Maharashtra

Nagpur

CC/386/2021

KARODILAL A AHUJA (AUTHORITY HOLDER) ON BEHALF OF AARTI K AHUJA - Complainant(s)

Versus

MANAGER, STATE BANK OF INDIA - Opp.Party(s)

SELF

11 Nov 2024

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/386/2021
( Date of Filing : 26 Jul 2021 )
 
1. KARODILAL A AHUJA (AUTHORITY HOLDER) ON BEHALF OF AARTI K AHUJA
S 201, KKH COMPLEX, ABOVE CANARA BANK, PLOT NO.7, NEAR POLICE STATION, NARA ROAD, JARIPATKA, NAGPUR-440014
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. MANAGER, STATE BANK OF INDIA
WARDHMAN NAGAR, NAGPUR-440008
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SACHIN Y. SHIMPI PRESIDENT
 HON'BLE MR. B.B. CHAUDHARI MEMBER
 
PRESENT:SELF, Advocate for the Complainant 1
 ADV. ANITA BHOJWANI, Advocate for the Opp. Party 1
Dated : 11 Nov 2024
Final Order / Judgement

आदेश

 मा. अध्यक्ष श्री. सचिन शिंपी यांचे आदेशान्वये.

  1. तक्रारदाराने सदर तक्रार ग्राहक सरंक्षण कायदा 2019 चे कलम 35 अतर्गत दाखल केली आहे. 
  2. तक्रारदार करोडीलाल आहूजा यांनी आरती आहुजा यांचे वतीने सदर तक्रार दाखल केली असुन आरती आहूजा यांचे वि.प.यांचे बॅंकेत बचत खाते होते व त्या अनुषंगाने आरती आहुजा यांनी वि.प.यांचेकडुन सोने तारण कर्ज घेतले होते. वि.प. यांनी तक्रारदाराचे सोने तारण ठेवतांना सोन्याचे योग्य मूल्यांकन केले नव्हते व ते कर्ज थकीत झाल्यानंतर वि.प.यांनी त्या सोन्याचा  लिलाव करण्‍याचे अनुषंगाने तक्रारदार यांना नोटीस पाठविल्याने तक्रारदार यांनी ही तक्रार अंतरिम अर्जासह दाखल करुन तक्रारदाराचे सोने लिलावात विकु नये तसेच योग्य प्रकारे कर्जाबाबत अॅग्रीमेंट करावे व तक्रारदाराने मागीतलेली माहिती वि.प. यांनी द्यावी अशी मागणी केली होती. त्यानंतर दिनांक 26.7.2021 रोजी वि.प. यांनी तक्रारीत नमुद सोन्याचा लिलाव करुन नये असा अंतरिम आदेश या आयोगाव्दारे पारित करण्‍यात आला होता.
  3. वि.प. यांनी बॅंकेच्या अटी व शर्ती अभिलेखावर दाखल करुन असा बचाव केला की,  बॅंकेच्या नियमाप्रमाणे सोन्याचे मुल्यांकन (Valuation ) करुन कर्ज देण्‍यात आले होते.  त्यानंतर दिनांक 31.3.2022 रोजी तक्रारदाराने संपूर्ण सोने तारण कर्जाची रक्कम भरुन आरती आहूजा यांचे कर्ज खाते बंद केले असुन त्याबाबतचे स्टेटमेंट देखिल दिनांक 12.4.2022 चे पत्रासोबत अभिलेखावर दाखल केले आहे.
  4. तक्रारदाराची तक्रारीतील मागणी विचारात घेता तक्रारदाराचे सोने लिलाव विकु नये तसेच योग्य प्रकारे कर्जाचे अॅग्रीमेंट करावे व तक्रारदाराने मागीतलेली माहिती वि.प. यांनी द्यावी अशी मागणी तक्रारीत केली होती. परंतु आता तक्रारदाराने सोने तारण कर्जाची संपूर्ण रक्कम वि.प. कडे भरल्याने तक्रारदाराचे तक्रारीत केलेल्या मागण्‍या या निरर्थक ठरतात. तसेच तक्रारदाराने कर्ज खाते बंद केल्यानंतर इतर काही मागण्‍या असल्यास तक्रारदाराने त्या अतिरिक्त अर्जाव्दारे केलेल्या नाही. परिणामी तक्रारदाराची तक्रार तक्रारदाराने स्वतःने  सोने तारण कर्जाची संपूर्ण रक्कम वि.प. कडे भरणा करुन कर्ज खाते बंद केल्याने तक्रार निरर्थक झाल्याने (in fructuous) निष्‍फळ ठरते. सबब खालील प्रमाणे आदेश पारित करण्‍यात येतो.

अंतीम आदेश

  1. तक्रारदाराने स्वतः सोने तारण कर्जाची संपूर्ण रक्कम वि.प. कडे भरणा करुन कर्ज खाते बंद केल्याने तक्रारदाराचे तक्रारीत तथ्‍य नसलयाने तक्रार खारीज करण्‍यात येते.

खर्चाबद्दल कोणतेही आदेश नाही. 

 
 
[HON'BLE MR. SACHIN Y. SHIMPI]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MR. B.B. CHAUDHARI]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.