विद्यमान जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,
वाशिम.
तक्रार क्रमांक : ४६ /२०१२ दाखल दिनांक :१३/१२/२०१२
निर्णय दिनांक :२७/०६/२०१४
निर्णय कालावधी :०१ वर्ष ०६ म.२२ दि.
तक्रारकर्ता : कादर नुरा नुरीवाले, वय ३५ वर्ष,
तक्रारकर्ते यांचे तर्फे रा.कोळंबी पो.ढाबा ता.मंगरुळपीर जि.वाशिम
अॅड.ए.डि.रेषवाल
// विरुध्द //
विरुध्द पक्ष : ओरिएन्टल इंन्शुरन्स कंपनी लि.,
विरुध्द पक्ष यांचे तर्फे तर्फे शाखाधिकारी, शाखा कार्यालय
अॅड.पी.के.ढवळे वाशिम, झांझरी कॉम्प्लेक्स १ला मजला,
पाटणी चौक, ता.जि.वाशिम
पारित व्दारा :- १. मा.सौ.एस.एम.उंटवाले, अध्यक्षा
२. मा.श्री.ए.सी.उकळकर,सदस्य
३. मा.श्रीमती.जे.जी.खांडेभराड, सदस्या
::: आ दे श :::
( पारित दिनांक : २७/०६/२०१४ )
आदरणीय अध्यक्षा,मा.सौ.एस.एम.उंटवाले, यांचे अनुसार : -
१. ग्राहक संरक्षण कायदा १९८६ चे, कलम : १२ अन्वये, सादर करण्यात
आलेल्या, सदर तक्रार प्रकरणातील मजकूर, थोडक्यात आढळून येतो तो येणेप्रमाणे,
..२.. तक्रार क्रमांक : ४६ /२०१२
तक्रारकर्ता हे कोळबी, पो.ढाबा ता.मंगरुळपिर जि.वाशिम येथील रहिवासी आहे. तक्रारकर्त्याने दि.०२.०८.२००९ रोजी ओरिएन्टल इंन्शुरन्स कं.लि., यांच्या कडुन नागरी सुरक्षा इंडीज्युअल पॉलिसी दि.०२.०६.२००९ ते ०१.०६.२०१० या कालावधीची काढली आहे. सदर पॉलिसी अंर्तगत रु.२,००,०००/-पर्यंत नुकसान भरपाई देता येते अपघातामध्ये ८०% रु.१,६०,०००/- व दवाखान्याकरीता (हॉस्पीटलायझेशन) २०% रु.४०,०००/- एवढी रक्कम विमा कंपनी पॉलिसी धारकाला देवु शकते. सदर पॉलिसीचा विमा हप्ता भरलेला आहे. व पॉलिसी नं.१८२२०२/४८/२०१०/२२० असुन ऑफीस कोड १८२२०२ हा आहे.
दि.२३.१२.२००९ रोजी तक्रारकर्ते रात्रीच्या वेळी विज/लाईन गेल्यामुळे घरामध्ये घासलेटचा दिवा पेटवुन तो कुलरवर ठेवला होता व गाढ झोपलेले असतांना सदर दिवा हा उंदराच्या हालचालीमुळे तक्रारकर्त्याच्या अंगावर पडला. या घटनेमध्ये (अपघातामध्ये) तक्रारकर्ते गंभीर रित्या भाजले गेले. या अपघातात गळा, छाती, एक हात पूर्णपणे जळाले, घटनेनंतर तक्रारकर्ते गव्हर्नमेंट हॉस्पीटल, अकोला येथे दि.२४.१२.२००९ ते ०२.०१.२०१० पर्यंत भरती होते. त्यांना २२% जळाल्याबद्दल प्रमाणपत्र दिले. तेथे उपचार चालू असतांना तेथील उपचारामुळे तक्रारकर्त्याचे जखमेत कोणतीही सुधारणा होत नव्हती. त्यामुळे तेथुन सुट्ठी घेउन भावना ग्रामीण रुग्णालय, सोनखास ता.मंगरुळपिर जि.वाशिम येथे भरती झाले व आजही उपचार चालु आहे. भावना ग्रामीण रुग्णालयामध्ये रु.३०,५१५/- एवढा खर्च आला. तसेच औषधोपचारासाठी रु.१०,०००/- वाहतुक खर्च रु.१०,०००/- तसेच गुणकारी आहाराकरीता रु.२०,०००/- असा खर्च आला. तसेच सदर अपघाता बद्दल पो.स्टे.मंगरुळपीर येथे खबर देवुन पंचनामा सुध्दा केला.
