प्रकरण पंजीबध्द करण्यांत आले दि.08/02/2010 विरुध्दपक्षास नोटीस लागून हजर राहण्याची तारीख :- 18/03/2010 मा. अध्यक्ष, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बुलडाणा यांचे समक्ष प्रकरण क्रमांक :- सी.सी. /36/2010 निकाल तारीख :- 23/11/2010 सौ.मंदाकिनी संतोष ठाकरे : वय 45 वर्षे, धंदा - घरकाम : तक्रारकर्ती रा. कल्याणा, ता.मेहकर, जि.बुलडाणा. : --विरुध्द-- व्यवस्थापक : दि ओरीएन्टल इन्शुअरन्स कंपनी लि. : मंडलीय कार्यालय क्र.2,8,हिंदुस्थान कॉलनी, : अजनी चौक, नागपूर- 440 015 : विरुध्दपक्ष जिल्हा मंचाचे पदाधिकारी :- 1) श्री.राजीव त्रिं. पाटील - अध्यक्ष 2) श्रीमती नंदा लारोकर - सदस्या तक्रारकर्त्यातर्फे वकील :- श्री.दिपक मापारी. विरुध्दपक्षातर्फे वकील :- श्री.डि.एस.चव्हाण (मा.सदस्या श्रीमती नंदा लारोकर यांनी निकाल कथन केला) आ दे श प त्र 1.. तक्रारकर्तीनुसार तिची शेतकरी मुलगा समाधान संतोष ठाकरे यांचा दि.27/02/2008 रोजी ट्रॅक्टर अपघातामधे मृत्यू झाला, ज्यानंतर तक्रारकर्तीने त्यांच्या मृत्यूबाबत शेतकरी अपघात व्यक्तीगत विमा योजनेअंतर्गत विम्याची रक्कम मिळण्याकरीता विरुध्दपक्षाकडे विमा प्रस्ताव सादर केला. मात्र दि.11/12/2009 रोजी विरुध्दपक्षाने तक्रारकर्तीचा विम्याचा दावा कोणत्याही योग्य त्या कारणाशिवाय फेटाळून लावल्यामुळे तक्रारकर्तीने ही तक्रार दाखल करुन तिला संबंधीत विम्याची रक्कम मिळावी अशी मागणी केली आहे. ..2.. प्रकरण क्रमांक :- सी.सी. /36/2010 ..2.. 2.. विरुध्दपक्षानुसार तक्रारकर्तीचा मुलगा समाधान संतोष ठाकरे यांच्या नावावर कोणतीही जमीनी नव्हती व तो शेतकरी नव्हता व त्यामुळे विरुध्दपक्षाने योग्य त्या कारणाकरीता तक्रारकर्तीचा विम्याचा दावा फेटाळला असल्यामुळे ही तक्रार देखील खारीज करण्यांत यावी. 3.. या प्रकरणातील तक्रार अर्ज, विरुध्दपक्षाचा लेखी जवाब व उभय बाजूंनी दाखल केलेली कागदपत्रे विचारात घेता आमच्या समोर खालील मुद्दे निर्णयासाठी उपस्थित होतात. अ) विरुध्दपक्षाची या प्रकरणातील सेवेतील त्रुटी आहे काय ? -- होय. ब) या तक्रारीचा अंतिम आदेश काय ?-- कारणमिमांसेप्रमाणे.. 4.. दोन्ही पक्षांनी लेखी युक्तीवाद दाखल केला व युक्तीवाद केला. या प्रकरणातील वादाचा एकमेव मुद्दा असा आहे की, मृत समाधान संतोष ठाकरे हा दि.27/2/2008 या अपघाताच्या दिवशी शेतकरी होता अथवा नाही. या संबंधी तक्रारकर्तीने जी कागदपत्रे या प्रकरणात सादर केलेली आहे त्यावरुन दि.3/2/2008 च्या फेरफार नोंद क्र.656 नुसार संतोष रामराव ठाकरे यांनी त्यांच्या मालकीची जमीनी त्यांच्या मुलांना आपसात वाटून दिली होती व ज्यामधे समाधान संतोष ठाकरे यांच्या नावावर मौजे. कल्याणा, ता.मेहकर येथील सर्व्हे 42/7 या 2 हेक्टर 51 आर जमीनीपैकी 81 आर इतकी जमीन देण्यांत आली होती. अशा प्रकारे दि.03/02/2008 रोजी मृत समाधान संतोष ठाकरे यांच्या नांवावर 81 आर जमीन असल्याचे दिसून येते. दि.27/2/2008 रोजी समाधान संतोष ठाकरे यांचे निधन झाल्यावर दि.15/1/2009 रोजी फेरफार क्रमांक 695 नुसार संबंधीत जमीन त्यांचे वारस म्हणून तक्रारकर्तीच्या नांवाने करुन देण्यांत आलेली आहे. समाधान संतोष ठाकरे यांच्याकडे 81 आर जमीन असल्याबाबत तक्रारकर्तीने क्लेम फॉर्म भाग -1 मधे योग्य ती माहिती विरुध्दपक्षाला दि.25/2/2009 रोजीच दिलेली होती असे विरुध्दपक्षाने दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन दिसून येते. विरुध्दपक्षाने जरी त्यांच्या लेखीजवाबामधे अपघाताच्या ..3.. प्रकरण क्रमांक :- सी.सी. /36/2010 ..3.. दिवशी मृत व्यक्तीकडे जमीन नसल्याचे नमूद केले आहे, तरीही या प्रकरणात दाखल करण्यांत आलेल्या फेरफाराच्या कागदपत्रांवरुन मृत शेतकरी समाधान संतोष ठाकरे यांच्याकडे अपघाताच्या दिवशी शेती होती असे स्पष्टपणे दिसून येते. त्यामुळे विरुध्दपक्षाने कोणत्याही योग्य त्या कारणाशिवाय तक्रारकर्तीचा विम्याचा दावा फेटाळून लावण्यांत आलेला दिसून येतो. त्याचप्रमाणे तक्रारकर्तीने विरुध्दपक्षाकडे विम्याचा दावा 25 फेब्रुवारी 2009 ला सादर केल्यानंतर विरुध्दपक्ष यांनी त्या पुढील एक महिन्यात त्यावर उचीत कार्यवाही करणे आवश्यक होते. मात्र विरुध्दपक्षाने तक्रारकर्तीचा विमा दावा कोणत्याही योग्य त्या कारणाशिवाय डिसेंबर 2009 मधे नामंजूर केलेला आहे. सबब विरुध्दपक्ष हे तक्रारकर्तीला महाराष्ट्र शासनाच्या खालील निर्णयानुसार योग्य ते व्याज देखील द्यायला बाध्य आहेत असे मंचाचे मत आहे. शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या कृषी,पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाच्या, शासन निर्णय क्रमांक शेअवि 2008/प्र.क्र.187/11 अ, मंत्रालय विस्तार, मुंबई 400 032, दि.6/09/2008 नुसार वरील योजनेच्या अंमलबजावणी, कार्यपध्दती व नियुक्त यंत्रणाची कर्तव्ये आणि जबाबदारी याबाबत निर्देश देण्यांत आलेले आहेत. यामधील कलम 23 (इ)(1) व (2) हे खालीलप्रमाणे आहे. (1) विमा सल्लागार कंपनीने सादर केलेला विमा प्रस्ताव तपासून परिपूर्ण प्रस्ताव स्विकारुन पोहोच देतील. एक महिन्यात त्यावर निर्णय घेवून नुकसान भरपाईच्या रकमेचा धनादेश शेतक-यांच्या वारसदारांच्या बचत खात्यात जमा करतील. (2) विमा प्रस्तावात त्रुटी असल्यास त्रुटीबाबतचे पत्र किंवा दावा नामंजूर असल्यास त्याबाबतचे पत्र संबंधीत अर्जदारास पोहोच करतील व त्याची प्रत विमा ..4.. प्रकरण क्रमांक :- सी.सी. /36/2010 ..4.. सल्लागार कंपनी व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांना देतील. परिपूर्ण प्रस्ताव प्राप्त झाल्यापासून एक महिन्याच्या आत उचीत कार्यवाही न केल्यास तीन महिन्यापर्यत दावा रकमेवर दरमहा 9 टक्के व त्यानंतर पुढे 15 टक्के व्याज देय राहील. त्यामुळे या प्रकरणात विरुध्दपक्ष तक्रारकर्तीला दि.01/04/2009 ते दि.30/06/2009 पर्यत द.सा.द.शे. 9% दराने व दि.01/07/2009 पासून प्रत्यक्ष रक्कम देईपर्यत द.सा.द.शे.15% दराने व्याज द्यायला बाध्य आहे असे मंचाचे मत आहे. सबब खालील अंतीम आदेश पारीत करण्यांत येत आहे. अं ती म आ दे श 1) विरुध्दपक्षाने तक्रारकर्तीचा शेतकरी मुलगा समाधान संतोष ठाकरे याच्या अपघाती मृत्यूबाबतचा विम्याचा दावा कोणत्याही योग्य त्या कारणाशिवाय फेटाळून सेवेतील त्रुटी दर्शविली आहे. सबब विरुध्दपक्षाने तक्रारकर्तीला शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत विम्याची रक्कम रु.1,00,000/- (अक्षरी रु.एक लक्ष फक्त) ची रक्कम द्यावी व या रकमेवर दि.1/4/2009 ते दि.30/6/2009 पर्यत द.सा.द.शे.9% दराने व दि.1/7/2009 पासून प्रत्यक्ष रक्कम देईपर्यत 15% दराने व्याज द्यावे. 2) विरुध्दपक्षाने तक्रारकर्तीचा विम्याचा दावा कोणत्याही योग्य त्या कारणाशिवाय फेटाळून लावून तक्रारकर्तीला दिलेल्या आर्थीक,शारीरिक व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून रु.2000/- (अक्षरी दोन हजार) ची रक्कम द्यावी. ..5.. प्रकरण क्रमांक :- सी.सी. /36/2010 ..5.. 3) विरुध्दपक्षाने तक्रारकर्तीला न्यायीक खर्चाबाबत. रु.1000/- (अक्षरी एक हजार) ची रक्कम द्यावी. 4) वरील आदेशाचे पालन विरुध्दनपक्षाने हा आदेश मिळाल्यापासून 45 दिवसाच्या आत करावे. (श्रीमती नंदा लारोकर) (राजीव त्रिं. पाटील) सदस्या अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, बुलडाणा. स्थळ :- बुलडाणा दिनांक :- 23/11/2010
| [HONORABLE Mrs Nanda Larokar] Member[HONORABLE R T Patil] PRESIDENT | |