जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2010/301 प्रकरण दाखल तारीख - 10/12/2010 प्रकरण निकाल तारीख – 07/02/2011 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील, - अध्यक्ष मा.श्रीमती.सुवर्णा देशमुख. - सदस्या श्री.देवीदास पि.पुंडलिकराव माने, वय वर्षे 46, धंदा शेती, रा. पिंपळगांव ता.नायगांव जि.नांदेड. अर्जदार. विरुध्द 1. व्यवस्थापक, युनायटेड इंडिया इशुरन्स कंपनी लि, गैरअर्जदार प्रादेशिक कार्यालय, अंबिका भवन 19, तिसरा मजला, धरमपेठ एक्सटेंशन, शंकरनगर चौक, नागपूर – 440010. 2. व्यस्थापक, युनायटेड इंडिया इंशुरन्स कंपनी लि, संतकृपा मार्केट, जी.जी.रोड, नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड.बि.व्ही.भुरे. गैरअर्जदार क्र. 1 व 2 तर्फे वकील – अड. श्रीनिवास मद्ये निकालपत्र (द्वारा- मा.श्रीमती.सुवर्णा देशमुख,सदस्या) अर्जदार देवीदास पि.पुडंलिकराव माने रा. पिंपळगांव ता.नायगांव जि.नांदेड राहणार असून तो मयत शेतकरी धोंडयाबाई भ्र.देवीदास माने हिचा पती आहे. अर्जदाराची पत्नी नामे धोंडयाबाई देवीदास माने ही दि.31/08/2009 रोजी सांयकाळी 6.00 वाजता उत्तम बेंद्रीकर यांच्या शेतातील विहीरीतील पाणी आणण्यासाठी गेली असता, विहीरीतील पाणी काढतांना तिचा पाय घसरुन विहीरीत पडल्यामुळे बुडून अपघाती मृत्यु झाला. याबद्यल पोलिस स्टेशन नायगांव यांन अपघाती मृत्यु क्र.13/2009 कलम 174 सी.आर.पी.सी. नुसार नोंदविले व घटनास्थळ पंचनामा करुन प्रमाणपत्र दिले, अर्जदाराने अपघाती रिपोर्ट, घटनास्थळ पंचनामा, तहसिलदार यांचे अहवाल दाखल केले आहे. मयत धोंडयाबाई ही शेतकरी होती त्यांचे नांवे पिंपळगांव येथे गट नं.15 मध्ये क्षेत्रफळ 60 आर एवढी जमीन आहे व त्या जमीनीची ती मालक व ताबेदार होती त्यांच्या नांवे 7/12 चा उतारा व नमुना नं.8 चा उतारा व 6 क चा उतारा दाखल केला आहे. अर्जदाराची पत्नी ही शेतकरी होती व तिचे प्रिमीअम महाराष्ट्र शासनाने भरलेले आहे व ती लार्भाथी आहे म्हणून अर्जदार गैरअर्जदार क्र. 1 यांचे ग्राहक आहे. सदरील पॉलिसीचा कालावाधी हा ऑगष्ट 2009 ते 01/09/2009 आहे. अर्जदाराने आपल्या पत्नीच्या मृत्युनंतर क्लेम दाखल केल्यानंतर गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांचेकडे क्लेम दाखल केल्यापासुन विम्याची रक्कम मिळण्यासाठी अनेकवेळा तोंडी विनंती केली असता, लवकरच होईल म्हणून नुसते अश्वासन देत राहीले. गैरअर्जदार यांनी दि.02/08/2010 च्या पत्रान्वये अर्जदाराचा विम्याचा क्लेम हा अर्जदाराचे पत्नीच्या मृत्युपुर्वी तिचे 7/12 वर नांव नसल्याचे कारण नमुद करुन क्लेम नामंजुर केला. अर्जदार मयताचा पती असून तो प्रस्तुत पॉलिसीनुसार नुसान भरपाई मिळण्यास हक्कदार आहे, त्यामुळे गैरअर्जदार यांनी कोणत्याही प्रकारचा विलंब न लावता विम्याची रक्कम अर्जदारास देणे बंधनकारक असतांना बेकायदेशिरपण 7/12 वर अर्जदाराचे पत्नीचे मृत्युपूर्वी नांव नसल्याचे चुकीचे कारण दाखवून क्लेम नामंजुर केला. गैरअर्जदार यांनी त्रुटी सेवा दिल्याबद्यल, पॉलिसी, विम्याची रक्कम रु.1,00,000/- व त्यावर 12 टक्के व्याज तसेच मानसिक व शारीरिक त्रासापोटी रु. 