जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2010/302 प्रकरण दाखल तारीख - 14/01/2011 प्रकरण निकाल तारीख – 07/02/2011 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील, - अध्यक्ष मा.श्रीमती.सुवर्णा देशमुख. - सदस्या श्री.कलावतीबाई भ्र.बाजीराव आमोघे, वर्षे 44, धंदा घरकाम, रा.उमरदरी ता.मुखेड जि.नांदेड. अर्जदार. विरुध् 1. व्यवस्थापक, युनायटेड इंडिया इशुरन्स कंपनी लि, गैरअर्जदार प्रादेशिक कार्यालय, अंबिका भवन 19, तिसरा मजला, धरमपेठ एक्सटेंशन, शंकरनगर चौक, नागपूर – 440010 2. व्यस्थापक, युनायटेड इंडिया इंशुरन्स कंपनी लि, संतकृपा मार्केट, जी.जी.रोड, नांदेड. 3. विभागीय प्रमुख, कबाल इशुरन्स सर्व्हीसेस प्रा.लि. शॉप नं. 2 दिशा अलंकार कॉम्प्लेक्स, टाऊन सेंटर, कॅनॉट प्लेस, औंरगाबाद. अर्जदारा तर्फे वकील - अड.बि.व्ही.भुरे. गैरअर्जदार क्र. 1 व 2 तर्फे वकील – अड. श्रीनिवास मद्ये गैरअर्जदार क्र. 3 - स्वतः निकालपत्र (द्वारा- मा.श्रीमती.सुवर्णा देशमुख,सदस्या) अर्जदाराचे पती नामे बाजीराव पि. पुंडलिक आमोघे हे दि.20/09/2009 रोजी शेताकडे गेले असता, शेतीला पाणी देत असतांना त्यांना सापाने चावा घेतला, त्यानंतर त्यांना शासकीय रुग्णालय नांदेड येथे उपचारासाठी शरीक केले व त्यांच्यावर उपचार चालु असतांना दि.23/09/2009 रोजी त्यांचा मृत्यु झाला. त्याबद्यल अर्जदाराने पी.एम.रिपोर्ट,ग्राम पंचायत चे मृत्यु प्रमाणपत्र, मरणोत्तर पंचनामा दाखल केले. अर्जदाराचे पती बाजीराव पुंडलिक आमोघे हे व्यवसायाने शेतकरी होते, त्यांच्या नांवे मौजे उमरदरी येथे गट नं 82/2 मध्ये क्षेत्रफळ 71 आर गट नं.80 मध्ये क्षेत्रफळ 2 हेक्टर 12 आर एवढी जमीन आहे व त्या जमीनीचे ते मालक व ताबेदार होते, ते 7/12 धारक शेतकरी होते. अर्जदाराने 7/12 चा उतारा, नमुना नं. 8 चा उतारा व 6 क चा उतारा दाखल केला आहे. महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील शेतक-याचे, शेतक-यांना विमा संरक्षण देण्यासाठी शेतक-याचे शेतकरी अपघात विमा योजना गैरअर्जदार क्र. 1 यांचेकडे काढले व त्याचे प्रिमीअम गैरअर्जदार क्र. 1 यांनी विमा घेते वेळेस सर्व प्रकारची जोखीम स्विकारली व विमा शेतक-याच्या हक्कात दिला. अर्जदाराचे पती हे शेतकरी होते व त्याचे प्रिमीअम महाराष्ट्र शासनाने भरलेले आहे व तो लाभार्थी आहे म्हणून अर्जदाराचे पती हे गैरअर्जदार क्र. 1 यांचे ग्राहक आहेत. सदरील पॉलिसीचा कालावधी हा ऑगष्ट 2009 ते ऑगष्ट 2010 असा आहे व घटना ही दि.16/09/2009 ची आहे व मृत्यु दि.23/09/2009 आहे. त्यामुळे गैरअर्जदार हे अर्जदारास नुकसान भरपाई देण्यास पात्र आहेत. अर्जदाराने आपल्या पतीच्या मृत्युनंतर क्लेम दाखल केल्यानंतर गैरअर्जदार क्र. 1,2 व 3 यांचेकडे क्लेम दाखल केल्यापासुन विम्याची रक्कम मिळण्यासाठी अनेक वेळा तोंडी विनंती केली पण गैरअर्जदार यांनी आज या, उद्या या म्हणुन नेहमी टाळाटाळ करीत राहीले व अर्जदाराने गैरअर्जदाराकडे चकरा मारुन सुध्दा आजपर्यंत विम्याची नुसान भरपाई दिलेली नाही जे