जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,धुळे.
मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही. दाणी
मा.सदस्या – सौ.एस.एस. जैन.
---------------------------------------- ग्राहक तक्रार क्रमांक – १९६/२०१२
तक्रार दाखल दिनांक – ०१/११/२०१२
तक्रार निकाली दिनांक – १३/०६/२०१३
श्री. श्रीकृष्ण शामलाल अग्रवाल.
उ.व.४९ वर्ष,धंदा - व्यापार व शेती,
रा. स्टेशन रोड, दोंडाईचा,
ता. शिंदखेडा,जि. धुळे. ----------- तक्रारदार
विरुध्द
(१) युनाटेड इंडिया इंशुरन्स कंपनी लि.
कार्यालयः- दिनेश कॉम्प्लेक्स, दुसरा तळ.
पो.बॉ.नं.२३, आग्रा रोड, देवपुर धुळे.
नोटीसीची बजावणी मॅनेजर यांचेवर होण्यात यावी.
(२) M.D. India Health Care Services.
(T.P.A.) Pvt. Ltd.
कार्यालयः- ५१/अ, दुसरा मजला,
डॉ.भिवा पुरकर मार्ग, धंतोली, नागपूर – १२. --------- सामनेवाला
न्यायासन
(मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही. दाणी)
(मा.सदस्या – सौ.एस.एस.जैन)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – वकील श्री.आर.एन. अग्रवाल)
(विरुध्दपक्ष तर्फे – वकील श्री.के.पी. साबद्रा)
निकालपत्र
(द्वाराः मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही. दाणी)
--------------------------------------------------------------------------
(१) सामनेवाला यांनी दि.१६/०५/२०१३ रोजीचा अर्ज देवून ते तक्रारदार यांना दि.१८/०३/२०१३ चा बॅंक ऑफ अमेरिका या बॅंकेचा धनादेश क्रं.३०२५०४ रक्कम रू.४७,५२७/- चा देण्यास तयार असल्याचे मान्य केले आहे.
(२) सदर प्रकरणी तक्रारदार यांनी दि.१३/०६/२०१३ रोजी अर्ज देऊन चेक मिळाल्याची व सामनेवाला कडून काहीही घेणे नसल्याची स्वाक्षरी केलेली पुरसीस दाखल करुन, त्यांना सदर प्रकरण मंचापुढे चालविणे नसल्याने प्रकरण निकाली काढण्यात यावे अशी विनंती केली आहे.
(३) तक्रारदार यांनी दाखल केलेली पुरसीस पाहता तक्रारदार यांना चेक मिळाल्याने, तक्रारीस कारण राहिले नसल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे पुरसीस मंजूर करण्यात आली असून, प्रकरण निकाली काढणे योग्य होईल असे या न्यायमंचाचे मत आहे. सबब न्यायाचे दृष्टीने खालील प्रमाणे आदेश पारित करण्यात येत आहे.
आदेश
(अ) तक्रारदारांची तक्रार निकाली काढण्यात येत आहे.
(ब) तक्रार अर्जाचे खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
धुळे.
दिनांकः १३-०६-२०१३.
(सौ.एस.एस. जैन) (सौ.व्ही.व्ही. दाणी)
सदस्या अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, धुळे.