ग्राहक तक्रार क्र. 173/2013
अर्ज दाखल तारीख : 04/12/2013
अर्ज निकाल तारीख: 04/09/2015
कालावधी: 01 वर्षे 09 महिने 01 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1. श्रीमती पाटील आशा व्यंकटराव,
वय – तांबरी विभाग, शिवनेरी चौक,
हॉटेल अंबाला जवळ, उस्मानाबाद. ....तक्रारदार
वि रु ध्द
1. शखा व्यवस्थापक,
टाटा मोटार्स फायनान्स लि.
राम नगर, पोलीस मुख्यालयासमोर, उस्मानाबाद.
2. शाखा व्यवस्थापक, टाटा मोटर्स फायनान्स लि.
मिलेनियम टॉवर, पहिला मजला,
भावसार चौक, मालेगाव रोड, तरोडा (खू.), नांदेड ता. जि. नांदेड.
3. शाखा व्यवस्थापक, टाटा मोटर्स फायनान्स लि.
सिटी हॉस्पीटलच्या बाजूला, जुना एम्लॅायमेंट चौक,
व्ही. आय.पी. रोड, सेालापूर. ..
4. व्यवस्थापक साहेब, बी.यु. भंडारी अॅटो लि. ए-3,
अभिमान श्री. सोसायटी पाषान रोड, पुणे.
5. प्रदिप माने, वसूली एजंट टाटा मोटर्स,
फायनान्स लि. रा. नळदुर्ग, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद. ..विरुध्द पक्षकार.
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2) मा.श्रीमती विद्युलता जे.दलभंजन. सदस्या.
3) मा.श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य.
तक्रारदारातर्फे विधीज्ञ : श्री.आर.ए.सुर्यवंशी.
विरुध्द पक्षकार क्र. 1 ते 3 तर्फे विधीज्ञ : श्री.आर.ए.पिलखाने.
विरुध्द पक्षकार क्र. 4 तर्फे : श्री. इनामदार.
विरुध्द पक्षकार क्र. 5 तर्फे : एकतर्फो.
न्यायनिर्णय
मा. सदस्या श्री.मुकुंद बी.सस्ते यांचे व्दारा :
तक्रारकर्ताच्या (तक) तक्रारी अर्जातील कथन थोडक्यात पुढीलप्रमाणे.
अ) 1) तक्ररदाराची विप ने व्यवहारात जास्तीची आकारलेली रक्कम व्याजासह वसूल होऊन मिळावी म्हणून त्याची तक्रार केलेली आहे. सदरची तक्रार संक्षिप्त स्वरुपात पुढीलप्रमाणे.
2) त्यांनी घेतलेली चार चाकी संदर्भात विप क्र. 1 कडे रु.1,13,145/- रक्कम अॅडव्हान्स भरली व उर्वरित रु.2,90,000/- विप कडुन कर्ज घेऊन बाफना मोटर्स लि. येथून कर्ज घेऊन कर्जाचा पहीला हप्ता रु.10,450/- विप कडे भरुन वाहन खरेदी केले. तक च्या तक्रारीनुसार विप क्र. 1 हा विप क्र.2, 3 यांचे स्थानीक विक्रेता, एजंट आहे. विप क्र.4 व 5 विप क्र.1, 2 व 3 चे कर्मचारी आहेत. तक्रारदाराने दि.23/01/2010 रोजी करार करुन 43 हप्ते पाडून 4 वर्षाचा अनुषंगाच्या कालावधीने करार केला असून प्रती महा रु.9,451/- असा हप्ता ठरला आहे. ठरल्याप्रमाणे 9,451/- चे 43 धनादेश विप क्र. 1 च्या हक्कात तक्रारदाराने दिलेले आहेत. तक चे म्हणण्यानुसार त्यांचे आज पर्यंत विप क्र. 1 यांचेकडे 43 कर्जाचे हप्याची रक्कम रु.4,06,393/- अधिक डिपॉझिट रु.1,13,145/- व अॅडव्हान्स हप्त्याची रक्कम रु.10,450/- अशी एकूण रु.5,19,538/- त्या वरील व्याजासह बे बाक केलेले असून तक कडे एकही हप्ता देणे बाकी नाही अशा स्वरुपाचे