ग्राहक तक्रार क्र. 02/2012
अर्ज दाखल तारीख : 04/01/2012
अर्ज निकाल तारीख: 04/02/2014
कालावधी: 02 वर्षे 01 महिने 01 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1. जुबेर गणी पठाण,
वय-24 वर्षे, धंदा – व्यापार,
रा.तांदुळवाडी रोड, कळंब,
ता. कळंब, जि.उस्मानाबाद. ....तक्रारदार
वि रु ध्द
1. मॅनेजर, टाटा मोटार्स फायनान्स लि.,
पहिला मजला, मिलेनियम टॉवर्स,
मालेगांव रोड, तारोडा नाका, नांदेड-413605.
2. मॅनेजर,
टाटा मोटार्स फायनान्स लि.शाखा,
बाफना मोटार्स, एम.आय.डी.सी., उस्मानाबाद. ....विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा. श्रीमती ए.जी.सातपुते, अध्यक्षा.
२) मा.श्री.मुंकूद बी.सस्ते, सदस्य.
तक्रारदारातर्फे विधीज्ञ : श्री.एस.बी.तावरे,
विरुध्द पक्षकारा क्र.1 तर्फे विधीज्ञ : श्री.डी.आर.कुलकर्णी.
विरुध्द पक्षकारा क्र.2 तर्फे विधीज्ञ : स्वत:
निकालपत्र
मा. अध्यक्षा श्रीमती ए.जी.सातपुते, यांचे व्दारा :
1) तक्रारदाराच्या तक्रारी अर्जाचे थोडक्यात कथन पुढीलप्रमाणे :
तक्रारदार हे मौजे कळंब, ता. कळंब, जि. उस्मानाबाद येथील रहीवाशी असून उपजिवीके करीता पोल्ट्री फार्मचा व्यवसाय करतात. सदर व्यवसायासाठी बॉयल कोंबडी- कोंबडया वाहण्यासाठी टाटा पिकअप 207 डी.आय. ही गाडी बाफना मोटार्स प्रा. लि. यांच्याकडून ऑक्टो. 2007 मध्ये घेतली. विरुध्द पक्षकार कडून रु.3,46,000/- आर्थिक सहकार्य कर्ज स्वरुपात घेतले. सदर कर्जाच्या नियमाप्रमाणे दि.31/10/2007 ते दि.02/09/2011 पर्यंत सदर कर्ज व्याजासह रक्कम रु.5,11,400/- ही नियमानुसार हे कराराप्रमाणे ठरले त्यानुसार अर्जदाराने गाडी घेतली. सदर गाडीची पासींग होवून एम.एच.25/पी.0572 हा नंबर पडला. सदर गाडीचे कर्जाचे हप्ते अर्जदाराने वेळेच्या वेळी भरणा केलेले असून दि.27/11/2011 पुर्वी अर्जदाराने रक्कम रु.5,22,400/- ही विरुध्द पक्षकार यांच्याकडे जमा केली असतांना विरुध्द पक्षकार यांनी जाणीवपुर्वक अर्जदाराच्या कर्जाच्या खात्यामध्ये कर्जाच्या भरणा रक्कमेमध्ये निष्कारण व बेकायदेशीरपणे संमतीवीना रक्कम रु.39,123/- खर्चाची रक्कम म्हणुन वजा दर्शविली व तसेच कर्ज रक्कमेपैकी रु.28,700/- निष्कारण बाकी दर्शविली वास्तविक अर्जदाराने रु.10,000/- जास्तीची भरलेली आहे. दि.24/11/2011 रोजी अर्जदाराची सदरची गाडी ही बॉयलर कोंबडया रक्कम रु.1,25,000/- किंमतीच्या घेवून बारामती येथून कळंब येथे घेवून येत असतांना बारामती येथे विरुध्द पक्षकार यांनी बेकायदेशीररित्या सदर गाडी ताब्यात घेतली व दि.25/11/2011 रोजी संध्याकाळी सदरची गाडी सोडून दिली. अर्जदाराच्या बॉयलर कोंबडया या गाडीतच मरण पावल्या. त्यामुळे अर्जदाराचे रु.1,25,000/- चे ठोक नुकसान झाले आहे. थकबाकी नसतांना विरुध्द पक्षकार गाडीच्या आर.सी. बुकवर असलेली एच. पी. उतरवून देण्यास तयार नाही. तसेच गाडीचे मुळ कागदपत्रे अर्जदारास देण्यास तयार नाही. म्हणून अर्जदाराने दि.05/12/2012 रोजीची नोटीस रक्कम रु.28,700/- वसुली कामी वाहन जप्तीपूर्वी सुचना म्हणुन अर्जदारास पाठविली. म्हणून सदरचे प्रकरण दाखल करण्यात आले. करीता टाटा पिकअप 207 डी.आय. नं.एम.एच.25/पी0572 चे मुळ आर.सीबुक एन.ओ.सी. च्या पत्रासह मिळावी, अर्जदारास झालेल्या आर्थीक नुकसान भरपाईपोटी रु.1,50,000/- व्याजासह, झालेल्या मानसीक त्रासापोटी रु.25,000/- व या अर्जाच्या खर्चापोटी रु.5000/- विरुध्द पक्षकार यांच्याकडून देण्यात यावे अशी विनंती केली आहे.
तक्रारदार यांनी तक्रारीसोबत कर्जखाते उतारा, नोटीसची प्रत, जे.के. ट्रेडर्स नोंदणी दाखला, अर्जदारचे आडत दुकान नोंदणी दाखला, अर्जदाराचे चिकन सेंटर नोंदणी दाखला. ई. कागदपत्रे दाखल केली आहेत.
