ग्राहक तक्रार क्र. : 86/2014
दाखल तारीख : 04/04/2014
निकाल तारीख : 04/07/2015
कालावधी: 01 वर्षे 03 महिने 01 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1. महादेव साहेबराव गपाट,
वय - सज्ञान, धंदा – व्यापार व शेती,
रा.इंदापुर ता. वाशी, जि. उस्मानाबाद. ....तक्रारदार
वि रु ध्द
1. व्यवस्थापक युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लि.
शाखा किंग्ज कॉर्नर, शिवाजी चौक, उस्मानाबाद.
2. व्यवस्थापक युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लि.
बिदादा कॉम्पलेक्स ढोकी रोड,
कळंब ता. कळंब, जि.उस्मानाबाद. ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2) मा.श्रीमती विद्युलता जे.दलभंजन. सदस्या.
3) मा.श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य.
तक्रारदारांतर्फे विधीज्ञ : श्री.ए.डी.गपाट.
विरुध्द पक्षकारा तर्फे विधीज्ञ : श्री.ए.व्ही.मैंदरकर.
न्यायनिर्णय
मा. सदस्य श्री.मुकुंद बी.सस्ते, यांचे व्दारा:
अ) तक्रारदाराच्या तक्रारी अर्जाचे थोडक्यात कथन पुढीलप्रमाणे :
1. तक्रारकर्ता (तक) मौजे इंदापुर ता. वाशी जि. उस्मानाबाद येथील रहीवाशी असून शेती करुन आपली व आपले कुटूंबाचा उदरनिर्वाह भागवितो. अर्जदाराने शेतीला जोडधंदा म्हणून दि.06/01/2012 रोजी फॉर्मट्रॅक कंपनीचा ट्रॅक्टर क्र.एम. एच. 25 एच. 5513 हा विकत घेतला आहे. ज्याचा चेसी क्र. टी.2228055 व इंजिन क्र. ई 2231467 असा आहे. ट्रॅक्टरची एकुण किंमत रु.5,80,000/- एवढी असुन सदरचे ट्रॅक्टर घेतेवेळी अर्जदाराने रक्कम रु.1,80,000/- रोख भरणा केला होता. सदर ट्रॅक्टर स्टेट बॅंक ऑफ हैद्राबाद शाखा वाशी या बँकेचे रक्कम रु.4,00,000/- कर्ज आहे. सदरचे ट्रॅक्टरवर विप कंपनीची शेतकरी पॅकेज पॉलिसी क्र.162783/47/12/96/00000158 उतरवलेली आहे. त्यामुळे तक हा विप यांचा ग्राहक आहे. सदरच्या ट्रॅक्टरचा दि.26/03/2013 रोजी अर्जदाराने सोलापूर औरंगाबाद रोडवर असणा-या कोठया शेजारी रोडलगत उभा केला होता. त्यावेळी मध्यरात्री 12 वाजणेच्या सुमारास अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे रोड लगतच्या खडयात पडल्याने ट्रॅक्टरची चेसी बेंड झाली व इंजिनमध्ये बिघाड झाला.
2. सदरबाबत तक यांनी विप यांना कळविले असता शेरुमला ट्रॅक्टर आणून लावणेबाबत सांगितले त्यावरुन तक यांनी दि.02/04/2013 रोजी सदरचे ट्रॅक्टरचे अपघाताबाबत आपले कळंब येथील शाखेस लेखी अर्ज दिला. सदरचा ट्रॅक्टर हा एक महिना अंदाजे शोरुमला दुरुस्तीसाठी उभा होता. विप यांनी तक यांना ट्रॅक्टरचे दुरुस्ती करीता खर्च करणे आवश्यक असतांना विमा कंपनीने तक याला कसल्याही प्रकारची मदत न पूरवल्याने सदर तक्रार दाखल केली असून अर्जदाराचे खर्चवजा जाता निव्वळ रक्कम रु.50,000/- चे नुकसान झाले तसेच तक यांना झालेला शारीरिक, मानसिक, आर्थिक त्रासापोटी रु.50,000/- असे ट्रॅक्टरचे दुरुस्तीसाठी रक्कम रु.1,39,592/- एवढा खर्च झाला. मात्र विप यांनी सदर खर्च व्याजासह द्यावे ही विनंती केली आहे.
