(घोषित द्वारा – श्रीमती अंजली देशमुख, अध्यक्ष ) तक्रारदारातर्फे अड शिंदे बी.आर.हजर. गैरअर्जदार गैरहजर. तक्रारदाराचा युक्तिवाद ऐकला. खालीप्रमाणे निकाल पारित करण्यात आला. तक्रारदाराची थोडक्यात तक्रार खालीलप्रमाणे आहे. तक्रारदारानी गैरअर्जदाराकडे खाते क्रमांक 62064570805 स्टेशन रोड ब्रँच औरंगाबाद. दिनांक 27/1/2010 रोजी त्यांनी चेक क्रमांक 703806 रक्कम रु 15,000/- आयसीआयसीआय बँकेचा गैरअर्जदार बँकेमध्ये जमा केला. चेक जमा केल्यानंतर आठ दिवसांनी तक्रारदारास असे समजले की, त्यांच्या खात्यामध्ये सदरील चेक जमा झालेला नाही. गैरअर्जदार बँकेत विचारणा केली असता पाहून सांगतो असे उत्तर मिळाले. वेळोवेळी चौकशी केली असता गैरअर्जदार बँकेकडून त्यांना कांहीही माहिती मिळाली नाही म्हणून गैरअर्जदार बँककडे लेखी स्वरुपात तक्रार दाखल केली. त्यानंतर गैरअर्जदार बॅकेने तकारदारास दिनांक 6/3/2010 रोजी लेखी स्वरुपात तक्रारदाराने दिलेला चेक क्रमांक 703806 गहाळ झाला आहे असे कळविले. तक्रारदार गैरअर्जदाराकडून नुकसान भरपाई रु 15,000/-, सेवेतील त्रुटीबाबत रु 5000/-, मानसिक त्रासापोटी रु 10,000/-, इतर खर्चाबद्दल रु 15,000/- असे एकूण रु 50,000/- मागतात.त्यानंतर मंचामध्ये दिनांक 29/4/2010 रोजी बँकेविरुध्द तक्रार दाखल केली. गैरअर्जदाराना नोटीस पाठवून ते मंचात हजर झाले नाहीत म्हणून त्यांच्या विरुध्द एकतर्फा सुनावणीचा आदेश पारित करण्यात आला. तकारदाराचे वकील अड शिंदे बी.आर. यांचा युक्तिवाद ऐकला. तक्रारदारानी दिनांक 6/7/2009 रोजी आयसीआयसीआय बँकेचा चेक क्रमांक 703806 गैरअर्जदार बँकेत जमा केला परंतु बँकेकडून तो गहाळ झाल्याचे बँकेने तक्रारदाराला सांगितले. गैरअर्जदार बँकेसारख्या संस्थेकडून अशा प्रकारची चूक होणे हे बरोबर नाही असे मंचाचे मत आहे. या त्यांच्या निष्काळजीपणाबद्दल मंच तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रु 1,000/- व तक्रारीच्या खर्चाबद्दल रु 1,000/- गैरअर्जदार बँकेने 6 आठवडयाच्या आत द्यावेत असा आदेश देत आहे. आदेश 1. तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येत आहे. 2. गैरअर्जदार बँकेने या आदेशाच्या प्राप्तीपासून 6 आठवडयाच्या आत तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रु 1,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु 1,000/- द्यावेत. (श्रीमती ज्योती पत्की) (श्रीमती रेखा कापडिया) (श्रीमती अंजली देशमुख) सदस्य सदस्य अध्यक्ष
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Smt. Anjali L. Deshmukh] PRESIDENT[ Smt.Jyoti H.Patki] MEMBER | |