा प्रमाणे विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने तक्रारकर्त्‍याचा  साक्षीदार विमा एजंट श्री मनिष धाबेकर याला विचारावयाची प्रश्‍नावली पान क्रं 81 वर दाखल केली, त्‍याची प्रत श्री मनिष धाबेकर याने स्विकारली. विरुध्‍दपक्ष विमा कंपनी तर्फे पान क्रं 84 ते 93 वर बाजार करार गुरांचा विमा कराराची प्रत दाखल केली.

07.   प्रकरणातील उपलब्‍ध दस्‍तऐवज, उभय पक्षांचे दाखल साक्षी पुरावे इत्‍यादीचे अवलोकन जिल्‍हा ग्राहक आयोगा तर्फे करण्‍यात आले. तक्रारकर्त्‍या तर्फे वकील श्री एम.डी.खोब्रागडे आणि विरुध्‍दपक्ष क्रं 1  व क्रं 2 विमा कंपनी तर्फे वकील श्री ललीत लिमये यांचा मौखीक युक्‍तीवाद ऐकला, त्‍यावरुन जिल्‍हा ग्राहक आयोगा समोर न्‍यायनिवारणार्थ खालील मुद्दे उपस्थित होतात-

अक्रं

मुद्या

उत्‍तर

1

तक्रारकर्त्‍याचा विमा दावा विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने नामंजूर करुन दोषपूर्ण सेवा दिल्‍याची बाब सिध्‍द होते काय?

-होय-

 

 

2

काय आदेश?

अंतिम आदेशा नुसार

 

                                                                                     ::निष्‍कर्ष::

मुद्दा क्रं 1 बाबत

08       या प्रकरणात तक्रारकर्त्‍याचे गायीचा विरुध्‍दपक्ष क्रं 1 व 2 विमा कंपनी कडे काढलेला विमा दावा, विम्‍याचे वैध कालावधीत गायीचा मृत्‍यू या बाबी संबधाने उभय पक्षां मध्‍ये कोणताही विवाद नाही. यामधील मुख्‍य विवाद असा आहे की, विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचे म्‍हणण्‍या प्रमाणे तक्रारकर्त्‍याचे गायीचा विमा काढताना त्‍याला विमा कंपनीने गायीचा टॅग क्रं 13550 पुरविला होता परंतु विमा दावा दाखल करताना त्‍याने सदर टॅग विमा कंपनीकडे सादर केला नाही. विमा पॉलिसीतील अटी व शर्ती प्रमाणे विमा दावा निश्‍चीतीसाठी विमा कंपनीने पुरविलेला टॅग दाखल करणे आवश्‍यक आहे. याउलट तक्रारकर्त्‍याचे म्‍हणण्‍या प्रमाणे त्‍याला विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने पुरविलेला गाईचे कानाचा टॅग हरविला होता व ही बाब त्‍याने विमा कंपनीचा एजंट श्री मनिष यशवंतराव धाबेकर याला दुरध्‍वनी वरुन कळविली होती. विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने विमा एजंटला दुरध्‍वनी वरुन कळविल्‍याची बाब नाकारली. विमा कंपनीचे असे महणणे आहे की, विमा कंपनीचा टॅग हरविल्‍या बाबतची लेखी सुचना तक्रारकर्त्‍याने त्‍यांना देणे आवश्‍यक होते परंतु तसे त्‍याने केले नाही. जर त्‍याने तशी लेखी सुचना दिली असती तर विमा कंपनीने अन्‍य टॅग उपलब्‍ध करुन तो गायीचे कानामध्‍ये टोचला असता परंतु तसे काहीही तक्रारकर्त्‍याने या प्रकरणात केलेले नाही. विमा पॉलिसीचे अटी व शर्ती प्रमाणे विमा कंपनीने पुरविलेला सदर टॅग दाखल करणे आवश्‍यक आहे. याउलट, तक्रारकर्त्‍याचे म्‍हणण्‍या प्रमाणे त्‍याला विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने पुरविलेला गाईचे कानाचा टॅग हरविला होता व ही बाब त्‍याने विमा कंपनीचा एजंट श्री मनिष यशवंतराव धाबेकर याला दुरध्‍वनी वरुन कळविली होती. विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने विमा एजंटला तक्रारकर्त्‍याने दुरध्‍वनी वरुन कळविल्‍याची बाब नाकारली. विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचे असे म्‍हणणे आहे की, विमा कंपनीने पुरविलेला टॅग हरविल्‍या बाबत लेखी सुचना तक्रारकर्त्‍याने त्‍यांना देणे आवश्‍यक होते परंतु तसे त्‍याने केलेले नाही. जर त्‍याने तशी लेखी सुचना विमा कंपनीला दिली असती तर विमा कंपनीने त्‍याला अन्‍य टॅग उपलब्‍ध करुन तो टॅग गायीचे कानामध्‍ये टोचला असता परंतु तसे काहीही त्‍याने या प्रकरणात केलेले नाही. विमा पॉलिसीचे अटी व शर्ती प्रमाणे विमा कंपनीने पुरविलेला सदर टॅग दाखल करणे आवश्‍यक आहे. सहाय्यक आयुक्‍त, अॅनीमल हजबन्‍डरी, पवनी यांचे कार्यालयात सदर गायीचा टॅग क्रमांक-M.L.D.B.-A.H.-M.H.-370041389948असा नोंदविलेला असून विमा दाव्‍याचे वेळी तक्रारकर्त्‍याने तो टॅग विरुध्‍दपक्ष विमा कंपनीकडे सादर केला होता. तक्रारकर्त्‍याचे म्‍हणण्‍या प्रमाणे वस्‍तुतः पशु वैद्दकीय अधिकारी, पवनी यांनी दिलेला टॅग आणि विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने दिलेला टॅग हे एकाच मृत पावलेल्‍या गायीचे होते.

09.   विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचे वकीलांनी खालील मा.वरिष्‍ठ न्‍यायालयाचे निवाडयांवर आपी भिस्‍त ठेवली-

  1. Hon’ble State Consumer Disputes Redressal Commission, Punjab

 

First Appeal No.-321 of 2018

Order dated-06.09.2018

Branch Manager, National Insurance Co. Ltd.

-VERSUS-

Sushma Devi

 

       The submission raised by counsel for appellant before us is that there was no tag affixed on the ear of the dead buffalo, being indicative of its  being insured with OP No.1 and as such in the absence of any such tag, the claim of the complainant  cannot be allowed. In the event of loss of ear tag, it is the responsibility of the insured to give immediate notice to the company and get the animal retagged.  We are strictly governed by the terms and conditions of the policy.  The terms and conditions of the policy form part of the contract between the parties and have to be strictly implemented.

 

II) Hon’ble State Consumer Disputes Redressal Commission,   Pandri, Raipur (C.G.)

First Appeal No.-FA/2016/293

Order Dated-23.08.2016

Sanjay Kumar Das

-VERSUS-

Zonal Manager, National Insurance Company Ltd.

         On the basis of terms and conditions of the insurance policy, it appears that it is mandatory for the appellant (Complainant) to submit ear tag with claim from, but the appellant (Complainant) was unable to submit the ear tag of the deceased cow before the Insurance Company, therefore, his claim was declared No Tag No Claim by the respondents (Ops). Therefore , the District Forum has rightly reached to the conclusion that the appellant (Complainant) has not followed the terms and conditions of the insurance policy, hence , he is not entitled to get sum assured under the policy even on nonstandard basis.

 

 

III) Hon’ble State Consumer Disputes Redressal Commission, Uttarkhand, Dehradun

First Appeal No.-144/2007

Order Dated-23.05.2008

 

The District Forum accepted the Complainant’s version that it was on account of the mistake made by the veterinary officer that old tag number of the insured buffalo was mentioned in the post-mortem report but in the face of the facts of the case, we are not convinced that such a mistake could have inadvertently been made by the veterinary officer. The reason being that the veterinary officer could not be expected to have remembered that tag number of any buffalo among that large number of insured buffaloes kept  and reared by the villagers. When the ear tag bearing No.-NIA/1862 had been lost, the same could not have been found tagged in the ear of the insured dead buffalo and it appear that on the death of some uninsured buffalo, the complainant decided to take illegal benefit and procured the post-mortem report and got the old tag number mentioned in it forgetting that the said tag had already been lost.

 

 

  1. आम्‍ही उपरोक्‍त मा.वरिष्‍ठ न्‍यायालयांनी दिलेल्‍या न्‍यायनिवाडयांचे काळजीपूर्वक वाचन केले असता विमाकृत जनावराचे विम्‍याचे वेळी विमा कंपनीने जारी केलेला इअर टॅग विमा पॉलिसीतील अटी व शर्ती प्रमाणे विमाधारकाने विमा कंपनीकडे विमा दावा दाखल करताा सादर करणे आवश्‍यक असल्‍याचे प्रतिपादन केले आहे.