निवेदन तक ने केले आहे. वाहनाची खरेदीपोटी भरलेली रक्कम रु.1,13,145/- पैकी फक्त रु.97,397/- एवढी रक्कम टाटा मोटर्सकडे जमा दिसुन येते तसेच टाटा मोटर्सकडे दिलेले अॅडव्हान्स कर्जाचे हप्ते रु.10,050/- श्री काटे आर. पी. यांचेकडे तक ने दिलेले असूनही ती रक्कम आज पर्यंत खाते उता-यावर दिसुन येत नाही पण उर्वरीत रक्कम दिसून येते. तसेच भंडारी अॅटो लि. यांचेकडून गाडी नेते वेळी रक्कम रु.5,000/- भरलेली आहे. ती ही रक्क्म उता-यावर दिसुन येत नाही. अशी रक्कम रु.31,198/- तक्रारदाराचे खाते उता-यास नोंदविलेला नाही. तक्रारदार पुढे असे म्हणणे आहे की त्याचे बँकेतील खात्यावर धनादेश वठतील एवढी रक्कम असतांना कर्ज रक्कम रु.2,90,000/- पोटी रु.5,05,636/- भरणा केलेली आहे. तक्रारदाराने विप चे कार्यालयाकडे जाऊन बे बाकी प्रमाणपत्राची मागणी केली असता रु.38,000/- एवढी मागणी विप ने केली तसेच तक्रारदार विप क्र. 2 चे प्रतिनीधी प्रदिप माने यांनी घरी येऊन कोरा चेक घेऊन गेले व रु.9,850/- ची पावती दिली त्याचीही नोंद बॅलंन्स शीट वर केलेली नाही. त्यामुळे एकूण रक्कम रु.38,000/- अधिक रु.60,000/- अधिक रु.23,000/- अधिक रु.10,000/- व अर्जाचे खर्च रु.5,000/- व्याजासह मागणी केली आहे.
या वर विप ला नोटीस पाठविण्यात आले वि क्र. 1, 2 व 3 तर्फे लेखी म्हणणे दाखल केले आहे. विप क्र.5 विरुध्द एकतर्फा करण्यात आले. विप क्र.4 ला नोटीस मिळाल्यानंतर त्याने आपले म्हणणे सादर केले.
विप क्र.1, 2 व 3 चे लेखी म्हणण्याचा सारांश खालीलप्रमाणे.
तक्रारदार याने विप क्र. 2 कडून घेतलेल्या कर्जा वेळच्या वेळी परत फेड न केल्यामुळे विप चे वसूलीत अडवणूक निर्माण करण्याचे उद्देशाने प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे व ती फेटाळणे योग्य आहे. विप क्र.1, 2 व 3 पुढे असे म्हणणे आहे की तक्रारदाराने चुकीची आकडेवारी दाखल केलली असून तक्रारदाराने रु.3,09,000/- चे कर्ज घेतलेले असुन सुरवातीस रक्कम रु.78,478/- एवढीच रक्कम जमा केलेली आहे. तक्रारदाराने सांगीतलेली रा.पा. काटे नावाच्या व्यक्ति विप शी संबंधीत नाही. तो विप चा कर्मचारी देखील नाही. तसेच रक्कम रु.5,000/- जी तक ने विप क्र. 4 कडे भरली आहे असे म्हंटलेले आहे. त्या कर्जाच्या रक्कमेस काही संबंध नाही. तक ने रु.31,198/- रक्कम भरणा केली हा मजकूर खोटा चुकीचा असुन ही रक्कम तक ने कशा प्रकारे नमूद केली याचा खुलासा होत नाही व ही रक्कम कर्जाशी संबंधीत नाही त्या मुळेच खाते उता-यात नमुद नाही. याउलट तक ने घेतलेली रु.3,09,000/- त्या वरील व्याज रु.97,397/- अशी एकूण करारातील कर्ज रक्कम आहे. तक्रारदाराच्या तक्रारीतील प्रदिप माने या व्यक्तीचा विप चा कसलाही संबंध नाही. तक चा नोकर वा प्रतिनीधी होत नाही. विप स कसलाही प्रकारचा कोरा धनादेश मिळालेला नाही, रु.9,850/- ही