..३.. तक्रार क्रमांक : ४६ /२०१२
विरुध्द पक्षाकडे सदर पॉलिसीची नुकसान भरपाईची रक्कम मिळण्याकरीता पुर्ण मुळ कागदपत्रासह (मेडीकल बिल्स, हॉस्पिटल बिल, पोलीस पेपर, इत्यादी) पुर्तता केलेली आहे. परंतु विरुध्दपक्ष यांनी नेहमी उडवाउडवीचे उत्तरे दिली व आजपर्यत विमा पॉलिसी नुसार कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाईची रक्कम दिलेली नाही. ज्या हेतुकरीता तक्रारकर्त्याने पॉलिसी काढली होती त्याचे उद्दीष्टविमा कंपनीने पुर्ण केलेले नाही. विमा कंपनी ही फक्त नफा कमावण्याचे उदे्दशाने व्यवसाय करीत आहे, विमा कंपनी ही अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब करीत आहे. तरी तक्रारकर्त्याची विनंती कि, तक्रार मंजुर करुन तक्रारी नुसार रु.२,००,०००/- नुकसान भरपाई तसेच दावा दाखल केल्यापासुन त्यावर रु.१८% दराने व्याज, तसेच शारिरिक व मानसिक, आर्थिक त्रासाबद्दल
रु. १०,०००/- व तक्रार खर्च रु.५,०००/- विरुध्दपक्षाकडून देण्याचा आदेश व्हावा. इतर इष्ट व न्याय दाद तक्रारकर्त्याचे हितावह व विरुध्दपक्षा विरुध्द देण्याची कृपा करावी ही विनंती.
सदर तक्रार तक्रारकर्ते यांनी शपथेवर दाखल केलेली असुन त्या सोबत एकुण १० दस्ताऐवज पुरावे म्हणुन दाखल केलेले आहे.
2) विरुध्द पक्षाचा लेखी जवाब :- सदर तक्रारीची नोटिस मंचातर्फे प्राप्त झाल्या नंतर विरुध्द पक्षाने त्यांचा लेखी जबाब (निशाणी 11 ) दाखल करुन बहुतांश विधाने नाकबूल केली आहे. त्याचा थोडक्यात आशय असा, तक्रारकर्त्याची तक्रार ही योग्य न्यायक्षेत्रात नसुन चुकीची व खोटी माहीती सादर करुन व विदयमान मंचापसून विविध बाबी कागदोपत्री लपवून सदर तक्रार तक्रारकर्त्याने दाखल केलेली आहे.
..४.. तक्रार क्रमांक : ४६ /२०१२
विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याचा दावा नियमाप्रमाणे शहानिशा केल्यानंतर पूर्णत: निकाली काढला व त्याबाबत तक्रारदारास कळविले. त्याची प्रत जोडपत्र क्र.१ नुसार सोबत जोडली आहे. तक्रारकर्त्याच्या तक्रारीमध्ये तक्रारकर्त्याने पुर्णत:वास्तविक परिस्थीती कोर्टापासून लपवून ठेवून आपल्या मनघडंत कहानी व्दारे वि.मंचा समक्ष आपली तक्रार आणली परंतु वास्तविक परिस्थिती ही तशी नसूनवेगळीच आहे. तक्रारकर्त्याने आपल्या सोई प्रमाणे दाव्याची रचना केस तयार करतांना केली व जास्तीतजास्त खोटे व वाढीव बिले दाखल केलेली आहे. परंतु विरुध्दपक्ष हे शासनाच्या अधिपत्या खाली चालणारे शासकिय उपक्रम आय.आर.डी.ए. जे नियमांचा अधिन राहूनच कार्य करते. विरुध्दपक्षाला नियमानुसार कुठलाही दावा निकाली काढता येतो विरुध्दपक्ष कागदपत्रावर आपली भिस्त ठेवत आहे. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाकडे दि.०२.०६.२००९ ते ०१.०६.२०१० हया कालावधी करीता नागरी सुरक्षा इंडीव्हुज्युअल पॉलीसी काढली होती सदर पॉलीसीचे प्रिमियम हे १४९/- इतके होते सदर पॉलिसी नुसार इंन्सुअर्ड चा अपघाती मृत्यु झाल्यास पॉलिसीच्या ८०% म्हणजेच मृत्यु झाल्यास रु.१६०,०००/-फक्त किंवा जखमी झाल्यास दवाखान्याचे खर्चाचे २०% म्हणजेच मर्यादीत रु.४०,०००/- इतकी रक्कम योग्य ती शहानीशा करुन कागदपत्रांचा खरेपणा पडताळून व कार्यालयीन क्लेम प्रोसेस नुसार संपूर्णदाव्याची शहानिशा केल्यानंतर जर इंश्युअर्ड चे क्लेम व कागदपत्रे नियमाप्राणे असल्यास मिळतात.
असे असतांना घटनेची माहीती मिळताच विरुध्दपक्ष कंपनीने सदर प्रकरणात तपास अहवाल मागीतला व त्याचप्रमाणे तक्रारकर्त्याकडुन दवाखाण्याचे संपूर्ण मुळ कागदपत्रे मागवीली त्याचप्रमाणे दवाखाण्याच्या योग्यतेबाबत
..५.. तक्रार क्रमांक : ४६ /२०१२
डॉक्टरांबाबत चौकशी केली परंतु तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाच्या मागणीची कोणतीही पुर्तता केली नाही. खोटे, चुकीचे, बनावटीस्वरुपाचे कागदपत्रे वि.मंचात दाखल केले. त्याचप्रमाणे दवाखाण्याच्या रजिष्ट्रेशन बाबत माहिती पुरविली नाही. तपासा अंती विरुध्दपक्षाला असे निदर्शनास आले कि, सदर दवाखाना हा नोंदणीकृत नाही. कोणतेही दवाखाण्याचे मुळ इंनव्हॉईस बिल प्राप्त झाले नाही. क्लेमचा निपटारा करते कामी केलेल्या तपासात तक्रारकर्त्याने दिलेल्या त्याच्या जबाबात त्याने रु.४५,०००/- खर्च आला असे तोंडी सांगीतले त्याचा कोणताही पुरावा दाखल केला नाही तसेच पोलिस दस्ताऐवजावरुन असे आहे की, तक्रारकर्त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता परंतु शिक्षेपासुन पळवाट काढण्यासाठी या पॉलिसीचा गैरफायदा तक्रारकर्ता घेत आहे. त्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार दंड लावून खारीज करण्यात यावी करीता हा लेखी जबाब.
3) कारणे व निष्कर्ष ः-
या प्रकरणातील तक्रारकर्ते यांची तक्रार, विरुध्दपक्षाचा लेखी जबाब, उभयपक्षाने दाखल केलेले सर्व दस्तऐवज, तक्रारकर्ते यांचे प्रतिउत्तर व उभयपक्षांचा तोन्डी युक्तीवाद यांचे काळजीपूर्वक अवलोकन मंचाने केले व खालील निष्कर्ष कारणे देवुन नमुद केला.
तक्रारकर्त्याचा दि.२३.१२.२००९ रोजी त्याच्या घरामध्ये घासलेटचा दिवा अंगावरपडुन ते या अपघातामध्ये गंभीर रित्या भाजल्या गेले. या अपघातामध्ये त्यांचा चेहरा, गळा, छाती व हात जळाले तक्रारकर्ता दि.२४.१२.२००९ ते ०२.०१.२०१० पर्यंत सरकारी हॉस्पिटल अकोला येथे भरती होते. तक्रारकर्ता हा
..६.. तक्रार क्रमांक : ४६ /२०१२
२२% जळाल्या बद्दल त्याला प्रमाणपत्र देण्यात आलेले असुन ते सदर प्रकरणात दाखल आहे. तक्रारकर्त्याने दि.०२.०८.२००९ रोजी दि. ओरिएन्टंल इंन्शुरन्स कंपनी यांच्या कडुन नागरी सुरक्षा इंडीज्युअल पॉलीसी दि.०२.०६.२००९ ते ०१.०६.२०१० या कालावधी करीता काढलेली आहे तसेच सदर पॉलीसी नुसार रु.२,००,०००/- पर्यंत नुकसान भरपाई जर अपघातामध्ये वैयक्तीक अपघात झाल्यास तो (८०%) असेल तर नुकसान भरपाई रु.१,६०,०००/- व दवाखाण्याकरीता (२०% )रु.४०,०००/- एवेढी रक्कम विमा कंपनी पॉलीसी धारकाला देऊ शकते. अपघात झाल्यानंतर तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाकडे नुकसान भरपाई मिळण्या करीता मागणी केली.
विरुध्दपक्षाचे असे म्हणने आहे की, त्यांनी तक्रारकर्त्याचा दावा फेटाळुन लावून तक्रारकर्त्यास दि.०१.०४.२०११ रोजी कळविले, विरुध्दपक्षाने प्रकरणात तक्रारकर्त्याचा दावा खारीज करण्या बाबत पत्र दाखल केले परंतु ते त्याला मिळाल्या बाबत कुढलीही पोचपावती दाखल केलेली नाही. विरुध्दपक्षाने मुदतीच्या कायदया प्रमाणे तक्रारकर्त्याच्या तक्रारीस आक्षेप घेतला परंतु विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याचा दावा खारीज केल्या बाबतचे पत्र तक्रारकर्त्यास मिळाले किंवा नाही या बाबबत कुठलीही पोचपावती व योग्य तो खुलासा न केल्यामुळे मुदतीच्या कायदयाच्या तरतुदी प्रमाणे विरुध्दपक्षाचा आक्षेप या प्रकरणात लागु होत नाही.
विरुध्दपक्षास तक्रारकर्त्याने त्यांच्याकडे रु.२,००,०००/- रक्कमेची विमा पॉलीसी काढली हे मान्य आहे. तक्रारकर्त्याने घटना झाल्याबाबतची रितसर सुचना पोलिस स्टेशन मंगरुळपीर येथे दिली होती असे दाखल दस्ताऐवजावरुन
..७.. तक्रार क्रमांक : ४६ /२०१२
दिसते व या दस्तात तक्रारकर्त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असे कुठेही दिसुन येत नाही त्यामुळे या बाबतीतील विरुध्दपक्षाचा आक्षेप सुध्दा ग्राहय धरता येणार नाही. विरुध्दपक्षाने घटने बाबत घेतलेला आक्षेप हा ग्राहय धरता येवु शकत नाही. विरुध्दपक्षाने असा युक्तीवाद केला कि, जर मृत्यु झालातरच रु.१,६०,०००/- अपघाता पोटी देण्यास विरुध्दपक्ष पात्र ठरतात परंतु तक्रारकर्त्याने काढलेल्या पॉलीसी मध्ये वैयक्तीक अपघात झाला असेल तर रु.१,६०,०००/- व दवाखाण्याचा खर्च रु.४०,०००/- असे नमुद आहे. त्यामुळे विरुध्दपक्षाचा आक्षेप ग्राहय धरता येणार नाही. तक्रारकर्त्याने या प्रकरणात ४०% कायमस्वरुपी अपंग प्रमाणपत्र दाखल केलेले आहे. तक्रारकर्त्याने त्याला झालेल्या अपघातामध्ये दवाखाण्याच्या खर्चाची रु.३०,५१५/- चे मेडिकल बिल प्रकरणात दाखल केले आहे. त्यामुळे विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याचा हा विमा पॉलिसीचा दावा बेकायदेशीर रित्या फेटाळून अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केला आहे. म्हणुन तक्रारकर्ता हा वैयक्तीक अपघाता पोटी रु.१,६०,०००/- व दवाखाण्याच्या खर्चा पोटी रु.४०,०००/- असे मिळुन रु.२,००,०००/- विरुध्दपक्षाकडुन मिळण्यास पात्र आहे. तक्रारकर्त्याचा पॉलीसीचा दावा फेटाळुन विरुध्दपक्षाने दि�लेल्या मानसिक व शारिरीक त्रासा बद्दल रु.५०००/- मिळण्यास पात्र ठरतो, अश्या निष्कर्षाप्रत हे न्याय मंच आलेले आहे.
सबब खालील प्रमाणे अंतीम आदेश पारीत करण्यात आलेला आहे.
..८.. तक्रार क्रमांक : ४६ /२०१२
अंतीम आदेश
१. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजुर करण्यात येत आहे.
२. विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्ते यांना नागरी सुरक्षा इंडीव्हुज्युअल
पॉलीसी पोटी विमा रक्कम रु.२,००,०००/- (अक्षरी,दोन लाख) ही तक्रार
दाखल तारीख १३.१२.२०१२ पासुन तर प्रत्यक्ष रक्कम अदाई पर्यंत
द.सा.द.शे. ६% व्याज दराने दयावी.
३. विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्ते यांना शारिरीक, मानसिक व आर्थिक
नुकसान भरपाई पोटी रु.५,०००/- (अक्षरी,पाच हजार)व तक्रारीचा
खर्च रु.२,०००/-(दोन हजार) दयावा.
४. विरुध्दपक्ष यांनी सदर आदेशाचे पालन आदेश प्रत मिळाल्यापासुन
४५ दिवसाचे आत करावे.
५. उभयपक्षकारांना आदेशाची प्रत निःशुल्क देण्यात यावी.
मा.सौ.एस.एम.उंटवाले,
अध्यक्षा
मा.श्री.ए.सी.उकळकर, मा.श्रीमती.जे.जी.खांडेभराड,
सदस्य सदस्या
दि�.२७.०६.२०१४
स्टेनो/गंगाखेडे