::: आदेश नि. 1 वर ::: (मंचाचे निर्णयान्वये,श्री.अनिल एन.कांबळे,मा.अध्यक्ष) (पारीत दिनांक : 15.02.2012) 1. अर्जदाराने प्रस्तुत तक्रार गै.अ. विरुध्द दाखल करुन टेस्ट सिरीज 2012 करीता फिस व सर्व्हीस टॅक्स जमा केलेले एकूण रु.4,412/- परत मिळण्याकरीता आणि पञ व्यवहार व केस दाखल करण्याकरीता झालेला खर्च रु.650/- तसेच मानसीक अवहलेना केल्याबद्दल रु 2500/- गै.अ. यांनी द्यावेत अशी तक्रारीत मागणी केली आहे.
2. तक्रार नोंदणी करुन गै.अ.यांना नोटीस काढण्यात आले. गै.अ. क्रं. 3 हजर होवून लेखीउत्तर दाखल करण्यास वेळ मागितला.तक्रार न्यायप्रविष्ट असतांना गै.अ.क्र. 1 व 2 यांच्या वतीने, अर्जदाराशी गै.अ. क्रं. 3 ने आपसात समझोता करुन चेक नं. 051681 रु.7,000/- दि. 15/2/2012 बँक ऑफ महाराष्ट्र चा धनादेश अर्जदाराला दिला त्याची प्रत अर्जदाराने रेकॉर्डवर दाखल केले. अर्जदार व गै.अ.यांच्यात आपसात झालेल्या समझोत्यामुळे अर्जदाराने नि. 9 नुसार अर्ज दाखल करुन, समझोत्यानुसार रु.7,000/- चा धनादेश गै.अ.क्रं..3 मार्फत विद्यासागर क्लासेस, मुंबई यांच्यावतीने मिळालेला आहे. त्यामुळे तक्रार खारीज करण्यात यावी असा विनंती अर्ज दाखल केला.
3. गै.अ.यांना मंचामार्फत पाठविलेले नोटीस प्राप्त झाल्यानंतर, अर्जदाराने तक्रारीत केलेल्या मागणीची पूर्तता गै.अ.यांनी केलेली आहे. अर्जदाराने दाखल केलेल्या तक्रारीची मागणी पूर्ण झाली असल्याने नि. 9 नुसार अर्ज दाखल करुन तक्रार खारीज करण्याची विनंती केली. अर्जदारास नि. 9 मधील मजकुराबाबत विचारण केली असता बरोबर असल्याचे मान्य केले. सदर अर्जावर अर्जदार गै.अ.क्रं. 3 ची सही आहे. अर्ज मंजुर करण्यात आला. अर्जदाराने तक्रार खारीज करण्याची विनंती केल्यामुळे तक्रार अंतीमतः निकाली काढून खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे. // अंतिम आदेश // (1) अर्जदाराची मागणी पूर्ण झाली असल्याने तक्रार खारीज. (2) अर्जदार व गै.अ. यांनी आपआपला खर्च सहन करावा. (3) उभय पक्षांना आदेशाची प्रत देण्यात यावी. चंद्रपूर, दिनांक :15/02/2012. |