Maharashtra

Thane

CC/630/2015

Smt Vaishali Santosh Thakare - Complainant(s)

Versus

Manager, Toronto Motors - Opp.Party(s)

Adv Vasanta P Katarnavare

04 Aug 2015

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे .
 
Complaint Case No. CC/630/2015
 
1. Smt Vaishali Santosh Thakare
At Director Global Enterprises, Office 104, Sai Charan Apt, Motiram Park, B Cabin Rd, Ambernath east
Thane
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Manager, Toronto Motors
Offuce Champion Sis compound 15, parsi Panchayat Rd, Andheri east, Mumbai 69
Mumbai
Maharashtra
2. Manager ,Waxvagen Finanace Ltd
At Office - Silver Thodiya ,3rd floor, B Wing , Cardiyal Grasis Rd, Chakla , Andheri ,east Mumbai 69
Mumbai
Maharashtra
3. Manager, Waxvagen Pvt Ltd,
At Silver Yuretiya ,3rd floor, B wing , Cardiyal Grasis rd, Chakla, Andheri east , Mumbai 69
Mumbai
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. MANOHAR Y. MANKAR PRESIDENT
 HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE MEMBER
 HON'BLE MR. N D Kadam MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

Dated the 04 Aug 2015

  1. प्रस्‍तुत प्रकरणातील तक्रारदार या ग्‍लोबल एंटरप्राय्रझेस या विविध व्‍यावसायिक भागीदारी संस्‍थेच्‍या संचालिका आहेत. तक्रारदार इतर व्‍यवसायाबरोबर टूर आणि ट्रॅव्‍हल्‍स व्‍यवसायसुध्‍दा करतात. या व्‍यवसायासाठी त्‍यांनी वॉक्‍स वॅगन वेंटो 1.6 डिझेल कार 9.09 लाख किंमतीस सामनेवाले क्र. 1 यांजकडून विकत घेण्‍यासाठी रु. 40,000/- अनामत रक्‍कम ऑक्‍टोबर, 2014 मध्‍ये देऊन वाहन बुक केले व त्‍यासाठी सामनेवाले 2 यांजकडून रु. 8.69 लाख इतके कर्ज घेतले व वाहनाची संपूर्ण किंमत सामनेवाले क्र. 1 यांना दिली. तथापि, सामनेवाले क्र. 1 यांनी तक्रारदारांना सदर वाहन तक्रार दाखल पर्यंत दिले नाही. सदर कार एका खाजगी कंपनीला भाडयाने देऊन त्‍यापासून तक्रारदारांना मासिक उत्‍पन्‍न रु. 60,000/- मिळणार होते. त्‍याचे नुकसान झालेच, शिवाय ड्रायव्‍हरची नेमणूक अगोदरच केल्‍याने त्‍याला दरमहा 15,000/- प्रमाणे पगार दयावा लागला. सबब सामनेवाले यांनी वाहनाची पूर्ण किंमत स्विकारुनही वाहनाची डिलीव्‍हरी दिली नसल्‍याने मानसिक त्रासाबद्दल रु. 1 लाख, शारिरीक त्रासाबद्दल रु. 1 लाख, आर्थिक खर्च रु. 2 लाख, फायदयापासून वंचित झाल्‍याबद्दल रु. 2.25 लाख नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे.

  2. तक्रारदारांची तक्रार, त्‍यासोबतची कागदपत्रे यांचे वाचन मंचाने केले. तसेच तक्रारदारांचे वकीलांना दाखल सुनावणीकामी ऐकण्‍यात आले. त्‍यावरुन खालीलप्रमाणे निष्‍कर्ष निघतातः

     

    1. तक्रारदारांनी तक्रारीमध्‍ये अगदी सुस्‍पष्‍टपणे नमूद केले आहे की तक्रारदार संचालिका असलेली ग्‍लोबल एंटरप्रायझेस ही भागिदारी संस्‍था अनेक प्रकारचे व्‍यवसाय करीत असून त्‍यापैकी टुर्स आणि ट्रॅव्‍हल्‍स्‍ हा एक व्‍यवसाय आहे. या व्‍यवसासाठी त्‍यांनी वॅक्‍स वॅगन ही कार विकत घेऊन सदर वाहन एका खाजगी कंपनीस भाडयाने देऊन मासिक रु. 60,000/- उत्‍पन्‍न त्‍यांना मिळणार होते. तक्रारदारांचे स्‍वयंकथन स्‍पष्‍ट करते की, त्‍यांनी सदर वाहन हे व्‍यवसायासाठी पर्यायाने नफा कमविण्‍यासाठी विकत घेतले आहे. सदर वाहन खरेदी त्‍यांच्‍या भागिदारी धंदयासाठी नफा कमविण्‍याच्‍या उद्देशाने केली असल्‍याचे तक्रारदारांचे कथनच ते ग्राहक संरक्षण कायदा कलम 2(1)(ड) या संज्ञेत येत नसल्‍याचे सिध्‍द करते.

    2.  

  3. तक्रारदारांनी आपल्‍या तक्रारीमध्‍ये वाहनाचा वापर चरितार्थासाठी करण्‍याबाबत दुरान्‍वयेही उल्‍लेख केला नाही. तक्रारदारांनी नमूद केल्‍याप्रमाणे त्‍यांची भागीदारी संस्‍था आहे. इंडियन पार्टनरशिप अॅक्‍ट, 1932 मधील कलम 4 मध्‍ये भागिदारी (Partnership) यांची व्‍याख्‍या खालीलप्रमाणे दिली आहेः

  4.  

    Partnership is the relation between persons who have agreed to share the profits of a business carried on by all or any of them acting for all.

     

            सदर व्‍याख्‍येमधील तत्‍वाचा विचार केल्‍यास भागिदारी म्‍हणजे व्‍यवसायातील नफा वाटून घेण्‍याचे भागिदाराचे आपसी संबंध आहेत. म्‍हणजेच, नफा कमविणे संस्‍थेचे मूळ उद्दीष्‍ट असल्‍याने नफा कमविण्‍या-या संस्‍था अथवा त्‍यांचे भागिदार ग्राहक संरक्षण कायदा कलम 2(1)(ड) नुसार ग्राहक या संज्ञेत येत नसल्‍याने त्‍यांना ग्राहक मंचाकडे दाद मागण्‍याचा हक्‍क नाही.

            सबब, तक्रारदार हे ग्राहक या संज्ञेत येत नसल्‍याने इतर मुद्दयांचा विचार करण्‍यात आला नाही. उपरोक्‍त चर्चेनुरुप खालीलप्रमाणे आदेश करण्‍यात येतोः

                    

              आ दे श

 

  1. तक्रार क्र. 630/2015 ग्राहक संरक्षण कायदा कलम 12(3)

         अन्‍वये फेटाळण्‍यात येते.

  2. खर्चाबाबत आदेश नाही.

  3. आदेशाच्‍या प्रती उभय पक्षांना विनामुल्‍य विनाविलंब पाठविण्‍यात याव्‍यात.

  4. तक्रारीचे अतिरिक्‍त संच तक्रारदारांना परत करावेत.

     

 
 
[HON'BLE MR. MANOHAR Y. MANKAR]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE]
MEMBER
 
[HON'BLE MR. N D Kadam]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.