जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2010/321 प्रकरण दाखल तारीख - 31/12/2010 प्रकरण निकाल तारीख – 22/03/2011 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील, - अध्यक्ष मा.श्रीमती.सुवर्णा देशमुख. - सदस्या सुलोचनाबाई भ्र. रनजीत नरवाडे वय वर्षे 45, धंदा घरकाम रा. राहेर ता.नायगांव जि. नांदेड. अर्जदार. विरुध् 1. व्यवस्थापक, 1. युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लि. 1. प्रादेशिक कार्यालय, अंबिका भवन 19,तिसरा मजला, धरमपेठ एक्सटेंशन,शंकर नगर चौक, नागपूर 440 010 2. व्यवस्थापक, युनायटेड इंडिया इन्शूरन्स कंपनी लि. संत कृपा मार्केट, जी.जी.रोड, नांदेड. गैरअर्जदार 3. विभागीय प्रमुख, कबाल इन्शुरन्स सर्व्हीसेस प्रा.लि.शॉप नं.2, दीशा अंलकार कॉम्प्लेक्स, टाऊन सेंटर, कॅनॉट प्लेस औरंगाबाद. अर्जदारा तर्फे वकील - अड.भुरे बी.व्ही. गैरअर्जदार क्र.1 व 2 तर्फे वकील - अड.अविनाश कदम गैरअर्जदर क्र.3 तर्फे वकील - स्वतः निकालपत्र (द्वारा- मा.श्री.बी.टी.नरवाडे,पाटील, अध्यक्ष ) 1. अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी की, अर्जदार ही राहेर ता.नायगांव येथील रहीवासी असून मयत शेतकरी रनजीत मारोती नरवाडे यांची पत्नी आहे. अर्जदाराचे पती रनजीत हे दि.16.12.2009 रोजी स्वतःचे शेतात शौचासाठी गेले असता त्यांस डाव्या पायाच्या अंगठयास वीषारी सापाने चावा घेतला त्यानंतर सरकारी दवाखाना कूटूंर येथे उपचारासाठी घेऊन जात असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. त्याबाबत पी.एम.रिपोर्ट, ग्रामपंचायत चे मृत्यू प्रमाणपञ, मरणोत्तर पंचनामा इत्यादी कागदपञ दाखल केले आहेत. अपघाताबददल पोलिस स्टेशन कूटूंर येथे गुन्हा नंबर 26/2009 कलम 174 भा.द.वि. नुसार गून्हा नोंदविला व घटनास्थळ पंचनामा केला. मयत आनंदराव हयांचे मौजे दापका (राजा) ता.मुखेड येथे गट नंबर 141 मध्ये क्षेञफळ 0 हेक्टर 58 आर एवढी जमीन आहे. त्याबाबत 7/12 उतारा, नमुना नं.8 चा उतारा व 6-क चा उतारा दाखल केला आहे. महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील शेतक-यांचे विमा संरक्षण देण्यासाठी शेतकरी अपघात विमा योजना गैरअर्जदार क्र.1 यांचेकडे काढले व त्यांचे प्रिमियम गैरअर्जदार क्र.1 यांचेंकडे भरले आहे. गैरअर्जदार क्र.1 यांनी शेतक-यांची जोखीम स्विकारली आहे.सदर पॉलिसीचा कालावधी ऑगस्ट 2009 ते ऑगस्ट 2010 असा होता. अपघात दि.16.12.2009 रोजी झाला त्यामूळे अर्जदार हा गैरअर्जदार यांचेकडून नूकसान भरपाई मिळण्यास पाञ आहे. महाराष्ट्र शासनाच्या जी आर नुसार तालूका कृषी अधिकारी नायगांव यांचेकडे विम्याची रक्कम मिळण्यासाठी दाखल केला.अर्जदार ही अडानी असल्यामूळे व दूःखात असल्यामूळे क्लेम दाखल करण्यास विलंब झाला. तालूका कृषी अधिकारी नायगांव यांनी अर्जदारांचा क्लेम अर्ज गैरअर्जदार क्र.3 कडे पाठविला आहे. गैरअर्जदार यांनी मागितलेली सर्व कागदपञ दाखल करुन देखील गैरअर्जदार यांनी विम्याची रक्कम दिली नाही.शेवटी अर्जदार यांनी दि.07.12.2010 रोजी वकिलामार्फत विमा रक्कम मिळण्यासाठी नोटीस पाठविली, नोटीस मिळून सूध्दा गैरअर्जदारयांनी विमा रक्कम दिली नाही. म्हणून अर्जदाराने सदर तक्रार दाखल करुन अशी मागणी केली आहे की, विम्याची रक्कम रु.1,00,000/-व त्यावर 12 टक्के व्याज सन 2009 पासून तसेच मानसिक व शारीरिक ञासापोटी रु.25,000/- तसेच दावा खर्च रु.5000/- मिळावेत. 2. गैरअर्जदार क्र.1 व 2 हजर झाले त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. अर्जदार यांनी तालुका कृषी अधिकारी यांना पक्षकार केलेले नाही म्हणून तक्रारीचा योग्य तो निर्णय होऊ शकत नाही म्हणून तक्रार फेटाळण्यात यावी असे म्हटले आहे ? गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचे म्हणण्याप्रमाणे अर्जदार ही मयत रनजीत यांचा पत्नी आहे याबददल कोणताही पूरावा दाखल केलेला नाही किंवा वारसा प्रमाणपञ दाखल केलेले नाही. 3. गैरअर्जदार क्र.3 हे हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. अपघात हा दि.16.12.2009 रोजी झाला व त्यांना क्लेम हा दि.08.02.2010 रोजी प्राप्त झाला पण तो क्लेम सोबत काही कागदपञ कमी होते जसे की, मूळ फेरफार इत्यादी , या बाबत अर्जदार यांना तालुका कृषी अधिकारी यांचेमार्फत दि.23.02.2010 रोजी कळविण्यात आले परंतु दि.10.06.2010, 6.10,2010 रोजी कळविण्यात आले. कागपञ प्राप्त झाल्यानंतर दि.06.12.2010 रोजी गैरअर्जदार क्र.1 कडे क्लेम पाठविण्यात आला. म्हणून त्यांचे सेवेमध्ये कोणतीही ञूटी नाही म्हणून त्यांचे विरुध्दची तक्रार ही फेटाळण्यात यावी असे म्हटले आहे. 3. अर्जदार व गैरअर्जदार क्र. 1, 2 व 3 यांनी दाखल केलेला लेखी जवाब व कागदपञ पाहून व दोन्ही पक्षकारातर्फे युक्तीवाद ऐकून जे मूददे उपस्थित होतात ते मूददे व त्यावरील सकारण उत्तरे खालील प्रमाणे, मूददे उत्तर 1. अर्जदार ग्राहक आहेत काय ? होय. 2. गैरअर्जदार हे अर्जदारानी मागितलेली विमा रक्कम देण्यास बांधील आहेत काय ? होय. 3. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे मूददा क्र.1 ः- 4. अर्जदार यांनी ग्रामपंचायत चे मृत्यू प्रमाणपञ दाखल केलेले आहे तसेच तलाठी यांनी गाव नमूना सहा क वारसा प्रमाणपञाची नोंदवही यामध्ये मृत भोगवटदाराचे नांव रनजीत मारोती नरवाडे दाखवलेले आहे. ज्यामध्ये रनजीत हा सुलोचनाबाई हिचा पती आहे असे लिहीलेले आहे. त्यामूळे गैरअर्जदार यांनी काढलेला मूददा अर्जदार हे गैरअर्जदार यांचे वारस नाहीत, हा याठिकाणी अर्जदाराने खोडलेला आहे व अर्जदार ही मयत रनजीत यांचे वारस आहेत हे सिध्द झालेले आहे. अर्जदार ही मयत रनजीत यांची पत्नी आहे हे सिध्द होत असल्यामूळे मूददा क्र.1 चे उत्तर सकारात्मक देण्यात येते. मूददा क्र.2 ः- 5. अर्जदार यांनी मयत रनजीत यांचे नांवावर शेती असल्याबददल 7/12 चा उतारा दाखल केलेला आहे. ज्यामध्ये मयत रनजीत यांचे नांवावर शेत जमीन असल्याबददल पूरावा मंचासमोर आलेला आहे. तसेच मयत रनजीत हे दि.16.12.2009 रोजी स्वतःचे शेतात शौचासाठी गेले असता त्यांस डाव्या पायाच्या अंगठयास विषारी सापाने चावा घेतला त्यानंतर सरकारी दवाखाना कूटूंर येथे उपचारासाठी घेऊन जात असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. त्याबाबत पी.एम.रिपोर्ट, ग्रामपंचायत चे मृत्यू प्रमाणपञ, मरणोत्तर पंचनामा इत्यादी कागदपञ दाखल केले आहेत. अपघाताबददल पोलिस स्टेशन भोकर येथे गुन्हा नंबर 26/2009 कलम 174 भा.द.वि. गून्हा नोंदविला व घटनास्थळ पंचनामा केला. सन 2009-10 मध्ये औरंगाबाद महसूल विभागात येणा-या सर्व शेतक-यासाठी व्यक्तीगत अपघात विमा गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचेंकडून काढलेली आहे व त्यांचा विमा हप्ता महाराष्ट्र शासनाने भरला आहे. यामध्ये रनजीत यांचा सहभाग असल्यामूळे व अर्जदार ही त्यांची पत्नी असल्यामूळे ते प्रत्यक्षरित्या जरी नाही तरी अप्रत्यक्षरित्या अर्जदार हे ग्राहक आहेत. त्यामूळे अर्जदार हे विमा रक्कम रु.1,00,000/- गैरअर्जदार यांचे कडे मागू शकतात. अर्जदार यांने मृत्यू दाखला प्रमाणपञ, वारसा प्रमाणपञ, 7/12, वैद्यकीय रिपोर्ट, इत्यादी कागदपञासह गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचेकडे अर्ज दाखल केला आहे. त्याबददलची पोहच पावती अर्जदाराने दाखल केली आहे. . म्हणून अर्जदार हे या योजनेस पाञ आहेत व पाञ असून सूध्दा गैरअर्जदार यांनी योजनेची रक्कम न देऊन सेवेत ञूटी केली आहे. तसेच गैरअर्जदार यांनी क्लेम हा वेळेत दाखल केला नाही असा आक्षेप घेतला आहे, यावर आमचे म्हणणे असे आहे की, शासनाने अडाणी शेतक-यासाठी हा विमा काढलेला आहे, शेतकरी वारल्यावर त्यांचे कुटूंब हे दूःखात असते तसेच अडाणी असल्यामूळे त्यांना काय करावे हे कळत नाही म्हणून अशा प्रकारचा विलंब हा गृहीत धरण्यात येऊ नये असे शासनाच्या परिपञकामध्ये निर्देश आहेत. म्हणून सदर तक्रार ही मूदतीत येते. वरील सर्व कागदपञ सिध्द झाल्याने गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी अर्जदारास नूकसान भरपाई पोटी रक्कम रु.1,00,000/- एक महिन्याचे आंत दयावेत. तसेच मानसिक ञासापोटी रु.5,000/- व दावा खर्च म्हणून रु.2,000/- दयावेत या निर्णयापर्यत हे मंच आलेले आहे. 6. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज मंजूर करण्यात येतो. 2. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी हा निकाल लागल्यापासून 30 दिवसांचे आंत अर्जदार यांना रु.1,00,000/- पूर्ण रक्कम दयावी व त्या रक्कमेवर दि.31.12.2010 पासून पूर्ण रक्कम मिळेपर्यत 9 टक्के व्याजाने रक्कम दयावी. 3. मानसिक ञासाबददल रु.5,000/- व दावा खर्च म्हणून रु.2,000/- मंजूर करण्यात येतात. 4. वरील सर्व रक्कम एक महिन्याचे आंत न दिल्यास, एक महिन्यानंतर संपूर्ण रक्कमेवर 9 टक्के व्याज पूर्ण रक्कम मिळेपर्यत गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी अर्जदारास द्यावे. 5. पक्षकारांना आदेश कळविण्यात यावा. श्री.बी.टी.नरवाडे पाटील श्रीमती सुवर्णा देशमूख अध्यक्ष सदस्या जयंत पारवेकर लघूलेखक
| [HON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh] MEMBER[HON'BLE President B.T.Narwade] PRESIDENT | |