जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, बीड यांचे समोर …...
ग्राहक तक्रार क्रमांक – 70/2012 तक्रार दाखल तारीख- 14/05/2012
बिजुबाई महादेव अडागळे
वय – 40 वर्ष, धंदा – शेती /घरकाम
रा.महासावंगी, ता.पाटोदा जि.बीड. ....... तक्रारदार
विरुध्द
1. शाखा व्यवस्थापक,
युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लि.
जालना बीड रोड, ता.जि.बीड ........ सामनेवाले.
2. तालुका कृषी अधिकारी,
कार्यालय पाटोदा ता.पाटोदा जि.बीड.
3. डेक्कन इन्शुरन्स अँन्ड रिइन्शुरन्स ब्रोकर्स प्रा.लि.
6, परखडे बिल्डींग, भानुदास नगर, बिग बाझार मागे,
आकाशवाणी चौक, औरंगाबाद.
को र म - पी.बी.भट, अध्यक्ष
अजय भोसरेकर, सदस्य
तक्रारदारातर्फे – वकील – आर.बी.धांडे,
सामनेवालेतर्फे – वकील – कोणीही हजर नाही.
।। निकालपत्र ।।
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ही ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदारांनी तक्रारीत तांत्रिक बाब असल्याने नवीन प्रकरण दाखल करण्याची परवानगी देऊन सदरची तक्रार काढून घेण्याचे संदर्भात अर्ज दिला. त्यानुसार तक्रार निकाली काढणे उचित होईल असे न्यायमंचाचे मत आहे.
सबब, न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रारदारांना नवीन तक्रार दाखल करण्याची परवानगी देऊन सदरची
तक्रार निकाली काढण्यात येते.
2. खर्चाबददल आदेश नाही.
3. ग्राहक संरक्षण कायदा- 1986, अधिनियम 2005 मधील कलम-20
(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
(अजय भोसरेकर) (पी.बी.भट)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड