नि.२५
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचे समोर
मा.अध्यक्ष : श्री.अनिल य.गोडसे
मा.सदस्या : श्रीमती गीता घाटगे
ग्राहक तक्रार अर्ज क्र. ११९६/०९
-------------------------------------------
तक्रार नोंद तारीख : २४/७/०९
तक्रार दाखल तारीख : २८/७/०९
निकाल तारीख : १२/८/२०११
-------------------------------------------------------
१. श्री विजय शिवाजी कदम
वय वर्षे – ३८, धंदा – शेती
रा.लोढे, ता.तासगांव, जि.सांगली ..... तक्रारदारú
विरुध्दù
१. मॅनेजर / व्यवस्थापक,
सिध्दार्थ ऑटोमोबाईल्स लि.
२०१९, के.एच./७/१, रजपूत कॅम्पस,
नवी गल्ली, राजारामपुरी, कोल्हापूर
२. मॅनेजिंग डायरेक्टर,
जे.सी.बी. इंडिया लि.
प्लॉट नं.४६, शिवप्रसाद सोसायटी,
पानमळा, सिंहगड रोड, पुणे
३. मॅनेजिंग डायरेक्टर,
जे.सी.बी. इंडिया लि.
२३१७/मथुरा रोड, बल्लभ गृह,
हरियाना – १२१००४ .....जाबदारúö
तक्रारदारतर्फेò : +ìb÷.श्री.एस.एम.सवळेकर
+ìb÷.श्री.बाळासाहेब टकले
जाबदार क्र.१ तर्फे : +ìb÷. श्री जे.जी.कामत
जाबदार क्र.२व ३ तर्फे : +ìb÷.श्री विणा कुलकर्णी
नि का ल प त्र
द्वारा- अध्यक्ष- श्री.अनिल य.गोडसे
१. तक्रारदार यांनी सदरचा तक्रार अर्ज आपल्या जे.सी.बी.मशीनबाबत मिळालेल्या सदोष सेवेबाबत दाखल केला आहे.
२. सदर तक्रार अर्जाचा थोडक्यात तपशील पुढीलप्रमाणे –
तक्रारदार यांनी जाबदार क्र.३ यांनी निर्माण केलेले जे.सी.बी.मशीन जाबदार क्र.१ यांचेकडून दि.१६/४/२००८ रोजी रक्कम रु.२०,२०,०००.४८/- इतक्या रकमेस खरेदी केले. सदर जे.सी.बी.मशीन तांत्रिक दृष्टीने सुयोग्य असल्याची खात्री जाबदार क्र.१ ते ३ यांनी दिली. तसेच जाबदार क्र.३ यांनी तक्रारदार यांना वॉरंटी सर्टिफिकेट दिले होते. जे.सी.बी.मशीन खरेदी केल्यानंतर चौथ्या महिन्यापासून मोठया प्रमाणात जे.सी.बी. मशिनचा कलर जाण्यास सुरुवात झाली व यांत्रिक दोष निर्माण होण्यास सुरुवात झाली. याबाबत तक्रारदार यांनी जाबदार क्र.३ यांचे अधिकृत विक्रेते जाबदार क्र.१ यांचेकडे तक्रार केली. त्यावर जाबदार यांनी कोणतीही दाखल घेतली नाही व मशिनचा कलर जातो, दुसरीकडे कलर मारुन घ्या अशी उध्दट उत्तरे दिली. तक्रारदार यांनी जाबदर यांना दि.१५/१/२००९ रोजी नोटीस पाठविली. त्यास जाबदार यांनी दि.२७/१/२००९ रोजी उत्तर पाठविले. परंतु त्यानंतर कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे तक्रारदार यांचे नुकसान झाले. त्यामुळे तक्रारदार यांनी प्रस्तुतचा तक्रारअर्ज दाखल केला आहे.
तक्रारदार यांनी तक्रारअर्जासोबत नि.३ ला शपथपत्र व नि.५ चे यादीने ११ कागद दाखल केले आहेत.