2) सदर प्रकरणात मंचामार्फत विरुध्द पक्षकार क्र.1 यांना नोटीस मिळाल्यानंतर त्यांनी दि.02/06/2013 रोजी आपले म्हणणे दाखल केले.
2) सदर प्रकरणात मंचामार्फत विरुध्द पक्षकार क्र.2 यांना नोटीस मिळाल्यानंतर त्यांनी दि.07/11/2013 रोजी आपले म्हणणे दाखल केले.
विमा कंपनी आणि आमचे अशील यांचेत मध्यस्थ म्हणुन काम करणे एव्हढेच मर्यादित काम आमची संस्था करते. माझ्या संस्थेने महाराष्ट्र शासनास कोणत्याही प्रकारची फी अथवा आर्थिक मदत मागितलेली नाही, लागू केलेली नाही अथवा स्वीकारलेली नाही. विरुध्द पक्षकार क्र.2 या संस्थेची भुमिका हि मर्यादित आहे आणि अशी मर्यादित सेवा माझ्या संस्थेने प्रदान केलेली आहे. त्यामुळे दाव्यापासून दावेदारास मिळणा-या अथवा न मिळणा-या आर्थिक लाभासाठी विरुध्द पक्षकार क्र.2 या संस्थेस जबाबदार धरण्यात येऊ शकत नाही. म्हणून विरुध्द पक्षकार क्र.2 या संस्थेस केलेल्या कोणत्याही दाव्यातून मुक्त करण्यात यावे असे नमूद केले आहे.
3) सदर प्रकरणात मंचामार्फत विरुध्द पक्षकार क्र.3 यांना नोटीस मिळाल्यानंतर त्यांनी दि.15/06/2013 रोजी आपले म्हणणे दाखल केले.
या कार्यालयाकडून जा.क्र./ताकृअ/सेअवी/क्र.1786 दि.03/10/2012 रोजी मा.जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी उस्मानाबाद सादर केला आहे. मा. जिल्हा अधिक्षक उस्मानाबाद या कार्यालयाने विमा कंपनीकडे त्यांच्या स्तरावरुन सादर केला.
4) तक्रारदाराची तक्रार, त्यांनी दाखल केलेली कागदपत्रे, गैरतक्रारदार यांचे म्हणणे, त्यांनी दाखल केलेली कागदपत्रे, उभयतांचा लेखी युक्तीवाद इत्यादींचा विचार करता आम्ही निष्कर्षासाठी खालील मुद्ये उपस्थित करीत आहोत. त्यांचे निष्कर्ष खाली दिलेल्या कारणांसाठी देतो.
मुद्ये निष्कर्ष
1) तक्रारदार विरुध्द पक्षकार यांचा ग्राहक होतो काय ? होय.
2) विरुध्द पक्षकारने अर्जदाराच्या सेवेत त्रुटी केली आहे का ? होय.
3) अर्जदार अनुतोषास पात्र आहे काय ? होय.
4) काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे.
निष्कर्षाचे विवेचन
5) मुद्या क्र.1 ते 3 चे उत्तर: सदर तक्रारीमध्ये विरुध्द पक्षकार क्र.1 ने त्या व्यक्तीच्या शेताचा 6 (ड) क्लेम फॉर्म मागितला व तो आला नाही म्हणुन सदरचा प्रस्ताव तसाच ठेवलेला आहे. सदर तक्रारीत या मंचाने सर्व कागदपत्रांची पाहणी केली असता 6 ड व मयत तुकाराम नरसाळे यांच्या नावे सात बारा असून त्यांच्या नावे 2 हे 22 आर अशी जमीन दिसून येते. तक्रारदारास विरुध्द पक्षकार यांच्याकडे क्लेम फार्म दाखल केला परंतु इन्शुरन्स कंपनीस अर्जदाराने सर्व कागदपत्रे पाठवूनही नेमकी कोणती कागदपत्रे तक्रारदाराकडे नाहीत म्हणुन तक्रारदाराच्या क्लेम फॉर्मवर काहीही विचार केलेला नाही असे स्पष्ट दिसून येत नाही. म्हणून सदर तक्रारीमध्ये आम्हा उभयतांच्या मते तक्रारदाराने दाखल केलेल्या कागदपत्रांवरून तक्रारदार सदर विमा दाव्यापोटी रक्कम रु.1,00,000/- मिळण्यास पात्र आहे. म्हणून मुद्या क्र. 1 ते 3 चे उत्तर आम्ही होय असे देतो.
आदेश
1) तक्रारदाराची तक्रार खालीलप्रमाणे मंजूर करण्यात येते.
2) विरुध्द पक्षकार क्र.1 यांनी अर्जदारास विम्या पोटी रु.1,00,000/- (रुपये एक लाख फक्त) द्यावे.
सदर रक्कम तक्रारदार यांना विरुध्द पक्षकार क्र.1 यांनी तक्रार अर्ज दाखल तारखेपासून द.सा.द.शे 9 टक्के दराने रक्कम देय होई पर्यंत द्यावी.
3) विरुध्द पक्षकार क्र.1 यांनी तक्रारदारास झालेल्या मानसिक त्रासापोटी रु.5,000/-(रुपये पाच हजार फक्त) द्यावे.
4) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्रीमती ए.जी.सातपुते) (श्री.मुकूंद.बी.सस्ते)
अध्यक्ष सदस्य
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.