Maharashtra

Ahmednagar

CC/17/58

Appasaheb Rangnath Autade - Complainant(s)

Versus

Manager, Union Bank of India - Opp.Party(s)

Self

30 Nov 2018

ORDER

District Consumer Disputes Redressal Forum,Ahmednagar.
judgement
Office Phone No.(0241)2347917
 
Complaint Case No. CC/17/58
( Date of Filing : 21 Feb 2017 )
 
1. Appasaheb Rangnath Autade
Pohegaon, Tal- Kopergaon,
Ahmednagar
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Manager, Union Bank of India
Union Bank Bhavan,239,Vidhan Bhavan Marg,Nariman Point, Mumbai,
Mumbai
Maharashtra
2. Manager,Union Bank of India
Branch Kolpewadi, Tal- Kopergaon,
Ahmednagar
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V. C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. C. V.Dongare Member
 HON'BLE MR. M. N. Dhake MEMBER
 
For the Complainant:Self, Advocate
For the Opp. Party: M.v.Deshpande, Advocate
Dated : 30 Nov 2018
Final Order / Judgement

(आदेश पारीत व्‍दारा-श्री.महेश एन.ढाके - मा.सदस्‍य )

1.   तक्रारदाराने सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्‍वये दाखल केली आहे. 

2.   तक्रारदाराची तक्रार थोडक्‍यात अशी ः-

     सामनेवाला नं.1 ही प्रधान बँक असून सामनेवाले नं.2 ही सामनेवाले नं.1 ची शाखा(Branch) आहे. तक्रारदार हे सामनेवाले नं.2 चे ग्राहक आहे. तक्रारदार हे शेतकरी असून त्‍यांनी सामनेवाले नं.2 कडून दिनांक 20.04.2014 रोजी ऊस पिकाकरीता ड्रिप करणे करीता रु.32,500/- चे कर्ज सामनेवाले नं.2 यांच्‍याकडून घेतले होते. सदर कर्जास दि संजीवनी (टा) सहकारी साखर कारखाना ता.कोपरगांव जि.अहमदनगर यांनी हमी दिली होती. सामनेवाले नं.2 यांनी संजीवनी सहकारी साखर कारखान्‍याकडे सदर कर्जाचे रक्‍कम व्‍याजासह वसुली करीता रु.34,293/- ची लेखी मागणी केली होती. सामनेवाले नं.2 यांच्‍या लेखी मागणी प्रमाणे संजीवनी सह साखर कारखान्‍याने तक्रारदार यांचा सन 2014-15 सालात गळीतास आलेल्‍या प्रथम ऊसाच्‍या बिलातून रक्‍कम रु.29,866/- दिनांक 08.01.2015 रोजी कपात करुन सामनेवाले नं.2 यांच्‍याकडे चेकव्‍दारे पाठविली व व्दितीय ऊसाच्‍या बिलातून रक्‍कम रु.4427/- दिनांक 19.03.2015 रोजी कपात करुन सामनेवाले नं.2 यांच्‍याकडे चेकव्‍दारे पाठविली. ड्रिप लोनची रक्‍कम रु.34,293/- सामनेवाले नं.2 यांनी ड्रिप लोन खाती जमा करणे आवश्‍यक होते. परंतु सामनेवाले नं.2 यांनी ड्रिप लोन खाती रक्‍कम रु.7168/- जमा केली. उर्वरीत रक्‍कम रु.27,125/- तक्रारदार यांचे सेव्‍हींग खातेत जमा केली. त्‍यानंतर सामनेवाले नं.2 यांनी तक्रारदार यांच्‍या ड्रिप लोन खात्‍यावर रक्‍कम रु.27,125/- येणे बाकी दर्शवून त्‍यावर बँकाच्‍या नियमाप्रमाणे व्‍याज आकारणी सुरु केली. तक्रारदार यांच्‍या गळीतास आलेल्‍या ऊसातून व्‍याजासह कर्जाची रक्‍कम बँकेकडे गेल्‍यामुळे तक्रारदार यांचा समज झाला की, त्‍यांचे लोन अकौंट संपुर्ण निरंक झाले.

3.   तक्रारदार यांचा पुढील वर्षी संजीवनी कारखान्‍याकडे ऊस गळीतास गेला तेव्‍हा त्‍यांना संजीवनी कारखान्‍याच्‍या कर्मचा-यांनी सुचित केले की, आपल्‍या ऊस पेमेंट मधून सामनेवाले नं.2 यांनी रु.29,999/- ची मागणी केली आहे. सदर मागणी संदर्भात तक्रारदार यांनी सामनेवाले नं.2 यांना त्‍याची चुक लक्षात आणुन दिली. त्‍यानंतर सामनेवाले नं.2 यांनी स्‍वतःची चुक झाकण्‍यासाठी तक्रारदार यांची सामनेवाला नं.2 बँकेच्‍या सेव्‍हींग खात्‍यातील रक्‍कम रु.27,702/- परस्‍पर तक्रारदार यांच्‍या लोन खाती जमा केली व एक वर्षाची व्‍याजाची रक्‍कम रु.2297/- तक्रारदार यांच्‍याकडे येणे दर्शविली आहे. व आज अखेर त्‍या रक्‍कमेवर व्‍याज आकारणी सुरु आहे. सामनेवाले यांचे कृत्‍य बेकायदेशिर असून त्‍यांचे कृत्‍य अनुचित व्‍यापारी पध्‍दत व सेवा त्रुटी या सदरात मोडणारी आहे. सामनेवाले यांच्‍या कृत्‍यामुळे तक्रारदार यांना फार मोठा शारीरीक व मानसिक त्रास झाला आहे.

4.   तक्रारदार यांनी सामनेवाले नं.2 यांचे कृत्‍य सामनेवाले नं.1 यांना दिनांक 04.01.2016 रोजी लेखी रजिस्‍ट्रर पोष्‍टाने कळवून सुध्‍दा सामनेवाले नं.1 यांनी सामनेवाले नं.2 यांना चुक दुरुस्‍त करण्‍यास सुचित केले नाही. अथवा तक्रारदार यांच्‍या लेखी पत्रास खुलासा केला नाही. म्‍हणून सामनेवाले नं.1 व 2 यांनी एकमिलापी ने सदरचे गैरकृत्‍य केले आहे. त्‍यात सामनेवाले नं.1 व 2 व्‍यक्‍तीगत व संयुक्‍तीक जबाबदार आहे. सामनेवाले नं.1 व 2 यांना तक्रारदार यांचे लेखी पत्र मिळून देखील ते त्‍याप्रमाणे वागले नाहीत. तक्रारदार यांचे लोन खात्‍यावर दर्शविलेली येणे बाकी निरंक केली नाहीत व लेखी पत्रास उत्‍तर दिले नाही. म्‍हणून सामनेवाले यांच्‍याकडून या अर्जाचे विनंती कॉलममध्‍ये नमुद केलेल्‍या दादी मिळण्‍याकरीता अर्जदाराचा सामनेवाले विरुध्‍द हा अर्ज केला आहे.

5.   तक्रारदाराने तक्रारीत अशी मागणी केली आहे की, सामनेवाला नं.2 यांच्‍या चुकीमुळे तक्रारदार यांच्‍या ड्रिप लोन खात्‍यावर जादा वसुल केलेली रक्‍कम रु.2297/- व त्‍यावरील व्‍याज तक्रारदार यांना वसुल होऊन मिळावी. तक्रारदारास मानसिक व शारीरीक त्रासापेाटी सामनेवाले नं.1 व 2 यांच्‍याकडून रक्‍कम रुपये 10,000/- देण्‍याचा हुकूम व्‍हावा. या अर्जाचा खर्च रक्‍कम रुपये 5,000/- तक्रारदारास सामनेवाले नं.1 व 2 यांच्‍याकडून मिळावा.

6.   तक्रारदाराने तक्रारीसोबत 1) संजीवनी कारखान्‍यास पाठविलेले थकबाकी मागणीपत्र 2) तक्रारदाराचे दिनांक 25.01.2015 ते 19.10.2015 मंजुर खाते उतारा 3) तक्रारदाराचे बचत खात्‍याचा खाते उतारा 4) सामनेवाला यांनी संजीवनी कारखाना यांनी दुस-यांदा पाठविलेले थकबाकी मागणी यादी 5) सामनेवाला नं.2 यास पाठविलेले थकबाकी यादी इ. कागदपत्रे तक्रारदाराने सोबत दाखल केली आहेत.

7.   सामनेवाला यांना मंचामार्फत नोटीस काढण्‍यात आली. त्‍यानुसार सामनेवाला हे मे.मंचात हजर झाले. त्‍यांनी निशाणी 15 ला खुलासा दिला. सामनेवाला यांनी त्‍यांचे खुलाशात वस्‍तुस्थिती विशद केली ती पुढील प्रमाणे- तक्रारदार व इतर सभासद शेतक-यांनी घेतलेल्‍या कर्जास दि संजीवनी सहकारी साखर कारखाना, कोपरगांव यांनी त्‍यांच्‍या ऊस उत्‍पादक शेतकरी सभासदांची हमी घेतलेली होती व त्‍याप्रमाणे सदर कारखाना व बँक यांचेत रितसर आपसात समजुतीचा करार / लेख ( Memorandum of Understanding ) झालेला होता. अशा प्रकारे कारखान्‍याने हमी दिल्‍याने गळीतास आलेल्‍या ऊसाच्‍या रकमेतून कर्जाच्‍या हप्‍त्‍याची रक्‍कम व्‍याजासह पाठविणे कारखान्‍यावर बंधनकारक असल्‍याने वसुलीसाठी सामनेवाले नं.2 यांनी त्‍यांना लेखी मागणी करण्‍याचे काहीही कारण नाही व तशी मागणी सामनेवाले नं.2 यांनी कधीही केलेली नाही. उलट कारखान्‍याचे पत्र जा.क्र.6447 दिनांक 01.11.2013 अन्‍वये व सदर पत्राचे मागणीनुसार सामनेवाले नं.2 यांनी दिनांक 22.11.2014 च्‍या पत्रासमवेत कर्जदारांची यादी व त्‍या दिवशीच्‍या व्‍याजासह येणे असलेल्या बाकी बाबतची यादी त्‍यांनी मागणी करताच देणे सामनेवाले नं.2 यांचेवर बंधनकारक असलेने त्‍यांनी सदर यादी पाठविली आहे. सदरची यादी वसुली यादी नव्‍हती व नाही. सदरचे एम.ओ.यु. तारीख 22.11.2014 चे पत्राची स्‍थळप्रत यादीसह सामनेवाले आज रोजी वर्णन यादी समेत दाखल करीत आहेत. त्‍यातील कारखाना व सामनेवाले यांचेत ठरलेल्‍या शर्ती व अटींबाबत सविस्‍तर खुलासा केलेला असून त्‍यावरुन व सामनेवाले नं.2 यांचे वर नमुद केलेल्‍या पत्रावरुन मे.मंचास सामनेवाले यांचे वरील म्‍हणणे खरे असलेचे दिसून येईल.

8.   हमीदार कारखान्‍याने तक्रारदार यांनी घेतलेल्‍या टर्मलोन पोटी (मुदत कर्ज) त्‍यांचेकडे गळीतास आलेल्‍या ऊसाच्‍या रकमेतून ठरले प्रमाणे हप्‍ता अधिक व्‍याज अशी फक्‍त रक्‍कम पाठविणे ऐवजी संपुर्ण रक्‍कम सामनेवाले नं.2 यांना पाठविली. परंतु सामनेवाले नं.2 यांनी तक्रारदार यांना ड्रीपसाठी रुपये 32,500/- चे मुदत कर्ज (टर्म लोन) दिलेले असल्‍याने मंजुरी पत्रातील व कर्जाच्‍या ठरलेल्‍या शर्ती व अटी प्रमाणे तक्रारदाराकडून हप्‍ता व व्‍याज एवढीच रक्‍कम वसुल करणे क्रमप्राप्‍त असलेने सामनेवाले यांनी परतफेडीच्‍या हप्‍त्‍याची रक्‍कम तक्रारदार यांचे कर्ज खात्‍यात जमा करुन उर्वरीत रक्‍कम तक्रारदाराचे बचत खात्‍यात वर्ग केली. हे सर्व बँक आणि कर्जदार तक्रारदार यांचेत झालेल्‍या करारानुसार व नियमानुसार केलेले आहे त्‍यात सामनेवाले नं.2 यांची कोणतीही चुक नव्‍हती व नाही. अशा प्रकारे कोणतीही चुक केलेली अथवा झालेली नसलेने तक्रारदार म्‍हणतात त्‍याप्रमाणे चुक झाकण्‍याचा प्रश्‍नच उदभवत नाही.

9.   वरील प्रमाणे ठरलेला हप्‍ता आणि व्‍याज मिळालेवर उरलेल्‍या रकमेवर सामनेवाले यांनी कर्जदार तक्रारदार व सामनेवाले नं.2 यांचेत ठरलेल्‍या शर्ती व अटींप्रमाणे व ठरलेल्‍या दराने व्‍याज आकारणी केली यात सामनेवाले नं.2 यांनी काहीही बेकायदेशिर केलेले नाही. सामनेवाले नं.2 यांना तक्रारदार कर्जदार आणि त्‍यांचेत ठरलेल्‍या कराराबाहेर जाता येणार नाही.

10.  सदरचे कर्ज मुदत कर्ज (टर्म लोन) असलेने त्‍याची परतफेड बँकेने ठरवुन दिलेल्‍या हप्‍त्‍याप्रमाणेच करावयाची असते. त्‍यामुळे सामनेवालेने कारखान्‍याकडून आलेली संपुर्ण रक्‍कम कर्जखाती जमा केली असती तर तो कराराचा भंग झाला असता शिवाय कारखाना आणि सामनेवाले यांचेत झालेल्‍या एम.ओ.यु.मध्‍ये गळीतास आलेल्‍या ऊसाची संपुर्ण रक्‍कम सामनेवाले नं.2 यांनी घ्‍यावी असा कोणताही उल्‍लेख नाही. सामनेवाले हे फक्‍त हप्‍त्‍याची रक्‍कम घेण्‍यास बांधील आहेत.

11.  शिवाय कोणत्‍याही कर्जदारास ज्‍या कारणाकरिता कर्ज पाहिजे असते ती रक्‍कम / भांडवल त्‍यांचेकडे उपलब्‍ध नसल्‍यानेच तो बँकेकडून कर्ज घेत असतो व कर्जदार व बँक यांचेत ठरलेप्रमाणे कर्जफेड करीत असतो. त्‍यामुळे तक्रारदार यांनी कोणतीही गोष्‍ट समजुन न घेता कारखान्‍याकडे चौकशी न करता लोन अकौंट संपुर्ण निरंक झाले असा समज नव्‍हेतर गैरसमज करुन घेतल्‍याचे दिसून येईल.

12.  सुरुवातीस नमुद केल्‍याप्रमाणे कारखाना हमीदार असलेने सामनेवाले नं.2 यांनी कारखान्‍याकडे कर्जदाराची यादी व येणे बाकी अशी माहितीची फक्‍त यादी कारखान्‍याचे मागणीनुसार पाठविली. त्‍यामुळे सामनेवालो नं.2 यांनी पुढील वर्षी गळीतास गेलेल्‍या पेमेंटमधून रुपये 29,999/- ची मागणी केली हे म्‍हणणे खोटे आहे.

13.  तक्रारदार यांनी सामनेवाले यांची कोणतीही चुक नसतांना बँकेत येऊन बँकेतील कर्मचा-यांशी वाद घालुन त्‍यांचे सेव्‍हींग्‍ज खात्‍यावरील रक्‍कम कर्जखाती वर्ग करणेस भाग पाडले. आणि उलट सामनेवाले नं.2 यांनी स्‍वतःची चुक झाकणेसाठी तक्रारदार यांच्‍या सेव्‍हींग्‍ज खात्‍यातील रक्‍कम रुपये 27,702/- ही रक्‍कम परस्‍पर तक्रारदार यांच्‍या लोन खात्‍यात जमा केलेचा कांगावा केला आहे.

14.  तक्रारदार यांचे सांगणे प्रमाणे बचत खात्‍यातील रक्‍कम जमा करुनही व्‍याजाची रक्‍कम येणे बाकी असलेने सदर रक्‍कम कॉम्‍प्‍युटर मध्‍ये उता-यात नावे पडलेली आहे व सदर रक्‍कम सामनेवाले नं.2 यांना मिळेपर्यंत त्‍यावर व्‍याजाची आकारणी होणार आहे व ती बँकेच्‍या नियम आणि पध्‍दतीप्रमाणे तक्रारदार यांचेकडून वसुल करणेचा सामनेवाले नं.2 यांना पुर्णपणे अधिकार आहे. त्‍यामुळेच सामनेवाले नं.2 बँकेने तक्रारदार म्‍हणतात त्‍या प्रमाणे कोणतेही बेकायदेशीर कृत्‍य केलेले नाही अथवा अनुचित व्‍यापारी पध्‍दत अवलंबिली नाही. अथवा त्‍यांचे सेवेत कोणतीही त्रुटी नाही. त्‍यामुळे तक्रारदार यांना शारीरीक व मानसिक त्रास होण्‍याचे काहीही कारण नाही.

15.  वस्‍तुतः सामनेवाले यांनी तक्रारदार/ कर्जदार यांना ड्रिपसाठी रक्‍कम रुपये 32,500/- चे कर्ज द.सा.द.शे.9.30 टक्‍के दराने तारीख 26.04.2014 रोजी दिलेले होते व सदर कर्जाची परतफेड दरवर्षी रुपये 5714.20 अधिक व्‍याज अशा हप्‍त्‍याने सात वार्षिक हप्‍त्‍यात करावयाची होती. पहिला हप्‍ता दिनांक 30.06.2015 रोजी द्यावयाचा होता व शेवटचा हप्‍ता दिनांक 30.06.2021 रोजी द्यावयाचा होता. अशा प्रकारे सदर कर्जाच्‍या कर्ज फेडीच्‍या शर्ती व अटी होत्‍या व एम.ओ.यु.मध्‍ये देखील हप्‍त्‍यानेच कर्ज फेड करणे बाबत उल्‍लेख आहे. तक्रारदारास दिलेल्‍या कर्जाचे मंजुरी पत्राची व सदर कर्जाच्‍या शर्ती व अटी त्‍यांना मान्‍य असलेची त्‍यांनी सामनेवाला नं.2 बँकेस लिहून दिलेली पोहोच (Acknowledge) आज रोजी वर्णन यादी समेत दाखल करीत आहे. मंजुरी पत्रातील शर्तीप्रमाणे कर्जफेड हप्‍त्‍याने करावयाची होती ते त्‍यावरुन दिसून येईल.

16.  मात्र तरीही तक्रारदार यांनी वाद घातलेने व सर्व शर्ती अटी व बँकेचे नियम समजावुन सांगुनही ताठर भूमिका घेतलेने बँकेच्‍या नियमाविरुध्‍द जावुन तक्रारदार यांच्‍या सेव्‍हींग्‍ज खात्‍यातून त्‍यांचे सांगणेप्रमाणे रक्‍कम सामनेवाला नं.2 यांनी कर्ज खात्‍यात वर्ग केली. त्‍यामुळे उलट सामनेवाले बँकेचेच व्‍याजाचे नुकसान झालेले आहे. ही गोष्‍ट लक्षात घेता तक्रारदाराने त्‍यांचे कर्जखाती बाकी असलेली रक्‍कम परंतु त्‍यांनी तसे न करता बँकेला नियमाविरुध्‍द जायला लावुन सेव्‍हींग्‍ज खात्‍यातुन कर्जखाती रक्‍कम जमा करायला लावुन सामनेवाले यांचे विरुध्‍द खोटा व लबाडीचा अर्ज देऊन त्‍यांचेवर फार अन्‍याय झाल्‍याचा देखावा निर्माण करणेचा प्रयत्‍न चालविला आहे. अशी परिस्थिती असल्‍याने तक्रारदार यांचे पत्रास सामनेवाला यांनी उत्‍तर दिलेले नाही.

17.  सामनेवाले शेवटी सर्वात महत्‍वाचा मुद्दा मे.मंचासमोर मांडला आहे तो असा की, सामनेवाला नं.2 ही बँक असून तिचा बँकिंगचा व्‍यवसाय आहे. त्‍यात डिपॉझीट स्विकारणे, त्‍यावर व्‍याज देणे, कर्जवाटप करणे, वगैरे गोष्‍टी अंतर्भूत आहेत. कर्ज वाटप करुन त्‍यावरील व्‍याज मिळविणे व लोकांच्‍या ठेवी स्विकारणे यावरच बँकेचा सर्व कारभार चालतो. बँकेकडे असलेला पैसा हा रिझर्व बँक देत असते व तोच पैसा वाटून बँक मिळालेल्‍या व्‍याजाव्‍दारे आपला कारभार चालविते. त्‍यामुळे मुदतीआधी कोणतेही खाते बंद केल्‍यास बँकेचे व्‍याजाचे उत्‍पन्‍न बुडते व पर्यायाने बँकेस तोटा सहन करावा लागतो. व तशा प्रकारचा तोटा सामनेवाला यांना तक्रारदार यांचे कर्ज खात्‍याबाबत झालेला आहे.

18.  अशा प्रकारे बँकींग प्रणाली/ व्‍यवसाय वगैरे कोणत्‍याही गोष्‍टी समजुन न घेता तक्रारदार यांनी आडमुठेपणाचे धोरण स्विकारुन व बचत खात्‍यातील रक्‍कम कर्जखाती जमा करण्‍यास लावुन व सामनेवालाचे व्‍याजाचे नुकसान करुन सामनेवाले यांचे विरुध्‍दच खोटया कथनाचा अर्ज करुन सामनेवाले यांना विनाकारण वेठीस धरलेले आहे. त्‍यामुळे तक्रारदार यांचा तक्रार अर्ज खर्चासह फेटाळण्‍यात यावा.

19. सामनेवाला यांनी खुलाशासोबत हमीदार कारखाना व सामनेवाला नं.2 यांचे रिजनल ऑफिस यांचेत झालेला मेमेरॅण्‍डम ऑफ अंडरटेकींगची झेरॉक्‍स प्रत, तक्रारदारास कर्ज मंजुर केल्‍याचे पत्र/मंजुरी पत्र, तक्रारदार यांनी सामनेवाला नं.2 यांना कर्ज मंजुरीचे सर्व शर्ती व अटी मान्‍य व कबूल असल्‍याबाबत लिहून दिलेली पोहोच (Acknowledgment ), सामनेवाला नं.2 यांनी हमीदार कारखान्‍याने त्‍यांचे जा.पत्र क्र.6247 दिनांक 01.11.2014 ने मागणी केल्‍याप्रमाणे त्‍यांना पाठविलेले गाववाईज यादी कर्ज बाकी रक्‍कम  बाबतची यादीसह झेरॉक्‍स प्रत, तक्रारदार यांचे कर्ज खात्‍याचा सर्टिफाईड खाते उता-याची झेरॉक्‍स प्रत जोडलेले आहेत. 

20. तक्रारदार यांचे तक्रारीतील कथन व त्‍यासोबत त्‍यांनी दाखल केलेली कागदपत्रे पुराव्‍याचे कामी त्‍यांचे म्‍हणणे, सामनेवाला यांचा खुलासा त्‍यासोबत दाखल केलेली कागदपत्रे, तसेच निशाणी 20 ला सामनेवाला यांनी दिलेली कागदपत्रे, तक्रारदाराने कर्जासाठी दिलेले अर्ज, डिमांड डिक्‍लेरेशन / अंडरटेकींग, हायपोथीकेशन अॅग्रीमेंट इत्‍यादी कागदपत्रे तसेच तक्रारदार यांनी केलेला युक्‍तीवाद, सामनेवाला यांचे विद्वान वकील श्री.देशपांडे यांनी केलेला युक्‍तीवाद न्‍याय निर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.

    

             मुद्दे  

      उत्‍तर

1.

सामनेवाला यांनी तक्रारदारास द्यावयाचे सेवेत त्रुटी ठेवलेली आहे काय.?                    

 

... नाही.

2.

तक्रारदार नमुद मागणी मिळण्‍यास पात्र आहे काय.?

 

... नाही.

3.

आदेश काय ?

...अंतीम आदेशानुसार.

का र ण मि मां सा

21.   मुद्दा क्र.1 व 2 – तक्रारदार यांनी सामनेवाला नं.2 यांचेकडून ऊस पिकांकरीता ड्रिप इरीगेशन करण्‍यासाठी कर्ज खाते आहे. सदर कर्जास दि संजीवनी (टा) सहकारी साखर कारखाना ता.कोपरगांव जि.अहमदनगर यांनी हमी दिली आहे. तक्रारदाराचे कथनाप्रमाणे सामनेवाला नं.2 यांना संजीवनी सहकारी साखर कारखानाकडे कर्जाची रक्‍कम 3265/- व्‍याजासह वसुलीकरता रुपये 34,293/- लेखी मागणी केली आहे. व सामनेवाला नं.2 च्‍या लेखी मागणी प्रमाणे संजीवनी सहकारी साखर कारखान्‍याने तक्रारदार यांचे 2014-15 सालात गळीतास आलेले प्रथम ऊसाचे बिल एकुण रक्‍कम रुपये 29,833/- दिनांक 08.01.2015 रोजी कपात करुन सामनेवाले नं.2 यांचेकडे चेक व्‍दारे पाठविले. व व्दितीय ऊसाचे बिल एकुण रक्‍कम रुपये 4,427/- दिनांक 19.03.2015 रोजी सामनेवाला नं.2 यांना ड्रिप लोन खाते जमा करणे आवश्‍यक होते. परंतु सामनेवाला नं.2 यांनी ड्रिप लोन खाते रुपये 7168/- जमा केले. सामनेवाला नं.2 यांनी तक्रारदार यांचे ड्रिप लोन खात्‍यात 27125/- ची येणे बाकी दर्शवून बँकेच्‍या नियमाप्रामणे व्‍याज आकारणी सुरु केली. गळीतास आलेले ऊसातून व्‍याजासह कर्जाची रक्‍कम बँकेकडे गेल्‍यामुळे तक्रारदार यांचा समज झाला की त्‍यांचे लोन अकौंट संपुर्ण निरंक झाले असा युक्‍तीवाद तक्रारदाराने केला. पुढे तक्रारदार यांनी युक्‍तीवाद केला की, सामनेवाले नं.2 यांनी रुपये 29,999/- ची मागणी केली आहे असे संजीवनी कारखान्‍याचे कर्मचा-यांनी सुचित केले. सदर मागणी संदर्भात तक्रारदार यांनी सामनेवाला नं.2 यांना त्‍यांची चुक लक्षात आणून दिली व त्‍यानंतर सामनेवाला नं.2 यांनी स्‍वतःची चुक झाकण्‍यासाठी तक्रारदार यांचे सामनेवाले नं.2 बँकेच्‍या सेव्‍हींग खात्‍यातील रक्‍कम परस्‍पर रक्‍कम रु.2297/-  तक्रारदार यांचे लोन खात्‍यात जमा केले व एक वर्षाचे व्‍याजासह रक्‍कम रु.2297/- तक्रारदार यांचेकडे येणे दर्शविली. व आज पावेतो त्‍या रकमेवर व्‍याज आकारणी सुरु आहे. हे सामनेवाला यांचे कृत्‍य बेकायदेशिर असून त्‍यांचे कृत्‍य अनुचित व्‍यापारी प्रथेचे व सेवेत त्रुटी या सदरात मोडते आहे. सामनेवालाने आपले लेखी कैफियतीमध्‍ये असा मुद्दा घेतला की, सामनेवाला यांनी तक्रारदाराने घेतलेले टर्म लोन पोटी त्‍यांचेकडील गळीतास आलेला ऊस रक्‍कम एकुण भरलेली नाही, हप्‍त्‍यासोबत व्‍याज अशी फक्‍त रक्‍कम पाठविण्‍यास हमीदार कारखान्‍याने संपुर्ण रक्‍कम सामनेवाला नं.2 यांना पाठविलेली आहे. परंतु सामनेवाला यांनी तक्रारदारास ड्रिपसाठी रक्‍कम रु.32,500/- ची मुदत कर्ज (टर्म लोन) दिलेले असल्‍याने मंजूर पत्रातील व कर्जाचे ठरलेले अटी व शर्तीप्रमाणे तक्रारदाराकडून हप्‍ता व्‍याजासह रक्‍कम वसुल करणे क्रमप्राप्‍त असल्‍याने सामनेवालांनी परतफेडीचा हप्‍ता रक्‍कम तक्रारदार यांचे कर्ज खात्‍यात जमा करुन उर्वरीत रक्‍कम तक्रारदाराचे बचत खात्‍यात वर्ग केले. ही सर्व सामनेवाला बॅंक आणि कर्जदार / तक्रारदार यांचेत झालेले करारानुसार व नियमाप्रमाणे केलेली आहे. त्‍यात सामनेवाला यांची कोणतीही चुक नव्‍हती व नाही. सामनेवाला यांनी या पुढे असेही म्‍हटंले आहे की, कारखाना व सामनेवाला यांचेत झालेला एम.ओ.यु. मध्‍ये गळीतास आलेल्‍या ऊसाची संपुर्ण रक्‍कम सामनेवाला नं.2 यांनी घ्‍यावी असा कोणताही उल्‍लेख नाही, असा कोणताही उल्‍लेख सामनेवाला नं.2 यांनी केला. सामनेवाला यांनी दाखल केलेले एम.ओ.यु. तक्रारदाराने सामनेवालास लिहून दिलेली पोच, त्‍याचप्रमाणे सामनेवाला यांनी दाखल केलेले तक्रारदाराचे बँक खाते उतारा, तक्रारदाराने सामनेवाला बँकेस कर्जासाठी दिलेले सर्व कागदपत्रे यांचे अवलोकन केले असता, तसेच तक्रारदार व सामनेवाला यांनी केलेला युक्‍तीवाद यावरुन ही बाब सष्‍ट होते की, सामनेवाला यांनी अटी व शर्तीप्रमाणे लोन घेतलेले आहे, बँकेचे कागदपत्रावरुन असे सिध्‍द होते. सामेनवाला यांनी त्‍यांचे सेवेत त्रुटी केली असे म्‍हणता येणार नाही. सामनेवालाने कर्जदार /तक्रारदार व सामनेवाला व बँक यांचेतील कागदपत्रे व कारखान्‍याचे व सामनेवाला यांचेत झालेले एम.ओ.यु. मधील कागदपत्रावरुन झालेला सामनेवालाने कोणतीही त्रुटी केलेली नाही असे मंचाचे मत आहे. व त्‍या अनुषंगाने तक्रारदाराने केलेली रकमेची मागणी ही संयुक्‍तीक वाटत नाही. सबब सदर तक्रार खारीज करण्‍याचे निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब मुद्दा क्र.1 व 2 चे उत्‍तर नकारार्थी नोंदविण्‍यात येते.

22.  मुद्दा क्र.3 -मुद्दा क्र.1 व 2 चे विवेचनावरुन खालील प्रमाणे अंतिम आदेश पारीत करण्‍यात येत आहे.

- अं ति म आ दे श

1.   तक्रारदाराची तक्रार खारीज करण्‍यात येते.

2.   उभय पक्षकार यांनी या तक्रारीचा खर्च स्‍वतः सहन करावा.

3.   या आदेशाची प्रथम प्रत उभय पक्षकार यांना निःशुल्‍क देण्‍यात यावी.

4.   तक्रारदार यांना या प्रकरणाची “ब” व “क” फाईल परत करावी.

 
 
[HON'BLE MR. V. C. Premchandani]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. C. V.Dongare]
Member
 
[HON'BLE MR. M. N. Dhake]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.