ग्राहक तक्रार क्र. 08/2014
दाखल तारीख : 07/01/2014
निकाल तारीख : 20/01/2015
कालावधी: 01 वर्षे 0 महिने 14 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1. प्रताप पिता दिंगबरराव देशमुख,
वय-50 वर्षे, धंदा – वकिली,
रा.पिताश्री निवास, कोर्टाच्या पाठीमागे समर्थ नगर,
उस्मानाबाद, ता.जि. उस्मानाबाद. ....तक्रारदार
वि रु ध्द
1. द. मॅनेजर,
दि.न्यु इंडिया एश्युरन्स कं. लि.
नाईक निवास, शिवाजी चौक, उस्मानाबाद.
ता. जि. उस्मानाबाद. ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2) मा.श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य.
तक्रारदारांतर्फे विधीज्ञ : श्री.व्ही. डी. मोरे.
विरुध्द पक्षकारा तर्फे विधीज्ञ : श्री.आर.एम. कोनापूरे.
न्यायनिर्णय
मा. अध्यक्ष श्री.एम.व्ही.कुलकर्णी यांचे व्दारा:
1) आपले कारचा विरुध्द पक्ष (विप) कडे विमा उतरविलेला असतांना कारचे आगीमुळे जळून नुकसान झाल्या नंतर भरपाई विप ने दिली नाही म्हणून तक्रारकर्ता (तक) ने ही तक्रार दाखल केली आहे.
2) तक चे तक्रारी अर्जातील कथन थोडक्यात असे की तकने मारुती इको कार MH-25 R2422 खरेदी करुन दि.11/12/2012 ते 10/12/2013 या कालावधीसाठी ओन डॅमेज कव्हरसाठी विप कडे विमा उतरविला. सदरची पॉलिसी पॅकेज पॉलिसी होती व ओ.डी.साठी प्रिमियम रु.4,876/- भरला. दि.12/10/13 रोजी संध्याकाळी 10 वाजणेचे सुमारास तक व त्याचे मित्र काका मोरे व सतिष कु-हाडे असे गाडीतुन काजळा येथून उस्मानाबाद येथे येत होते. वाघोली गावचे शिवारात वळणावर कारचे इलेक्ट्रीक वायर अचानक जळाल्याने तक ने कार डाव्या बाजूस घेऊन थांबविली तक व त्याचे मित्र कार मधून खाली उतरले त्यावेळी वायरचा स्पार्क होऊन कारने पेट घेतला व कार संपुर्णपणे जळून खाक झाली त्यावेळेस तक हाच स्वत: कार चालवित होता.
3) ता.13/10/2013 रोजी तक ने उस्मानाबाद ग्रामीhण पोलीस स्टेशनमध्ये घटनेची माहीती दिली. घटना 08/2013 ने नोंदली गेली. पोलीसांनी जळालेल्या कारचा पंचनामा केला. त्या दिवशी रवीवार असल्यामुळे दुस-या दिवशी तक ने विप ला घटनेची माहीती दिली. विप तर्फे सर्व्हेअर हिरासकर यांनी घटनास्थळी जाऊन कारची पाहणी केली. विप यांच्या सांगण्यावरुन दुरुस्तीसाठी कार ‘’स्वामी समर्थ फायबर ग्लास वर्क अॅण्ड मोटार गॅरेज उस्मानाबाद’’ येथे नेली. खर्चाचे कोटेशन रु.3,43,050/- चे दिले. तक ने विप कडे दुरुस्ती खर्च मागणीचा क्लेम फॉर्म दि.14/10/2013 रोजी दिला. सोबत पोलीस स्टेशन जबाबाची प्रत, घटनास्थळ पंचनामा, कव्हर नोट, ड्रायव्हींग लायसेन्स, आर.सी बुक, कोटेशन इत्यादी कागदपत्रे हजर केली. मात्र विप ने तक चा क्लेम मंजूर अथवा नामंजूर केल्याचे कळविले नाही. शेवटी दि.27/12/013 रोजी तक ने वकीला मार्फत विप स नोटीस पाठविली. मात्र विप ने अदयापही विमा रक्कम दिली नाही.
