जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2010/311 प्रकरण दाखल तारीख - 22/12/2010 प्रकरण निकाल तारीख – 19/03/2011 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील, - अध्यक्ष मा.श्रीमती.सुवर्णा देशमुख. - सदस्या साहेबराव विक्रम सुगावे वय वर्षे 32, धंदा शेती रा. घुंगराळा ता.नायगांव जि. नांदेड. अर्जदार. विरुध् 1. व्यवस्थापक, 1. युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लि. 1. प्रादेशिक कार्यालय, अंबिका भवन 19,तिसरा मजला, धरमपेठ एक्सटेंशन,शंकर नगर चौक, नागपूर 440 010 2. व्यवस्थापक, युनायटेड इंडिया इन्शूरन्स कंपनी लि. संत कृपा मार्केट, जी.जी.रोड, नांदेड. गैरअर्जदार 3. वीभागीय प्रमुख,कबाल इन्शुरन्स सर्व्हीसेस प्रा.लि. शॉप नं.2, दीशा अंलकार कॉम्प्लेक्स, टाऊन सेंटर, कॅनॉट प्लेस, औरंगाबाद अर्जदारा तर्फे वकील - अड.भुरे बी.व्ही. गैरअर्जदार क्र.1 व 2 तर्फे वकील - अड.एस.जी.मद्ये गैरअर्जदार क्र.3 तर्फे वकील - स्वतः. निकालपत्र (द्वारा- मा.श्री.बी.टी.नरवाडे,पाटील, अध्यक्ष ) 1. अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी की, अर्जदार हे घुंगराळा ता.नायगांव येथील रहीवासी असून मयत शेतकरी सुनिता साहेबराव सुगावे हिचा पती आहे. अर्जदाराची पत्नी सुनिता ही दि.07.07.2010 रोजी तिच्या राहत्या घरी असताना तिला सापाने चावा घेतला व त्यानंतर तिला खाजगी इलाजासाठी मूगट येथे नेण्यात आले व तेथून नांदेड येथे अटो घेऊन जात असताना अटो पलटी झाला व त्यात अर्जदाराच्या पत्नीस मार लागला व त्यात तिचा मृत्यू झाला. त्याबाबत पी.एम.रिपोर्ट, ग्रामपंचायत चे मृत्यू प्रमाणपञ, मरणोत्तर पंचनामा इत्यादी कागदपञ दाखल केले आहेत. अपघाताबददल पोलिस स्टेशन कूंटूर येथे कलम 174 सी.आर.पी.सी. नुसार गून्हा नोंदविला व घटनास्थळ पंचनामा केला. तसेच ग्रामीण पोलिस स्टेशन नांदेड यांनी सूध्दा घटनेची 174 प्रमाणे नोंद केली. मयत सुनिता हीची मौजे घुंगराळा ता.नायगांव येथे गट नंबर 11 मध्ये क्षेञफळ 1 हेक्टर 98 आर एवढी जमीन आहे. त्याबाबत 7/12 उतारा, नमुना नं.8 चा उतारा व 6-क चा उतारा दाखल केला आहे. महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील शेतक-यांचे विमा संरक्षण देण्यासाठी शेतकरी अपघात विमा योजना गैरअर्जदार क्र.1 यांचेकडे काढले व त्यांचे प्रिमियम गैरअर्जदार क्र.1 यांचेंकडे भरले आहे. गैरअर्जदार क्र.1 यांनी शेतक-यांची जोखीम स्विकारली आहे.सदर पॉलिसीचा कालावधी दि.ऑगस्ट 2009 ते ऑगस्ट 2010 असा होता. अपघात दि.7.7.2010 रोजी झाला त्यामूळे अर्जदार हा गैरअर्जदार यांचेकडून नूकसान भरपाई मिळण्यास पाञ आहे. महाराष्ट्र शासनाच्या जी आर नुसार तालूका कृषी अधिकारी नायगांव यांचेकडे अर्ज देऊन क्लेम फॉर्म घेतला व तो दि.24.08.2010 रोजी तालूका कृषी अधिकारी नायगांव यांचे कडे विम्याची रक्कम मिळण्यासाठी दाखल केला. त्यांनी दि.31.8.2010 रोजी क्लेम गैरअर्जदार क्र.3 कडे पाठविला. परंतु अद्यापपर्यत त्यांनी क्लेमची रक्कम दिली नाही. दि.14.12.2010 रोजी तोडी विनंती केली असता गेरअर्जदार यांनी विमा रक्कम देण्यास नकार दिला. म्हणून अर्जदाराने सदर तक्रार दाखल करुन अशी मागाणी केली आहे की, विम्याची रक्कम रु.1,00,000/-व त्यावर 12 टक्के व्याज सन 2010 पासून तसेच मानसिक व शारीरिक ञासापोटी रु.25,000/- तसेच दावा खर्च रु.5000/- मिळावेत. 2. गैरअर्जदार क्र.1 व 2 हजर झाले त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. अर्जदार यांनी तालुका कृषी अधिकारी यांना पक्षकार केलेले नाही म्हणून तक्रारीचा योग्य तो निर्णय होऊ शकत नाही म्हणून तक्रार फेटाळण्यात यावी असे म्हटले आहे. अर्जदाराची तक्रार ही अपरिपक्व