की, नियमानुसार एक महिन्याच्या आत देणे बंधनकारक आहे तरीपण त्यांनी दिली नाही. म्हणुन अर्जदाराने शेवटी वकीला मार्फत दि.15/11/2010 रोजी कायदेशिर नोटीस पाठविली तरीपण गैरअर्जदारांनी अर्जदारास नुकसान भरपाई दिली नाही म्हणुन अर्जदाराने तक्रारअर्ज दाखल केला आहे. त्यांची मागणी आहे की, अर्जदारास शेतकरी अपघात विम्याची रक्कम रु.1,00,000/-, 18 टक्के व्याजाने सन 2009 पासून अर्जदारास द्यावेत. तसेच शारीरिक व मानसिक त्रासापोटी रु.25,000/- व दावा खर्च रु.5,000/- अर्जदारास द्यावेत. गैरअर्जदार क्र. 1 व 2 हे वकीला मार्फत हजर झाले त्यांनी आपला लेखी जबाब दाखल केला. त्यांचे म्हणणे की, अर्जदारास प्रस्तुत अर्ज दाखल करण्याचा कोणताही कायद्याने अधिकार नाही. अधिकार नसतांना सुध्दा प्रस्तुत तक्रारअर्ज मा.न्यायमंचासमोर दाखल करुन मंचाची दिशाभूल करीत आहे. जे की, कायद्याने चुक असल्यामुळे तक्रारअर्ज रु.25,000/- दंड लावून फेटाळण्यास योग्य आहे. प्रस्तुत तक्रारअर्ज अपरिपक्व (Premature) आहे कारण अर्जदाराने प्रस्तुत दावा गैरअर्जदार क्र. 3 यांच्या मार्फत गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांचेकडे दाखल केलाच नाही. जर क्लेम दाखलच केला नसेल तर गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी सदर न दाखल केलेला क्लेम नामंजूर करण्याचा किंवा क्लेम देण्यास टाळाटाळ करण्याचा किंवा विलंब करण्याचा किंवा सेवेत त्रुटी देण्याचा प्रश्नच उदभवत नाही. असे असतांना सुध्दा अर्जदार प्रस्तुत न्यायमंचासमोर सत्य परिस्थीती लपवून मंचाचे दिशाभूल करीत आहे आणी खोटा दावा दाखल केलेला आहे. म्हणून अर्जदाराचा अर्ज गैरअर्जदार क्र. 1 व 2 च्या विरुध्द खर्चासह फेटाळण्यात यावा असे म्हटले आहे. प्रस्तुत तक्रारअर्जातील परिच्छेद क्र. 1 , 3, 4,5 व 6 मधील सर्व मजकूर निखालस खोटे असून गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांना मान्य नाही कारण सदर अपवघातासंबंधी किंवा सदर विमा क्लेम संबंधी कोणताही कागदोपत्री पुरावा गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांच्याकडे अर्जदाराने किंवा गैरअर्जदार क्र. 3 यांनी दाखल केले नाही. त्यामुळे सदर अपघाती विमा संबंधी गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांच्या अर्जदाराप्रती कोणतेही जिम्मेदारी नाही जोपर्यंत अर्जदार यांनी विमा पॉलिसीच्या नियम व अटी अनसरुन कागदोपत्री पुरावा प्रतिवादी क्र. 1 व 2 यांच्याकडे रितसर अर्जासहीत दाखल करत नाही व आवश्यक बाबीचे पुर्तता करत नाही तोपर्यंत कसल्याही प्रकारची जिम्मेदारी राहत नाही. वास्तवात दि.16/09/2009 रोजी किंवा दि.20/09/2009 रोजी अर्जदाराचे पती बाजीराव पुंडलिक आमोघे हे शेताकडे पाणी देण्यासाठी गेले नव्हते व त्यांना सापाने चावा घेतला नाही व त्याना उपचारासाठी नांदेड व औरंगाबाद येथे शासकीय रुग्णांलयात दाखल केले नाही व त्यांचा मृत्यू दि.23/09/2009 रोजी उपचारा दरम्यान झाला नाही व बेगमपुरा औरंगाबादचे पोलिसांनी आकस्मात मृत्यू नोंदणी म्हणुन नोंद केली नाही व पंचनामा केला नाही. प्रस्तुत तक्रारअर्जातील परिच्छेद क्र.2 व 13 यास उत्तर देण्याची गरज नाही. प्रस्तुत तक्रारअर्जातील परिच्छेद क्र. 7,8,9,10 व 11 मधील ह सर्व मजकूर खोटी असून प्रतीवादी क्र. 1 व 2 यांना मान्य नाही. अर्जदाराचे पती सदर विमा पॉलिसीच्या अटी व नियमानुसार दि.15/08/2009 रोजी किंवा मयताचे मृत्युपूर्वी ते शेतकरी असल्याबद्यल व त्यांच्या मृत्यु दि.23/09/2009 रोजी किंवा साप चावल्यामुळे झाल्याबद्यल व सदर विमा क्लेम प्रतीवादी क्र. 1 व 2 यांच्याकडे सर्व सत्यप्रती कागदपत्रासहीत प्रतीवादी क्र. 3 यांनी दाखल केल्याबद्यल व ते प्राप्त झाल्याबद्यल व दि.15/11/2010 रोजी कायदेशिर नोटीस पाठविल्याबद्यल कागदोपत्री पुराव्याच्या आधारे सिध्द करण्यात आला नाही. म्हणून अर्जदाराचे अर्ज प्रतीवादी क्र. 1 व 2 यांच्या विरुध्द फेटाळण्यात यावा असे म्हटले आहे. अर्जदाराने विमा पॉलिसीच्या अटी व नियमाचे पालन न केल्यामुळे व आवश्यक ते कागदपत्रांची पुर्तता केली नसल्यामुळे व त्रुटीची पुर्तता केली नसल्यामुळे अर्जदारास प्रतीवादी क्र.1 व 2 यांच्याकडुन कोणताही विमा रक्कम रु.1,00,000/- व त्यावर दि.2009 पासुन 12 टक्के व्याज व रु.50,000/- मानसिक व शारिरीक त्रासापोटी व दावा खर्च म्हणून रु.5,000/- मागता येणार नाही. वरील सर्व गोष्टीचा विचार करुन अर्जदाराचा अर्ज प्रतीवादी क्र. 1 व 2 यांचे विरुध्द फेटाळण्यात यावा असे म्हटले आहे. गैरअर्जदार क्र.3 हे हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. अपघात हा दि.23.09.2009 रोजी झाला व त्यांना क्लेम हा दि.05.06.2010 रोजी प्राप्त झाला पण तो क्लेम सोबत काही कागदपञ कमी असल्याचे दि.11/06/2010 रोजी कळविण्यात आले.परत दि.06.10,03/11/2010 व दि.06.12.2010 रोजी परत पञ देण्यात आले. त्यामूळे अर्जदारांचा क्लेम हा प्रलंबित आहे. म्हणून त्यांचे सेवेमध्ये कोणतीही ञूटी नाही म्हणून त्यांचे विरुध्दची तक्रार ही फेटाळण्यात यावी असे म्हटले आहे. अर्जदार व गैरअर्जदार क्र. 1, 2 व यांनी दाखल केलेला लेखी जवाब व कागदपञ पाहून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. अर्जदार ग्राहक आहेत काय ? होय. 2. गैरअर्जदार हे अर्जदारानी मागितलेली विमा रक्कम देण्यास बांधील आहेत काय ? होय. 3. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे मूददा क्र.1 अर्जदार यांनी ग्रामपंचायत चे मृत्यू प्रमाणपञ दाखल केलेले आहे तसेच तलाठी यांनी गाव नमूना सहा क वारसा प्रमाणपञाची नोंदवही यामध्ये मृत भोगवटदाराचे नांव बाजीराव पुंडलिक आमोघे दाखवलेले आहे. ज्यामध्ये कलावतीबाई ही बाजीराव यांची पत्नी आहे असे लिहीलेले आहे. त्यामूळे गैरअर्जदार यांनी काढलेला मूददा अर्जदार हे गैरअर्जदार यांचे वारस नाहीत, हा याठिकाणी अर्जदाराने खोडलेला आहे व अर्जदार हे मयत बाजीराव यांचे वारस आहेत हे सिध्द झालेले आहे. अर्जदार ही मयत बाजीराव यांची पत्नी आहे हे सिध्द होत असल्यामूळे मूददा क्र.1 चे उत्तर सकारात्मक देण्यात येते. मूददा क्र.2 अर्जदार ही मयत बाजीराव यांचे नांवावर शेती असल्याबददल 7/12 चा उतारा दाखल केलेला आहे. ज्यामध्ये मयत बाजीराव यांचे नांवावर शेत जमीन असल्याबददल पूरावा मंचासमोर आलेला आहे. तसेच मयत बाजीराव हे दि.23.09.2009 रोजी शेताकडे गेले असता शेतीला पाणी देत असतांना त्यांना सापाने चावा घेतल्याने त्यांचा अपघाती मृत्यू झाला, हा मूददा गैरअर्जदार यांनी जवाबामध्ये मृत्यूबदल पूरावा दाखल केला नाही म्हणून अमान्य केला आहे. अर्जदार यांनी घटनेची फिर्याद दिली व त्यामध्ये अर्जदाराचा मृत्यू हा सापाने चावा घेतल्याने झाला अशी माहीती पोलिस स्टेशन बेगमपुरा औरंगाबाद यांनी अपघाती नोंद घेतली आहे. त्याबददलचे कागदपञ अर्जदाराने दाखल केल्यामूळे मयत बाजीराव हे सापाच्या चाव्याने अपघाती मरण पावले हे सिध्द झालेले आहे. सन 2009-10 मध्ये औरंगाबाद महसूल विभागात येणा-या सर्व शेतक-यासाठी व्यक्तीगत अपघात विमा गैरअर्जदार क्र.1 यांचेंकडून काढलेली आहे व त्यांचा विमा हप्ता महाराष्ट्र शासनाने भरला आहे. यामध्ये बाजीराव यांचा सहभाग असल्यामूळे व अर्जदार ही त्यांची पत्नी असल्यामूळे ती प्रत्यक्षरित्या जरी नाही तरी अप्रत्यक्षरित्या अर्जदार ही ग्राहक आहे. त्यामूळे अर्जदार ही विमा रक्कम रु.1,00,000/- गैरअर्जदार यांचे कडे मागू शकते. अर्जदार हीने मृत्यू दाखला प्रमाणपञ, वारसा प्रमाणपञ, 7/12, इत्यादी कागदपञासह गैरअर्जदार क्र.2 व 3 यांचेकडे अर्ज दाखल केला आहे. त्याबददलची पोहच पावती अर्जदाराने दाखल केली आहे. दि.16.09.2009 रोजी घटना घडली आहे व त्याबददलची कागदपञे गैरअर्जदार क्र.1 व 2 यांना पाठविले आहेत. कंपनीने ते कागदपञे युनायटेड इंडिया इन्शूरन्स कंपनी यांना सेंटलमेंट साठी दिलेले आहेत पण अद्यापपर्यत गैरअर्जदार क्र.2 व 3 यांनी विम्याची रक्कम दिली नाही हे सिध्द होते. वरील सर्व कागदपञ सिध्द झाल्याने गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांनी अर्जदारास नूकसान भरपाई पोटी रक्कम रु.1,00,000/- एक महिन्याचे आंत दयावेत. तसेच मानसिक ञासापोटी रु.5,000/- व दावा खर्च म्हणून रु.2,000/- दयावेत या निर्णयापर्यत हे मंच आलेले आहे. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज मंजूर करण्यात येतो. 2. गैरअर्जदार क्र.2 व 3 यांनी हा निकाल लागल्यापासून 30 दिवसांचे आंत अर्जदार यांना रु.1,00,000/- पूर्ण रक्कम दयावी व त्या रक्कमेवर दि.10.12.2010 पासून पूर्ण रक्कम मिळेपर्यत 9 टक्के व्याजाने रक्कम दयावी. 3. मानसिक ञासाबददल रु.5,000/- व दावा खर्च म्हणून रु.2,000/- मंजूर करण्यात येतात. 4 वरील सर्व रक्कम एक महिन्याचे आंत न दिल्यास, एक महिन्यानंतर संपूर्ण रक्कमेवर 9 टक्के व्याज पूर्ण रक्कम मिळेपर्यत गैरअर्जदार क्र.2 व 3 यांनी अर्जदारास दयावे लागेल. 5. पक्षकारांना आदेश कळविण्यात यावा. श्री.बी.टी.नरवाडे पाटील श्रीमती सुवर्णा देशमूख अध्यक्ष सदस्या गो.प.निलमवार. लघुलेखक
| [HON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh] MEMBER[HON'BLE President B.T.Narwade] PRESIDENT | |