4) तक हे जेष्ठ विधीज्ञ असल्यामुळे व कमरेच्या मणक्याचा त्रास असल्यामुळे डॉक्टरांनी आरामदायी कारमधून प्रवास करण्याचा तक ला सल्ला दिलेला आहे. त्यामुळे नवीन कार खरेदी करे पर्यंत म्हणजे दि.03/11/2013 पर्यंत तक ला दररोज रु.1,000/- किराया देऊन कार वापरावी लागली. विप कडून आर्थिक त्रासाबददल रु.50,000/- सेवेतील त्रुटी बददल रु.50,000/-, मानसिक त्रासासाठी रु.25,000/- अर्जाचा खर्च रु.10,000/- व कारचे नुकसान भरपाई रु.3,43,050/- मिळावी म्हणून तक ने ही तक्रार दाखल केलेली आहे.
5) तक्रारीसोबत क्लेम फॉर्मची प्रत, स्वामी समर्थ गॅरेजचे कोटेशन, रजिष्ट्रेशन कार्ड ची प्रत, सट्रीफिकेट ऑफ इन्शुरन्स, दि.26/12/013 चे नोटीसची प्रत, दि.13/10/2013 चे जबाबाची प्रत, घटनास्थळ पंचनामाची प्रत, ड्राय्रायव्हींग लायसन्सची प्रत हजर केली आहे.
6) विप ने हजर होऊन दि.09/04/2014 रोजी आपले म्हणणे दाखल केलेले आहे. त्याप्रमाणे तक हा विप चा ग्राहक नसल्याने या मंचास ही तक्रार चालविण्याचा अधिकार नाही. ही तक्रार देण्यास कोणतेही कारण घडलेले नाही. तथाकथित अपघात तक ने शाबीत करणे जरुर आहे. तक ने माहीती दिल्यानंतर विप ने आपला सर्व्हेअर नुकसान आजमावण्यासाठी पाठविला. अंतिमसर्व्हे तारीख 26/11/2013 रोजी झाला. सर्व्हेअरने ता.27/11/2013 रोजी तक ला लॉस इस्टीमेट, मुळ आर.सी. बुक हजर करण्यास कळविले. मात्र तक ने सदरचे पत्र घेण्यास नकार दिलेला आहे. तक च्या नोटीसीस विप ने योग्य ते उत्तर दिलेले आहे. तक ने या मंचाकडे धाव घेतल्यामुळे त्याची तक्रार रदद होण्यास पात्र आहे. तक चा क्लेमबाबत निर्णय होण्यात विप चा कोणताही दोष नाही. विप ने सेवेत कोणतीही त्रुटी केलेली नाही. त्यामुळे तक्रार रदद होण्यास पात्र आहे.
7) तक्रारदाराची तक्रार, सोबत दाखल केलेले कागदपत्रांचे विप यांची तक्रार त्यांनी दाखल केलेले कागदपत्रे तक व विप यांचा युक्तिवाद इ. चे सुक्ष्म अवलोकन केले असता आमचे विचारार्थ सदर प्रकरणात खालीलप्रमाणे मुद्दे उपस्थित होतात. त्यांची उत्तरे त्यांचे समोर खाली दिलेल्या कारणासाठी लिहिली आहेत.
मुद्दे उत्तर
1) तक हा विप चा ग्राहक आह काय ? होय.
2) विप ने सुवेत त्रुटी केली आहे काय ? होय.
2) तक हा अनुतोषास पात्र आहे काय ? होय.
3) काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिमांसा
मुद्दा क्र. 1 :
8) विपने आपल्या से मध्ये म्हंटले आहे की तक त्याचा ग्राहक नाही. तक चे म्हणणे प्रमाणे त्याची इको कार क्र.एम.एच.25 आर 2422 चा विमा दि.11/12/2012 ते 10/12/2013 चा कालावधीसाठी विप कडून घेतला होता. विम्याची कव्हर नोट तक ने हजर केलेली आहे. अपघाताची तारीख 12/10/2013 आहे त्यामुळे तक हा विप चा ग्राहक होतो. म्हणून मद्दा क्र. 1 चे उत्तर आम्ही होकारार्थी देतो.
मुद्दा क्र. 2 व 3 :
9) कार जळण्याची घटना दि.12.10.2013 ला संध्याकाळी 10 वाजता झाली अशी तक चे तक्रारीत म्हणणे आहे. ता.13/10/2013 रोजी पोलीसांनी तक चा घेतलेला जबाब तक ने हजर केला आहे. मात्र त्यामध्ये अपघात दि.13/10/2013 रोजी पहाटे दोनच्या सुमारास झाला असे म्हंटले आहे पोलीसांनी नोंद 3.30 वा केल्याचे दिसते. घटनास्थळ पंचनामा सकाळी 8 ते 9 चे दरम्यान केल्याचे दिसते पंचनाम्यात गाडी संपुर्ण जळून गेल्याचे लिहिले आहे. तक हे वकील असतांना पोलीसांसमोर वेगळी वेळ व तक्रारीत वेगळी वेळ का लिहिली हे समजत नाही. नंतर सोमवार दि.14/10/2013 रोजी विप ला घटनेची माहीती दिल्याचे तक ने म्हंटले आहे ते विप ला कबूल आहे. त्यानंतर विप ने सर्व्हेअर पाठवला. फायनल सव्ह्रे दि.26/11/2013 ला झाल्याचे विपचे म्हणणे आहे. तक ने मागीतलेली कागदपत्रे दिली नाही एवढीच विप ची तक्रार आहे.
10) सर्व्हेअरचे दि.27/11/2013 चे पत्राप्रमाणे ऑथईज्ड डिलर किंवा सर्व्हीस स्टेशनचे लॉस एस्टीमेट व ओरीजनल आर. सी. बुक मागीतले होते विप चे दि.06/02/2014 चे पत्राप्रमाणे एकूण 14 कागद मागीतले होते तर पत्र तक ने स्वीकारली नसल्याचा शेरा दोन्ही पाकिटावर दिसून येतो. तक चे हे वर्तन अनाकलनीय आहे.
11) तक ने ‘ स्वामी समर्थ गॅरेज’ चे एस्टीमेट हजर केले आहे. एकूण 70 कामांसाठी खर्च रु.3,43,050/- येईल असे त्यात म्हंटले आहे. विप चे सर्व्हेअरने किती इस्टीमेट केले या बददल विप ने मौन बाळगले आहे. सर्व्हेअर दुधानी यांनी अॅफीडेव्हीट मध्ये म्हंटले आहे की कारचे संपुर्ण नुकसान झाले होते त्यामुळे तक विम्याची रक्कम मिळणेस पात्र आहे. मात्र विप चे म्हणणे प्रमाणे तक ने जरुर ते कागदपत्र दिले नाहीत. तक व विप एकमेकावर दोष ढकलत आहेत. मात्र तक ने जरुर ती कागदपत्रे दिल्यास विप ने नुकसान भरपाई देणे जरुर आहे त्यामुळे मुददा क्र.2 व 3 चे उत्तर होकारार्थी देतो व खालीलप्रमाणे आदेश करतो.
आदेश
1) तक ची तक्रार मंजूर करण्यात येते.
2) तक ने विप चे दि.06/01/2014 चे पत्राप्रमाणे कागदपत्र या मंचात दाखल करावीत अथवा कागदपत्रे विप ला दिल्याचा पुरावा दाखल करावा.
3) वरीलप्रमाणे तक ने पुर्तता केल्यावर विप ने इन्शूरन्स डिक्लर्ड व्हॅल्यू प्रमाणे रु.2,84,474/- (रुपये दोन लक्ष चौ-यांची हजार चारशे चौ-यात्तर फक्त) नुकसान भरपाई तक ला दयावी.
4) विप ने तक ला तक्रारीचा खर्च म्हणून रु.10,000/- (रुपये दहा हजार फक्त) दयावे.
5) उपरोक्त आदेशाची अंमलबजावणी विरुध्द पक्ष यांनी आदेश दिल्या तारखेपासुन तीस दिवसात करुन विरुध्द पक्षकार यांनी तसा अहवाल 45 दिवसात मा.मंचासमोर सादर करावा, सदरकामी उभय पक्षकारांनी मंचात हजर रहावे. सदर आदेशाची पुर्तता विरुध्द पक्षकार यांनी न केल्यास तक्रारदाराने तसा अर्ज दयावा.
6) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री. मुकुंद बी. सस्ते) (श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.