Maharashtra

Osmanabad

CC/149/2013

VARSH SUDHIR HAJGUDE - Complainant(s)

Versus

MANAGER, UNITED INDIA INSURANCE CO. LTD. - Opp.Party(s)

A.K.FATAK

21 May 2015

ORDER

DISTRICT CONSUMER REDRESSAL FORUM OSMANABAD
Aria of Collector Office Osmanabad
 
Complaint Case No. CC/149/2013
 
1. VARSH SUDHIR HAJGUDE
RES. DATTA NAGER, TAL. KALAMB, DIST. OSMANABAD
...........Complainant(s)
Versus
1. MANAGER, UNITED INDIA INSURANCE CO. LTD.
SHIVAJI CHOWK, NEAR LOKMANGAL BANK, OSMANABAD.
2. TAL. AGRICULTUR OFFICER,
TAL. AGRICULTUR OFFICER, TAL.KALAMB,
OSMANABAD
MH
3. MANAGER, KABAL INSURANCE BROKING SERVICES LTD
KABAL INSURANCE BROKING SERVICES LTD, 3/A, S.V. ROAD, GOREGAO, MUMBAI
OSMANABAD
MH
4. MANAGER
NATIONAL INSURANCE CO. LTD. 4TH FLOOR FLOOR, SURBHI CHOWK
SOLAPUR
MH
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. M.V. Kulkarni. PRESIDENT
 HON'BLE MRS. VIDYULATA J.DALBHANJAN MEMBER
 HON'BLE MR. M.B. Saste MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

ग्राहक तक्रार  क्र.  149/2013

                                                                                    अर्ज दाखल तारीख : 19/10/2013

                                                                                    अर्ज निकाल तारीख: 21/05/2015

                                                                                    कालावधी: 01 वर्षे 07 महिने 04 दिवस

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, स्‍मानाबाद

1.   श्रीमती वर्षा सुधीर हाजगूडे,

     वय - 30 वर्षे, धंदा – घरकाम,

     रा.दत्‍त नगर, कळंब,

     ता. कळंब, ता.जि.उस्‍मानाबाद.                         ....तक्रारदार      

             

                            वि  रु  ध्‍द

1.    मा. विभागीय व्‍यवस्‍थापक,

युनाईटेड इंडिया इन्‍शुरन्‍स कंपनी लि.,

2 रा मजला, किंग्‍ज कॉर्नर बिल्‍डींग,

शिवाजी चौक,उस्‍मानाबाद.

 

2.    मा. तालुका कृषि अधिकारी,

तालुका कृषि अधिकारी कार्यालय, कळंब,

      ता. कळंब, जि. उस्‍मानाबाद.

 

3.    मा. व्‍यवस्‍थापक,

कबाल इन्‍शोरन्‍स सर्व्‍हीसेस प्रा. लि.,

युनिट- 20, 1 ला मजला, ओेरिएण्‍टल हाऊस,

3 / ए, एस. व्‍ही. रोड, गोरेगांव (पश्चिम),

मुंबई -400063.                                 ..विरुध्‍द  पक्षकार

 

कोरम :       1)  मा.श्री.एम.व्‍ही.कुलकर्णी, अध्यक्ष.

                                    2) मा.श्रीमती विद्युलता जे.दलभंजन. सदस्‍य.

                  3)  मा.श्री.मुकुंद बी.सस्‍ते, सदस्‍य.                  

      

                                तक्रारदारातर्फे विधीज्ञ    :  श्री.ए.के. फाटक.

                       विरुध्‍द पक्षकार क्र.1 तर्फे विधीज्ञ  :  श्री.के.एच.चौरे.

                       विरुध्‍द पक्षकार क्र.2 तर्फे विधीज्ञ  :  स्‍वत:.

                       विरुध्‍द पक्षकार क्र.3 तर्फे विधीज्ञ  :  स्‍वत:.

                        न्‍यायनिर्णय

मा. सदस्‍य श्रीमती विद्युलता जे.दलभंजन. यांचे व्‍दारा:

अ)   1.   तक्रारदाराच्‍या तक्रारी अर्जाचे थोडक्‍यात कथन पुढीलप्रमाणे :

          अर्जदार श्रीमती वर्षा सुधीर हाजगुडे या हत्‍तनगर कळंब ता. कळंब जि. उस्‍मानाबाद येथील रहिवाशी आहेत त्‍यांनी विरुध्‍द पक्ष (विमा कंपनी) यांचे विरुध्‍द तक्रार दाखल केलेली आहे.

2.     अर्जदाराचे पती (मयत सुधीर) यांचे नावावर गट नं.132 फ क्षेत्र 26 आर – एवढी जमीन होती.

 

3.    दि.15/06/2010 रोजी दुपारी 3 वाजता कळंब येरमाळा रोडवर हासेगांव शिवारात  CG-040JA-0175  या ट्रकने सुधीरच्‍या मोटार सायकल नं.MH-25-C 4354  ला जोराची धडक दिल्‍याने ते दि.15/06/2010 रोजी ते मयत झाले त्‍याबद्दल कळंब येथे गु.रं. नं.81/10 कलम 279, 304(A) I.P.C. च्‍या चालकाविरुध्‍द गुन्‍हा नोंद झाला आहे.

 

4.    त्‍यानंतर अर्जदाराने विप क्र.2 (तालूका कृषी अधिकारी) यांचेकडे दि.09/05/2011 रोजी सर्व कागदपत्रांची पुर्तता करुन विमा प्रस्‍ताव दाखल करुन विमा रकमेची मागणी केली. कृषी अधिकारी यांनी सदर प्रस्‍ताव (ब्रोकर) विप क्र.3 यांचेकडे पाठवला व ब्रोकरने विमा कंपनीकडे पाठवला प्रस्‍तावासोबत मृत्‍यू प्रमाणपत्र, वारस प्रमाणपत्र, p.m. Report, 7/12, 8-A, 6-A, passbook, घटनास्‍थळ पंचनामा, एफ.आय.आर. व शपथपत्र, प्रपत्र -ग चे दिले.

5.    अर्जदाराने दि.10/10/2013 रोजी विप कडे चौकशी केली असता तुमचा प्रस्‍ताव फार पुर्वीचा असून तो आमच्‍याकडून मंजूर न करता निकालात गेला चौकशीसाठी उशीर केला असे सांगून उडवाउडवीची उत्‍तरे दिली तसेच अद्यापही काही कळविलेले नाही विमा रक्‍कम दिली नाही. त्यामुळे अर्जदाराने प्रस्‍तुत तक्रारीव्‍दारे विमा रक्‍कम रु.1,00,000/- 12 टक्‍के व्‍याजासह शारीरिक मानसिक त्रासापोटी रक्कम रु.20,000/- विमा कंपनीकडून मिळावेत अशी विनंती केलेली आहे.

 

ब)    विमा कंपनी विप क्र.1 यांनी म्‍हणणे अभिलेखावर दाखल केलेले आहे त्‍यांचे म्‍हणण्‍यानुसार वारस प्रमाणापत्र दाखल नाही. तक्रार मुदतीत कशी आहे याबाबत कसलाही उल्‍लेख नाही. दोन वर्षात तक्रार दाखल करणे गरजेचे होते पतीचे निधन दि.15/06/2010 रोजी झाले. तक्रार मुदतीत नाही नामंजूर करावी. कृषी अधिकारी यांचेकडे प्रस्‍ताव दाखल केला त्‍याबद्दल पुरावा नाही. विमा कंपनीला प्रस्‍ताव प्राप्‍त नाही. उडवाउडवीची उत्‍तरे दिली नाहीत. त्रुटी केलेली नाही त्‍यामुळे तक्रार खर्चासह खारीज करावी न्‍यामंचाची दिशाभुल केलेली आहे. दंडात्‍मक कार्यवाही व्‍हावी अशी विनंती विमा कंपनीने केलेली आहे.

 

क)   ब्रोकर, विप क्र. 2 यांनी त्‍यांचे म्हणण्‍याप्रमाणे तक यांनी प्रस्‍ताव 90 दिवसात दाखल केला नाही. विप ला प्रस्‍ताव दि.04/02/2012 रोजी प्राप्‍त झाला. विप यांनी सदर प्रस्‍ताव विमा कंपनीला दि.17/02/2012 रोजी पाठवला. विमा कंपनीने दि.17/04/2012 रोजी प्रस्‍ताव फेटाळला व तसे वारसांना कळवले आहे तरी तक्रारीतुन विप क्र. 2 यांना पुर्णपणे मुक्‍त करावे अशी विनंती केलेली आहे.

 

ड)   विप क्र.3 कृषी अधिकारी यांनी त्‍यांचे म्‍हणणे दाखल केलेले आहे त्‍यांचे म्‍हणण्‍यानुसार अर्जदाराचा प्रस्‍ताव दि.09/05/2011 रोजी दाखल केला व तो दि.12/05/2011 रोजी जि. अ. कृ. अधिकारी यांच्‍याकडे पुढील कार्यवाहीस्‍तव सादर करण्‍यात आला.

 

इ)    अर्जदाराने तक्रारीसोबत कृषी अधिकारी याचे पत्र दि.10/01/2012 क्लेम फॉर्म भाग-1, तलाठीचे प्रमाणपत्र, क्‍लेम फॉर्म नं-3, 7/12, 6-अ, नोंदवही फेरवही, प्रतिज्ञापत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, मृत्‍यू प्रमाणपत्र, FIR, घटनास्‍थळ पंचनामा, मरणोत्‍तर पंचनामा, पी.एम. रिपोर्ट, पासबुकची झेरॉक्‍स इ. कागदपत्रांचे सुक्ष्‍म अवलोकन केले, अर्जदाराचा लेखी युक्तिवाद वाचला, तोंडी युक्तिवाद ऐकला असता आमचे विचारार्थ सदर प्रकरणात खालीलप्रमाणे मुद्दे उपस्थित होतात.

         मुद्दे                                             उत्‍तरे

1) अर्जदाराची तक्रार मुदतीत आहे का?                                                     होय.

 

2) अर्जदाराला देण्‍यात येणा-या सेवेत विमा कपंनीने त्रुटी केली का?       होय.

 

3) अर्जदार विमा रक्कम मिळविण्‍यास पात्र आहे काय ?                          होय.

 

4) काय आदेश ?                                                                            अंतिम आदेशाप्रमाणे.

 

फ)                                               कारणमीमांसा

मुद्दा क्र.1

1.    अर्जदाराचे पती दि.15/06/2010 रोजी मयत झालेले आहेत अर्जदाराने शेतकरी अपघात विमा प्रस्‍ताव दि.09/05/2011 रोजी कृषी अधिकारी यांचेकडे दाखल केलेला आहे आणि कृषी अधिकारी उस्‍मानाबाद मार्फत ब्रोकर औरंगाबाद मार्फत विमा कंपनीला दि.17/02/2012 रोजी पाठवला व विमा कंपनीने दि.17/04/2012 रोजी प्रस्‍ताव नामंजूर केला व अर्जदाराच्‍या वारसांना क्‍लेम नामंजूर केल्याच्‍या तारखेपासून दोन वर्षात अर्जदाराने म्हणजेच दि.19/10/2013 रोजी तक्रार दाखल केलेली आहे. सदर तक्रार मुदतीत आहे. विमा कंपनीने जी हरकत घेतलेली आहे की तक्रार मुदतीत नाही ही बाब संयुक्तिक वाटत नाही त्‍यामुळे मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी देत आहोत.

मुद्दा क्र. 2

2.     विमा कंपनीला अर्जदाराचा प्रस्‍ताव पाठविला तो दि.17/02/2012 रोजी पुर्वी मिळाला आणि तो उशिरा प्राप्‍त झाल्‍याने दि.17/02/2012 रोजी नामंजूर केला आणि सेवेत त्रुटी केली.

3.    महाराष्‍ट्र शासनाने शेतक-यांसाठी जी योजना राबवली ति‍चे कल्याणकारी स्वरुप पाहता त्‍यांच्‍या कुटूंबास आर्थिक लाभ देण्‍याकरीता स्‍वतंत्र विमा योजना नसल्‍याने शेतकरी व्‍यक्तिगत अपघात विमा योजना कर्यांन्वित केलेली आहे.

 

4.    विमा कंपनीने अशी हरकत घेतलेली आहे की अर्जदाराचा विमा प्रस्‍ताव त्‍यांच्‍याकडे आला नाही परंतु बारकर यांनी सदर अर्जदाराचा प्रस्‍ताव पाठवलेला आहे तो विमा कंपनीला मिळालेला असून विमा कंपनीने अर्जदाराला नामंजूर केल्‍याचे कळवलेले आहे. अभिलेखावर दाखल कागदपत्राचे सुक्ष्‍म अवलोकन केले असता असे दिसुन येते की विमा कंपनीला सदर प्रस्‍ताव दि.21/02/2012 रोजी प्राप्‍त झाला व त्‍यानुसार त्‍यांनी अर्जदारास 90 दिवसाच्‍या आत प्रस्‍ताव न दिल्‍याने आम्‍ही दावा देऊ शकत नाही असे पत्र पाठवून कळविलेले आहे. सदर पत्र अभिलेखावर दाखल केलेले आहे.

 

5.    विमा कंपनीचे असे म्‍हणणे आहे की अर्जदाराने 90 दिवसाच्‍या आत प्रस्‍ताव न दिल्‍याने आम्‍ही दावा देऊ शकत नाही असे पत्र पाठवून कळविलेले आहे सदर पत्र अभिलेखावर दाखल केलेले आहे.

 

6.     विमा कंपनीचे असे म्हणणे आहे की अर्जदाराने 90 दिवसाच्‍या आत क्‍लेम दाखल करणे गरजेचे आहे परंतू शासन निर्णय पाहता शेक-यांसाठीची ही योजना असल्याने अपघात घडला हे सिध्‍द होत असल्‍यास विमा दावे नामंजूर करुन नये. केव्‍हाही प्रस्‍ताव आला तर तो स्विकारावा व विमा रक्‍कम अदा करावी असे स्‍पष्‍ट नमूद असतांना तांत्रिक कारण पुढे करुन विमा दावे नामंजूर करुन शेतक-यांच्‍या विधवांना रकमेपासून वंचित ठेऊन शासन निर्णयाला डावलून स्‍वत:ची मनमानी करण्‍याचा अधिकार विमा कंपनीला नाही असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.

 

7.    विमा कंपनीने विमा दावा नामंजूर करणेसाठी आणखी एक कारण म्हणजे विमादावा कट ऑफ तारीख उलटून गेल्‍यानंतर विमा दावा दाखल केलेला आहे. पॉलिसीचा अवधी पुर्ण झाल्‍यानंतर 90 दिवसानंतर प्राप्‍त होणारे दावा समर्थनीय कारणास्‍तव स्विकारण्‍याचा उल्‍लेख शासन परीपत्रकात आहे.

 

8.    परंतू पॉलिसीचा अवधी पुर्ण झाल्यावर विहीत 90 दिवसाच्‍या मुदतीत विमा दावा सादर न केल्‍यास विमादावा नामंजूर करण्‍यात यावा अशी कोणतीही पॉलिसी अट अभिलेखावर दाखल नाही. विमा कंपनीस विमा क्‍लेम त्‍वरेने सेटल करण्‍यास उपयोग होईल इतक्‍याच मर्यादीत सदर सुचना अपेक्षीत ठरते. मा. महाराष्‍ट्र राज्‍य आयोगाने न्‍यू इंडिया एश्‍योरंन्‍स कं.लि. विरुध्‍द नानासाहेब हनूमंत जाधव 2005 (2) सी.पी. आर. 24 या निवाडयातील न्‍यायिक तत्‍वाप्रमाणे विहित मुदतीमध्‍ये दावा सादर करण्‍याची सुचना केवळ directory  असून mandatory असू शकत नाही.

 

9.    महाराष्‍ट्र शासनाने राज्यातील शेतक-यांना अपघातामुळे कुटूंबाचे उत्‍पन्‍नाचे साधन बंद होऊन अडचणीची परीस्थिती निर्माण होत असल्‍याने आर्थिक लाभ देण्‍याकरीता स्‍वतंत्र विमा योजना सुरु केलेली आहे. शेतक-यांना आर्थिक अडचणीतून मुक्‍त करणे आणि त्‍यांचे हित संरक्षण करणे हा पॉलिसीचा मुख्‍य उद्देश आहे. त्यामुळे केवळ तांत्रिक बाबीकडे लक्ष न देता मुख्‍य पॉलिसीचा उद्देश कसा सफल होऊ शकतो हे पाहणे आणि केवळ व्‍यावसायिक दृष्‍टीकोणातून विमा पॉलसीकडे न पाहता विमा दाव्‍याचा सकारात्‍मक विचार करणे अत्‍यावश्‍यक व अपेक्षीत होते असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.

 

10.    नमूद प्रकरणात आम्ही मा. मुंबई उच्च न्‍यालायाच्‍या शकुंतला भ. धोंडीराम मुंढे विरुध्‍द स्‍टेट ऑफ महाराष्‍ट्र 2010 (2) महा. लॉ. जनरल पेज नं.880 या निवाडयाचा संदर्भ विचारात घेऊ इच्छित आहोत त्‍या निवाडयात मा. न्‍यायालयाने खालीलप्रमाणे निरीक्षण नोंदविले आहे.

     Besides it is to be borne in mind that as per the government Resolution date on 05/01/2005  as well as minuts of the meeting dated on 16/02/2006 that the said scheme is social welfare scheme and it is beneficial to the family members of the farmers who expired  in  accidental death and respondent no. 4 insurance should not have adopted the  technical approach while grautivs the claims of the family members of the deceased farmer for compensation but said respondent No. 4 insurance company although as stated here in above the petitioner completed the necessary formalities and submitted the claim along with the necessary documents.

 

       अभिलेखावर दाखल कागदपत्रावरुन मयत सुधीर यांचा मृत्‍यू अपघात असल्याचे सिध्‍द होते विमा कंपनीने तांत्रिक बाबींचा आधार घेऊन विमा रकमेपासून अर्जदाराला वंचित ठेवलेले आहे असे करण्‍याने त्‍यांचा हक्क संपूष्‍टात येत नाही विमा कंपनीने अर्जदाराला विमा रक्‍कम न देऊन सेवेत त्रुटी केलेली आहे अर्जदार हा विमा रक्‍कम रु.1,00,000/- विमा दावा नामंजूर केलेल्‍या दिनांकापासून म्‍हणजेच दि.17/04/2012 पासून 9 टक्‍के व्‍याज दराने मिळविण्‍यास पात्र ठरतात त्‍यामुळे मुद्दा क्र.2 व 3 चे उत्‍तर होकारार्थी देऊन खालीप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.

                                 आदेश

तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्‍यात येते.

1) विमा कंपनीने अर्जदार यांना विमा रक्‍कम रु.1,00,000/- (रुपये एक लाख फक्‍त) दि.17/04/2012 पासून संपूर्ण रक्‍कम देय होईपर्यंत द.सा.द.शे. 9 दराने व्‍याज दयावे.

2)  विमा कपंनीने अर्जदारास तक्रार खर्चापोटी रक्कम रु.2,000/-(रुपये दोन हजार फक्‍त)  द्यावेत.

3)  विरुध्‍द पक्ष क्र.2 व 3 यांचे विरुध्‍द तक्रार नामंजूर करण्‍यात येते.

 

4)  उपरोक्‍त आदेशाची अंमलबजावणी विरुध्‍द पक्ष यांनी आदेश दिल्‍या तारखेपासुन तीस

    दिवसात करुन विप यांनी तसा अहवाल 45 दिवसात मा.मंचासमोर सादर करावा,

    सदरकामी उभय पक्षकारांनी मंचात हजर रहावे. सदर आदेशाची पुर्तता विप यांनी न

    केल्‍यास तक्रारदाराने तसा अर्ज दयावा.

5)    उभय पक्षकारांना आदेशाच्‍या प्रमाणित प्रती निशु:ल्‍क देण्‍यात याव्‍यात.

 

 

 

 

   (श्री. एम.व्‍ही. कुलकर्णी)

         अध्‍यक्ष

  (श्री.मुकूंद.बी.सस्‍ते)                                (सौ.विद्युलता जे.दलभंजन)

      सदस्‍य                                                       सदस्‍या 

               जिल्‍हा  ग्राहक  तक्रार  निवारण  मंच,  उस्‍मानाबाद.

 
 
[HON'BLE MR. M.V. Kulkarni.]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. VIDYULATA J.DALBHANJAN]
MEMBER
 
[HON'BLE MR. M.B. Saste]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.