जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच बीड यांचे समोर
ग्राहक तक्रार क्रमांक –115/2011 तक्रार दाखल तारीख –02/08/2011
परवीन बी पि.शेख खययुम
वय 30 वर्षे,धंदा घरकाम व शेती .तक्रारदार
रा.कामखेडा ता.जि.बीड
विरुध्द
1. शाखाधिकारी,
रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी
(अनिल धिरुभाई अंबानी ग्रुप)
19, रिलायन्स सेंटर, वालचंद हिराचंद मार्ग,
बलार्ड इस्टेट, मुंबई-400 038 ..सामनेवाला
2. मा.तहसिलदार
तहसिल कार्यालय, बीड ता.जि.बीड
को र म - पी.बी.भट, अध्यक्ष
अजय भोसरेकर, सदस्य.
तक्रारदारातर्फे :- अँड.अविनाश पि. गंडले
सामनेवाले क्र. 1 व 2 तर्फे :- स्वतः
निकालपत्र
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
सदर प्रकरणात विलंब माफीचा अर्ज दाखल केलेला नाही. तसेच मा.शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे अत्यावश्यक सामनेवाला केलेला नाही. यासाठी यूक्तीवादाला दि.10.08.2011 रोजी प्राथमिक सुनावणीसाठी नेमण्यात आली. सदर दिनांकापासून आजपर्यत तक्रारदार हजर नाही व त्यांचा यूक्तीवाद नाही.
ग्राहक संरक्षण कायदयातील तदतुनीनुसार मुदत संपली असल्याने सदरची तक्रार यूक्तीवादाविना निकाली काढणे उचित होईल असे न्यायमंचाचे मत आहे.
सबब, न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रार अर्ज निकाली.
2. खर्चासाठी कोणताही आदेश नाही.
3. ग्राहक संरक्षण कायदा- 1986, अधिनियम 2005 मधील कलम- 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
(अजय भोसरेकर) (पी.बी.भट)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड