Maharashtra

Nanded

CC/10/293

Pravin Ashokrao Panchal - Complainant(s)

Versus

Manager, State Bank of India Nanded - Opp.Party(s)

P.D.Ambekar

25 Feb 2011

ORDER


District Consumer Reddressal Forum , NandedDistrict Consumer Forum , Visava Nagar, V.I.P. Road, Nanded
Complaint Case No. CC/10/293
1. Pravin Ashokrao PanchalShyam Nagar, NandedNandedMaharashtra ...........Appellant(s)

Versus.
1. Manager, State Bank of India NandedYeshwant Nagar, NandedNandedMaharashtra ...........Respondent(s)



BEFORE:
HON'BLE President B.T.Narwade ,PRESIDENTHON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh ,MEMBER
PRESENT :

Dated : 25 Feb 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच,नांदेड.
 
प्रकरण क्रमांक :- 2010/293
 
                    प्रकरण दाखल तारीख -    07/12/2010     
                    प्रकरण निकाल तारीख     25/02/2011
 
समक्ष  मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील,           - अध्‍यक्ष
        मा.श्रीमती.सुवर्णा देशमुख.           -   सदस्‍या
 
श्री.प्रवीण पि.अशोकराव पांचाळ,
वय वर्षे 22, धंदा शिक्षण
रा.श्‍यामनगर ता.जि.नांदेड.                                      अर्जदार.
      विरुध्
1.   व्‍यवस्‍थापक,
 स्‍टेट बँक ऑफ इंडिया
      शाखा यशवंत नगर, नांदेड.                      गैरअर्जदार
2.   सहायक व्‍यवस्‍थापक,
      डेव्‍हलपमेंट क्रेडीट बँक,
      शाखा डॉक्‍टर लेन, नांदेड
 
अर्जदारा तर्फे वकील        -   अड.पी.डी.अंबेकर
गैरअर्जदार क्र.1 तर्फे वकील   -       अड.जि.एस. पांडे.
गैरअर्जदार क्र.2 तर्फे वकील -   अड. ए.व्‍ही.चौधरी
 
                                                निकालपत्र
 (द्वारा- मा.श्री.बी.टी.नरवाडे,पाटील, अध्‍यक्ष )
 
1.   अर्जदाराची तक्रार थोडक्‍यात अशी की, अर्जदार हा गैरअर्जदार क्र. 1 यांच्‍या बँकेचा ग्राहक असून अर्जदाराचे गैरअर्जदार यांच्‍या बँकेत खाते आहे. ज्‍याचा खाते क्र.20020248972 असा आहे. अर्जदाराचा एटीएमचा नंबर 6220180192200065816 असा आहे. अर्जदाराने दि.15/02/2010 रोजी अर्जदाराचे वडीलांना दवाखान्‍यात दाखविण्‍यासाठी व तपासणीसाठी रु.15,000/- ची गरज होती पण रु.10,000/- काढण्‍याचा प्रयत्‍न केला व एटीएमच्‍या त्रुटीच्‍या सेवेमुळे अर्जदारास रु.10,000/- न मिळताच मिळाल्‍याची पावती मिळाली परंतु सदरील रक्‍कम न मिळता खात्‍यातुन रु.10,000/- कपात झाले. अर्जदारास पैशाची नितांत गरज होती म्‍हणून यशवंत नगर येथील गैरअर्जदार क्र.1 च्‍या बँकेच्‍या एटीएम येथे जाऊन गैरअर्जदार क्र. 1 यांच्‍या एटीएम मधून रु.10,000/- काढली व आपली गरज भागवीली. अर्जदाराने दि.18/02/2010 रोजी गैरअर्जदार क्र. 1 यांच्‍या शाखा अधिकारी यांना लेखी तक्रार दिली परत दि.09/06/2010सर्व प्रकारबद्यल बॅक ऑफ इंडिया शाखा नवा मोंढा येथे लेखी स्‍वरुपात तक्रार नोदविली.
 
2.   अर्जदाराने ज्‍यावेळेस गैरअर्जदार क्र. 2 यांच्‍या भाग्‍यनगर येथील एटीएम मशीनमधून पैस काढण्‍याचा प्रयत्‍न केला परंतु सदरील पैसे न मिळताच सदरील रक्‍कम अर्जदाराच्‍या खात्‍यातुन कपात झाली, त्‍यासंबंधीची चलछायाचित्रे मा.न्‍यायाधीश साहेबांनी गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांच्‍याकडुन मागवून सदरील घटनेची सत्‍यता तपासावी ही विनंती.
 
3.   अर्जदार हा सध्‍या सहयोग कॉलेज विष्‍णपूरी येथे एमबीए प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे. अर्जदाराचे खाते क्रमांक 20020248972 मधून रु.10,000/- गैरअर्जदार क्र. 2 यांच्‍या एटीएम मशिन भाग्‍यनगरच्‍या सेवेतील त्रुटीमुळे अर्जदाराच्‍या बचत खात्‍यातुन कपात झाले, सदरील रु.10,000/- परत मिळावे. व मानसिक त्रासापोटी रु.15,000/-, नोटीसीचा खर्च रु.2,000/-, दाव्‍याचा खर्च रु.3,000/- मिळावे, अशी विनंती केली आहे.
 
4.                गैरअर्जदार क्र.1 हे वकिलामार्फत हजर झाले व त्‍यांनी आपले लेखी म्‍हणणे दाखल केलेले आहे. अर्जदार व गैरअर्जदार क्र.2 यांच्‍यामध्‍ये प्रत्‍यक्षात काय घडले हे ते सांगू शकत नाही. गैरअर्जदार क्र.1 यांच्‍या एटीएम स्विच सेंटरवरुन मिळालेल्‍या माहीतीवरुन अर्जदार यांच्‍या खात्‍यावरुन अर्जदारास रु.10,000/- नगदी मिळाले असे दर्शविते. तसेच त्‍यांच्‍या जे.पी. लॉगच्‍या पुराव्‍यावरुन जेव्‍हा 00 कोड दर्शविते तेव्‍हा अर्जदाराचा व्‍यवहार पूर्ण झाला असे संबोधतो. अर्जदाराच्‍या तक्रारीप्रमाणे गैरअर्जदार क्र.1 यांनी दि.19.2.2010 रोजी माहीती मागिवीली असता त्‍यांनी त्‍याच दिवशी जे.पी. लॉगच्‍या उत्‍तरासह दि.2.3.2010 रोजी माहीती पूरविली. दि.4.10.2010 रोजी गैरअर्जदार क्र.2 यांच्‍या बँकेस लेखी कळविले असता त्‍यांनी दि.10.11.2010 रोजी रक्‍कम अर्जदारास मिळाली व त्‍यांच्‍याकडे दि.15.2.2010 रोजी जास्‍तीची रक्‍कम आढळून आली नाही असे कळविले.म्‍हणून कोण‍तीही रक्‍कम देण्‍यास ते जबाबदार नाहीत.म्‍हणून अर्जदाराचा अर्ज खर्चासह फेटाळण्‍यात यावा असे म्‍हटले आहे.
 
5.        गैरअर्जदार क्र.2 हे वकिलामार्फत हजर झाले व त्‍यांनी आपले लेखी म्‍हणणे दाखल केलेले आहे. हे त्‍यांना मान्‍य नाही की, त्‍यांच्‍या एटीएम मशीनमधून रु.10,000/- मिळाले नाही. कारण रक्‍कम मिळाल्‍याचा एटीएम स्विच सेंटर यांचा पूरावा हा व्‍यवहार यशस्‍वी झाल्‍याबददलचा Transaction Code 00 हा चौकशी अंती सिध्‍द झाला आहे. व्‍यवहार हा आरबीआय च्‍या अखात्‍यारित चालत असतो व एटीएम मशीन मध्‍ये जमा असलेली रक्‍कम OVER DUES दाखवते अन्‍यथा जर रक्‍कमेची पूर्तता झाली असेल तर Transaction successful ज्‍यांचा कोड 00 असा दाखवते. असे अर्जदाराच्‍या व्‍यवहारा बाबत 00 कोड दाखविला आहे.म्‍हणजे व्‍यवहार हा पूर्ण झालेला आहे. गैरअर्जदार क्र.2 बँकेचा व एटीएम मशीनचा नांदेड येथून कूठल्‍याही प्रकारे त्‍यामध्‍ये फेरबदल अथवा दूरुस्‍ती करण्‍याचा प्रश्‍नच येत नाही. दि.24.9.2010 रोजी गैरअर्जदार क्र.2 यांना कूठलीही नोटीस मिळालेली नाही. दि.15.2.2010 रोजी अर्जदार यांचा व्‍यवहार यशस्‍वी झाल्‍याबददलचा सर्व पूरावा दिला असल्‍यामूळे गैरअर्जदार क्र.2 यांचे सेवेत ञूटी असण्‍याचा प्रश्‍नच निर्माण होत नाही. त्‍यामूळे अर्जदार यांनी मागणी केलेली नूकसान भरपाई देण्‍यास ते जबाबदार नाहीत.पैसे उकळण्‍याच्‍या उददेशाने व बॅकेची प्रतिमा मलीन करण्‍याच्‍या उददेशाने तक्रार दाखल केली आहे.म्‍हणून अर्जदाराची तक्रार ही खर्चासह फेटाळण्‍यात यावी असे म्‍हटले आहे.
 
6.      अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेले कागदपत्र तपासल्‍यानंतर व दोन्‍ही बाजूचा यूक्‍तीवाद ऐकल्‍यानंतर जे मूददे उपस्थित होतात ते मूददे व त्‍यावरील सकारण उत्‍तरे खालील प्रमाणे.
 
मुद्ये.                                                                        उत्‍तरे.
1.   अर्जदार हे ग्राहक आहे काय ?                                    होय.
2.   अर्जदार यांने केलेली मागणी पूर्ण करण्‍यास
गैरअर्जदार जबाबदार आहेत काय ?                          नाही.         
3.   काय आदेश ?                                            अंतीम आदेशाप्रमाणे.
                         कारणे
मुद्या क्र. 1
 
7.        हे दोन्‍ही मूददे एकमेकाशी पूरक असल्‍यामूळे ते एकंञित चर्चिण्‍यात येत आहेत.एकंदर कागदपञावरुन असे दिसते की, जरी अर्जदार हा विद्यार्थी आहे तरीही तो स्‍वच्‍छ हाताने या मंचासमोर आलेला नाही. अर्जदाराला वारंवार सूचना करुन देखील त्‍यांनी त्‍यांचे पासबूकची फेब्रूवारी 2010 या महिन्‍याचा खाते उतारा दाखल केलेला नाही ? शेवटी दि.17.2.2011 रोजी त्‍यांनी त्‍यांचे पासबूकची झेरॉक्‍स कॉपी दाखल केली आहे. त्‍या कॉपीवरुन असे दिसते की, त्‍यांनी दि.14.3.2010 रोजी ते दि.20.4.2010 पर्यतच्‍या नोंदीचा उतारा दाखल केला आहे ? संधी मिळूनही त्‍यांनी फेब्रूवारी 2010 चा व वीशेषतः दि.15.2.2010 चा उतारा दाखल केलेला नाही ?  दि.15.2.2010 रोजीचा जर उतारा दाखल केला असता आणि जर अर्जदाराला गैरअर्जदार क्र.2 च्‍या एटीएम मधून त्‍या दिवशीची स्लिप मिळून देखील पैसे मिळाले नाही व नंतर त्‍यांनी त्‍यांच दिवशी गैरअर्जदार क्र.1 च्‍या यशवंत नगर या शाखेतून रु.10,000/- काढले होते असे जर म्‍हणायचे होते तर एकाच दिवशी रु.10,000/- उचलल्‍याच्‍या दोन नोंदी निश्चित आल्‍या असत्‍या, अर्जदाराने जाणूनबूजून त्‍या दिवशीच्‍या व्‍यवहाराच्‍या नोंदी या मंचापासून लपवून ठेवलेल्‍या आहेत यावरुन असे दिसते की, तो स्‍वच्‍छ हाताने मंचासमोर आलेला नाही.
 
8.        अर्जदाराने डॉ. पांचाळ व डॉ.अशोक मूंडे यांचे समर्थ हॉस्‍पीटलचे प्रमाणपञ दि.15.2.2010 चे दाखल केले आहे. त्‍यावर फक्‍त डॉ. पांचाळ यांचीच सही आहे ? नियोजित दवाखान्‍याचा खर्च रु.15,000/- येईल असे या प्रमाणपञामध्‍ये म्‍हटले आहे व हे प्रमाणपञ देखील दि.15.2.2010 रोजीचेच आहे. हे जर खरे असते तर अर्जदाराने त्‍यादिवशी नक्‍कीच रु.15,000/- काढले असते तसे न करता त्‍यांनी रु.10,000/- काढले असे सांगतात पण रु.5,000/- का कमी काढले त्‍या बददल उल्‍लेख करीत नाहीत ? खात्‍यात पैसे शिल्‍लक नसावे असे म्‍हणावे तर त्‍यांनी जो वर पासबूकचा खाते उतारा जो दाखल केला त्‍यावरुन असे दिसते की, त्‍यांनी सतत पाच वेळेला मार्च एप्रिल महिन्‍यामध्‍ये रु.15,614/- प्रत्‍येक वेळी उचल केलेली दिसते. यावरुन असे दिसते की, अर्जदार काही तरी लपविण्‍याचा प्रयत्‍न करीत आहेत. गैरअर्जदार यांनी यूक्‍तीवादाच्‍या वेळी असा उल्‍लेख केला की, हे फक्‍त दवाखान्‍याचे इस्‍टीमेंटचे प्रमाणपञ डॉ. पाचाळ कडून घेतले आहे व खरे तर अर्जदाराचे वडील दवाखान्‍यात शरीक होते का  ? या बददल कोणताही, शरीक केल्‍याबददलचा किंवा डिसचार्ज दिल्‍या बददलचा, पूरावा दाखल केलेला नाही ?
 
9.        महत्‍वाची गोष्‍ट अशी की, अर्जदाराने परस्‍पर गैरअर्जदाराच्‍या वकिलाना बँकेशी केलेल्‍या पञव्‍यवहाराच्‍या नकला मिळाल्‍या होत्‍या त्‍या ते अर्ज देऊन दि.17.2.2010 रोजी दाखल केल्‍या. ते महत्‍वाचे कागदपञ पाहता गैरअर्जदार क्र.2 बँकेने गैरअर्जदार क्र.1 बँकेला दि.11.10.2010 रोजीच पञ देऊन कळविले होते व त्‍यामध्‍ये असे स्‍पष्‍टपणे नमूद केले आहे की, DCB would like to state that no excess cash was found on the transaction date i.e. February 15, 2010, as per the reconciliation at the end of day done at the said ATM site (the response code in the Electronic Journal is 00) अशा प्रकारे 00 कोड आला यांचा अर्थ Transaction successful  झाले असा होतो व नेमके हेच कागदपञ या मंचापूढे अर्जदाराने दाखल करण्‍याचे टाळले होते ?  एकंदर व्‍यवहारावरुन अर्जदार हा गैरअर्जदार क्र.1 चा खातेदार म्‍हणजे ग्राहक आहे याबददल दूमत नाही परंतु अर्जदाराने गैरअर्जदाराच्‍या तथाकथित ञूटी बददल जो ऊहापोह त्‍यांचे तक्रारीत केला आहे त्‍या कोणताही सबळ पूरावा ते दाखल करु शकले नाहीत. उलटपक्षी असे दिसते की, दि.15.2.2010 रोजीचा रु.10,000/- उचलल्‍याचा व्‍यवहार Successful  झाला होता म्‍हणून सदरील कोड 00 Electronic machine  ने दाखवलेला होता. येथे जास्‍त ऊहापोह न करता असे नमूद करावेसे वाटते की, अर्जदाराने विनाकारण ही तक्रार या न्‍यायमंचात दाखल केली आहे. जरी गैरअर्जदाराने ही तक्रार खर्चासहीत खारीज करावी अशी विनंती केली असली तरीही अर्जदार हा तरुण विद्यार्थी असल्‍यामूळे त्‍यांला एकवेळ संधी देणे क्रमप्राप्‍त आहे असे आम्‍हाला वाटते. यावरुन ते नक्‍कीच समज घेतील व पून्‍हा बिनबूडाची तक्रार कोणाही विरुध्‍द दाखल करणार नाहीत.
 
10.            वरील चर्चेवरुन या मंचाचे असे मत आहे की, ही तक्रार खारीज करण्‍यास योग्‍य आहे तथापि पक्षकारांनी आपआपला खर्च सोसावा असे आम्‍हास वाटते म्‍हणून आम्‍ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
                                                      आदेश
1.                                      अर्जदाराचा तक्रार अर्ज खारीज करण्‍यात येतो.
 
2.                                      पक्षकारांनी आपआपला खर्च सोसावा.
 
3.              पक्षकारांना आदेश कळविण्‍यात यावा.
 
 
 
श्री.बी.टी.नरवाडे पाटील                                    श्रीमती सुवर्णा देशमूख          
           अध्‍यक्ष                                                                  सदस्‍या
 
 
 
जयंत पारवेकर
लघूलेखक   

[HON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh] MEMBER[HON'BLE President B.T.Narwade] PRESIDENT