25,000/- सन 2009 पासुनप व दावा खर्च रु. 5,000/- अर्जदाराच्या हक्कात मंजुर करावे, अशी विनंती केली आहे. गैरअर्जदार क्र. 1 व 2 हे वकीला मार्फत हजर झाले त्यांनी आपला लेखी जबाब दाखल केला. त्यांचे म्हणणे की, अर्जदारास प्रस्तुत अर्ज दाखल करण्याचा कोणताही कायद्याने अधिकार नाही. अधिकार नसतांना सुध्दा प्रस्तुत तक्रारअर्ज मा.न्यायमंचासमोर दाखल करुन मंचाची दिशाभूल करीत आहे. जे की, कायद्याने चुक असल्यामुळे तक्रारअर्ज रु.25,000/- दंड लावून फेटाळण्यास योग्य आहे. क्र. 1 व 2 यांचेकडे दाखल केलाच नाही. जर क्लेम दाखलच केला नसेल तर गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी सदर न दाखल केलेला क्लेम नामंजूर करण्याचा किंवा क्लेम देण्यास टाळाटाळ करण्याचा किंवा विलंब करण्याचा किंवा सेवेत त्रुटी देण्याचा प्रश्नच उदभवत नाही. असे असतांना सुध्दा अर्जदार प्रस्तुत न्यायमंचासमोर सत्य परिस्थीती लपवून मंचाचे दिशाभूल करीत आहे आणी खोटा दावा दाखल केलेला आहे. म्हणून अर्जदाराचा अर्ज गैरअर्जदार क्र. 1 व 2 च्या विरुध्द खर्चासह फेटाळण्यात यावा असे म्हटले आहे. प्रस्तुत तक्रारअर्जातील परिच्छेद क्र. 1 , 3, 4, मधील सर्व मजकूर निखालस खोटे असून गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांना मान्य नाही सदर विमा क्लेम संबंधी कोणताही कागदोपत्री पुरावा गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांच्याकडे दाखल केले नाही. त्यामुळे सदर अपघाती विमा संबंधी गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांच्या अर्जदाराप्रती कोणतेही जिम्मेदारी नाही जोपर्यंत अर्जदार यांनी विमा पॉलिसीच्या नियम व अटी अनसरुन कागदोपत्री पुरावा प्रतिवादी क्र. 1 व 2 यांच्याकडे रितसर अर्जासहीत दाखल करत नाही व आवश्यक बाबीचे पुर्तता करत नाही तोपर्यंत कसल्याही प्रकारची जिम्मेदारी राहत नाही. वास्तवात 31/08/2009 रोजी सायंकाळी 6.00 वाजता उत्तम बेंद्रीकर यांच्या शेतातील विहीरीतील पाणी आणण्यासाठी गेलीच नव्हती व ती विहीरीतून पाणी काढत नव्हती व ती विहीरीत पडलीच नाही त्यामुळे बुडून तिचा मृत्यु दि.01/09/2009 रोजी होण्याचास प्रश्नच उदभवत नाही. याबद्यल पोलिस स्टेशनशी संगनमत करुन गैरअर्जदाराकडुन पैसे उकळण्याचा उद्येशाने अर्जदाराने नायगांव पोलिस स्टेशन येथे घडलेल्या घटनेसंबंधी अपघाती मृत्यु क्र.13/2009 चा नोंद केला. प्रस्तुत तक्रारअर्जातील परिच्छेद क्र.5,6,7,8,9,10 व 13 मधील सर्व मजकुर निखालस खोटे असून ते गैरअर्जदारास मान्य नाही. अर्जदाराची पत्नी धोंडयाबाई देवीदास माने ही जिवंत असतांना त्यांचे मृत्यू पर्यंत घरकाम करीत होती. मयताचे नांवे पिंपळगांव येथे गट क्र.15 मध्ये क्षेत्रफळ 0.60 आर एवढी केंव्हीही नव्हतीच व त्या जमीनीची ती कधीही मालक वा ताबेदार नव्हती व ती 7/12 धारक शेतकरी नव्हतीच. अर्जदाराने नमुना नं.8 चा उतारा दाखल केला नाही. विमा पॉलिसीच्या अटी व नियमानुसार मयताचे नांवाने त्यांच्या मृत्यूपुर्वी 7/12 मध्ये नांव असणे व मयताचे/शेतक-याचा नावाचा नोंद 7/12 मध्य मृत्युपुर्वी असणे आवश्यक आहे व बंधनकारक आहे किंवा विमा पॉलिसी क्र.230200/47/09/99/00000067 चा कालावधी ज्या दिवशी चालू झाले व त्या दिवशी म्हणजे दि.15/08/2009 रोजी 7/12 वर मयताचे नांव असणे आवश्यक आहे. अर्जदार यांना क्लेम मागण्याचा कोणताही हक्क पोहचत नाही व अर्जदार हे क्लेम मागण्यास पात्र ठरत नाही. (As per terms & conditions of insurance policy No.230200/47/09/99/00000067, farmers name should in the Land Record Register i.e. 7/12 on the date of the issuance of policy otherwise the claimant is not eligible to claim and get the amount of insurance.) प्रस्तुत दाव्यामध्ये अर्जदाराने तसे काही कागदोपत्री पुराव्या आधारे सिध्द केले नाही अर्जदाराने संबंधीत तलाठी नायगांव यांच्याशी संगनमत करुन सदर मयताचे नांव तिच्या मृत्युनंतर 7/12 व गाव नमुना 6 क मध्ये हस्तक्षराने लिहीण्यास भाग पाडले आहे. प्रतीवादी क्र. 1 व 2 यांनी दावा फेटाळून कोणतीही चुक केली नाही म्हणून अर्जदार यांना विमा पॉलिसीची रक्कम रु.1,00,000/- व त्यासवर 2009 पासुनप 12 टक्के व्याज व त्रासापोटी रु.25,000/- व दावा खर्च रु.5,000/ देण्याची जिम्मेदारी प्रतीवादीची नाही. म्हणून वरील सर्व गोष्टीचा विचार करुन अर्जदाराचा अर्ज प्रतीवादी नं. 1 व 2 यांचे विरुध्द फेटाळण्यात यावा असे म्हटले आहे. अर्जदार व गैरअर्जदार क्र. 1, 2 व यांनी दाखल केलेला लेखी जवाब व कागदपञ पाहून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. अर्जदार ग्राहक आहेत काय ? होय. 2. गैरअर्जदार हे अर्जदारानी मागितलेली विमा रक्कम देण्यास बांधील आहेत काय ? होय. 3. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे मूददा क्र.1 अर्जदार यांनी ग्रामपंचायत चे मृत्यू प्रमाणपञ दाखल केलेले आहे तसेच तलाठी यांनी गाव नमूना सहा क वारसा प्रमाणपञाची नोंदवही यामध्ये मृत भोगवटदाराचे नांव धोंडयाबाई भ्र.देविदास माने दाखवलेले आहे. ज्यामध्ये देवीदस हा धोंडयाबाई यांचा पती आहे असे लिहीलेले आहे. त्यामूळे गैरअर्जदार यांनी काढलेला मूददा अर्जदार हे गैरअर्जदार यांचे वारस नाहीत, हा याठिकाणी अर्जदाराने खोडलेला आहे व अर्जदार हे मयत बाजीराव यांचे वारस आहेत हे सिध्द झालेले आहे. अर्जदार ही मयत धोंडयाबाई यांचा पती आहे हे सिध्द होत असल्यामूळे मूददा क्र.1 चे उत्तर सकारात्मक देण्यात येते. मूददा क्र.2 अर्जदार हा मयत धोंडयाबाई यांचे नांवावर शेती असल्याबददल 7/12 चा उतारा दाखल केलेला आहे. ज्यामध्ये मयत धोंडयाबाई यांचे नांवावर शेत जमीन असल्याबददल पूरावा मंचासमोर आलेला आहे. तसेच मयत धोंडयाबाई हीचा दि.01.09.2009 