Maharashtra

Ahmednagar

CC/16/292

Nanasaheb Kondaji Markad - Complainant(s)

Versus

Manager, The New India Insurance Co.Ltd. - Opp.Party(s)

Wankhede

09 Mar 2021

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, अहमदनगर
पराग बिल्डींग,जिल्हाधिकारी कार्यालय आवार,अहमदनगर फोन नं. (0241) 2347917
आदेश
 
Complaint Case No. CC/16/292
( Date of Filing : 18 Oct 2016 )
 
1. Nanasaheb Kondaji Markad
Galnimb, Tal- Shrirampur,
Ahmednagar
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Manager, The New India Insurance Co.Ltd.
Parag Plaza, Dr.Chatuphal Marg, Shrirampur,
Ahmednagar
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V. C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. C. V.Dongare Member
 HON'BLE MR. M. N. Dhake MEMBER
 
PRESENT:Wankhede, Advocate for the Complainant 1
 Adv.s.P.Meher, Advocate for the Opp. Party 1
Dated : 09 Mar 2021
Final Order / Judgement

निकालपत्र

निकाल दिनांक – ०९/०३/२०२१

(द्वारा मा. सदस्‍यः श्री.महेश निळकंठ ढाके)

__________________________________________________________

१.   तक्रारदाराने तक्रार ग्राहक संरक्षण कायदा १९८६ कलम १२ अन्‍वये दाखल केली आहे. तक्रारदार हे रा.गळनिंब, ता.श्रीरामपुर जि.अहमदनगर येथील रहिवासी असुन त्‍यांचा शेती व पशुपालन व्‍यवसाय आहे. त्‍यांचेकडे गायी होत्‍या. तक्रारदार यांनी सामनेवालेकडे दिनांक ०७-०८-२०१६ रोजी संपर्क साधुन गायींवर इन्‍शुरन्‍स  काढणेकामी चौकशी केली व त्‍या अनुषंगाने सामनेवाले यांनी दिनांक ०८-०८-२०१६ रोजी सामेवालेमार्फत एजंट श्री.रामनाथ्‍ भारत व सरकारी पशु वैद्यकीय अधिकारी श्री.एम.एम. धुमाळ यांनी तक्रारदार यांचे घरी जावून, दोन गायींची तपासणी करून, त्‍यांना गायीचे डावे कानावर सामनेवाले यांचा ‘टॅग’ लावला.  सदर टॅगचा नं.अनुक्रमे MLDB.N/A 370011949804, 370011949815 लावला व प्रत्‍येकी रक्‍कम रूपये ५०,०००/- चा विमा उतरविला. त्‍याबाबत पशुवैद्यकीय अधिकारी श्री.एम.एम. धुमाळ यांनी पशुशल्‍य चिकीत्‍सकचे प्रमाणपत्र [पशुबिमा] असे दिनांक ०८-०८-२०१६ रोजी दिलेले आहे. वास्‍तविक सदर इन्‍शुरन्‍सचे अनुषंगाने तक्रारदार याने सामनेवाले यांना दिनांक ०८-०८-२०१६ रोजी इन्‍शुरन्‍स प्रिमीयमची रक्‍कम रूपये २,८१८/- ही सामनेवाले यांचेकडे रोख जमा केलेली आहे व त्‍या अनुषंगाने संपुर्ण कार्यवाही ही दिनांक ०८-०८-२०१६ रोजी पुर्ण केलेली आहे व तेव्‍हापासुनच सदर विमा चालु झालेला आहे. सदर विमा पॉलिसी नंबर 15180247160400000264 असा आहे. दिनांक २५-०८-२०१६ रोजी उपरोक्‍त  नमुद विमा असलेली NIA  370011949815 एक गाय ही तक्रारदाराचे घरी मृत्‍यु  झाली. त्‍याबाबत तक्रारदाराने सदर गायीचा डॉ.