Maharashtra

Kolhapur

CC/11/181

Smt. Rekha Kiran Patil. - Complainant(s)

Versus

Manager, The Oriental Insurance Co.Ltd - Opp.Party(s)

P.S.Bharmal.

29 Aug 2011

ORDER


monthly reportDistrict Consumer Forum, Kolhapur
Complaint Case No. CC/11/181
1. Smt. Rekha Kiran Patil.Rashiwade, Tal. Radhanagari.Kolhapur. ...........Appellant(s)

Versus.
1. Manager, The Oriental Insurance Co.Ltd204 E ward, Kanchanganga Complex, New Shahupuri,Kolhapur.Kolhapur. ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh ,PRESIDENTHONABLE MRS. Mrs.V.N.Shinde ,MEMBER
PRESENT :P.S.Bharmal., Advocate for Complainant
P.R. Kolekar, Advocate for Opp.Party

Dated : 29 Aug 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 नि का ल प त्र :- (दि.29.08.2011) (द्वारा-श्री.एम्.डी.देशमुख, अध्‍यक्ष)

 (1)   प्रस्‍तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला यांनी म्‍हणणे दाखल केले. सुनावणीचेवेळेस, दोन्‍ही बाजूंच्‍या वकिलांनी युक्तिवाद केला.
  
(2)   तक्रारदाराची थोडक्‍यात तक्रार अशी,
         
      तक्रारदारांच्‍या पतीचा मुख्‍य व्‍यवसाय शेती हा आहे. तक्रारदार यांचे पतीचा ’शेतकरी व्‍यक्तिगत अपघात विमा योजने’  अंतर्गत विमा उतरविलेला आहे. राज्‍य शासनाने सदर विम्‍याची हप्‍त्‍याची रक्‍कम सामनेवाला कंपनीला अदा केली आहे. तक्रारदारांचे पती मयत किरण गोपाळ पाटील हे दि. 10/03/2009 रोजी दुपारी 12-45 वाजणेचे सुमारास शेतातील निशिगंधा फुलांचेवर किटकनाशक औषध फवारणी करत असताना त्‍यांच्‍या तोंडातून विषारी औषध पोटामध्‍ये गेलेने ते बेशुध्‍द अवस्‍थेत पडले असता त्‍यांना उपचाराकरिता सी.पी.आर. हॉस्‍पीटल येथे दाखल करण्‍यात आले होते. परंतु औषधोपचार चालू असताना दि. 11/03/2009 रोजी तक्रारदारांचे पतीचा मृत्‍यू झाला याबाबत राधानगरी पोलिस स्‍टेशन येथे सदर अपघाताची नोंद झालेली आहे. तक्रारदारांनी त्‍यांचे पतीचा अपघाती मृत्‍यू झालेनंतर सर्व आवश्‍यक कागदपत्रासह क्‍लेम फॉर्म भरुन दि. 12/11/2009 रोजी सामनेवाला विमा कंपनीकडे क्‍लेमबाबत मागणी केली. त्‍यानंतर स्‍वत: भेटून क्‍लेमबाबत चौकशी केली. परंतु तक्रारदारांचा क्‍लेम मंजूरीस पात्र असतानाही क्‍लेम मंजूर केलेला नाही अथवा क्‍लेमबाबत कळविले नाही व क्‍लेमची रक्‍कमही दिलेली नाही. त्‍यामुळे दि. 20/02/2010 रोजी सामनेवाला कंपनीस वकिलामार्फत नोटीस पाठविली त्‍याची दखलही सामनेवाला कंपनीने घेतलेली नाही.   सबब, तक्रारदारांची तक्रार मंजूर करुन विमा रक्‍कम रु. 1,00,000/- व्‍याजासह देणेबाबत आदेश व्‍हावेत अशी विनंती केली आहे.
 
(3)   तक्रारदारांनी त्‍यांच्‍या तक्रारीसोबत क्‍लेम फॉर्म भाग 1 व त्‍याचे सहपत्र, सात-बाराचे उतारा, खाते नं. 397 चा 8 अ चा उतारा, मयताची फेरफार डायरी, वारसा डायरी गाव नमुना 6 क, क्‍लेम फॉर्म भाग 2, तलाठयाचे प्रमाणपत्र, तक्रारदारांचे वारस प्रतिज्ञापत्र, तक्रारदार यांचे प्रतिज्ञापत्र, मयताचे निवडणुक ओळखपत्र, मृत्‍यू प्रमाणपत्र, अपघात वर्दी, एम.एल.सी. नं. 2277/09, अपघात पंचनामा, पी.एम. नोटस, इन्‍क्‍वेस्‍ट पंचनामा, कॉज ऑफ डेथ सर्टीफीकेट, बँक पासबुक, इत्‍यादी इत्‍यादीच्‍या प्रती दाखल केलेल्‍या आहेत. 
   