रोजी उत्तम बेंद्रीकर यांच्या शेतातील विहीरीतील पाणी आणण्यासाठी गेली असता विहीरीतील पाणी काढतांना पाय घससरुन पाण्यात बुडून त्यांचा अपघाती मृत्यू झाला, हा मूददा गैरअर्जदार यांनी जवाबामध्ये मृत्यूबदल पूरावा दाखल केला नाही म्हणून अमान्य केला आहे. अर्जदार यांनी घटनेची फिर्याद दिली व त्यामध्ये अर्जदाराचा मृत्यू हा पाण्यात बुडून अपघाताने झाला अशी माहीती पोलिस स्टेशन नायगांव यांनी अपघाती नोंद घेतली आहे. त्याबददलचे कागदपञ अर्जदाराने दाखल केल्यामूळे मयत धोंडयाबाई ही विहीरीत बुडून अपघाती मरण पावली हे सिध्द झालेले आहे. सन 2009-10 मध्ये औरंगाबाद महसूल विभागात येणा-या सर्व शेतक-यासाठी व्यक्तीगत अपघात विमा गैरअर्जदार क्र.1 यांचेंकडून काढलेली आहे व त्यांचा विमा हप्ता महाराष्ट्र शासनाने भरला आहे. यामध्ये धोंडयाबाई यांचा सहभाग असल्यामूळे व अर्जदार ही त्यांची पत्नी असल्यामूळे ती प्रत्यक्षरित्या जरी नाही तरी अप्रत्यक्षरित्या अर्जदार ही ग्राहक आहे. त्यामूळे अर्जदार ही विमा रक्कम रु.1,00,000/- गैरअर्जदार यांचे कडे मागू शकते. अर्जदार हीने मृत्यू दाखला प्रमाणपञ, वारसा प्रमाणपञ, 7/12, इत्यादी कागदपञासह गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचेकडे अर्ज दाखल केला आहे. त्याबददलची पोहच पावती अर्जदाराने दाखल केली आहे. दि.31.08.2009 रोजी घटना घडली आहे व त्याबददलची कागदपञे गैरअर्जदार क्र.1 व 2 यांना पाठविले आहेत. कंपनीने ते कागदपञे युनायटेड इंडिया इन्शूरन्स कंपनी यांना सेंटलमेंट साठी दिलेले आहेत पण अद्यापपर्यत गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी विम्याची रक्कम दिली नाही हे सिध्द होते. वरील सर्व कागदपञ सिध्द झाल्याने गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी अर्जदारास नूकसान भरपाई पोटी रक्कम रु.1,00,000/- एक महिन्याचे आंत दयावेत. तसेच मानसिक ञासापोटी रु.25,000/- व दावा खर्च म्हणून रु.5,000/- दयावेत या निर्णयापर्यत हे मंच आलेले आहे. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज मंजूर करण्यात येतो. 2. गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी हा निकाल लागल्यापासून 30 दिवसांचे आंत अर्जदार यांना रु.1,00,000/- पूर्ण रक्कम दयावी व त्या रक्कमेवर दि.10.12.2010 पासून पूर्ण रक्कम मिळेपर्यत 9 टक्के व्याजाने रक्कम दयावी. 3. मानसिक ञासाबददल रु.5,000/- व दावा खर्च म्हणून रु.2,000/- मंजूर करण्यात येतात. 4. वरील सर्व रक्कम एक महिन्याचे आंत न दिल्यास, एक महिन्यानंतर संपूर्ण रक्कमेवर 9 टक्के व्याज पूर्ण रक्कम मिळेपर्यत गैरअर्जदार क्र.2 व 3 यांनी अर्जदारास दयावी. 5. पक्षकारांना आदेश कळविण्यात यावा. श्री.बी.टी.नरवाडे पाटील श्रीमती सुवर्णा देशमूख अध्यक्ष सदस्या गो.प.निलमवार. लघुलेखक
| [HON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh] MEMBER[HON'BLE President B.T.Narwade] PRESIDENT | |