जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, गडचिरोली
ग्राहक तक्रार क्रमांक :- 18/2016 तक्रार नोंदणी दि. :-23/3/2016
तक्रार निकाली दि. :-24/5/2016
निकाल कालावधी:- 2 म.1 दिवस
अर्जदार/तक्रारकर्ता :- श्री.जयंद्रकुमार भाऊजी वैद्य,
शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, मंगेवाडा,
ता.धानोरा, जिल्हा - गडचिरोली.
- विरुध्द –
गैरअर्जदार/विरुध्दपक्ष :- मा.व्यवस्थापक/संचालक,
विलास एच.पी.गॅस ग्रामीण वितरक एजन्सी,
शाखा धानोरा,ता.धानोरा,जिल्हा–गडचिरोली-442606
अर्जदार :- स्वतः
गैरअर्जदार तर्फे वकील :- स्वतः
गणपूर्ती :- (1) श्री विजय चंद्रलाल प्रेमचंदानी, अध्यक्ष
(2) श्री सादीक मोहसीनभाई झवेरी, सदस्य
(3) श्रीमती रोझा फुलचंद्र खोब्रागडे, सदस्या
- आदेश निशाणी क्र.1 वर -
(मंचाचे निर्णयान्वये, श्री विजय चं. प्रेमचंदानी, अध्यक्ष)
(पारीत दिनांक : 24 मे 2016)
1. अर्जदाराने सदर तक्रार, गॅस सिलेंडर सबसिडीची रक्कम अर्जदाराचे खात्यात जमा होत नसल्यामुळे अर्ज दाखल केला.
2. सदर तक्रार न्यायप्रविष्ठ असतांना, अर्जदार व गैरअर्जदार यांचेमध्ये समाझोता झाल्याने प्रकरण मागे घेत असल्याचा अर्ज नि.क्र.6 नुसार अर्जदार व गैरअर्जदार यांनी संयुक्तरित्या दाखल केला. सदर अर्ज मंजुर करुन, त्याअनुषंगाने अंतिम आदेश पारीत करण्यात येते.
- अंतिम आदेश -
(1) अर्जदार तक्रार पुढे चालविण्यास इच्छुक नसल्याने व तक्रार मागे घेण्याचे कारणाने नस्तीबध्द करण्यात येत आहे.
(2) तक्रारीची मुळ प्रत सोडून इतर प्रती व मुळ दस्ताऐवज अर्जदाराला परत देण्यात यावे.
(3) अर्जदार व गैरअर्जदार यांनी आप-आपला खर्च स्वतः सहन करावा.
(4) अर्जदाराला आदेशाची प्रत विनामुल्य देण्यात यावी.
गडचिरोली.
दिनांक :- 24/5/2016
(रोझा फु. खोब्रागडे) (सादीक मो. झवेरी) (विजय चं. प्रेमचंदानी)
सदस्या सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, गडचिरोली.