(मंचाचे निर्णयान्वये, श्री अनिल एन.कांबळे, अध्यक्ष(प्रभारी))
(पारीत दिनांक : 29 जानेवारी 2011)
1. अर्जदाराने सदरची तक्रार गै.अ.चे विरुध्द दाखल करुन चेकची रक्कम, मानसीक, शारीरीक ञासापोटी नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च गै.अ.कडून मिळवून देण्यात यावे अशी विनंती केली आहे. अर्जदाराचा गै.अ.च्या बँकेत खाता क्र.11358129663 असा खाता असून, त्या खात्यात दि.2.3.10 रोजी एच.डी.एफ.सी बँकेचा चेक क्र.123500 जमा केला. परंतु, त्या चेकची रक्कम अर्जदाराच्या खात्यात जमा करण्यात आली नाही. अर्जदार दोन-तीनदा बँकेत जावून चौकशी केली असता, गै.अ.यांनी टाळाटाळ केली. चेक रक्कम खात्यात जमा केली नाही. त्यामुळे शारीरीक, मानसीक ञास झाला असल्याने गै.अ.यांनी एच.डी.एफ.सी बँकेचा चेक
... 2 ... (ग्रा.त.क्र.35/2010)
क्र.123500 ची रक्कम खात्यात जमा करण्याचा आदेश पारीत करण्यात यावा. शारीरीक, मानसीक ञासापोटी रुपये 5000, तक्रार खर्चापोटी रुपये 1000 गै.अ.कडून मिळवून देण्यात यावे अशी मागणी केली आहे.
2. अर्जदाराने नि.3 नुसार 2 दस्ताऐवज दाखल केले. ज्यात चेक जमा केल्याची काऊंटर स्लीप, गै.अ.बँकेला दिलेल्या पञाची प्रत जोडली आहे. तक्रार नोंदणी करुन गै.अ. नोटीस काढण्यात आले. गैरअर्जदारास नोटीस तामील झाल्याची पोहचपावती नि.6 नुसार प्राप्त. गै.अ.तर्फे लेखी पञ पोष्टाव्दारे प्राप्त तो नि.7 वर रेकॉर्डवर दाखल आहे. अर्जदाराने तक्रारीचे कथना पृष्ठयर्थ नि.9 नुसार शपथपञ दाखल केला आहे.
3. गै.अ.यांनी पोष्टाव्दारे विना शपथपञावर पाठविलेल्या अर्जदाराच्या तक्रारीचे उत्तरात चेक क्र.123500 चे रुपये 1500 ग्राहकाचे खाता क्र. 11358129663 व्याजानिशी रुपये 1545 जमा करण्यात आले. ग्राहकांस विनंती करुनही चेक कोणत्या पक्षात दिलेला आहे याची माहिती मागविण्यात आली. परंतु, संबंधीत ग्राहकांनी सहकार्य केले असते तर चेक जारी करणा-याकडून दूसरा चेक मागविण्यात आला असता, परंतु ग्राहकाने सहकार्य केले नाही, यात आमंचा काही दोष नाही. पैसे जमा झाल्याची सुचना पञ घेण्यास ग्राहकाचा नकार, असे पोष्टाव्दारे प्राप्त झालेलया पञात नमूद केले आहे.
अर्जदाराने, दाखल केलेल्या तक्रारीतील मजकूर, शपथपञ आणि उपलब्ध दस्ताऐवजावरुन खालील कारणे व निष्कर्ष निघतात.