३. जाबदार क्र.१ यांनी नि.९ वर आपले म्हणणे सादर केले आहे. त्यामध्ये त्यांनी तक्रारदार यांचे तक्रारअर्जातील बहुतांश मजकूर नाकारला आहे. जाबदार यांनी आपल्या म्हणण्यामध्ये मशिनचा कलर फेंट झालेमुळे मशिनच्या कार्यक्षमतेवर कोणताही परिणाम होत नाही व मशिन पेंट करणेची कोणतीही आवश्यकता नाही. परंतु तक्रारदार यांना मशिन पेंट करणे आवश्यक वाटत असेल तर वर्कशॉपमध्ये घेवून यावे, जाबदार हे पेंट करुन देणेस तयार आहेत असे कळविले होते. परंतु तक्रारदार यांनी मशिन पेंट करण्यासाठी आणले नाही. जाबदार यांनी तक्रारदार यांना कोणतीही सदोष सेवा दिलेली नाही, त्यामुळे तक्रारदार यांचा तक्रारअर्ज फेटाळणेत यावा असे जाबदार क्र.१ यांनी नमूद केले आहे.
४. जाबदार क्र.२ व ३ यांनी नि.१३ वर आपले म्हणणे दाखल केले आहे. जाबदार क्र.२ व ३ यांनी त्यांच्या म्हणण्यात तक्रारदार यांचे तक्रारअर्जातील बहुतांश मजकूर नाकारला आहे. तक्रारदार यांनी मशिनचा वापर योग्य त्या प्रशिक्षित ऑपरेटरकडून केला नाही व मशीनची योग्य ती काळजी घेतली नाही. त्यामुळे मशिनचा कलर हा अयोग्य हाताळणीमुळे गेला आहे. मशिनमध्ये कोणताही तांत्रिक दोष नाही व तक्रारदार यांनी त्याबाबत कोणतेही तज्ञ व्यक्तीचा पुरावा दाखल केला नाही. तक्रारदार हा व्यावसायिक असल्याने तो ग्राहक होत नाही. तक्रारदाराचा तक्रारअर्ज चालविण्यास या मंचास भौगोलिक अधिकारक्षेत्र नाही. या सर्व बाबींचा विचार करुन तक्रारदारांचा तक्रारअर्ज फेटाळणेत यावा.
५. तक्रारदार यांनी नि.१६ वर आपले प्रतिउत्तर दाखल केले आहे. त्यामध्ये त्यांनी जाबदार यांचे म्हणण्यातील मजकूर नाकारला आहे. तक्रारदार यांनी नि.१७ वर प्रतिउत्तराचे पृष्ठयर्थ शपथपत्र दाखल केले आहे. तक्रारदार यांनी नि.१८ वर लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. जाबदार क्र.२ व ३ यांनी नि.१९ वर आपला लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. तसेच नि.२१ च्या यादीने काही निवाडे दाखल केले आहेत. तक्रारदार यांनी नि.२२ ला व जाबदार नं.२ व ३ यांनी नि.२३ ला कोणताही तोंडी युक्तिवाद करणेचा नाही अशी पुरसिस दाखल केली आहे. जाबदार क्र.१ यांनी नि.२४ ला दिलेली कैफियत हाच युक्तिवाद म्हणून वाचण्यात यावा अशी पुरसिस दाखल केली.
६. तक्रारदार यांचा तक्रारअर्ज, जाबदार यांनी दिलेले म्हणणे, दाखल करण्यात आलेली कागदपत्रे व दोन्ही बाजूंचा युक्तिवाद यावरुन पुढील मुद्दा मंचाचे निष्कर्षासाठी उपस्थित होतो. प्रस्तुतचा तक्रारअर्ज चालविणेसाठी या मंचास भौगोलिक अधिकारक्षेत्र आहे का ? जाबदार क्र.२ व ३ यांनी आपल्या म्हणण्यामध्ये भौगोलिक अधिकारक्षेत्राबाबत आक्षेप घेतला आहे. तक्रारदार यांनी दाखल केलेल्या तक्रारअर्जामध्ये नमूद केलेले जाबदार यांचे पत्ते पाहता जाबदार क्र.१ यांचा पत्ता कोल्हापूर येथील आहे, जाबदार क्र.२ यांचा पत्ता पुणे येथील आहे व जाबदार क्र.३ यांचा पत्ता हरियाणा राज्यातील आहे. यावरुन सदरील जाबदार हे या मंचाच्या भौगोलिक अधिकारक्षेत्रातील नाहीत ही बाब स्पष्ट होते. तक्रारदार यांनी त्यांच्या तक्रारअर्जामध्ये अर्जदार हे या मे.