3. तक यांनी तक्रारीसोबत ट्रॅक्टरचे आर.सी. बुकची झेरॉक्सची प्रत, विमा हप्त्याची झेरॉक्स पावती, शेतकरी विमा पॉलिसी, विप कडे दिलेल्य अर्जाची प्रत, ट्रॅक्टरची केलेली दुरुस्तीबाबत विवरण, अर्जदाराने विप यांना पाठवलेल्या नोटीसची ऑफीस कॉपी, पोष्ट पावत्या, पोहोच पावत्या इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.
ब) सदर तक्रारीबाबत विप यांना नोटीस बजावण्यात आली असता विप यांनी आपले म्हणणे दि.05/06/2014 रोजी दिले ते खालीलप्रमाणे...
5) तक यांच्या ट्रॅक्टरला अपघात झाला हे कागदोपत्री पुराव्या अभावी अमान्य. सदर अपघताबाबत तक यांनी पॉलिसीच्या अटी व शर्तीनुसार आवश्यक असतांना कोणत्याही पो.स्टे. मध्ये कळविलेले नाही अथवा गुन्हा नोंद केलेला नाही तसेच अपघाताचे फोटो काढले नाही त्यामुळे ट्रॅक्टरचे जे काही नुकसान झालेले आहे हे अपघातामुळे झालेले नसुन ते ट्रॅक्टरचा वापर व्यवस्थित न केल्यामुळे झालेले आहे. अपघातस्थळी सर्व्हे होणे आवश्यक होते. सदर अपघाताची लागलीच माहिती न देता ट्रॅक्टर शोरुमला संपर्क साधून त्यांचे सांगणेप्रमाणे ट्रॅक्टर घटनास्थळावरुन पोलिस स्टेंशनला फिर्याद न देता, घटनास्थळ पंचनामा न करता हलविले ज्यामुळे विमा पॉलिसीच्या अटी व शर्तीचा भंग झाला. तक यांच्या चुकीच्या वापरामुळे ट्रॅक्टरचे नुकसान झालेले असतांना अपघात झाल्याचे भासविण्याचा प्रयत्न केला. विप यांनी सदर विमा मंजूर अथवा नामंजूर करण्याआगोदर सदर दावा दाखल केला म्हणून सदरची तक्रार मुदतपुर्व आहे. म्हणून सदरची तक्रार नामंजूर व्हावी असे नमूद केले आहे.
क) अर्जदार यांचा तक्रार अर्ज वि यांचे महणणे, तक यांनी दाखल केलेले कागदपत्रे व उभयतांचा लेखी युक्तिवाद लेखी युक्तिवाद वाचला व तोंडि युक्तिवाद ऐकला असता आमचे विचारार्थ सदर प्रकरणात खालीलप्रमाणे मुद्ये उपस्थित होतात.
मुद्दे उत्तर
1) तक्रारदार हे विप यांचे ग्राहक आहे काय ? होय.
2) विप यांनी अर्जदार यांना देण्यात
येणा-या सेवेत त्रुटी केली आहे काय ? नाही.
3) काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे.
ड) कारणमीमांसा
1. तक्रारदाराने विमा संरक्षीत वाहनाला झालेला कथीत अपघाता संदर्भात झालेले नुकसान भरपाई विमा कंपनीने न दिल्यामुळे कायदेशीर दायीत्व नाकारल्यामुळे केलेल्या सेवेतीत त्रुटीबाबत या न्यायमंचात तक्रार दाखल केलेली आहे. विप ने याबाबत असे प्रतीपादन केले आहे की ग्राहक संरक्षण कायद्याच्या तदतुदीनुसार सदरची तक्रार चालू शकत नाही. ही बाब खरी आहे की तक्रारदाराने तक्रारीत अश्या स्पष्ट स्वरुपाचे कथन केलेले नाही तथापि त्यामुळे तक्रारदाराच्या तक्रारीत फारसा फरक पडत नाही कारण त्यांची तक्रार ही नाकारलेल्या विम्याबाबत असून ती नाकारणे हे न्याययुक्त नाही असे त्यांचे संदर्भीय म्हणणे आहे. त्यामुळे तसेच तक्रारदार व विप यांच्या मधील ग्राहक व तक्रारदार हे नाते स्पष्ट स्वरुपात असल्यामुळे तक्रादार हे विप चे ग्राहक होतात.
2. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार दि.26/03/2013 रोजी अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे ट्रॅक्टर रोड लगत असलेल्या खडयामध्ये पडला त्यामुळे इंजिनमध्ये बिघाड होऊन हंडी फुटली याबाबत पोलीस स्टेशनला तक्रार का दिली नाही किंवा तो का देऊ शकला नाही याचे त्यांनी न्यायपुर्ण विवेचन कोठेही दिलेली नाही. अपघातग्रस्त वाहन गाडी अपघातस्थळावरुन त्यांनी हलवले हे खरे आहे परंतु स्पॉट पंचनामा हा त्याबाबत मार्गदर्शक स्वरुपाचा असून मॅन्डेटरी नाही. ही बाब खरी की तक्रारदाराने खूप उशीरा विप ला कळवले व त्यानंतर विप ने सर्व्हे केले, फोटो काढले, सर्व्हेअरने सव्ह्रे केला व नुकसानीची पाहणी करुन रिपोर्ट दिला त्याच सोबत असाही अहवाल दिला की ट्रॅक्टरचे झालेले नुकसान अपघाताने झालेले नुकसान नसून ऑपरेशनल डॅमेज आहे. प्रस्तुतच्या प्रकरणामध्ये तक्रारदाराने अनेक प्रकारे निष्काळजीपणा केल्याचे दिसुन येते. ज्यामध्ये वाहन रोड लगत रात्रीच्या वेळी निष्काळजीपणे म्हणजेच अनअटेंन्डेड उभे करुन कोणत्याही स्वरुपाचे काळजी खबरदारी न घेता बेवारस उभे केले. याबाबत स्वत: तक्रारदाराचे म्हणणे देतो की सकाळी सहा वाजता आम्ही शेतामध्ये गेल्यावर ट्रॅक्टर खडयात पडलेले दिसते त्याच रात्री 12.00 वाजता अज्ञात वाहनाने उभ्या ट्रॅक्टर वाहनाला धडक दिली आहे. सदर ट्रॅक्टर जर तक्रारदाराने सकाळी खडयात पडलेले पाहिल्यावर अपघात झाल्याचे कळाले असे म्हणतांनाच रात्री 12.00 वाजता अज्ञात वाहनाने धडक दिली हे कसे काय म्हणू शकतात यानंतर एवढ्या मोठया स्वरुपाचे नुकसान झाले असल्यावर पोलिस स्टेशनला तक्रार देणे आवश्यक होते परंतु ती ही खबरदारी त्यांनी घेतलेली दिसुन येत नाही याचसोबत कीमान पक्षी विप ला त्वरीत कळवून स्पॉट पंचनामा करुन घेणे अपेक्षीत होते अर्थात यातील ब-याचश्या गोष्टी तक्रारदाराने नंतर करवून घेतल्या परंतु त्यामुळे तक्रारदाराचे वाहन अपघात ग्रस्त झाले हे सिध्द करण्यात तक्रारदारास अपयश आल्याचे दिसुन येते. सर्व्हेअरचे असेसमेंट मधील स्पेअर पार्टसवर, गाडीवर नजर टाकली असता त्यातील स्पेअर पार्टस अपघाताच्या घटनेने खराब होण्याने संबंधीत वाटत नाहीत, तसाच अहवाल सव्ह्रेअरनेही दिलेला आहे. कारण एक्सटर्नल इम्पॅक्ट बाहेरुन पाठीमागून आघात झाल्यानंतर ट्रॅक्टरचे गिअर असेम्बली, ट्रान्मीशन सिस्टम तसेच पुढील अॅक्सल असे नुकसान होणे फारसे शक्य नाही त्यामुळे तक्रारदाराच्या वाहनाचे झालेले नुकसान हे अपघाताने झाले हे सिध्द करण्यास तक्रारदार अपयशी ठरले तसेच विप ने आपल्या विधानाच्या समर्थनार्थ दिलेले वरीष्ठ न्यायालयाचे न्यायनिवाडे प्रस्तुत प्रकरणांच्या संदर्भाने लागू असल्यामुळे सदरची तक्रार फेटाळण्यात येते.
आदेश
1. तक्रादाराची तक्रार नामंजूर करण्यात येते.
2. खर्चाबाबत कोणतेही आदेश नाही.
3. उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
अध्यक्ष
(श्री.मुकूंद.बी.सस्ते) (सौ.विदयुलता जे.दलभंजन)
सदस्य सदस्य
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.