श्री.एम.एम. धुमाळ शवविच्‍छेदन केले व त्‍याअनुषंगाने रिपोर्टही दिला. सदर रिपोर्टमध्‍ये गाय ही अपघाती [फुगुन] मयत झालेबाबत नमुद केलेले आहे. सदर गाय मृत्‍यु झालेनंतर तक्रारदार याने सामनेवालेकडे उपरोक्‍त नमुद इन्‍शुरन्‍सच्‍या अनुषंगाने तोंडी कळविले. त्‍यानंतर सामनेवाले यांनी सदर मृत झालेल्‍या गायीचा टॅग जमा करणेबाबत कळविले. सामनेवाले यांचा इन्‍व्‍हीस्‍टीगेटर येवून त्‍याने चौकशी केली. त्‍यानंतर तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्‍याकडे शवविच्‍छदेन प्रमाणपत्र, ग्रामपंचायते पत्र, पाच पंचाचा पंचनामा, मृतगायीचे फोटोग्राफ्स इत्‍यादी कागदपत्र जमा केले. त्‍यानंतर तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्‍याकडे शवविच्‍छेदन प्रमाणपत्र, ग्रामपंचायतचे पत्र, पाच पंचंचा पंचनामा, मृतगायीचे फोटोग्राफ्स इत्‍यादी कागदपत्र जमा केले. त्‍यानंतर तक्रारदाराने सामनेवालेशी संपर्क करून विम्‍याबाबत चौकशी केली असता, सामनेवाले यांनी दिनांक ०९-०९-२०१६ चे पत्रानुसार सदरचा क्‍लेम हा मुदतपूर्व असल्‍याने व त्‍यामुळे इन्‍शुरन्‍स्‍चे अटी व शर्तींचा भंग झाल्‍यामुळे इन्‍शुरन्‍स देता येत नाही, असे कळविले आहे. तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडे गायीचा इन्‍शुरन्‍स काढलेला असल्‍यामुळे तक्रारदार हे इन्‍शुरन्‍सची रक्‍कम रूपये ५०,०००/- मिळणेस पात्र आहे. सामनेवाले हे सदर रक्‍कम देण्‍यास टाळाटाळ करीत असुनतसे लेखीही कळविलेले आहे. वास्‍तविक सदर इन्‍शुरन्‍सबाबत कार्यवाही दिनांक ०८-०८-२०१६ पासुन झालेली असुन त्‍यास दिनांक २३-०८-२०१६ रोजी १५ दिवस पुर्ण होतात. असे असतांनाही सदर गाय ही इन्‍शुरन्‍सची कार्यवाही झाल्‍यानंतर १७ व्‍या दिवशी मृत झालेली आहे. सदर इन्‍शुरन्‍सबाबत सामनेवाले यांचे मॅनेजर व सदर एजंट हे जबाबदार आहे. मॅनेजर व एजंट यांनी त्‍यांचे कामात हलगर्जीपणा व कसुर केलेला आहे. अशा प्रकारे सामनेवाले यांनी अनुचित व्‍यापारी प्रवृत्‍तीचा अवलंब केलेला आहे व तक्रारदारास सेवा देतांना त्रुटी दिलेली आहे. त्‍यामुळे तक्रारदाराला सदरची तक्रार दाखल करणे भाग पडले आहे.

     तक्रारदार यांनी तक्रारीत अशी मागणी केली आहे की, तक्रारदारास इन्‍शुरन्‍स अन्‍वये विमा रक्‍क्‍म रूपये ५०,०००/- सामनेवालेकडुन मिळावे, तसेच त्रासापोटी नुकसान भरपाईची रक्‍कम रूपये १०,०००/- सामनेवालेकडुन मिळावे सदर रकमेवर संपूर्ण रक्‍कम मिळेपावेतो द.सा.द.शे. १० टक्‍के प्रमाणे नुकसान भरपाई सामनेवालेकडुन मिळावी व तक्रार अर्जाचा खर्च रूपये १०,०००/- सामनेवालेकडुन मिळावा.