// कारणे व निष्कर्ष //
4. अर्जदार, गै.अ. बँकेचा खातेदार आहे यात वाद नाही. तसेच, अर्जदाराने गै.अ. बँकेत खाता क्र. 11358129663 मध्ये दि.2.3.10 ला एच.डी.एफ.सी. स्टेट बँक शाखा वडसाचा चेक क्र.123500 रुपये 1500/- दि.1.3.10 हा चेक कलेक्शन करीता भारतीय स्टेट बँक, शाख वडसा यांचेकडे सादर केला होता. त्याची कांऊटर स्लीप नि.3 अ-1 वर अर्जदाराने दाखल केली आहे. गै.अ.ने पोष्टाव्दारे विनाशपथपञावर सादर केलेल्या लेखी उत्तरातही चेकचे रुपये 1545 खात्यात जमा करण्यात आले. परंतु, ते कोणत्या तारखेला खात्यात जमा केले
... 3 ... (ग्रा.त.क्र.35/2010)
याची कुठलीही तारीख सदर पञात नमूद केली नाही. वास्तवीक, कायद्याच्या नजरेत गै.अ.यांनी शपथपञावर तक्रारीचे उत्तर सादर केलेले नाही. परंतु, हे सिध्द होतो की, अर्जदाराने, गै.अ.कडे कलेक्शन करीता जमा केलेल्या चेकची रक्कम दि.2.3.10 पासून तक्रार दाखल करेपर्यंत म्हणजेच 23.9.10 पर्यंत जमा झाली नाही. वास्तवीक, भारतीय रिझर्व बँकेने दिलेल्या दिशानिर्देशानुसार चेकची रक्कम संबधीत ग्राहकाच्या खात्यात लवकरात लवकर जमा करावयास पाहिजे होते. जर संबंधीत बँकेने चेकची रक्कम जमा करण्यास विलंब केल्यास ती त्यांचे सेवेतील न्युनता आहे, या सदरात मोडतो.
5. प्रस्तुत प्रकरणातही अर्जदाराने 2.3.10 ला चेक जमा केल्यानंतर त्याची रक्कम अर्जदाराचे खात्यात जमा करण्यात आली नाही व शेवटी अर्जदारास तक्रार दाखल करावी लागली. गै.अ.स तक्रारीची नोटीस गेल्यानंतर जमा करण्यात आलेली आहे. गै.अ.ने केंव्हा रक्कम जमा केली हे पञात नमूद केले नाही. जेंव्हा की, अर्जदाराने 14.8.10 ला तक्रार दाखल करण्याचे पूर्वी खात्यात रक्कम जमा करण्याची विनंती केली तरीही चेकची रक्कम खात्यात जमा केली नाही. अर्जदाराने नि.9 नुसार दाखल केलेल्या शपथपञात गै.अ.यांनी 8.10.10 ला रुपये 1545/- जमा केले. यावरुन, गै.अ.यांनी अर्जदाराचे खात्यात 7 ऑक्टोंबर 2010 पर्यंत रक्कम जमा केली नाही, ही गै.अ.चे सेवेतील न्युनता आहे, या निष्कर्षाप्रत हे न्यायमंच आले आहे. गै.अ.यांनी ञुटी युक्त सेवा देवून अर्जदारास आर्थिक लाभापासून वंचीत केले, चेकची रक्कम जमा करण्यास अक्षम्य विलंब केला ही गै.अ.च्या सेवेतील न्युनता असून गंभीर निष्काळजीपणा आहे, असे या न्यायमंचाचे ठाम मत आहे. मा.राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोग, नवी दिल्ली यांनी एका प्रकरणात आपले मत दिले आहे, त्यातील बाब या प्रकरणाला तंतोतंत लागू पडतो. त्यातील महत्वाचा भाग खालील प्रमाणे.
Banking – Collection of cheques – Consumer Protection Act, 1986 – Deficiency in Service – Section 2(1)(g) – Section 2(1)(o) – What can be the appropriate time frame for crediting the cheques sent to the banks for collection ? – Question considered on the basis of the policies framed by the various banks and the directions in this connection issued by the Reserve Bank of India to them – So Considered, directed that for the local cheques credit and debit be given on the same day or at the most next day – For collection of outstation cheques the maximum period be 7/10/14 days and for any delay beyond it, the payee of the cheques be paid interest at the fixed deposit rate or at a specified rate – Reserve Bank of India made responsible for monitoring the directions given to the banks.