(4)   सामनेवाला विमा कंपनीने त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यान्‍वये तक्रारदारांच्‍या तक्रारीतील कथने नाकारलेली आहेत. ते त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यात पुढे सांगतात, तक्रारदारांनी सामनेवाला कंपनीकडे दाखल केलेल्‍या कागदपत्रामध्‍ये व्‍हीसेरा- रिपोर्ट व मृत्‍यू कारणांचा अंतीम अहवाल जोडलेला नाही. कागदपत्रांची मागणी करुनही दाखल न केलेने क्‍लेमबाबत अंतिम निर्णय घेणे शक्‍य झालेले नाही. सबब, तक्रारदारांची तक्रार चुकीची असलेने खर्चासह नामंजूर करणेत यावी अशी विनंती केली आहे.
  
(5)   या मंचाने दोन्‍ही बाजूंच्‍या वकिलांचा युक्‍तीवाद सविस्‍तर  ऐकला. दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता तक्रारदारांचे पती किरण गोपाळ पाटील त्‍यांचा दि. 11/03/2009 रोजी अपघाती मृत्‍यू झाला असलेबाबत राधानगरी पोलिस स्‍टेशनला नोंद केलेली आहे.   त्‍या अनुषंगाने पंचनामा झालेला आहे. तसेच शवविच्‍छेदन अहवाल व इन्‍क्‍वेस्‍ट पंचनामा झालेला आहे. तसेच सी.पी.आर. हॉस्‍पीटल, कोल्‍हापूर यांनी मृत्‍यूबाबत अंतिम अहवाल दाखल केला आहे इत्‍यादी कागदपत्रांचे अवलोकन केले असता दि. 10/03/2009 रोजी तक्रारदारांची पती किरण गोपाळ पाटील हे त्‍यांचे शेतामध्‍ये निशिगंधा फुलांचेवर किटकनाशक औषध फवारणी करत असताना त्‍यांच्‍या तोंडातून विषारी  औषध पोटामध्‍ये जावून विषबाधा झालेली आहे व त्‍यामध्‍ये त्‍यांच्‍या मृत्‍यू झाला असल्‍याचा उपरोक्‍त उल्‍लेख केलेल्‍या कागदपत्रांवरुन दिसून येते. तक्रारदारांनी तालुका कृषीअधिकारी, ता. राधानगरी, जि. कोल्‍हापूर यांचेमार्फत क्‍लेम फॉर्म भरलेला आहे व त्‍याची स्‍थळप्रत प्रस्‍तुत कामी दाखल केली आहे. त्‍यामध्‍ये पी.एम. अहवाल, मरणोत्‍तर पंचनामा इत्‍यादी कागदपत्रे दिसून येतात. तसेच सात-बारा उतारा, तलाठी प्रमाणपत्र, मृत्‍यू दाखला, घटनास्‍थळाचा पंचनामा इत्‍यादी सहपत्र जोडल्‍याचे दिसून येते. सदरची वस्‍तुस्थिती असतानाही सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारांच्‍या क्‍लेमबाबत कोणताही निर्णय घेतला नसल्‍याचे दिसून येते. तसेच आवश्‍यक ती कागदपत्रे असतानाही कागदपत्राची मागणी केली असे सामनेवाला कंपनी कोणत्‍याही आधाराशिवाय प्रतिपादन करीत आहे. उपरोक्‍त विवेचन विचारात घेता सामनेवाला विमा कंपनीकडे विहीत वेळेत क्‍लेम फॉर्म व आवश्‍यक ती सर्व कागदपत्रे देऊन सामनेवाला कंपनीने तक्रारदारांच्‍या क्‍लेमवर कोणताही निर्णय घेतलेला नाही. सदर सामनेवाला विमा कंपनीची सेवा त्रुटी झाल्‍याचे दिसून येते.  उपरोक्‍त कागदपत्रे विचारात घेता तक्रारदार हे विमा क्‍लेम रक्‍कम व्‍याजासह मिळण्‍यास पात्र आहेत या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.   सबब, आदेश.         
                               - आ दे श -
 
1.    तक्रारदारांची तक्रार मंजूर करणेत येते.
2.    सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारांना क्‍लेम रक्‍कम रु. 1,00,000/- (अक्षरी रुपये एक लाख फक्‍त) द्यावी. तसेच, सदर रक्‍कमेवर दि. 11/03/2009 पासून संपूर्ण रक्‍कम अदा होईपावेतो द.सा.द.शे.9 टक्‍के व्‍याज द्यावे.
3.    सामनेवाला   विमा कंपनीने तक्रारदारांना तक्रारीच्‍या खर्चापोटी रु. 1,000/- ( अक्षरी रुपये एक हजार फक्‍त) द्यावेत.

[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT