Maharashtra

Ahmednagar

CC/17/380

Smt. Sakubai Dattatray Madake - Complainant(s)

Versus

Manager, The Oriental Insurance Co. Ltd. - Opp.Party(s)

Adv. Kale

21 Dec 2019

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अहमदनगर
पराग बिल्डींग,जिल्हाधिकारी कार्यालय आवार,अहमदनगर फोन नं. (0241) 2347917
आदेश
 
Complaint Case No. CC/17/380
( Date of Filing : 27 Dec 2017 )
 
1. Smt. Sakubai Dattatray Madake
R/o Sonsavangi, Tal. Shevgoan,
Ahmednagar
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Manager, The Oriental Insurance Co. Ltd.
Pune Regional Office no-3, 321/1A-2, Oswal Bandhu Samaj Building, J.N. Road, Pune 411042
Pune
Maharashtra
2. Manager, The Oriental Insurance Co. Ltd.
Amber Plaza Building, Ahmednagar
Ahmednagar
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V. C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. C. V.Dongare Member
 HON'BLE MR. M. N. Dhake MEMBER
 
For the Complainant:Adv. Kale, Advocate
For the Opp. Party: Adv.Sujata Gundecha, Advocate
Dated : 21 Dec 2019
Final Order / Judgement

निकालपत्र

निकाल दिनांक – २१/१२/२०१९

(द्वारा मा.सदस्‍या : श्रीमती.चारु विनोद डोंगरे)

___________________________________________________________

१.   तक्रारदाराने ग्राहक संरक्षण कायदा १९८६ कलम १२ प्रमाणे सदर तक्रार दाखल केलेली आहे.

२.   तक्रारदार ही मयत दत्‍तात्रय मडके यांची पत्‍नी असुन मृत्‍युपूर्वी दत्‍तात्रय पंढरीनाथ मडके हे शेतकरी होते व त्‍यांच्‍या नावे गट क्रमांक १८६ व २५ अशी शेतजमिन मिळकती सोनसागावी, तालुका शेवगाव जिल्‍हा अहमदनगर येथे होती. तक्रारदार हिच्‍या मयत पतीचा सामनेवाले यांच्‍याकडे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत विमा उतरविला होता.  सदरचा विमा कालावधी दिनांक ०१-१२-२०१६ ते ३०-११-२०१७ असा होता.

३.   दिनांक २९-०३-२०१७ रोजी रात्री ९ वाजेच्‍या सुमारास ते घरी असतांना गायीने धडक दिली व त्‍यात ते खाली पडले. त्‍यामुळे त्‍यांच्‍या उजव्‍या हाताला  व इतर ठिकाणी जखमा झाल्‍या. त्‍यानंतर शेवगाव येथील हॉस्‍पीटलमध्‍ये दाखल करण्‍यात आले. दुसरे दिवशी सकाळी तक्रारदार हिचे पतीचा मृत्‍यू झाला. त्‍यानंतर सदर घटनेची खबर सी.आर.पी.सी. चे १७४ कलमाअन्‍वये ए.डी. नं.१७/२०१७ पोलीस स्‍टेशन शेवगाव येथे देण्‍यात आला. त्‍यानंतर तक्रारदार हिने संपुर्ण कागदपत्रांसह नोडल ऑफीसर यांचे मार्फत सामनेवाले यांच्‍याकडे विमा दावा दाखल केला. परंतु सामनेवाले यांनी सदरचा विमा दावा हा मयताचा मृत्‍यु  हा ह्दयविकाराने झाला, त्‍यामुळे विमा दावा देता येणार नाही, म्‍हणुन नामंजुर केला. अशाप्रकारे चुकीचे कारणाने तक्रारदार हिचा विमा दावा सामनेवाले यांनी नाकारला म्‍हणुन तक्रारदार हिने मंचात तक्रार दाखल करून परिच्‍छेद क्रमांक १० प्रमाणे मागणी केली आहे.

