-: निकालपत्र :-
( पारित दिनांक : 30 डिसेंबर 2014 )
मा. सदस्या श्रीमती.जे.जी.खांडेभराड, यांचेनुसार :-
ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये, सादर करण्यात आलेल्या, सदर तक्रार प्रकरणात, निशाणी-6 प्रमाणे तक्रारकर्ता यांनी दिनांक 10/10/2014 रोजी स्वत:हून तक्रार मागे घेण्याकरिता अर्ज केला. त्यापुर्वी उभय पक्ष यांनी,दिनांक 30/09/2014 रोजी, संयुक्त लेखी अर्ज, रेकॉर्डवर सादर केला, त्यामधील मजकूराचा, थोडक्यात आशय, आढळून येतो, तो येणेप्रमाणे -
सदर प्रकरणात विरुध्द पक्षाने, तक्रारकर्त्यास धनादेशाव्दारे दिनांक 22/07/2014 रोजी रुपये 45,618/-,खाते क्र. 11667350831 मध्ये जमा केले व या रक्कमेवरील व्याजापोटी व न्यायालयीन आणि इतर सर्व खर्चापोटी रुपये 4,523/- ( अक्षरी रुपये चार हजार पाचशे तेवीस ) इतकी रक्कम तडजोड म्हणून तक्रारकर्त्यास विरुध्द पक्ष बँकेव्दारे देण्यात आली आहे व त्यास तक्रारकर्त्याने कोणत्याही अटी किंवा शर्तीशिवाय सहमती दर्शविली आहे. या तडजोडीनंतर तक्रारकर्त्याने स्वत:हून आपली तक्रार मागे घेण्याचे कबूल केले आहे. या तडजोड पत्रावर उभय पक्षाच्या सहया आहेत.
अशास्थितीत, सदर तक्रार प्रकरणातील कार्यवाही, कायमची, येथेच, थांबविण्यात येत असून, सदर तक्रार, नस्तीबध्द करण्याचे निर्देश, देण्यात येत आहेत व अशाप्रकारे, सदर तक्रार प्रकरण, कायमचे, निकाली काढण्यात येत आहे.
(श्रीमती जे.जी. खांडेभराड) (श्री. ए.सी.उकळकर) ( सौ. एस.एम. उंटवाले )
सदस्या. सदस्य. अध्यक्षा.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, वाशिम.