 

11. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने त्‍याला पाठविलेले दिनांक-10.09.2018 रोजीचे पत्र्पान क्रं 27 वर दाखल केले, त्‍यामध्‍ये गायीचे दाव्‍या संबधी सादर केलेला इअर टॅग हा विमा कंपनीने जारी केलेल्‍या ईअर टॅग क्रं-MLDB/NIA/13550 शी जुळत नसलयाचे नमुद करुन विमा कंपनीने जारी केलेला सदर टॅग सात दिवसाचे आत सादर करावा, न केल्‍यास विमा दाव्‍या संबधी काहीही कार्यवाही होणार नाही असे त्‍यात नमुद केलेले आहे.

 

  1. , सदर प्रकरणात जिल्‍हा ग्राहक आयोगाचे असे मत आहे की, केवळ विमा कंपनीने जारी केलेला ईअर टॅग हरविला व तो तक्रारकर्ता सादर करु शकला नाही या कारणास्‍तव त्‍याचा अस्‍सल विमा दावा विमा कंपनीला नाकारता येणार नाही. याचे कारण असे आहे की, अन्‍य काही बाबी मृत जनावराची ओळख पटविण्‍यास उपलब्‍ध असतात, जसे मृत जनावराचा रंग, त्‍याचे शिंग इत्‍यादीची खात्री कररुनही विमा दावा निकाली काढता येतो.  परंतु तसे काहीही या प्रकरणात विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने विमाकृत गायीची ओळख पटविण्‍यासाठी केलेले नाही आणि केवळ विम्‍यातील अटी व शर्ती प्रमाणे विमा कंपनीने जारी केलेला ईअर टॅग सादर केला नाही म्‍हणून विमा दाव्‍याची पुढील कार्यवाही केलेली नाही. विरुध्‍दपक्ष विमा कंपनीची ही कृती  दोषपूर्ण सेवा असल्‍याची बाब सिध्‍द होते आणि म्‍हणून आम्‍ही मुद्दा क्रं 1 चे उत्‍तर होकारार्थी नोंदवित आहोत.

मुद्दा क्रं 2 बाबत-

  1. , तालुका व्‍हेटरनरी पॉलिक्‍लीनीक पवनी, जिल्‍हा भंडारा यांचे प्रमाणपत्राची प्रत दाखल केली, त्‍यामध्‍ये आजाराने दिनांक-29.06.2018 रोजी मृत्‍यू पावलेल्‍या तक्रारकर्त्‍याचे गायीचे परिक्षण त्‍यांनी केले त्‍यामध्‍ये टॅग क्रं 13550 नमुद केलेला आहे आणि सदर गायीची किम्‍मत रुपये-60,000/- असल्‍याचे नमुद केलेले आहे. सदर पशुधन विकास अधिकारी यांचे  प्रमाणपत्रात गाईचा रंग हा Blakish Brown ST-Black असा नमुद केलेला आहे. सदर प्रमाणपत्रात गायीचा मृत्‍यू हा   Hepatitis  मुळे झाल्‍याचे नमुद आहे. सदर प्रमाणपत्र हे महाराष्‍ट्र शासनाचे पशुधन विकास अधिकारी यांनी जारी केलेले आहे त्‍यामुळे सदर प्रमाणपत्रावर अविश्‍वास ठेवण्‍याचे कोणतेही प्रयोजन जिल्‍हा ग्राहक आयोगास दिसूनयेत नाही कारण मृत्‍यू  पावलेल्‍या गायीचा रंग Blakish Brown ST-Black असा नमुद केलेला आहे आणि विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने जारी केलेली विमा पॉलिसी, जी पान क्रं 15 व 16 वर दाखल आहे, त्‍यामध्‍ये टॅग क्रं 13550 या गायीचा रंग हा HF,BLAKISH BROWN  TS BLK HORN-UP LARGE CURVED असे नमुद केलेले आहे. पशुधन विकास अधिकारी, पवनी यांचे प्रमाणपत्रात वर्णन केलेला गायीचा रंग आणि विमा पॉलिसी मध्‍ये वर्णन केलेला
    गाईचा रंग हा एक सारखाच आहे. तसेच तक्रारकर्त्‍याने पशुधन विकास अधिकारी, पवनी यांचा पोस्‍ट मार्टम रिपोर्ट पान क्रं 18 वर दाखल केला, त्‍यामध्‍ये सुध्‍दा मृत्‍यू पावलेल्‍या गायीचा रंग हा Blakish brown Horns upwards असे नमुद असून Death of cow due to Hepatitis नमुद आहे.
  1. , तक्रारकर्त्‍याची विमाकृत गाय हिच मृत्‍यू पावलेली गाय आहे.  विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने जारी केलेला गायीचा ईअर टॅग हा हरविला असल्‍याने तक्रारकर्ता जरी तो सादर करु शकला नाही तरी विमाकृत गायीचाच मृत्‍यू झालेला आहे ही बाब उपरोक्‍त मृतक गायीचे वर्णना वरुन सिध्‍द होते, त्‍यामुळे विमा पॉलिसीतील अटी व शर्तीचा आधार घेऊन विरुध्‍दपक्ष विमा कंपनीला तक्रारकर्त्‍याचा विमा दावा नाकारता येणार नाही असे जिल्‍हा ग्राहक आयोगाचे मत आहे.  त्‍यामुळे तक्रारकर्ता हा विमाकृत गायीची किम्‍मत विरुध्‍दपक्ष‍ि विमा कंपनी कडून मिळण्‍यास पात्र आहे. तसेच तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल नुकसान भरपाई आणि तक्रारीचा खर्च विरुध्‍दपक्ष विमा कंपनीकडून मिळण्‍यास तो पात्र आहे असे जिल्‍हा ग्राहक आयोगाचे मत आहे.

 

15. उपरोक्‍त नमुद सर्व वस्‍तुस्थितीचा विचार करुन आम्‍ही प्रकरणात खालील प्रमाणे अंतिम आदेश पारीत करीत आहोत-

 

  •                       अंतिम आदेश-

 

(01) तक्रारकर्त्‍याची तक्रार, विरुध्‍दपक्ष दि न्‍यु इंडीया एश्‍योरन्‍स कंपनी तर्फे विरुध्‍दपक्ष क्रं 1 व्‍यवस्‍थापक, दि न्‍यु इंडीया एश्‍योरन्‍स कंपनी, पवनी, जिल्‍हा भंडारा आणि विरुध्‍दपक्ष क्रं 2 रिजनल मॅनेजर, दि न्‍यु इंडीया एश्‍योरन्‍स कंपनी, नागपूर यांचे विरुध्‍द वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्‍या अंशतः मंजूर करण्‍यात येते.

 

(02) विरुध्‍दपक्ष क्रं 1 व क्रं 2 विमा कंपनीला आदेशित करण्‍यात येते की, त्‍यांनी तक्रारकर्त्‍याला विमाकृत मृतक गाय ईअर टॅग क्रं-13550 संबधाने नुकसान भरपाई दाखल किम्‍मत रुपये-60,000/- (अक्षरी रुपये साठ हजार फक्‍त) एवढी रक्‍कम अदा करावी आणि सदर रकमेवर विमा दावा नाकारल्‍याचा दिनांक-10.09.2018 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-6 टक्‍के दराने व्‍याज तक्रारकर्त्‍याला निकालपत्राची प्रथम प्रमाणित प्रत प्राप्‍त झाल्‍याचे दिनांका पासून 30 दिवसांचे आत दयावे. विहित मुदतीत आदेशाचे अनुपालन विरुध्‍दपक्ष क्रं 1 व क्रं 2 विमा कंपनीने न केल्‍यास सदर विमा रक्‍कम आणि त्‍यावर दिनांक-10.09.2018 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-9 टक्‍के दराने दंडनीय व्‍याज यासह येणारी रक्‍कम तक्रारकर्त्‍याला देण्‍यास विरुध्‍दपक्ष क्रं 1 व क्रं 2 विमा कंपनी जबाबदार राहिल.

(03) विरुध्‍दपक्ष क्रं 1 व क्रं 2 विमा कंपनीचे दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल नुकसान भ्‍रपाई रुपये-5000/- (अक्षरी रुपये पाच हजार फक्‍त) आणि तक्रारीचा खर्च रुपये-5000/- (अक्षरी रुपये पाच हजार फक्‍त) विरुध्‍दपक्ष क्रं 1 व क्रं 2 विमा कंपनीने तक्रारकतर्याला दयावेत.

(04) सदर आदेशाचे अनुपालन विरुध्‍दपक्ष क्रं 1 व क्रं 2 विमा कंपनीने वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्‍या प्रस्‍तुत निकालपत्राची प्रथम प्रमाणित प्रत प्राप्‍त झाल्‍याचे दिनांका पासून 30 दिवसांचे आत करावे.

(05) निकालपत्राच्‍या प्रथम प्रमाणित प्रती सर्व पक्षकारांना निःशुल्‍क उपलब्‍ध करुन देण्‍यात याव्‍यात.

(06) उभय पक्षां तर्फे दाखल अतिरिक्‍त संच त्‍यांना परत करण्‍यात यावेत.

 

 

 

 
 
[HON'BLE MR. NITIN M. GHARDE]
PRESIDING MEMBER
 
 
[HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.