२.   तक्रारदाराने तक्रारीचे पुष्‍ट्यर्थ निशाणी २ वर शपथपत्र, निशाणी ४ वर दस्‍तऐवज यादीप्रमाणे पशुशल्‍य चिकीत्‍सक प्रमाणपत्र (पशुबिमा), सामनेवालेचे इन्‍शुरन्‍स ‘’निल’’ पत्र, कलेक्‍शन रिसीट, इन्‍शुरन्‍स पॉलिसी, लाईव्‍ह स्‍टॉक क्‍लेम फॉर्म, व्‍हॅल्‍युएशन सर्टीफिकीट, पशुदावा पशुचिकित्‍सा प्रमाणपत्र, ग्रामपंचायत दाखला, मृत गायीचे फोटो यांचे छायांकीत प्रती दाखल केलेल्‍या आहेत.

३.   सामनेवाले हजर झाले, सामनेवालेने निशाणी १२ ला लेखी म्‍हणणे दिलेले आहे. त्‍यात तक्ररीतील नमुद गायींचा मृत्‍यु, हा विमा घेतल्‍यानंतर १५ दिवसांचे आत झाला आहे, असे सामनेवालेने नमुद केले आहे. कंपनीचे अटी व शर्तीनुसार असे मान्‍य करण्‍यात आले आहे की, ‘’ The company is not liable to pay the claim in the event of death of insured animal due to diseases occurring within 15 days from the commencement of the risk.’’    यास्‍तव विमा दावा नाकारला, तो योग्‍य आहे.  विमा दाव्‍याचे अटी शर्तीनुसार योग्‍यरितीने नाकारला आहे. यावर निशाणी १४ वर तक्रारदाराचे पुराव्‍याचे शपथपत्र दाखल आहे. तक्रारदाराने निशाणी १६ ला कागदपत्रे दाखल केलेली आहेत. तक्रारदाराने सदरील दाव्‍यासंदर्भात श्री.एम.एम. धुमाळ, शासकीय पशुवैद्यकीय अधिकारी, कुरणपूर, ता. श्रीरामपुर, जिल्‍हा अहमदनगर व इन्‍शुरन्‍स कंपनीचे एजंट श्री. रामनाथ ज्ञानदेव भारत यांना साक्षीदार करण्‍यात यावे, असा अर्ज दिला. सदर अर्जावर सामनेवालेचा खुलासा दाखल करण्‍यात आला. त्‍यानुसार निशाणी १७ वर तक्रारदाराचा अर्ज रद्द करण्‍यात आला. निशाणी १८ ला सामनेवालेतर्फे लेखी युक्तिवाद दाखल करण्‍यात आला. सामनेवालेने निशाणी १९ वर न्‍यायनिवाडे दाखल केलेले आहेत.

४.   तक्रारदाराची तक्रार, त्‍यांनी दाखल केलेली कागदपत्रे व त्‍यांनी केलेला युक्तिवाद तसेच सामनेवालेने दाखल केलेली कैफीयत तसेच सामनेवालेने दाखल केलेला लेखी युक्तिवाद यांचा विचार करता पुढील मुद्दे कारणमिमंसेसह सादर करण्‍यात येत आहे.

अ.नं.   

मुद्दे

निष्‍कर्ष

(१)

तक्रारदार हे सामनेवालेचे ग्राहक आहे आहेत काय ?

होय

(२)

तक्रारदाराला द्यावयाचे सेवेत सामनेवाले यांनी सेवेत त्रुटी दिली आहे काय ?

होय

(३)

आदेश काय

अंतिम आदेशा प्रमाणे

 

कारणमिमांसा

५. मुद्दा क्र. (१)  – तक्रारदाराने सामनेवालेकडे दिनांक ०८-०८-२०१६ रोजी गायींचा विमा उतरविलेला होता. त्‍याचा कालावधी दिनांक ११-०८-२०१६ ते     १०-०८-२०१७ पर्यंत होता व पॉलिसी क्रमांक १५१८०२४७१६०४०००००२६४ असा आहे, ही बाब सामनेवाले यांनी मान्‍य असल्‍यामुळे तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक होतात. मुद्दा क्रमांक १ चे उत्‍तर होकारार्थी देण्‍यात येत आहे.

६. मुद्दा क्र. (२) – तक्रारदार यांनी गायींचा सामनेवालेकडे विमा उतरविला होता. या संदर्भात तक्रारदाराने निशाणी ४ (३) वर प्रिमीयम भरल्‍याची पावती व निशाणी ४/४ वर इन्‍शुरन्‍स पॉलिसीची प्रत दाखल केली आहे. निशाणी ४/१ वर दाखल केलेल्‍या प्रमाणपत्रप्रमाणे पशु वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी केली त्‍यावर  ‘अ’  - क्‍या जानवर स्‍वस्‍थ, तंदुरूस्‍त और दोशमुक्‍त है ? – Yes, असे होकाराथी मत दर्शविले आहे. यावरून तक्रारदाराचे गायी विमा घेतेवेळी तंदुरूस्‍त  असल्‍याचे म्‍हटले आहे.  तसेच तक्रारदाराने सामनेवाले यांच्‍याकडे विमा प्रिमीयमची रक्‍कम रूपये २,४५०/- भरल्‍याचे तक्रारदाराने दाखल केलेले कागदपत्र ४(३) दाखल केलेले आहे. एकुण प्रिमीयम रक्‍कम रूपये २,८१८/- भरली आहे. आहे. तक्रारदाराने सामनेवालेकडे दाखल केलेला विमा क्‍लेम निशाणी ४ (५) वर आहे. त्‍यावर दिनांक २५-०८-२०१६ रोजी गाय मयत झाल्‍याचे लिहीलेले आहे. त्‍यासदंर्भात पशु दावा पशुचिकित्‍सा प्रमाणपत्र निशाणी ४ (७) जोडलेले आहे. त्‍याचप्रमाणे निशाणी ४(८) ला पंचनामा जोडलेला आहे. दिनांक २५-०८-२०१६ रोजी तक्रारदाराची नमुद गायीपैकी विमा असलेली गाय ही तक्रारदाराचे घरी मृत्‍यू  पावली. त्‍या संदर्भात गायीचा शवविच्‍छेदन अहवालही दिलेला असुन सदर अहवालात गाय ही अपघाती मयत झाल्‍याचे रिपोर्टमध्‍ये नमुद केले आहे. तक्रारदार व सामनेवाले यांचे शपथपत्र व कागदपत्रांचे अवलोकन असता तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्‍याकडे गायीचा विमा उतरविलेला होता त्‍याचा कालावधी दिनांक ११-०८-२०१६ ते १०-०८-२०१७ पर्यंत असा आहे. तक्रारदार यांची गाय दिनांक २५-०८-२०१६ रोजी मयत झाली. तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्‍याकडे विमा दावा दाखल केला व तो सामनेवाले यांनी गायीचा मृत्‍यू हा विमा पॉलसी घेतल्‍यापासुन १५ दिवसाचे आत झाला म्‍हणुन तक्रारदार यांचा विमा दावा नाकारला. सामनेवले यांनी विमा नाकारून द्यावयचे सेवेत त्रुटी केली, सबब तक्रारदाराचा विमा दावा मंजुर करावा, असे तक्रारदाराचे वकिलांनी पुराव्‍याचे शपथपत्रात म्‍हटले आहे. सामनेवाले यांनी त्‍यांचे लेखी युक्तिवादात नमुद केले आहे की, तक्रारदार यांची गाय ही पॉलिसी सुरू झाल्‍यानंतर १५ दिवसांचे आत मयत झाली. त्‍यानुसार विमा दावा अटी व शर्तीनुसार विमा दावा अनुज्ञेय होत नाही. त्‍यामुळे तक्रारदार यांचा विमा दावा योग्‍य व रास्‍त कारणास्‍तव नाकारला आहे, सबब तक्रारदाराची तक्रार रद्द करण्‍यात यावी, असे युक्तिवादात म्‍हटले. सामनेवाले यांचे वकिलांनी मा. राष्‍ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोग, दिल्‍ली यांचे खालील न्‍यायनिवाडे दाखल केलेले आहेत.