रक्कमही मिळालेली नाही. या उलट वस्तुस्थिती अशी आहे की तक्रारदाराने कराराचे अटी व शर्तीचा भंग करुन सदरचे कर्ज हे थकीत झाले आहे. त्यामुळे दि.28/01/2014 रोजी विप कडे तक चे एकूण येणे रक्कम रु.39,145/- एवढी बाकी आहे व सदरची रक्क्म टाळण्याचे दृष्टीने सदरची तक्रार दाखल केलेली आहे. तक ने विप राजेंद्र काटे, प्रदिप माने, भंडारी अॅटो लि. अश्या व्यक्तिशी केली. या व्यवहारचा विप शी कोणतेही संबंध नाही त्यामुळे या विप स अश्या व्यवहाराशी कसलाही संबंध नाही. त्यामुळे विप कसल्याही प्रकारे जबाबदार राहत नाही. तक ने विप क्र. 1, 2 व 3 शी कर्जा संदर्भात व्यवहार करणे आवश्यक होते. अनुचीत व्यवहार करुन विप ने तक कडून रुक्कम वसूल केली नसल्याने तकवर रु.10,000/- चा दंड खर्च वसूल करुन विप स देण्यात यावा असे म्हणणे दिले आहे.
तक ने दि.08/08/2014 रोजी मागणी रक्कम रु.38,000/- वर व्याज रु.60,000/- अशी दुरुस्ती करण्यासाठी परवानगी मागीतली असता सदरचा दुरुस्ती अर्जावर विप चे म्हणणे मागीतले व सदरचे म्हणणे दि.16/09/2014 रोजी विप ने दिले व दि.16/09/2014 रोजी सदरचा दुरुस्ती अर्ज ना मंजूर करण्यात आलेला आहे. त्यानंतर दुरुस्ती अर्ज देऊन विप क्र.4 व 5 हे पक्ष झाले पैकी विप क्र. 5 विरुध्द एकतर्फा तर विप क्र.4 चे म्हणणे संक्षीप्तपणे असे की,
त्याचा या तक्रारीशी काही संबंध नाही त्यामुळे miss joinder च्या मुद्दायावर तक्रार खारीज करण्यात यावी. त्याच पुढे असे म्हणणे आहे की रु.5,000/- भरुन गाडी बुक केली हे खरे आहे. गाडीची संपुर्ण किंमत रु.3,72,408/- एवढी आहे पैकी रु.5,000/- गर्ज अॅटोव्हीलकडे भरली व नंतर रु.67,470/- त्याच्याकडे स्वत:कडे म्हणजे विप क्र. 4 कडे रोख भरली व टाटा फायनान्स ने रु.3,05,000/- फायनान्स करुन सर्व रकमेची पुर्तता केली त्यामुळे त्याच्या हद्दीपावेतो तशी कोणतीच तक्रार नाही.
निष्कर्षासाठी मुदयाबाबत विचार करता उपलब्ध कागदपत्राची पडताळणी केली असता खालील बाबी दिसून आल्या.
विप क्र.1, 2 व 3 चे म्हणणे व विप क्र. 4 चे म्हणणे पाहता दोघांच्या कर्ज रकमेत फरक आहे हे खरे परंतु हा फरक रु.4,000/- चा आहे. कर्ज दाते विप क्र. 1, 2 व 3 ने finanace amount रु.3,09,000/- एवढी दाखवली आहे. तक्रारीत कुठेही तक्रारदाराने गाडीचे कोटेशन अथवा इन्हाईस बिल दाखल केलेले नाही. तयामुळे गाडीची नक्की खरेदी किती रकमेस झाली तसेच सदरचा फायनान्सचा व्यवहार विप क्र. 1 2 व 3 पैकी नककी कोणशी झाला तसेच सदर कर्ज व्यवहाराचे करारपत्र तक ने अथवा विप ने कोणीही रेकॉर्डवर दाखल केले नाही. फकत सदर कर्ज व्यवहाराच्या अकाऊंट स्टेस्टेमेन्टस रेकॉर्डवर असल्याने विप ने दाखल केलेल्या म्हणणे व युक्तिवाद तक्रारदाराची तक्रार या शिवाय दाखल केलेल्या पावत्या एवढयाच संदर्भाने विचार करुन खालील मुददे निष्कर्षासाठी निघतात.
मुद्दे उत्तरे
1) तक्रारदार हा विप यांचा ग्राहक होतो काय ? विप क्र.1, 2 व 3 यांचे पुरते होय.
2) विप ने सेवेत त्रुटी अथवा अनुचित
व्यापार पध्दतीचा केला काय ? अंशत: होय.
3) काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे.
कारणमिमांसा
मुद्दा क्र. 1 ते 3:
तक्रारदाराने दाखल केलेली तक्रार विप क्र.1, 2 व 3 यांचेकडून घेतलेले कर्जच्या संदर्भात आहे. तक्रारदाराने बाफना मोटर्स मोटर्स लि. यांचेकडे रु.1,13,145/- काटे यांच्याकडे भरुन व उर्वरीत रक्कम कर्जाच्या स्वरुपात घेऊन बाफना मोटर्स लातून यांच्याकडे पहिला हप्ता 10,450/- भरुन लातूर शोरुम मधून गाडी घेतल्याचे म्हणणे आहे. सदरचा करार हा दि.23/01/2010 रोजी झालेले असून तो विप क्र.1, 2 व 3 यांचे पैकी कोणाशी झाले याबाबत स्पष्टपणे नमूद केलेले नाही. तसेच सदरच्या कराराच्या प्रती या न्यायमंचात दाखल केलेल्या नाही. तथापि अभिलेखावर दाखल केलेली कागदपत्रामध्ये टाटा मोटर फायनान्स लि. भरण्याचे अकौंट स्टेटमेंट वरील कॉन्ट्रॅक्ट क्रमांक 50000493246 असा आहे यांच नावाचे अनुषंगाने त्यांचा सदरचा करार विप क्र. 2 शी केलेला आहे असे वाटते / दिसते. सदरच्या स्टेटमेंटचे पाहणी केली असता हे खरे आहे की दि.23/01/2010 रोजी सदरचा करार झालेला असून तक चे वाहनासाठी सदरचा करार झालेला आहे. रु.12006/- एवढी रककम ही डॉक्यूमेंटेशन, स्टॅम्प, बँक चार्जेस, रिटर्न चार्जेस, व कलेक्शन एजंन्टस चार्जेस, यांचे नावाने वसूल केलेले दिसुन आले. सदरची रक्कम तक चे कर्ज खात्यावर टाकलेली दिसुन येते व सदरची रक्कम त्यांच्याकडून जमा दाखवून त्यांच्याकडून काहीही येणे नाही अशा स्वरुपात स्टेटमेंट दिलेले आहे. या बाबत संपूर्ण स्टेटमेंटचे पाहणी केली असता काही रक्कम रोख व काही रक्कम इंस्ट्रूमेंट व्दारे घेतली त्या नंतर तक ने दि.22/06/2013 चे स्टेटमेंट ची पुर्ण पाहणी केली असता दि.14/08/2012 रोजी दि.13/10/2012 रोजी दि.15/11/2012, दि.09/01/2013, दि.15/02/2013, दि.10/04/2013, दि.15/05,2013 रु.9,451/- पेक्षा कमी जास्त स्वरुपात भरल्याचे दिसुन येते. या व्यतरिक्त इतर हप्ते नियमीतपणे भरल्याचे आढळून येते. त्यानुसार त्या दिवशी तक कडे करंट ओव्हर डयू म्हणजे चालू येणे बाकी रु.35,407/- दिसुन येतो. या रक्कमेबाबत तक ची तक्रारीमध्ये कोठेही उल्लेख नाही.
चेकची रिसीप्ट रु.3,05,000/- असल्याने कर्ज रक्कम ही रु.3,05,000/- एवढीच होती हे दिसुन येते. तथापि कर्ज खात्यावर कर्जाची रक्कम रु.3,09,000/- एवढी दिसते.ती रक्कम कदाचित रु.3,000/- डॉक्यूमेंट चार्जेस व रु.1,000/- स्टॅम्प चार्जेस अशा स्वरुपात कर्ज खात्यावर टाकलेले असावेत.
विप ने तक कडील धनादेश क्लिंअरींगला पाठवले व बाऊन्स झाले तर तशी नोंद खात्यावर नाही वर उल्लेख केलेल्या तारखास रकमा कमी / जास्त जमा करण्यात आल्या आहेत. तथापि 1 ते 30 दिवस म्हणजे 1 महिन्याच्या पुढे कुठेही विप ने उशीर केलेला दिसुन येत नाही. तथापि विप ने ODC चार्जेस हे अनुचित पध्दतीने म्हणजे महिना पाच टक्के प्रती महीना एवढा दर महिन्याच्या आतील डिले पेमेंटसाठी लावलेला दिसुन येतो. रक्कम रु.5,155/- एवढे तक कडून ओडीसी म्हणून वसूल केले आहेत त्या व्यतरीक्त रु.3,000/- डॉक्यूमेट व 1 रीकव्हरी स्टॅम्प च्या स्वरुपात रु.4,000/- असे एकूण रु.9,155/- वसूल केले आहेत हे स्पष्ट दिसुन येते त्यामुळे दि.28/01/2014 रोजीचे स्टेटमेंटस मधून अतिरिक्त वसुल केलेली रक्कम रु.9,155/- वजा करुन उर्वरीत रक्कम तक ने विप कडे भरावी म्हणजेच दि.28/01/2014 पर्यंत थकीत असलेल्या 39,145/- एवढया रकमेपैकी रु.9,155/- एवढी रककम वजा करावी त्यादिवशी रु.29,990/- तक्रारदाराकडे येणे बाकी दिसते. या स्टेटमेंट व्यतरीक्त तक ने जर पुढील हप्ते दि.28/01/2014 नंतर भरलेले असतील तर या रकमेतून ती रक्कम वजा करण्यात यावी व उर्वरीत रकमेचा हिशोब येणे देण्याच्या स्वरुपात करावा व विप ने हिशोबा अंती त्वरीत बेबाकी प्रमाणपत्र द्यावे.
आदेश
1) तक ची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
2) दि.28/01/2014 रोजी तक कडे विप ची असलेल्या बाकी मधून अतिरिक्त वसुल केलेली रक्कम रु.9,155/- वजा करुन उर्वरीत रक्कम तक ने विप कडे भरावी म्हणजेच दि.28/01/2014 पर्यंत थकीत असलेल्या रु.39,145/- एवढया रकमेपैकी रु.9,155/- एवढी रककम वजा करावी त्यादिवशी रु.29,990/- तक्रारदाराकडे येणे बाकी दिसते. या स्टेटमेंट व्यतरीक्त तक ने जर पुढील हप्ते दि.28/01/2014 नंतर भरलेले असतील तर या रकमेतून ती रक्कम वजा करण्यात यावी व उर्वरीत रकमेचा हिशोब येणे देण्याच्या स्वरुपात करावा व विप ने हिशोबा अंती त्वरीत बेबाकी प्रमाणपत्र द्यावे.
3) उपरोक्त आदेशाची अंमलबजावणी विरुध्द पक्ष यांनी आदेश दिल्या तारखेपासुन तीस दिवसात करुन विरुध्द पक्षकार यांनी तसा अहवाल 45 दिवसात मा.मंचासमोर सादर करावा, सदरकामी उभय पक्षकारांनी मंचात हजर रहावे. सदर आदेशाची पुर्तता विरुध्द पक्षकार यांनी न केल्यास तक्रारदाराने तसा अर्ज द्यावा.
4) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
अध्यक्ष
(श्री.मुकूंद.बी.सस्ते) (सौ.विदयुलता जे.दलभंजन)
सदस्य सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद