नि का ल प त्र :- (दि. 25-10-2013) (द्वारा- श्री. संजय पी. बोरवाल, अध्यक्ष)
प्रस्तुतचा तक्रार अर्ज तक्रारदारांनी ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 कलम 12 अन्वये नुकसानभरपाई मिळण्यासाठी दाखल केलेला आहे.
(1) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी:-
तक्रारदार हे इचलकरंजी येथील मॉं पदमावती फॅब्रिक्स या फर्मचे प्रोपायटर असून तक्रारदार हे स्वत:चे कुटूंबाच्या उदरनिर्वाहकरिता सदरचा व्यवसाय करीत आहेत. वि.प. नं. 1 ही ट्रान्सपोर्ट व्यवसाय करणारी कंपनी असून मोबदला स्विकारुन वाहतुकीची सेवा पुरवितात. तक्रारदार यांनी वि.प. 1 कडे दि. 24-09-2010 रोजी सुती कापडाचे 12 गठ्ठे (Bales), Bale No. 6009 ते 6020 अन्वये माल ठेवणेत आलेला होता. वि.प. 1 यांनी तक्रारदार यांचेकडून मोबदला स्विकारुन तक्रारदारांच्या मालाची देखभाल योग्य स्थितीत ठेवणेची हमी व खात्री दिलेली होती. तक्रारदारांनी वि.प. 1 यांचेकडे ठेवलेल्या 12 Bales पैकी Bale NO. 6009, 6010 व 6012 अशा तीन Bales एकूण 1118 मिटर तक्रारदार यांचेकडून परत मागविल्या होत्या व त्याप्रमाणे वि.प. 1 यांनी तक्रारदार यांना देण्यास असमर्थता दर्शविली होती. त्याबाबत तक्रारदारांनी वि.प. 1 व 2 यांना प्रत्यक्ष भेटून व वेळोवेळी फोनव्दारे संपर्क साधून सदरचा माल परत करणेची विनंती केली होती परंतु वि.प. यांनी त्यास दाद दिली नाही. तक्रारदारांनी वि.प. 1 व 2 यांना दि. 6-01-2012 रोजीच्या पत्राने कळवून Bale NO. 6009 ते 6020 ची मागणी केली होती. त्यास तक्रारदार यांना वि.प. यांनी उत्तरही दिलेले नाही. मालही परत केलेला नाही. वि.प. यांनी तक्रारदारांकडून मोबदला स्विकारुन सेवा देण्यात कसूर करुन हेतुपुरस्सर अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला आहे. त्यामुळे तक्रारदारांना सदरचा तक्रार अर्ज दाखल करणे भाग पडले आहे. सबब, वि.प. यांनी तक्रारदार यांना परत न केलेल्या Bale NO. 6009, 6010, व 6012 (किंमत 50 X 1118 मिटर ) अशी एकूण रक्कम रु. 55,900/- दि. 24-09-2010 पासून द.सा.द.शे. 18 टक्के व्याजासह देण्यात यावी. व मानसिक त्रासापोटी रु. 10,000/- व तक्रार खर्च रु. 5,000/- तक्रारदारास देणेबाबत आदेश व्हावा अशी विनंती तक्रारदारांनी केली आहे.
(3) तक्रारदारांने त्यांचे तक्रारीसोबत तक्रारदार यांनी दिलेले श्री दिनेश भागचंद कासलीवाल यांना दिलेले वटमुखत्यारपत्र दि. 28-06-2005, तक्रारदार यांनी वि.प. यांचेकडे दिलेल्या मालाचा तपशिल, बेल नं. 6009, 6010 व 6012 ची दि. 24-09-2010 रोजीची पावती, तक्रारदार यांनी वि.प. यांना दि. 6-01-2012 रोजी दिलेले पत्र, व रजि. पोस्टाची पावती, व वि.प. नं. 1 व 2 यांना दि. 6-01-2012 रोजीचे पत्र मिळालेची पोस्टाची पोहोच पावती, व तक्रारदार यांचे पुराव्याचे शपथपत्र दाखल केलेले आहे.
(4) प्रस्तुतचा तक्रार अर्ज दाखल दि. 19-03-2013 रोजी दाखल होऊन दि. 15-04-2013 रोजी स्विकृत करुन वि.पक्ष यांना नोटीसीचा आदेश झाला. वि.पक्ष यांना नोटीस लागू होऊनही त्यांनी त्यांचे म्हणणे दाखल केले नसलेमुळे दि. 16-07-2013 रोजी वि.प. 1 व 2 विरुध्द एकतर्फा आदेश पारीत करणेत आले. तक्रारदार तर्फे वकिलांचा युक्तीवाद ऐकला व प्रस्तुतचे प्रकरण गुणदोषांवर निकाली करणेत येते.
(5) तक्रारदारांची तक्रार, दाखल कागदपत्रे, तक्रारदाराचे वकिलांचा युक्तीवाद इत्यादीचे बारकाईने अवलोकन केले असता पुढील महत्वाचे मुद्दे निष्कर्षासाठी येतात.
मुद्दे
1. वि.पक्ष कंपनी यांनी तक्रारदार यांना द्यावयाच्या
सेवेत त्रुटी ठेवली आहे काय ? ---- होय.
2. तक्रारदार नुकसान भरपाईची रक्कम मिळण्यास
पात्र आहे काय ? -----होय.
3. आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे.
वि वे च न
मुद्दा क्र.1: तक्रारदार यांचे कुटूंबाचे उदरनिर्वाहासाठी “मॉ पदमावती फॅब्रिक्स” या नावाने स्वंयरोजगार करतात. तक्रारदारांनी दि. 24-09-2010 रोजी वि.पक्ष 1 कडे ट्रान्सपोर्ट कंपनीकडे दि. 24-09-2010 रोजी सुती कापडाचे 12 गठ्ठे (Bales), Bale No. 6009 ते 6020 अन्वये माल ठेवणेत आलेला होता. वि.प. 1 यांनी तक्रारदार यांचेकडून मोबदला स्विकारुन तक्रारदारांच्या मालाची देखभाल योग्य स्थितीत ठेवणेची हमी व खात्री दिलेली होती. तक्रारदारांनी वि.प. 1 यांचेकडे ठेवलेल्या 12 Bales पैकी Bale NO. 6009,6010, व 6012 अशा तीन Bales एकूण 1118 मिटर तक्रारदार यांचेकडून परत मागविल्या होत्या व त्याप्रमाणे वि.प. 1 यांनी तक्रारदार यांना देण्यास असमर्थता दर्शविली. त्याबाबत तक्रारदारांनी वि.प. 1 व 2 यांना प्रत्यक्ष भेटून, फोनव्दारे संपर्क साधून सदरचा माल परत केला नाही. तक्रारदारांनी वि.प. 1 व 2 यांना दि. 6-01-2012 रोजीच्या पत्राने कळवून Bale NO. 6009, 6010, व 6012 ची मागणीप्रमाणे मालही परत केलेला नाही. वि.प. यांना संधी असूनदेखील ते याकामी हजर झालेले नाहीत किंवा कोणताही खुलासा त्याअनुषंगाने केलेला नाही. सबब, वि.प. 1 व 2 यांनी तक्रारदारांना सुती कापडाचे गठ्ठे Bale NO. 6009, 6010, व 6012 ची (किंमत 50 X 1118 मिटर ) अशी एकूण रक्कम रु. 55,900/- (अक्षरी रु. पंचावन्न हजार नऊशे फक्त) द.सा. द.शे. 9 टक्के प्रमाणे व्याजासह अदा करावी या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. तक्रारदारांनी दाखल केलेली कागदपत्रे व तक्रार याचा विचार करता वि. प. 1 व 2 यांनी तक्रारदार यांना सदोष सेवा देऊन अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केल्याचे स्पष्टपणे दिसून येते. सबब, तक्रारदार यांना वि.प. यांनी द्यावयाच्या सेवेत त्रुटी केली आहे असे या मंचाचे मत आहे. म्हणून मुद्दा क्र. 1 चे उत्तर होकारार्थी देत आहोत.
मुद्दा क्र. 2:-
वि.पक्ष 1 व 2 ट्रान्सपोर्ट कंपनी यांनी तक्रारदार यांना सदोष सेवा दिल्यामुळे तक्रारदार यांना मानसिक त्रास झाला. व तक्रारदार यांना मे. मंचात सदरची तक्रार दाखल करण्यास खर्च करावा लागला. त्यामुळे तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 1,000/- व तक्रारीचा खर्च रक्कम रु. 500/- इतके मिळण्यास पात्र आहेत, असे या मंचाचे मत आहे म्हणून मुद्दा क्र. 2 चे उत्तर होकारार्थी देत आहोत.
मुद्दा क्र. 3 : सबब, मंच या प्रकरणी पुढीलप्रमाणे आदेश देत आहे.
आ दे श
1. तक्रारदाराची तक्रार अशंत: मंजूर करण्यात येते.
2. वि. पक्ष क्र. 1 व 2 ट्रान्सपोर्ट कंपनी यांनी तक्रारदार यांना सुती कापडाचे गठ्ठे Bale NO. 6009, 6010, व 6012 ची (किंमत 50 X 1118 मिटर ) अशी एकूण रक्कम रु. 55,900/- (अक्षरी रु. पंचावन्न हजार नऊशे फक्त) अदा करावी. सदर रक्कमेवर तक्रार दाखल तारखेपासून संपूर्ण रक्कम मिळेपावेतो द.सा. द.शे. 9 टक्के प्रमाणे व्याज अदा करावे.
3. वि. पक्ष क्र. 1 व 2 यांनी ट्रान्सपोर्ट कंपनी यांनी तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 1,000/- (अक्षरी रु. एक हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु. 500/- (अक्षरी रु. पाचशे फक्त) अदा करावेत.
4. सदरच्या निकालपत्राच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.