जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2010/322 प्रकरण दाखल तारीख - 31/12/2010 प्रकरण निकाल तारीख – 22/03/2011 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील, - अध्यक्ष मा.श्रीमती.सुवर्णा देशमुख. - सदस्या रेणुका भ्र. आनंदराव जोगदंड वय वर्षे 33, धंदा घरकाम रा. दापका (राजा) ता.मुखेड जि. नांदेड. अर्जदार. विरुध् 1. व्यवस्थापक, 1. युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लि. 1. प्रादेशिक कार्यालय, अंबिका भवन 19,तिसरा मजला, धरमपेठ एक्सटेंशन,शंकर नगर चौक, नागपूर 440 010 2. व्यवस्थापक, युनायटेड इंडिया इन्शूरन्स कंपनी लि. संत कृपा मार्केट, जी.जी.रोड, नांदेड. गैरअर्जदार
अर्जदारा तर्फे वकील - अड.भुरे बी.व्ही. गैरअर्जदार क्र.1 व 2 तर्फे वकील - अड.अविनाश कदम निकालपत्र (द्वारा- मा.श्री.बी.टी.नरवाडे,पाटील, अध्यक्ष ) 1. अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी की, अर्जदार ही दापका (राजा) ता.मुखेड येथील रहीवासी असून मयत शेतकरी आनंदराव व्यकंटराव जोगदंड यांची पत्नी आहे. अर्जदाराचे पती आनंदराव हे दि.11.12.2009 रोजी दारु सोडण्यासाठीसल्ला घेण्यासाठी गेले असता शंकरानंद पवार यांनी अर्जदाराच्या पतीस वीषारी बुक्टी दिली. ज्यामूळे अर्जदाराच्या पतीचा मृत्यू झाला. त्याबाबत पी.एम.रिपोर्ट, ग्रामपंचायत चे मृत्यू प्रमाणपञ, मरणोत्तर पंचनामा इत्यादी कागदपञ दाखल केले आहेत. अपघाताबददल पोलिस स्टेशन भोकर येथे गुन्हा नंबर 191/2009 कलम 304 भा.द.वि. व कलम 7 कॉस्मेटीक मॅजीक ड्रग्स अक्ट 1954 नुसार शंकरानंद पवार यांचेवर गून्हा नोंदविला व घटनास्थळ पंचनामा केला. मयत आनंदराव हयांचे मौजे दापका (राजा) ता.मुखेड येथे गट नंबर 689 मध्ये क्षेञफळ 1 हेक्टर एवढी जमीन आहे. त्याबाबत 7/12 उतारा, नमुना नं.8 चा उतारा व 6-क चा उतारा दाखल केला आहे. महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील शेतक-यांचे विमा संरक्षण देण्यासाठी शेतकरी अपघात विमा योजना गैरअर्जदार क्र.1 यांचेकडे काढले व त्यांचे प्रिमियम गैरअर्जदार क्र.1 यांचेंकडे भरले आहे. गैरअर्जदार क्र.1 यांनी शेतक-यांची जोखीम स्विकारली आहे.सदर पॉलिसीचा कालावधी ऑगस्ट 2009 ते ऑगस्ट 2010 असा होता. अपघात दि.1112.2009 रोजी झाला त्यामूळे अर्जदार हा गैरअर्जदार यांचेकडून नूकसान भरपाई मिळण्यास पाञ आहे. महाराष्ट्र शासनाच्या जी आर नुसार तालूका कृषी अधिकारी मुखेड यांचेकडे विम्याची रक्कम मिळण्यासाठी दाखल केला. त्यांनी दि.02.8.2010 रोजी क्लेम अर्जदाराचा मृत्यू हा मांञिकाने वीषारी बूक्टी दिल्याने झालेला आहे व तो अपघाती झालेला नाही म्हणून क्लेम दि.02.08.2010 रोजी नामंजूर केल्या बाबतचे पञाद्वारे कळविले आहे.. महाराष्ट्र शासनाच्या परिपञकात स्पष्टपणे हे नमूद केले आहे की, वीषबाधा व अन्य कोणत्याही कारणाने वीषबाधा होऊन मृत्यू झाल्यास विमा रक्कम मिळण्यास शेतकरी हे पाञ राहतील. परंतु गैरअर्जदार यांनी चूकीचे कारण दाखवून क्लेम नामंजूर करुन सेवेत ञूटी केली आहे.. म्हणून अर्जदाराने सदर तक्रार दाखल करुन अशी मागणी केली आहे की, विम्याची रक्कम रु.1,00,000/-व त्यावर 12 टक्के व्याज सन 2009 पासून तसेच मानसिक व शारीरिक ञासापोटी रु.25,000/- तसेच दावा खर्च रु.5000/- मिळावेत. 2. गैरअर्जदार क्र.1 व 2 हजर झाले त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. अर्जदार यांनी तालुका कृषी अधिकारी यांना पक्षकार केलेले नाही म्हणून तक्रारीचा योग्य तो निर्णय होऊ शकत नाही म्हणून तक्रार फेटाळण्यात यावी असे म्हटले आहे. महाराष्ट्र शासन व गैरअर्जदार क्र.1 यांच्यात झालेल्या करारात अपघाती मृत्यूचे प्रकार नमूद केलेले आहे व यापैकी कूठल्याही प्रकारच्या अपघाती मृत्यू अर्जदाराच्या पतीस आलेला नसल्यामूळे अर्जदाराचा क्लेम हा गैरअर्जदाराने योग्यरित्या नामंजूर केला आहे.. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचे म्हणण्याप्रमाणे अर्जदार ही मयत आंनदराव यांची पत्नी आहे याबददल कोणताही पूरावा दाखल केलेला नाही किंवा वारसा प्रमाणपञ दाखल केलेले नाही. तसेच कोणताही कागदोपञी पूरावा दाखल केलेला नाही. विम्याचा कालावधी गैरअर्जदार यांना मान्य आहे. परंतु अर्जदार हे सदर योजनेस पाञ आहेत हे त्यांना मान्य नाही. अर्जदाराची तक्रार या कार्यक्षेञात येत नाही. अर्जदार यांनी त्यांचा क्लेम तालुका कृषी अधिकारी मूखेड यांच्याकडे दाखल केला व त्यांच्या मार्फतच विम्याची रक्कम मिळणार आहे. अर्जदार यांनी त्यांचा क्लेम गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचेकडे दाखल केलेला नसल्यामुळे त्यांना टाळाटाळ करण्याचा वा सेवेत ञूटी करण्याचा संबंधच येत नाही. अर्जदाराने विमा पॉलिसीच्या अटी प्रमाणे मयत आनंदराव हे शेतकरी असल्याबददल पूरावा, अपघाती मृत्यू झाल्याबददल कागदपञ, 7/12, एफ.आय.आर.घटनास्थळ पंचनामा, पी.एम.रिपोर्ट, वयाचा पूरावा, गाव नमूना सहा क, ड, मृत्यू प्रमाणपञ, इत्यादी कागदपञाच्या प्रमाणीत व सांक्षाकीत प्रति दाखल केलेल्या नाहीत. म्हणून अर्जदाराचा अर्ज अमान्य करण्यात यावा असे म्हटले आहे. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी शपथपञ दाखल केलेले आहे. 3. अर्जदार व गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी दाखल केलेला लेखी जवाब व कागदपञ पाहून व दोन्ही पक्षकारातर्फे युक्तीवाद ऐकून जे मूददे उपस्थित होतात ते मूददे व त्यावरील सकारण उत्तरे खालील प्रमाणे, मूददे उत्तर 1. अर्जदार ग्राहक आहेत काय ? होय. 2. गैरअर्जदार हे अर्जदारानी मागितलेली विमा रक्कम देण्यास बांधील आहेत काय ? होय. 3. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे मूददा क्र.1 ः-
4. अर्जदार यांनी ग्रामपंचायत चे मृत्यू प्रमाणपञ दाखल केलेले आहे तसेच तलाठी यांनी गाव नमूना सहा क वारसा प्रमाणपञाची नोंदवही यामध्ये मृत भोगवटदाराचे नांव आनंदराव व्यकंटराव जोगदंड दाखवलेले आहे. ज्यामध्ये आनंदराव हा रेणुकाबाई हिचा पती आहे असे लिहीलेले आहे. त्यामूळे गैरअर्जदार यांनी काढलेला मूददा अर्जदार हे गैरअर्जदार यांचे वारस नाहीत, हा याठिकाणी अर्जदाराने खोडलेला आहे व अर्जदार ही मयत आनंदराव यांचे वारस आहेत हे सिध्द झालेले आहे. अर्जदार ही मयत आनंदराव यांची पत्नी आहे हे सिध्द होत असल्यामूळे मूददा क्र.1 चे उत्तर सकारात्मक देण्यात येते. मूददा क्र.2 ः-
5. अर्जदार यांनी मयत आनंदराव यांचे नांवावर शेती असल्याबददल 7/12 चा उतारा दाखल केलेला आहे. ज्यामध्ये मयत आनंदराव यांचे नांवावर शेत जमीन असल्याबददल पूरावा मंचासमोर आलेला आहे. तसेच मयत आनंदराव हे दि.11.12.2009 रोजी दारु सोडण्यासाठीसल्ला घेण्यासाठी गेले असता शंकरानंद पवार यांनी अर्जदाराच्या पतीस वीषारी बुक्टी दिली. ज्यामूळे अर्जदाराच्या पतीचा मृत्यू झाला. त्याबाबत पी.एम.रिपोर्ट, ग्रामपंचायत चे मृत्यू प्रमाणपञ, मरणोत्तर पंचनामा इत्यादी कागदपञ दाखल केले आहेत. अपघाताबददल पोलिस स्टेशन भोकर येथे गुन्हा नंबर 191/2009 कलम 304 भा.द.वि. व कलम 7 कॉस्मेटीक मॅजीक ड्रग्स अक्ट 1954 नुसार शंकरानंद पवार यांचेवर गून्हा नोंदविला व घटनास्थळ पंचनामा केला. सन 2009-10 मध्ये औरंगाबाद महसूल विभागात येणा-या सर्व शेतक-यासाठी व्यक्तीगत अपघात विमा गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचेंकडून काढलेला आहे व त्यांचा विमा हप्ता महाराष्ट्र शासनाने भरला आहे. यामध्ये आनंदराव यांचा सहभाग असल्यामूळे व अर्जदार ही त्यांची पत्नी असल्यामूळे ते प्रत्यक्षरित्या जरी नाही तरी अप्रत्यक्षरित्या अर्जदार हे ग्राहक आहेत. त्यामूळे अर्जदार हे विमा रक्कम रु.1,00,000/- गैरअर्जदार यांचे कडे मागू शकतात. अर्जदार यांने मृत्यू दाखला प्रमाणपञ, वारसा प्रमाणपञ, 7/12, वैद्यकीय रिपोर्ट, इत्यादी कागदपञासह गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचेकडे अर्ज दाखल केला आहे. त्याबददलची पोहच पावती अर्जदाराने दाखल केली आहे. गैरअर्जदाराचे आक्षेप आहे की, अर्जदाराचा मृत्यू हा अपघाती नाही परंतु महाराष्ट्र शासनाच्या परिपञकात स्पष्टपणे हे नमूद केले आहे की, विषबाधा व अन्य कोणत्याही कारणाने विषबाधा होऊन मृत्यू झाल्यास विमा रक्कम मिळण्यास शेतकरी हे पाञ राहतील. म्हणून अर्जदार हे या योजनेस पाञ आहेत व पाञ असून सूध्दा गैरअर्जदार यांनी योजनेची रक्कम न देऊन सेवेत ञूटी केली आहे. वरील सर्व कागदपञ सिध्द झाल्याने गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी अर्जदारास नूकसान भरपाई पोटी रक्कम रु.1,00,000/- एक महिन्याचे आंत दयावेत. तसेच मानसिक ञासापोटी रु.5,000/- व दावा खर्च म्हणून रु.2,000/- दयावेत या निर्णयापर्यत हे मंच आलेले आहे. 6. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश
1. अर्जदाराचा तक्रार अर्ज मंजूर करण्यात येतो. 2. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी हा निकाल लागल्यापासून 30 दिवसांचे आंत अर्जदार यांना रु.1,00,000/- पूर्ण रक्कम दयावी व त्या रक्कमेवर दि.02.08.2010 पासून पूर्ण रक्कम मिळेपर्यत 9 टक्के व्याजाने रक्कम दयावी. 3. मानसिक ञासाबददल रु.5,000/- व दावा खर्च म्हणून रु.2,000/- मंजूर करण्यात येतात. 4. वरील सर्व रक्कम एक महिन्याचे आंत न दिल्यास, एक महिन्यानंतर संपूर्ण रक्कमेवर 9 टक्के व्याज पूर्ण रक्कम मिळेपर्यत गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी अर्जदारास द्यावे. 5. पक्षकारांना आदेश कळविण्यात यावा. श्री.बी.टी.नरवाडे पाटील श्रीमती सुवर्णा देशमूख अध्यक्ष सदस्या जयंत पारवेकर लघूलेखक
| [HON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh] MEMBER[HON'BLE President B.T.Narwade] PRESIDENT | |