निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 15/02/2012
तक्रार नोदणी दिनांकः- 02/03/2012 तक्रार निकाल दिनांकः- 07/03/2014
कालावधी 02 वर्ष. 05 दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्या
सौ.अनिता ओस्तवाल.M.Sc. L.L.B.
---------------------------------------------------------------------------------------------------------
गंगासागर भ्र.साहेबराव धुतराज, अर्जदार
वय 40 वर्षे. व्यवसाय.घरकाम. अॅड.मा.तु.पारवे.
रा.पिंपरण ता.पूर्णा,जि.परभणी.
विरुध्द
1 व्यवस्थापक, गैरअर्जदार.
न्यु इंडिया इन्शूरन्स कंपनी लि. अॅड.जी.एच.दोडीया
अॅड शर्मा यांचा घरचा वरचा मजला,
नानल पेठ, परभणी.
2 व्यवस्थापक, (Deleted as per order passed below exc.No.26)
कबाल इन्शुरन्स सर्विस प्रा.लि.
विभागीय कार्यालय भास्करायण,
एच.डी.एफ.सी.होम बिल्डींग प्लॉट नं. 7 सेक्टर नं.1,
टाऊन सेंटर सिडको औरंगाबाद.
3 मा.कृषी अधिकारी साहेब पूर्णा,
तालूका पूर्णा,जि.परभणी.
______________________________________________________________________
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.पी.पी.निटूरकर.अध्यक्ष.)
गैरअर्जदाराने अर्जदाराचा शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत तिच्या मयत पतीचा विमादावा मंजूर करण्याचे रखडत ठेवुन अर्जदारास सेवेत त्रुटी दिल्याबद्दलची तक्रार आहे.
अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, दिनांक 25/01/2011 रोजी भाग्योदय क्रशरवर दगडाने भरलेला रॉपर तुटून अर्जदाराच्या पती नामे साहेबराव धुतराज यांच्या अंगावर पडल्याने अपघाती मृत्यू झाला व ते हयात असतांना मौजे पिंपरण शिवारातील गट नं. 277 व 299 मधील त्यांच्या मालकीची 1 हेक्टर 61 आर जमीन मालक या नात्याने कसून खात होते.
अर्जदाराचे म्हणने की, तिच्या पतीच्या मृत्यूनंतर शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत तिच्या मयत पतीचा विमादावा सर्व कागदपत्रांसह गैरअर्जदार क्रमांक 3 कडे दिनांक 11/08/2011 रोजी दाखल केला होता.
अर्जदाराचे म्हणने की,विमादावा दाखल केल्यापासून ते आजतागायत पर्यंत गैरअर्जदार क्रमांक 1 विमा कंपनीने अर्जदाराचा विमादावा मंजूर करुन आजपर्यंत रक्कम दिलेली नाही. अर्जदाराने सदर विमादाव्याबाबत 02/01/2011 पर्यंत वाट पाहीली व शेवटी 03/01/2011 रोजी वकीला मार्फत गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांना नोटीस पाठविली तरी देखील विमा कंपनीने अर्जदाराचे पैसे दिले नाहीत, व अर्जदारास सेवेत त्रुटी दिली म्हणून सदरची तक्रार दाखल करणे भाग पडले व मंचास विनंती केली आहे की, सदरची तक्रार मंजूर करुन गैरअर्जदारांना आदेश करावा की, त्याने शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत 1 लाख रु. 15 टक्के दराने अर्जदारास द्यावेत. व तसेच मानसिक त्रासापोटी 10,000/- व तक्रार अर्ज खर्चापोटी 10,000/- गैरअर्जदाराने अर्जदारास देण्याचा आदेश व्हावा.
तक्रार अर्जाच्या पुष्टयार्थ अर्जदाराने नि.क्रमांक 2 वर आपले शपथपत्र दाखल केले आहे.
अर्जदाराने पुराव्याबाबत नि.क्रमांक 5 वर 24 कागदपत्रे दाखल केली आहेत. ज्यामध्ये कृषी अधिकारी पूर्णाला केलेला अर्ज, क्लेमफॉर्म भाग -1, 2, व 4, 7/12, नमुना नं.8 अ, फेरफार, 6 क, अकस्मात मृत्यू रजि, पी.एम. रिपोर्ट, जबाब, मरणोत्तर पंचनामा, घटनास्थळ पंचनामा, रेशनकार्ड, ओळखपत्र, Death Certificate, खाते पुस्तक, मतदान कार्ड, प्रतीज्ञापत्र, वारसाचे प्रमाणपत्र, नोटीस, पोस्टपावती, पोचपावती, शासन परिपत्रक कागदपत्रे दाखल केली आहेत.
तक्रार अर्जास लेखी निवेदन सादर करण्यासाठी मंचातर्फे गैरअर्जदाराना नोटीसा काढण्यात आल्या.
गैरअर्जदार क्रमांक 1 वकिला मार्फत मंचासमोर हजर व नि.क्रमांक 13 वर आपला लेखी जबाब सादर केला. त्यात त्यांचे असे म्हणणे आहे की, सदरची तक्रार ही खोटी व बनावटी आहे. अर्जदार आमचा ग्राहक नाही व सदरची तक्रार खारीज होणे योग्य आहे.
अर्जदार आमचा ग्राहक नाही व त्याने हप्त्यापोटी रक्कम देखील विमा कंपनीकडे भरलेली नाही. विमा कंपनीने अर्जदारास कसल्याही प्रकारची सेवेत त्रुटी दिली नाही. अर्जदाराचा विमादावा आमच्याकडे आलेला नाही. त्यामुळे सेवात्रुटी देण्याचा प्रश्नच येत नाही. म्हणून विमा कंपनीने मंचास विनंती केली आहे की, सदरची तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी.
विमा कंपनीने लेखी जबाबाच्या पुष्टयार्थ नि.क्रमांक 18 वर आपले शपथपत्र दाखल केले आहे.
अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 2 यास प्रस्तुत प्रकरणातून वगळावे म्हणून नि.क्रमांक 26 वर अर्ज दाखल केला. त्याप्रमाणे सदरचा अर्ज मंजूर करुन गैरअर्जदार क्रमांक 2 याला सदर प्रकरणातून वगळण्यात आले.
गैरअर्जदार क्रमांक 3 यास मंचाची नोटीस तामील होवुनही मंचासमोर हजर नाहीत. त्यामुळे त्यांचे विरुध्द एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला.
दोन्ही बाजुंच्या कैफियतीवरुन निर्णयास उपस्थित होणारे मुद्दे खालील प्रमाणे आहेत.
मुद्दे. उत्तर.
1 गैरअर्जदार क्रमांक 1 विमा कंपनीने अर्जदारास सेवेत
त्रुटी दिली आहे काय ? नाही.
2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे.
मुद्दा क्रमांक 1.
अर्जदाराचे मयत पती साहेबराव धुतराज यास मौजे पिंपरण ता.पूर्णा येथील गट क्रमांक 277 व 299 मध्ये शेतजमीन होती व ते शेतकरी अपघात विमा योजनेचे लाभार्थी होते. ही बाब नि.क्रमांक 5/5 वर दाखल केलेल्या 7/12 उतारा व 5/6 वरील नमुना नं. 8 अ च्या उता-यावरुन सिध्द होते.
अर्जदाराच्या पतीचा दिनांक 25/01/2011 रोजी दगडाने भरलेला रॉपर तुटून त्यांच्या अंगावर पडला व अपघात होवुन त्यात त्यांचा मृत्यू झाला होता. ही बाब नि.क्रमांक 5/12 वरील मरणोत्तर पंचनाम्यावरुन व तसेच नि.क्रमांक 5/13 वरील घटनास्थळ पंचनाम्याच्या प्रतीवरुन सिध्द होते. तसेच सदरची बाब नि.क्रमांक 5/10 वर दाखल केलेल्या P. M. Report वरुन सिध्द होते.
अर्जदाराने शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत तिच्या मयत पतीचा अपघात विमादावा गैरअर्जदार क्रमांक 3 कडे दाखल केला होता. ही बाब नि.क्रमांक 5/1 वरील अर्जावरुन व नि.क्रमांक 5/2 वरील क्लेमफॉर्म भाग -1 वरुन सिध्द होते.
गैरअर्जदार क्रमांक 1 विमा कंपनीने नि.क्रमांक 34 वर विमा कंपनीने अर्जदारास दिनांक 09/12/2011 रोजी पाठविलेल्या पत्राची प्रत दाखल केली आहे. सदर पत्राचे अवलोकन केले असता स्पष्टपणे असे दिसते की, विमा कंपनीने अर्जदारास तिच्या मयत पतीच्या विमादाव्यापोटी दिनांक 08/12/2011 रोजीचा 1 लाख रुपयेचा चेक क्रमांक 407010 व्दारे रक्कम अदा केलेली आहे. याचाच अर्थ असा निघतो की, विमा कंपनीने 1 लाख रु. अर्जदारास दिलेले आहेत. कारण अर्जदाराने परत एकदा मंचासमोर येवुन सदर रक्कम मिळाली नाही, म्हणून Counter Affidavit दिले नाही.
विमा कंपनीने अर्जदारास सेवेत त्रुटी दिल्याचे कोठेही दिसत नाही. म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे नकारार्थी उत्तर देवुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज फेटाळण्यात येत आहे.
2 तक्रारीचा खर्च ज्याचा त्यांनी सोसावा.
3 आदेशाच्या प्रती पक्षकारांना मोफत पुरवाव्यात.
सौ.अनिता ओस्तवाल. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्या. मा.अध्यक्ष.