1.  2014(3) CPR 394 (NC) – Revision Petition No.3952 of 2008 Dt.18-07-2017 - New India Assurance Co.Ltd. & Ors. Vs. Sh.Deepak Anand, Sole Prop.M/s.Jennex International Exports  

2.  2013(2) CPR 140 (NC) – First Appeal No.470 of 2006 Dt.25-09-2012 - New India Assurance Co.Ltd. & Mrs. Shikha Bhatia & Anr.   

3.  2013(2) CPR 315 (NC) – Civil Appeal No.2080 of 2002 Dt.01-04-2009 – Vikram Greentech (I) Ltd. & Anr. Vs. New India Assurance Co. Ltd.    

4.  2010(4) CPR 35 (NC) – Revision Petition No.387of 2010 Dt.20-08-2010 – New India Assurance Co. Ltd. Vs. M/s. Anil Traders   

सदरचे न्‍यायनिवाडे या तक्रारीस लागू होत नाही, असे आयोगाचे मत आहे.

७.   तक्रारीत नमुद केलेला उभयपक्षांचा युक्तिवाद व पुराव्‍याचे अवलोकन केले असता विमा पॉलिसी ही दिनांक ११-०८-२०१६ पासुन सुरू झालेली आहे किंवा गायीचा मृत्‍यु हा विमा पॉलिसी काढल्‍यानंतर १५ दिवसांचे आत झाला, या कारणास्‍तव विमा दावा नाकारला. अयोग्‍य कारण देवुन सामनेवालेने तक्रारदाराचा विमा दावा नाकारून सेवेत त्रुटी ठेवली, असे आयोगाचे मत आहे. सदर गायीचा मृत्‍यू हा विमा पॉलसीचे कालावधीत झालेला असल्‍यामुळे तक्रारदार हे पुर्ण रक्‍कम मिळणेस पात्र ठरतात. याप्रमाणे तक्रारदार विमा रक्‍कम रूपये ५०,०००/- व त्‍यावर विमा नाकारल्‍यापासुन द.सा.द.शे. ५ टक्‍के प्रमाणे व्‍याज, तसेच नुकसान भरपाईची रक्‍कम रूपये ५,०००/- व  तक्रारीचा खर्च रक्‍कम रूपये ३,०००/- मिळण्‍यास पात्र ठरतात. सामनेवाले यांनी विमा दावा योग्‍य कारण न देता नाकारून सेवेत त्रुटी ठेवली आहे. सबब मुद्दा क्रमांक २ चे उत्‍तर होकारार्थी  देण्‍यात येत आहे.   

८.  मुद्दा क्र. (३) : मुद्दा क्र.१ व २ चे विवेचनावरून आम्‍ही  खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.   

आदेश

१. तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येत आहे.

२. सामनेवाले यांनी तक्रारदारास विमा दाव्‍याची रक्‍कम रूपये ५०,०००/- (अक्षरी पन्‍नास हजार मात्र) व त्‍यावर दिनांक ०९-०९-२०१६ पासून संपुर्ण रक्‍कम मिळेपावेतो द.सा.द.शे. ५ टक्‍के दराने व्‍याज द्यावे.

 

३. सामनेवाले यांनी तक्रारदार हिस शारीरिक व मानसिक त्रासाबद्दल रूपये ५,०००/- (अक्षरी पाच हजार हजार मात्र) व  सदर तक्रार अर्जाचा खर्च रूपये ३,०००/- (अक्षरी तीन हजार मात्र) द्यावा.

 

४. वर नमूद आदेशाची पुर्तता सामनेवाले यांनी आदेशाची प्रत मिळण्‍यापासून ३० दिवसाच्‍या आत करावी.

 

५. या आदेशाची प्रथम प्रत उभय पक्षकार यांना निःशुल्‍क देण्‍यात यावी.

 

६.  तक्रारदार यांना या प्रकरणाची ‘’ब’’ व ‘’क’’ फाईल परत  करावी.

 
 
[HON'BLE MR. V. C. Premchandani]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. C. V.Dongare]
Member
 
 
[HON'BLE MR. M. N. Dhake]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.