आहे कारण तो दावा हा गैरअर्जदार क्र. 3 मार्फत त्यांचे कडे दाखलच झालेला नाही. म्हणून सेवेत ञूटी देण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचे म्हणण्याप्रमाणे अर्जदार हा मयत सुनिता यांचा पती होता याबददल कोणताही पूरावा दाखल केलेला नाही किंवा वारसा प्रमाणपञ दाखल केलेले नाही. तसेच कोणताही कागदोपञी पूरावा दाखल केलेला नाही. मयत सुनिता ही शेतकरी आहेत याबददल ही पूरावा दाखल केलेला नाही. मयत सुनिता ही शेतकरी असल्याबददल 7/12 मध्ये नोंद नाही ? अर्जदाराने अपघातासंबंधी किंवा क्लेमसंबंधी काही कागदपञ दाखल केलेले नाहीत.जोपर्यत अर्जदार यांनी विमा पॉलिसीच्या नियम व अटीनुसार कागदोपञी पुरावा गैरअर्जदार क्र.1 व 2 कडे दाखल केलेले नाही म्हणून त्यांची कोणतीही जिम्मेदारी नाही. हे मान्य नाही की, अर्जदाराच्या पत्नीस साप चावला व त्यानंतर तिला अटोने नेत असताना अटो पलटी होऊन मार लागला व त्यातच तिचा मृत्यू झाला. अपघातासंबंधी कोणताही गून्हा किंवा अपघात मृत्यू नोंदविला नाही किंवा पंचनामा वगैरे केला नाही ? अर्जदार यांनी त्यांचा क्लेम गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचेकडे दाखल केलेला नसल्यामुळे त्यांना टाळाटाळ करण्याचा वा सेवेत ञूटी करण्याचा संबंधच येत नाही. अर्जदार यांनी अपघातासंबंधी कागदपञ दाखल केलेले नाहीत, तसेच व्हीसेरा रिपोर्ट व वैद्यकीय अधिकारी यांचा फायनल कॉज ऑफ डेथ ऑफ डिसीज्ड, इत्यादी कागदपञ दाखल केलेले नाहीत. अर्जदार हिचा मृत्यू हा अपघाती नसून तो नैसर्गिक मृत्यू आहे ? तसेच अटो चालकाकडे दि.7.7.2010 रोजी वाहन चालविण्याचा वैध व प्रभावी वाहन चालविण्याचा परवाना नव्हता. अर्जदाराचा अर्ज ते मान्य करु शकत नाही. तसेच त्यांनी कोणतीही ञूटीची सेवा दिलेली नाही अर्जदाराने विमा पॉलिसीच्या अटी प्रमाणे मयत सुनिता शेतकरी असल्याबददल पूरावा, अपघाती मृत्यू झाल्याबददल कागदपञ, 7/12, एफ.आय.आर.घटनास्थळ पंचनामा, पी.एम.रिपोर्ट, चालकाचा वैध व प्रभावी वाहन चालविण्याचा परवाना, वयाचा पूरावा, गाव नमूना सहा क, ड, मृत्यू प्रमाणपञ, इत्यादी कागदपञ दाखल केलेले नाहीत. म्हणून अर्जदाराचा अर्ज अमान्य करण्यात यावा असे म्हटले आहे. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी शपथपञ दाखल केलेले आहे. 3. गैरअर्जदार क्र.3 हे हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. अपघात हा दि.07.07.2010 रोजी झाला व त्यांना क्लेम हा दि.10.09.2010 रोजी प्राप्त झाला पण तो क्लेम सोबत काही कागदपञ कमी होते जसे की, केमीकल्स अनालेसीस रिपोर्ट इत्यादी , या बाबत अर्जदार यांना तालुका कृषी अधिकारी यांचेमार्फत दि29.09.2010 रोजी कळविण्यात आले. कागदपञ आल्यानंतर दि.16.12.2010 रोजी गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचेकडे पाठविण्यात आला. म्हणून त्यांचे सेवेमध्ये कोणतीही ञूटी नाही म्हणून त्यांचे विरुध्दची तक्रार ही फेटाळण्यात यावी असे म्हटले आहे. 4. अर्जदार व गैरअर्जदार क्र. 1, 2 व 3 यांनी दाखल केलेला लेखी जवाब व कागदपञ पाहून व दोन्ही पक्षकारातर्फे युक्तीवाद ऐकून जे मूददे उपस्थित होतात ते मूददे व त्यावरील सकारण उत्तरे खालील प्रमाणे, मूददे उत्तर 1. अर्जदार ग्राहक आहेत काय ? होय. 2. गैरअर्जदार हे अर्जदारानी मागितलेली विमा रक्कम देण्यास बांधील आहेत काय ? होय. 3. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे मूददा क्र.1 ः- 5. अर्जदार यांनी ग्रामपंचायत चे मृत्यू प्रमाणपञ दाखल केलेले आहे तसेच तलाठी यांनी गाव नमूना सहा क वारसा प्रमाणपञाची नोंदवही यामध्ये मृत भोगवटदाराचे नांव सुनिता साहेबराव सुंगावे दाखवलेले आहे. ज्यामध्ये साहेबराव हा सुनिता हिचा पती आहे असे लिहीलेले आहे. त्यामूळे गैरअर्जदार यांनी काढलेला मूददा अर्जदार हे गैरअर्जदार यांचे वारस नाहीत, हा याठिकाणी अर्जदाराने खोडलेला आहे व अर्जदार हे मयत सुनिता यांचे वारस आहेत हे सिध्द झालेले आहे. अर्जदार हे मयत सुनिता हिचे पती आहेत हे सिध्द होत असल्यामूळे मूददा क्र.1 चे उत्तर सकारात्मक देण्यात येते. मूददा क्र.2 ः- 6. अर्जदार यांनी मयत सुनिता हिचे नांवावर शेती असल्याबददल 7/12 चा उतारा दाखल केलेला आहे. ज्यामध्ये मयत सुनिता यांचे नांवावर शेत जमीन असल्याबददल पूरावा मंचासमोर आलेला आहे. तसेच मयत सुनिता ही दि.07.07.2010 रोजी घरकाम करीत असताना तिचे हाताचे बोटाला सापाने चावा घेतल्याने तिस इलाजासाठी मूगट येथे घेऊन जात असताना ताजेगांव टि.पाईट वर मृत्यू पावली. हा मूददा गैरअर्जदार यांनी जवाबामध्ये मृत्यूबदल पूरावा दाखल केला नाही म्हणून अमान्य केला आहे ? अर्जदार यांनी घटनेची फिर्याद दिली व त्यामध्ये अर्जदाराचा मृत्यू साप चावल्याने झाला अशी माहीती पोलिस स्टेशन कूंटूर येथे दिलेली आहे. त्याबददल जवाब घेण्यात आला व घटनास्थळ पंचनामा दाखल केला. त्याबददलचे कागदपञ अर्जदाराने दाखल केल्यामूळे मयत सुनिता हीस साप चावल्याने अटोमध्ये नेत असताना अटो पलटी झाल्याने गंभीर मार लागलेला आहे पण मयत सुनिता हीचा मृत्यू हा साप चावून झाला आहे हे सिध्द झालेले आहे. सन 2009-10 मध्ये औरंगाबाद महसूल विभागात येणा-या सर्व शेतक-यासाठी व्यक्तीगत अपघात विमा गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचेंकडून काढलेली आहे व त्यांचा विमा हप्ता महाराष्ट्र शासनाने भरला आहे. यामध्ये सुनिता सुंगावे यांचा सहभाग असल्यामूळे व अर्जदार हे त्यांचे पती असल्यामूळे ते प्रत्यक्षरित्या जरी नाही तरी अप्रत्यक्षरित्या अर्जदार हे ग्राहक आहेत. त्यामूळे अर्जदार हे विमा रक्कम रु.1,00,000/- गैरअर्जदार यांचे कडे मागू शकतात. अर्जदार यांने मृत्यू दाखला प्रमाणपञ, वारसा प्रमाणपञ, 7/12, वैद्यकीय रिपोर्ट, इत्यादी कागदपञासह गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचेकडे अर्ज दाखल केला आहे. त्याबददलची पोहच पावती अर्जदाराने दाखल केली आहे. गैरअर्जदार क्र.3 कंपनीने ते कागदपञे युनायटेड इंडिया इन्शूरन्स कंपनी यांना सेंटलमेंट साठी दिलेले आहेत पण अद्यापपर्यत गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी विम्याची रक्कम दिली नाही हे सिध्द होते. वरील सर्व कागदपञ सिध्द झाल्याने गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी अर्जदारास नूकसान भरपाई पोटी रक्कम रु.1,00,000/- एक महिन्याचे आंत दयावेत. तसेच मानसिक ञासापोटी रु.5,000/- व दावा खर्च म्हणून रु.2,000/- दयावेत या निर्णयापर्यत हे मंच आलेले आहे. 7. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज मंजूर करण्यात येतो. 2. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी हा निकाल लागल्यापासून 30 दिवसांचे आंत अर्जदार यांना रु.1,00,000/- पूर्ण रक्कम दयावी व त्या रक्कमेवर दि.24.08.2010 पासून पूर्ण रक्कम मिळेपर्यत 9 टक्के व्याजाने रक्कम दयावी. 3. मानसिक ञासाबददल रु.5,000/- व दावा खर्च म्हणून रु.2,000/- मंजूर करण्यात येतात. 4. वरील सर्व रक्कम एक महिन्याचे आंत न दिल्यास, एक महिन्यानंतर संपूर्ण रक्कमेवर 9 टक्के व्याज पूर्ण रक्कम मिळेपर्यत गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी अर्जदारास द्यावे. 5. पक्षकारांना आदेश कळविण्यात यावा. श्री.बी.टी.नरवाडे पाटील श्रीमती सुवर्णा देशमूख अध्यक्ष सदस्या जयंत पारवेकर लघूलेखक
| [HON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh] MEMBER[HON'BLE President B.T.Narwade] PRESIDENT | |