कोर्टाचे स्थळसीमेतील रहिवासी असल्यामुळे व अर्जास कारण या मे. कोर्टाच्या स्थळसिमेत घडले असलेने प्रस्तुत तक्रारअर्ज या मंचात दाखल केला आहे असे नमूद केले आहे. ग्राहक संरक्षण कायद्यातील कलम ११ चा विचार करता तक्रारदार ज्या ठिकाणी राहतो, त्यावरुन भौगोलिक अधिकारक्षेत्र ठरत नसून, जाबदार ज्या ठिकाणी राहतो अथवा व्यवसाय करतो, त्या ठिकाणावरुन भौगोलिक अधिकारक्षेत्र ठरत असते. जाबदार यांचे कार्यालय अथवा व्यवसायाचे ठिकाण हे या मंचाच्या अधिकारक्षेत्रात नाही त्यामुळे त्या कारणास्तव या मंचास भौगोलिक अधिकारक्षेत्र नाही. भौगोलिक अधिकारक्षेत्र ठरविताना तक्रारअर्जास कारण या मंचाच्या अधिकारक्षेत्रात घडले आहे का ? हे पाहणे गरजेचे आहे. तक्रारदार यांनी या मंचाच्या अधिकारसिमेत तक्रारअर्जास कारण घडले असे नमूद केले आहे. तक्रारअर्जास कारण घडल्याचा मजकूर परिच्छेद ७ मध्ये तक्रारदार यांनी नमूद केला आहे. त्यामध्ये कलर उडून गेल्यामुळे झालेल्या नुकसानीबाबत व तांत्रिक दोषाबाबत लेखी नोटीस पाठवून मागणी केली त्यास जाबदार यांनी खोडसाळपणे उत्तर पाठविले व अर्जदार हे जाबदार क्र.१ व २ कडे विचारण्यास गेले असता त्यांनी कोणतीही दखल घेतली नाही, त्यामुळे अर्जास कारण घडले असे नमूद केले आहे. तसेच तक्रारअर्जाच्या परिच्छेद ५ मध्ये दि.२७/१/२००९ रोजी नोटीस पाठविलेनंतर अर्जदार हे जाबदार क्र.१ व २ यांचेकडे मशिन घेवून गेले, त्यावेळेस जाबदार यांनी दखल घेतली नाही असे तक्रारदार यांनी नमूद केले आहे. तक्रारदार यांचे तक्रारअर्जातील कथनावरुन या मंचाचे अधिकारक्षेत्रात कोणतेही कारण घडल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे प्रस्तुतचा तक्रारअर्ज या मंचाच्या भौगोलिक अधिकारक्षेत्रात येत नाही या निष्कर्षाप्रत सदरचा मंच आला आहे. जाबदार यांनी दाखल केलेला सन्मा.राज्य आयोग, बिहार यांचा तक्रारअर्ज क्र.८/२००५ अभिषेक आग्रवाल विरुध्द मे. जे.सी.बी.इंडिया लि. याकामी दि.३०/१/२००८ रोजी दिलेल्या निवाडयातील निष्कर्ष याठिकाणी तंतोतंत लागू होतो. सबब, तक्रारदार यांना योग्य त्या मंचामध्ये तक्रारअर्ज दाखल करण्याची मुभा ठेवून तक्रारअर्ज काढून टाकणे संयुक्तिक ठरेल असे या मंचाचे मत झाले आहे. या मंचास भौगोलिक अधिकारक्षेत्र नाही या निष्कर्षाप्रत सदरचा मंच आला असल्याने इतर मुद्यांचा ऊहापोह करणे अथवा त्यावर कोणताही निष्कर्ष काढणे संयुक्तिक होणार नाही असेही या मंचाचे मत आहे.
वरील सर्व विवेचनावरुन सदरचा मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
१. तक्रारदार याचा तक्रार अर्ज योग्य त्या मंचामध्ये दाखल करण्याची मुभा ठेवून काढून
टाकण्यात येत आहे.
२. खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
सांगली
दिनांकò: १२/८/२०११
(गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली जिल्हा मंच, सांगली.
प्रत: तक्रारदार यांना हातपोहोच/रजि.पोस्टाने दि.//२०११
जाबदार यांना हातपोहोच/रजि.पोस्टाने दि.//२०११