जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.
ग्राहक तक्रार क्रमांक – ९९/२०१३
तक्रार दाखल दिनांक – १९/११/२०१३
तक्रार निकाली दिनांक – २७/०६/२०१४
१) सौ. मंगला महादेव शेवतकर
उ.वय ५३ कामधंदा – घरकाम
२) उमाकांत महादेव शेवतकर
उ. वय ३५ कामधंदा – व्यवसाय
३) सौ.रूपाली उमाकांत शेवतकर
उ.व.२८ कामधंदा – घरकाम
४) नेहा शरद शेवतकर
उ.व.१६ कामधंदा – शिक्षण
रा.घर नं.२९७८ गल्ली नं.४ धुळे. - तक्रारदार
विरुध्द
श्री. समर्थ सहकारी पतपेढी मर्या. धुळे.
नोटीसची बजावणी मुख्यकार्यकारी अधिकारी यांचेवर करण्यात यावी.
सचिन सुरेश कुलकर्णी (मुख्य कार्यकारी अधिकारी)
११९९ नगरपट्टी धुळे. - सामनेवाले
न्यायासन
(मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही.दाणी)
(मा.सदस्य – श्री.एस.एस.जोशी)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – अॅड.एस.वाय. शिंपी)
(सामनेवाले तर्फे – एकतर्फा)
निकालपत्र
(द्वाराः मा.सदस्य – श्री.एस.एस.जोशी)
१. तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्या पतसंस्थेत बचत खात्यात गुंतवलेली रक्कम मागणी करुनही परत दिली नाही म्हणून त्यांनी सदरची तक्रार दाखल केली आहे.
- ‘श्री. समर्थ सहकारी पतपेढी मर्या. धुळे. या पतसंस्थेत बचत खात्यात रक्कम गुंतविली होती. त्याचा तपशील खालील प्रमाणे.
खाते नंदेय तारीखदेय रक्कम
- सेव्हींग खाते नं.४०/५४८३ १६/८/२०११ १०,०००/-
- सेव्हींग खाते नं.४०/५४८४ १६/८/२०११ १०,०००/-
- सेव्हींग खाते नं.४०/५४८५ १६/८/२०११ १०,०००/-
- सेव्हींग खाते नं.४०/५४८६ १६/८/२०११ १०,०००/-
-
एकूण रक्कम रू. ४०,००००/- +व्याज
- सबब तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्याकडून बचत खात्यात ठेवलेली रक्कम रूपये ४०,०००/- व त्यावर ९% प्रमाणे व्याज आणि मानसिक त्रासापोटी रूपये १५,०००/- व अर्जाचा खर्च रक्कम रूपये ५,००/- सामनेवाले यांचेकडून मिळावा, यासाठी सदरचा तक्रार अर्ज दाखल केला आहे.
४. तक्रारदार यांनी आपल्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ बचत खाते पासबुकच्या छायांकीत प्रती दाखल केल्या आहेत.
५. सामनेवाले यांना मे. मंचाच्या नोटीसची बजावणी होवूनही ते मुदतीत हजर झाले नाहीत व त्यांनी खुलासा दाखल केला नाही. त्यामुळे त्यांचेविरूध्द ‘एकतर्फा’ आदेश पारीत करण्यात आला आहे.
६. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज, शपथपत्र, पुराव्यासाठी दाखल कागदपत्रे पाहता आमच्यासमोर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात. त्याची उत्तरे आम्ही सकारण खालील प्रमाणे देत आहोत.