४.   सामनेवाले यांनी त्‍यांची लेखी कैफीयत निशाणी १० सोबत प्रकरणात दाखल केली आहे. त्‍यामध्‍ये त्‍यांनी तक्रारदार हिचे मयत पतीचा विमा उतरविला होता, ही बाब मान्‍य केली आहे. मात्र सदरचा विमा दावा हा सामनेवाले यांनी तक्रारदार हिचे मयत पतीचा मृत्‍यू हा ह्दयविकाराने झाला आहे त्‍यामुळे नामंजुर केला यामध्‍ये सामनेवाले विमा कंपनीने कोणतीही सेवेत त्रुटी दिली नाही. सामनेवाले यांनी कोणत्‍याही अनुचीत व्‍यापारी प्रथेचा अवलंब केला नाही. सामनेवाले यांनी सदरचा विमा दावा योग्‍य कारणाने नाकारलेला आहे त्‍यामध्‍ये  सामनेवाले यांनी कोणतीही त्रुटी केली नाही त्‍यामुळे तक्रारदाराची तक्रार खर्चासह खारीज करण्‍यात यावी, अशी सामनेवाले यांनी मंचाला विनंती केली.  

५.  तक्रारदार यांनी दाखल केलेले कागदपत्र, शपथपत्र व त्‍यांचे वकील श्री.नितीन काळे यांनी दाखल केलेला लेखी युक्तिवाद तसेच सामनेवाले यांनी दाखल केलेले कागदपत्र, शपथपत्र, त्‍यांनी केलेला युक्तिवाद यावरून न्‍यायनिर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्‍यांचे उत्‍तर आम्‍ही सकारण खालील विवेचनाप्रमाणे देत आहोत.

अ.नं.

मुद्दे

निष्‍कर्ष

(१)

तक्ररादार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत काय ?

होय

(२)

सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सेवेत त्रुटी दिली आहे काय ?

होय

(३)

तक्रारदार नुकसान भरपाईची रक्‍कम मिळणेस पात्र आहे काय ?

होय

(४)

आदेश काय

अंतिम आदेशा प्रमाणे

 

कारणमिमांसा

६.  मुद्दा क्र. (१) :   तक्रारदार हिचे मयत पती दत्‍तात्रय पंढरीनाथ मडके यांचा सामनेवाले यांच्‍याकडे शासनाच्‍या निर्णयानुसार गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा रक्‍कम रूपये २,००,०००/- उतरविला होता.  सदरचा विमा कालावधी दिनांक ०१-१२-२०१६ ते ३०-११-२०१७ असा होता. विमा उतरविल्‍याची बाब सामनेवाले यांनी त्‍यांच्‍या लेखी कैफीयतीमध्‍ये मान्‍य केली आहे व यावरून तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहे, ही बाब सिध्‍द होते. सबब मुददा क्र.१ चे उत्‍तर होकारार्थी देण्‍यात येत आहे.  

७.  मुद्दा क्र. (२ व ३)  -  तक्रारदार हिचे पतीचा विमा उतरविल्‍यानंतर विमा कालावधीमध्‍ये दिनांक २९-०३-२०१७ रोजी रात्री ९ वाजेच्‍या सुमारास ते घरी असतांना गायीने धडक दिली व त्‍यात ते खाली पडले. त्‍यामुळे त्‍यांच्‍या उजवा हात व इतर ठिकाणी जखमा झाल्‍या. त्‍यानंतर शेवगाव येथील दवाखान्‍यात दाखल करण्‍यात आले. उपचारादरम्‍यान दुसरे दिवशी सकाळी त्‍यांचा मृत्‍यू झाला. ही बाब स्‍पष्‍ट करणेसाठी तक्रारदार यांनी प्रकरणात शवविच्‍छेदन अहवाल दाखल केला आहे व मृत्‍यू प्रमाणपत्र दाखल केले आहे. सामनेवाले यांनी तक्रारदाराच्‍या  या कथनाला त्‍याच्‍या लेखी कैफीयतीमध्‍ये असे बचाव घेतला की, तक्रारदार हिचे मयत पतीचा मृत्‍यू हा अपघाती नसुन तो नैसर्गिक आहे. तक्रारदार हिचे मयत पतीचा मृत्‍यु हा ह्दयविकाराने झाल्‍याने करारनाम्‍याच्‍या अटी व शर्तीनुसार सदरचा विमा दाव्‍याची रक्‍कम तक्रारदार हिला देता येणार नाही म्‍हणुन विमा दावा नाकारला. मंचाने प्रकरणात दाखल असलेला शवविच्‍छेदन अहवालाचे अवलोकन केले. त्‍यावर मृत्‍यूचे कारण ह्दयविकाराचा झटका असे नमुद आहे. सदरची घटना घडल्‍यानंतर तक्रारदार हिचे मयत पती दवाखान्‍यात उपचार घेत असतांना त्‍यांना ह्दयविकाराचा झटका आला. ह्दयविकाराचे झटक्‍याने मृत्‍यू  झाला असला तरी तो अपघात आहे, असे मंचाचे मत आहे. तक्रारदार हिच्‍या  मयत पतीचा विमा सामनेवाले यांच्‍याकडे उतरविला होता. त्‍यामुळे सामनेवाले यांनी सदरची रक्‍कम देणे आवश्‍यक होते. परंतु त्‍यांनी चुकीचे कारणाने विमा दावा नाकारला आहे, ही बाब सिध्‍द झाली आहे. अशा प्रकारे चुकीचे कारण देऊन विमा दावा नाकारणे, ही सामनेवाले यांनी सेवेत दिलेली त्रुटी आहे. तक्रारदार यांनी विम दाव्‍याची नुकसान भरपाई मिळणेसाठी सामनेवाले यांच्‍याकडे आवश्‍यक सर्व दस्‍तऐवज क्‍लेम फॉर्म, सातबारा उतारा, आठ अ चा खाते उतारा, मृत्‍यू प्रमाणपत्र, शवविच्‍छेदन अहवाल, पंचनामा, आधार कार्ड दाखल केलेले आहे. त्‍यामुळे तक्रारदार हिचे पतीचा मृत्‍यू अपघाती होता व सदरील विमा पॉलीसी ही शेतकरी अपघात विमा पॉलीसी म्‍हणुन उतरविली होती. सामनेवाले यांनी तक्रारदाराचे पतीला ह्दयविकाराचा झटका येऊन त्‍याचा मृत्‍यू झाला त्‍यामुळे विमा पॉलिसीच्‍या अटी व शर्तीनुसार विमा दावा देता येणार नाही, असे क‍थन केले. परंतु ह्दयविकार सुध्‍दा अपघात आहे यासाठी माननिय राष्‍ट्रीय आयोग व सर्वोच्‍च न्‍यायालयाने न्‍यायनिवाडे पारित केले व त्‍यामध्‍ये निर्णीत केले आहे ह्दयविकार हा अपघात आहे. यावरून व सदरचे तक्रारीतील तक्रारदाराचे कथन व कागदपत्र, पुरावा यावरून सदरची तक्रार तक्रारदार हिने सिध्‍द केली आहे. त्‍यामुळे सामनेवाले यांनी घेतलेला बचाव ग्राह्य धरता येत नाही. सबब मुद्दा क्र.१ व २ चे उत्‍तर होकारार्थी देण्‍यात येत आहे.

     तक्रारदार हिला सदरची तक्रार सामनेवाले यांनी चुकीच्‍या कारणाने विमा दावा नाकारला म्‍हणुन मंचात तक्रार दाखल करावी लागली. त्‍यासाठी तिला मानसिक व शारीरिक त्रासही सहन करावा लागला, या त्रासापोटी काही रक्‍कम तक्रारदार हिस देणे न्‍यायाचे ठरेल.

  मुद्दा क्र. (३) : मुद्दा क्रमांक १, २ व ३ वरील विवेचनावरून खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्‍यात येत आहे.   

आदेश

      १. तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येत आहे.

 

२.सामनेवाले यांनी तक्रारदारास विमा दाव्‍याची रक्‍कम रूपये २,००,०००/- (अक्षरी दोन लाख मात्र) व त्‍यावर दिनांक १७-११-२०१७ पासून संपुर्ण रक्‍कम मिळेपावेतो द.सा.द.शे. ९ टक्‍के दराने व्‍याज द्यावे.

 

३. सामनेवाले यांनी तक्रारदार हिस शारीरिक व मानसिक त्रासाबद्दल रूपये ५,०००/- (अक्षरी पाच हजार) व  सदर तक्रार अर्जाचा खर्च रूपये ३,०००/- (अक्षरी तीन हजार) द्यावा.

 

४  वर नमूद आदेशाची पुर्तता सामनेवाले यांनी आदेशाची प्रत मिळण्‍यापासून ३० दिवसाच्‍या आत करावी.

 

५. या आदेशाची प्रथम प्रत उभय पक्षकार यांना निःशुल्‍क देण्‍यात यावी.

 

६. तक्रारदार यांना या प्रकरणाची ‘’ब’’ व ‘’क’’ फाईल परत  करावी.

 
 
[HON'BLE MR. V. C. Premchandani]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. C. V.Dongare]
Member
 
 
[HON'BLE MR. M. N. Dhake]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.