Atul Nanda and another –Vs.- Reserve Bank of India and others
2008 CTJ 955 (CP) (NCDRC)
... 4 ... (ग्रा.त.क्र.35/2010)
6. गै.अ.यांनी पोष्टाव्दारे पाठविलेल्या पञात असे म्हटले आहे की, ग्राहकाने सहकार्य केले नाही. परंतु, गै.अ.नी अर्जदारास चेकबाबत माहिती मागीतली, सहकार्य करण्याबाबत कळविले या बाबत कुठला पञव्यवहार केला, याबाबतचा पुरावा दाखल केला नाही. उलट, पोष्टाव्दारे पाठविलेल्या पञात कोणत्या तारखेला रक्कम जमा केली याचा उल्लेख केला नाहीच नाही, आणि तो शपथपञावर नसल्यामुळे लेखी उत्तर म्हणून ग्राह्य धरण्यास पाञ नाही.
7. गैरअर्जदारास मंचाची नोटीस प्राप्त होऊनही हजर झाला नाही, त्यामुळे तक्रार गुणदोषावर निकाली काढण्यात यावे, असा आदेश नि.1 वर पारीत करण्यात आला. अर्जदाराने आपले सुनावणीत सांगितले की, गै.अ. बँक आजही ञास देत आहे. गै.अ. मंचाची नोटीस प्राप्त होऊनही आपले म्हणणे सादर केले नाही. तसेच, अर्जदारास ञास देत असल्याचे अर्जदाराने सांगितले. गै.अ.बँकेची वागणूक ही हुकमीपणाची (Arbitrary) असून सेवेतील न्युनता आहे. गै.अ.च्या बेजबाबदारपणाच्या वर्तणूकीमुळे अर्जदारास आर्थिक तसेच मानसीक, शारीरीक ञास सहन करावा लागला आणि जेंव्हा अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केली तेंव्हा गै.अ.यांनी व्याजासह अर्जदाराच्या खात्यात रक्कम जमा केली. अर्जदारास गै.अ.च्या बेजबाबदारपणाच्या वर्तणूकीमुळे मानसीक, शारीरीक ञास सहन करावा लागला, तसेच जी रक्कम मार्च 2010 मध्ये वापरास मिळावयास पाहिजे होती, ती रक्कम गै.अ.च्या ञुटीयुक्ती सेवेमुळे ऑक्टोंबर 2010 पर्यंत वंचीत राहावे लागले. त्यामुळे, गै.अ. मानसीक, शारीरीक ञासापोटी, आर्थिक नुकसान भरपाई देण्यास जबाबदार आहे, या निष्कर्षाप्रत हे न्यायमंच आले आहे.
8. अर्जदाराने, तक्रारीत चेकची रक्कम रुपये 1500 अर्जदाराचे खात्यात गै.अ.ने जमा करावे अशी मागणी केली आहे. वर उल्लेखीत न्यायनिवाडयात दिलेल्या मतानुसार बँकेने चेकची रक्कम व्याजासह बचत खात्यावर देय असलेल्या व्याजासह जमा करावे असे निर्देश दिलेले आहे. प्रस्तुत प्रकरणात गै.अ.यांनी 7 महिन्यानंतर व्याजासह दि.8.10.10 ला तक्रार दाखल केल्यानंतर 1545 रुपये जमा केले आहेत, असे अर्जदाराने शपथपञात नमूद केले आहे, त्यामुळे ही मागणी मंजूर करण्यास पाञ नाही. परंतु, अर्जदार इतर केलेली मागणी मंजूर करण्यास पाञ आहे, या निष्कर्षाप्रत हे न्यायमंच आले आहे.
... 5 ... (ग्रा.त.क्र.35/2010)
वरील कारणे व निष्कर्षावरुन अर्जदाराची तक्रार मंजूर करण्यास पाञ या निर्णयाप्रत हे न्यायमंच आले असल्याने तक्रार मंजूर करुन, खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे.
// अंतिम आंदेश //
(1) गैरअर्जदाराने, अर्जदारास मानसीक, शारीरीक ञासापोटी व आर्थिक नुकसानीपोटी रुपये 5000/- व तक्रार खर्चापोटी रुपये 1000/- आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसांचे आंत द्यावे.
(2) उभय पक्षांना आदेशाची प्रत देण्यात यावी.
गडचिरोली.
दिनांक :- 29/1/2011.