::: नि का ल प ञ::: (मंचाचे निर्णयान्वये, मा. सौ. कल्पना जांगडे (कुटे) मा.सदस्या) (पारीत दिनांक :- 17/11/2017) 1. तक्रारकर्त्याने सदरची तक्रार ग्राहक सरक्षंण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये दाखल केली आहे. सदर तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे. 2. तक्रारकर्त्याने दिनांक 15/03/2011 रोजी विरूध्द पक्ष क्रं 2 व्दारे निर्मित मारूती रिटज एम-एच-34 एए 3787 क्रंमांकाची गाडी विरूध्द पक्ष क्रं 1 कडुन विकत घेतली विरूध्द पक्ष क्रं 1 ने सदर वाहनाची तिस-या व चौथ्या वर्षाकरिता वाढीव वॉरन्टी ही दिनांक 17/02/2015 किंवा 80,000 किमी चालेल अशी दिली होती सदर वॉरन्टी ही फक्त वाहनाच्या यंत्राची असुन ती विरूध्द पक्ष क्रं 1 व 2 च्या निर्धारीत अटी व शर्ती ला धरुन होत्या अंदाजे नोव्हेंबर 2014 मधे सदर कारच्या दाराला जंग पकडुन नुकसान होत आहे असे निर्देशनास आल्यानंतर तक्रार कर्त्याने विरूध्द पक्ष क्रं 1 कडे सदर कार निरीक्षणास दिल्यानंतर त्यांनी त्याची पाहणी केली दिनांक 06/11/2014 रोजी सुध्दा सदर कारचा पार्ट नं 58270 एम 83 के 10 समोरील बंपर हा सुध्दा जंग लागुन खराब झाल्यामुळे बदलण्यात आलेला होता. सदर पार्ट हा कारच्या आतील बाजुला असतो कारच्या दाराच्या आतील बाजुने जंग पकडलेला आहे व तो आता बाहेरच्या बाजुला नुकसान होत असल्यामुळे निर्देशनास आले. तक्रार कर्त्याने वि.प क्र. १ कडे त्वरीत तक्रार नोंदविली तसेच तक्रार कर्त्याने विरूध्द पक्ष 2 च्या वेबसाईट वर सुध्दा तक्रार नोंदविल्यानंतर त्यांनी दिनांक 18/11/2014 रोजी माहिती मागितली परंतु विरूध्द पक्षांनी तक्रार कर्त्याचे तक्रारीचे निराकरण केले नाही व उत्तरपण दिले नाही वि.प क्रं 1 ने तक्रार कर्त्यास खोटे उत्तर देऊन कळविले की सदर वाहनाचे नुकसान हे प्रोटींग कारख्यान्याचा आवारात वाहन उभे राहत असल्यामुळे रासायनिक प्रक्रीयेमुळे उपरोक्त नमुद नुकसान झालेले आहे तक्रार कर्त्याच्या कारमध्ये निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याने दाराच्या आतील बाजुला व इतर ठिकाणी सुध्दा जंग लागत आहे ही बाब विरूध्द पक्षांच्या लक्षात आली परंतु त्यांनी स्वतःची जवाबदारी टाळली सदर कारच्या आतील भागात ब-याच ठिकाणी एक ते दिड वर्षापासुन जंग लागायला सुरू झाले असेल व म्हणुनच दाराचा व इतर भागाचा आतील पत्रा सडत सडत नोव्हेंबर 2011 मधे बाहेरच्या भागात सुध्दा नुकसान झाल्याने ही बाब लक्षात आली ज्यावेळी जंग लागायला सुरवात झाली त्यावेळी वाहन वॉरन्टी मधे होते परंतु नोव्हेंबर 2014 मधे सदर वाहनाच्या दाराला व इतर ठिकाणी जंग लागल्याचे दिसुन आले तेव्हा विरूध्द पक्षानी सदर वाहनाची वॉरन्टी संपुष्टात आल्याने सदर दुरूस्तीचा खर्च दयावा लागेल असे सांगितले परंतु सदर वाहन हे हमी कालावधी मधे असल्याने वि.प यांनी दुरूस्त करून देणे बंधणकारक आहे व तसे न करून त्यांनी तक्रार कर्त्यास सेवेत त्रुटी दिली तक्रार कर्त्याने दिनांक 12/01/2015 रोजी अधिवक्ता मार्फेत नोटीस पाठविला विरूध्द पक्षानी सदर नोटीसला खोटे उत्तर दिले सबब तक्रार कर्त्याने मंचा समक्ष तक्रार दाखल करून त्या मधे अशी मागणी केली की वि.प क्रं 1 व 2 यांनी तक्रार कर्त्याचे वाहनास ज्या ज्या ठिकाणी जंग लागला आहे व त्या जंगामुळे जी तुटफुट झालेली आहे तो प्रत्येक पार्ट बदलवुन नवीन लावुन दयावा विरूध्द पक्षांनी तक्रार कर्त्यास सेवेत त्रुटी दिली व अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केल्यामुळे तक्रार कर्त्याला त्रास झाला त्या त्रासापोटी रूपये 50,000/- व शारिरीक, मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई रूपये 50,000/- व तक्रार खर्च रूपये 10,000/- विरूध्द पक्ष्यांनी तक्रारकर्त्यास दयावा अशी विनंती केली. 3. तक्रारदाराची तक्रार स्विकृत करुन विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांना नोटीस काढण्यात आले. विरूध्द पक्ष क्रं 1 हजर होवून त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले आहे. विरूध्द पक्ष क्रं 2 हे तक्रारीत उपस्थित होऊन सुध्दा त्यांनी लेखी कथन दाखल न केल्यामुळे त्यांच्या विरूध्द दिनांक 04/07/2017 रोजीच्या आदेशपत्रावर लेखी उत्तराशिवाय प्रकरण चालवण्याचा आदेश पारीत. विरूध्द पक्ष क्रं 1 यांनी आपले लेखी उत्तरातील विशेष कथनामधे नमुद केले की, तक्रार कर्त्याने विरूध्द पक्ष क्रं 2 व्दारे निर्मीत मारूती रिटज गाडी एम एच 34 एए 3787 दिनांक 15/02/2011 रोजी विरूध्द पक्ष क्रं 1 कडुन खरेदी केली विरूध्द पक्ष क्रं 2 ने तक्रार कर्त्याला सदर वाहनाची वाढीव वॉरन्टी दिली होती व ती वॉरन्टी दिनांक 17/02/2015 पर्यन्त किंवा वाहन 80,000 किमी पर्यन्त चालली यापैकी जे पहिले होईल तो पर्यन्त दिली होती तक्रारकर्त्याला सदर वाहनाच्या वाढीव वॉरन्टीचे प्रमाणपत्राच्या मागच्या बाजुने अटी व शर्ती नमुद केलेले आहे. तक्रार कर्त्याने दिनांक 17/11/2014 रोजी प्रथमच सदर वाहनाच्या दाराला जंग पकडला आहे(रस्टींग कोरीजन ऑन बॉडी) अशी वि.प क्रं 1 कडे तक्रार केली त्यावेळी विरुध्द पक्ष क्र. 1 ने सदर वाहनाचे जॉब कार्ड तयार केले परंतु त्यावेळी सदर वाहन हे 93,057 किमी चाललेले होते व ते वॉरन्टी मध्ये नव्हते तक्रारकर्त्याने वि.प क्रं 1 च्या वर्कशॉप मधे जेव्हा जेव्हा वाहन आणले त्यावेळी सदर वाहनाचे सर्विसींग करून देण्यात आले व जॉब कार्ड प्रमाणे दिनांक 17/11/2014 पुर्वी तक्रार कर्त्याने जंग बद्दल तक्रार केली नव्हती. सदर वाहनामधे जंग लागल्याची तक्रार ही वाढीव वॉरन्टी पिरीयडमधे नव्हती त्यामुळे ते बदलवुन देण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. तक्रार कर्त्याचे सदर वाहन प्रोटीन्स फॅक्टरीमध्ये पार्क केलेली असते. त्यामुळे सदर वाहनावर जंग लागण्याची शकता आहे. तक्रारकर्त्याने सदर वाहनामध्ये निर्मिती दोष आहे याबाबत तज्ञाचा अहवाल दाखल केलेला नाही, त्यामुळे सदर वाहनामध्ये निर्मिती दोष आहे असे म्हणणे शक्य नाही. तक्रारकर्त्याच्या सदर वाहनामध्ये खराब झालेले पार्ट विरुद्ध पक्ष बदलवून देऊ शकतात. पंरतू त्यासाठी तक्रारकर्त्याला खर्च द्यावा लागेल. कारण सदर वाहन हे हमी किवा वाढीव हमी कालावधी मध्ये नाही. वि. प. यांनी तक्रारकर्त्यास सेवेत त्रुटी दिली नाही. सबब सदर तक्रार खोटी असल्याने ती खर्चासह खारीज करण्यात यावी. 4. तक्रारदारांची तक्रार, दस्ताऐवज, लेखी युक्तीवाद तसेच गैरअर्जदार क्र. १ चे लेखी म्हणणे, लेखी उत्तरालाच रिजॉइंडर समजण्यात यावा अशी पुरशिस व उभय पक्षांचा तोंडी युक्तीवाद तसेच तक्रारकर्ता व वि.प.क्र. १ यांचे परस्पर विरोधी कथनावरुन खालील मुद्दे मंचाच्या विचारार्थ घेण्यात आले. त्याबाबतची कारण मिमांसा आणि निष्कर्ष पुढील प्रमाणे. मुद्दे निष्कर्ष 1) तक्रारकर्ता विरूध्द पक्ष क्र. 1 व 2 यांचा ग्राहक आहे काय ? :- होय 2) विरूध्द पक्षांनी तक्रारकर्त्याप्रती न्युनतापूर्ण सेवा दिली आहे काय ? :- नाही 3) आदेश काय ? :- खारीज कारण मिमांसा मुद्दा क्रं. 1 बाबतः- 5. तक्रारकर्त्याने दिनांक 15/02/2011 रोजी विरूध्द पक्ष क्रं 2 व्दारे निर्मित मारूती रिटज एम-एच-34 एए 3787 क्रमांकाची गाडी विरूध्द पक्ष क्रं 1 कडुन विकत घेतली. याबाबत तक्रारकर्त्याने प्रकरणात पावती दाखल केलेली आहे. यावरून तक्रारकर्ता हा विरूध्द पक्षांचा ग्राहक आहे हे सिध्द होत आहे. सबब मुद्दा क्रं. 1 चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येत आहे. मुद्दा क्रं. 2 बाबत ः- |