मुददे निष्कर्ष
- तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत काय ? होय
- सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सेवा देण्यात
कसूर केली आहे काय ? होय
- तक्रारदार हे सामनेवाले यांच्याकडून देय रक्कम
व्याजासह आणि मानसिक त्रास व तक्रार अर्जाच्या
खर्चापोटी भरपाई मिळण्यास पात्र आहेत काय ? होय
ड. आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे
७. मुद्दा ‘अ’ - तक्रारदार यांनी आपल्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ बचत खाते पासबुकच्या छायांकीत प्रती दाखल केल्या आहेत. सामनेवाले यांनी तक्रारदार यांची बचत खात्यातील रक्कम नाकारलेली नाही. सदरील बचत खात्यातील रक्कमेचा विचार होता तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे. म्हणून मुद्दा ‘अ’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
८. मुद्दा ‘ब’- तक्रारदार यांनी तक्रारीचे अनुषंगाने दाखल केलेली कागदपत्रे पाहता, त्यांनी पतसंस्थेत रक्कम गुंतविली होती ही बाब सिध्द होते. तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्याकडे गुंतवलेली रक्कम परत करणे हे पतसंस्थेचे कर्तव्य होते. परंतु मागणी करुनही रक्कम दिलेली नाही ही सामनेवाले यांची तक्रारदार यांना द्यावयाच्या सेवेतील त्रुटी आहे असे या मंचाचे मत आहे. म्हणून मुद्दा ‘ब’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
९. मुद्दा ‘क’ - तक्रारदार यांनी दाखल केलेली बचत खात्यातील व्याजासह होणारी रक्कम सामनेवाले यांच्याकडून मिळावी अशी मागणी केलेली आहे. या सर्व बाबींचा विचार होता तक्रारदार हे सामनेवाले पतसंस्था श्री. समर्थ सहकारी पतपेढी मर्या. धुळे यांचेकडून बचत खात्यामधील देय रक्कम रूपये ४०,०००/- व त्यावर दि.१६/०८/२०११ पासून संपूर्ण रक्कम फिटेपर्यंत द.सा.द.शे.६ टक्के दराप्रमाणे व्याज अशी एकूण रक्कम मिळण्यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे.
तक्रारदार यांची व्याजासह होणारी रक्कम सामनेवाले यांच्याकडून परत मिळावी म्हणून तक्रारदार यांना सामनेवाले पतसंस्था श्री. समर्थ सहकारी पतपेढी मर्या. धुळे यांच्या विरुध्द या मंचात दाद मागावी लागली आहे. त्यामुळे त्यांना मानसिक त्रास सहन करावा लागलेला आहे व अर्ज दाखल करण्यासाठी खर्चही करावा लागलेला आहे. सबब तक्रारदार हे सामनेवाले यांच्या कडून मानसिक त्रासापोटी रु.२०००/- व अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रू.५००/- भरपाई मिळण्यास पात्र आहे असे या मंचाचे मत आहे. म्हणून मुद्दा ‘क’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
१०. मुद्दा ‘ड’ - वरील सर्व विवेचनावरून पुढील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे.
आ दे श
- तक्रारदार यांचा तक्रार अर्ज मंजूर करण्यात येत आहे.
- श्री. समर्थ सहकारी पतपेढी मर्या. धुळे यांनी तक्रारदार यांना सदर आदेशाचे तारखेपासून पुढील तीस दिवसांचे आत बचत खात्यामधील देय रक्कम रूपये ४०,०००/- व त्यावर दि.१६/०८/२०११ पासून संपूर्ण रक्कम फिटेपर्यंत द.सा.द.शे.६ टक्के दराप्रमाणे व्याज अशी एकूण रक्कम अदा करावी.
३. मानसिक त्रासापोटी रक्कम रू.२,०००/- (अक्षरी रूपये दोन हजार मात्र) व
अर्जाचे खर्चापोटी रक्कम रू.५,००/- (अक्षरी रूपये पाचशे मात्र) दयावेत.
४. वर नमूद आदेशाची अमंलबजावणी (अध्यक्ष/ संचालक/ व्यवस्थापक/ अवसायक) यापैकी वेळोवेळी जे कोणी पतसंस्थेचा कारभार पाहात असतील त्यांनी करावी. तसेच आदेश क्रं. २ मधील रकमेपैकी काही रक्कम अगर व्याज दिले असल्यास, कर्ज दिले असल्यास सदरची रक्कम वजावट करुन उर्वरित रक्कम अदा करावी.
-
-
(श्री.एस.एस. जोशी) (सौ.व्ही.व्ही. दाणी)
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.