जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2010/203 प्रकरण दाखल तारीख - 26/08/2010 प्रकरण निकाल तारीख – 02/02/2011 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील - अध्यक्ष मा.श्रीमती सुवर्णा देशमूख, पिंगळीकर - सदस्या. प्रशांत माधवराव पांचाळ वय 30 वर्षे, धंदा शेती अर्जदार. रा. कामठा (खु) ता.जि. नांदेड. विरुध्द. व्यवस्थापक, श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनी लि. रा.तिसरा माळा, जानकी चेंबर्स गैरअर्जदार जानकी नगर, हिंगोली रोड, नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड.जी.के.पोफळे गैरअर्जदारा तर्फे वकील - अड.पी.एस.भक्कड. निकालपञ (द्वारा - मा.श्रीमती सुवर्णा देशमुख, सदस्या ) गैरअर्जदार यांनी ञूटीची सेवा दिली म्हणून अर्जदार यांनी खालील प्रमाणे तक्रार दाखल केली आहे. थोडक्यात अर्जदाराची तक्रार अशी की, अर्जदार हे वाहतूक व्यापार करण्याचा व्यवसाय करतात. गैरअर्जदार हे व्यावसायीकांना ट्रक, वाहणे, वगैरे खरेदी करण्यासाठी कर्जाऊ अर्थ पुरवठा करतात. अर्जदाराने डिसेंबर 2007 मधे ट्रक खरेदी कण्यासाठी गैरअर्जदाराकडून रु.11,70,000/- चे कर्ज घेतले व सदर कर्ज 53 हप्त्यामध्ये एप्रिल 2012 पर्यत परतफेड करावयाचे ठरले होते. दि.8.2.2010 रोजी पर्यत रु.5,96,000/- ची परतफेड अर्जदाराने केली. सप्टेंबर 2009 रोजी निजार जि.नाशिक येथे अर्जदाराचे ट्रकचा अपघात होऊन वाहनाचे नूकसान झाले. तसेच एक व्यक्ती मयत झाला तसेच अर्जदाराच्या भावास फुफुसांचा कँसर झाल्यामूळे अर्जदारास त्यांचे ऑपरेशन करुन घ्यावे लागले. त्यासाठी सर्व कूटूंब हे अर्जदारावर अवलंबून होते. अर्जदाराची खूप आर्थिक ओढाताण झाली. तरी अर्जदाराने एप्रिल 2010 पर्यत एकूण जवळपास 28 हप्ते होतात त्यांचे रु.8,71,000/- जमा केले पाहिजे परंतू अर्जदाराने रु.5,96,000/- जमा केले. अडचणीमूळे काही हप्ते वेळेवर भरणे झाले नाही. या संधीचा फायदा घेऊन गैरअर्जदाराने कूठलीही सूचना न देता किंवा नोटीस न देता एप्रिल 2010 रोजी अर्जदाराचा ट्रक ताब्यात घेतला. असे करुन गैरअर्जदाराने अनूचित कृत्य केले आहे.त्यामूळे अर्जदार व त्यांचे कूटूंबावर उपासमारीची वेळ आली आहे. गैरअर्जदाराने त्यांना दंड व इतर अनावश्यक चार्जेस लावले. त्या कर्ज खात्याचा उतारा व कराराची प्रत दि.16.8.2010 रोजी मागितली असता त्यांनी ट्रक विक्री करण्याची धमकी दिली व विनंती फेटाळून लावली. एप्रिल 2010 पासून ट्रक हा गैरअर्जदाराच्या ताब्यात आहे. त्यामूळे अर्जदाराचे दररोजचे रु.4000/- चे नूकसान होत आहे. आजपर्यत अर्जदाराचे रु.4,48,000/- चे नूकसान झाले आहे. म्हणून अर्जदाराची मागणी आहे की, नूकसानी बददल रु.1,00,000/- व मानसिक ञासाची नूकसान भरपाई असे एकूण रु.5,48,000/- मिळावेत तसेच अर्जदाराचा ट्रक परत मिळावा तसेच अनावश्यक दंड व व्याज व इतर चार्जेस कमी करुन तडजोड करुन थकीत रक्कमेचे हप्ते करुन द्यावेत अशी मागणी केली आहे ? गैरअर्जदार हे वकिलामार्फत हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. अर्जदाराची तक्रार ही खोटी असून ती फेटाळावी असे म्हटले आहे. अर्जदाराने रु.11,70,000/- चे कर्ज घेतले आहे व गैरअर्जदाराच्या हक्कात लोन कम हायपोथीकेशन अग्रीमेंट करुन दिला आहे. त्यामूळे सदर करारानुसार लवाद नेमण्याचा करार झाला आहे. म्हणून या मंचास तक्रार चालविण्याचा अधिकार नाही. गैरअर्जदाराने अर्जदारास कोणतीही ञूटीची सेवा दिलेली नाही.करारनाम्याप्रमाणे अर्जदाराने गैरअर्जदाराकडे दि.10.10.2010 रोजी रु.11,70,925/- जमा करणे आवश्यक होते परंतु अर्जदाराने रु.6,02,400/- जमा केलेले आहेत. अर्जदाराने गैरअर्जदाराकडून वेळोवेळी टायर्स विकत घेण्याकरिता रु.88,000/- अतिरिक्त कर्ज घेतलेले आहे. अर्जदाराने ट्रकचा विमा काढलेला नव्हता त्यामूळे गैरअर्जदाराने दि.30.10.20008 ते 30.10.2009 रोजी ट्रकचा विमा काढला व त्याकरिता गैरअर्जदारास रु.45,825/- भरावे लागले. सदरची रक्कम पण अर्जदाराने गैरअर्जदारास दिलेली नाही. असे एकूण गैरअर्जदारास दि.10.10.2010 रोजी अर्जदाराकडून रु.13,03,825/- येणे बाकी आहे.कर्ज न भरण्यासाठी दाखविलेली कारणे ही खोटी आहेत व त्याकरिता कोणतेही कागदपञे अर्जदाराने दिलेली नाहीत.अर्जदाराने केव्हाही ठरलेल्या तारखेवर ठरलेली रक्कम भरलेली नाही व कर्जाची रक्कम भरण्यास जाणीवपूर्वक कसूर केला आहे. अर्जदाराचा ट्रक हा नियमाप्रमाणे ताब्यात घेतलेला आहे त्यानी कोणतेही सेवेमध्ये ञूटी केलेली नाही. तसेच आजही अर्जदार दि.7.5.2010 रोजीच्या नोटीसीप्रमाणे रु.11,02,255/- व दि.7.5.2010 पासूनचे व्याज व दंडव्याजाची रक्कम भरण्यास तयार असतील तर ते आजही ट्रकचा ताबा देण्यास तयार आहेत.अर्जदार जर रु.4,000/- दररोजचे नूकसान मागत असतील तर ते महिन्याला रु.1,20,000/- उत्पन्न मिळवित होते मग ते कर्जाची परतफेड का करीत नाहीत ? हा प्रश्न आहे. म्हणून अर्जदाराची तक्रार ही खर्चासह फेटाळण्यात यावी असे म्हटले आहे. अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेले कागदपञाप्रमाणे व दोन्ही बाजूचा यूक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. अर्जदार हा गैरअर्जदार यांचा ग्राहक आहे काय ? होय. 2. अर्जदाराने मागणी केलेली नूकसान भरपाई देण्यास गैरअर्जदार बांधील आहेत काय ? नाही. 3. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे मूददा क्र.1 व 2 ः- अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडून ट्रक क्र.एम.एच.-22/एन-719 साठी अर्थपुरवठा घेतला होता म्हणजे अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत व गैरअर्जदार यांनी सूध्दा हे मान्य केला आहे की ट्रक घेण्यासाठी अर्जदार व त्यांचे मध्ये करार झालेला आहे म्हणून अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत म्हणून मूददा क्र.1 चे उत्तर सकारात्मक देण्यात येते. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडून ट्रक एम.एच.-22/एन-719 साठी कर्ज रु.11,02,255/- घेतले होते व तसा करार झाला होता या बाबत गैरअर्जदार यांनी कागदपञ दाखल केलेले आहेत. तसेच अर्जदार यांनी कर्जाची रक्कम रु.6,02,400/- एवढीच जमा केलेली आहे. कराराप्रमाणे दि.10.10.2010 रोजी रु.11,70,925/- होते म्हणजे अर्जदार हा डिफॉलटर आहे. त्याने कर्जाची रक्कम वेळेवर व योग्य हप्ता भरलेला नाही हे सिध्द होते. तसेच अर्जदाराने जे देना बँकेचे चेक दिलेले आहेत ते सुध्दा रक्कम अपर्याप्त है म्हणून वापस आलेले आहे त्यांचे बँकेचे पञ गैरअर्जदार यांनी दाखल केलेले आहे. म्हणजे अर्जदार हा कर्जाची रक्कम वेळेवर भरत नव्हता हे सिध्द होते. तसेच त्यांनी कर्जाची रक्कम परतफेड करण्यास कसूर केलेला आहे.अर्जदार हा WILLFUL DEFULTER आहे. तसेच गैरअर्जदार यांनी लेखी यूक्तीवाद दाखल केला त्यामध्ये सूध्दा अर्जदारास जे कर्ज रक्कम रु.11,70,000/- दिले होते व त्या कर्जाला 7.65 टक्के व्याज होते तसेच ते कर्ज अर्जदाराने 45 हप्त्यामध्ये रु.33,455/- माहे प्रमाणे भरावयाचे होते परंतु कर्जाची रक्कम 53 हप्त्यामध्ये भरावयाची होती हे अर्जदाराचे म्हणणे बरोबर नाही. अर्जदाराने गैरअर्जदाराकडे दि.10.10.2010 रोजी रु.11,70,925/- भरावयास पाहिजे होते परंतु रु.6,02,400/- एवढेच जमा केले होते म्हणजे अर्जदार हा स्वतः Defaulter आहे. तसेच अर्जदार हा स्वच्छ हाताने मंचासमोर आलेला नाही कारण त्यांनी टायर्सचे कर्ज रु.88,000/- व ट्रकचा विमा रु.45,825/- बददल गैरअर्जदाराकडून कर्ज घेतले होते ही बाब लपवून ठेवलेली आहे. अर्जदाराने जाणूनबूजून कर्जाची रक्कम भरावयास कसूर केलेला आहे तसेच त्यांनी कर्ज न भरण्याचे कारण जे दिलेले आहे त्याबददल कोणताही पूरावा मंचासमोर दाखल केलेला नाही.गैरअर्जदारास ट्रक ताब्यात घेण्याचा अधिकार आहे व त्या अधिकाराद्वारे ट्रकचा ताबा घेतला आहे.अर्जदारास वारंवार कर्जाच्या रक्कमेची मागणी करुन सूध्दा अर्जदाराने जाणूनबूजून कर्जाची रक्कम दिलेली नाही. गैरअर्जदार यांनी जी कारवाई केलेली आहे ती नियमानुसार केलेली आहे व अर्जदाराने कराराचा भंग केल्यानंतर त्यांला वेळोवेळी गैरअर्जदार यांनी नोटीस दिलेल्या आहेत पण वेळोवेळी नोटीस देऊन सूध्दा अर्जदार हा कर्जाची रक्कम भरीत नव्हता. गैरअर्जदाराने नियमाप्रमाणे व पोलिस स्टेशन लातूर ग्रामीण यांना सूचना देऊन नियमाप्रमाणे कारवाई केलेली आहे. असे करुन गैरअर्जदार यांनी सेवेत ञूटी केली असे म्हणता येत नाही. आजही अर्जदार जर रक्कम रु.11,02,255/- व दि.7.5.2010 पासूनचे व्याज व दंडव्याजाची रक्कम भरत असतील तर ते त्यांना त्यांचा ट्रक परत करण्यास तयार आहेत. जर अर्जदारास ट्रक पाहिजे असेल तर त्यांनी वरील रक्कम गैरअर्जदारास द्यावी व ट्रक परत घ्यावा.जर त्यांना हप्ते पाडून पाहिजे असतील तर ते तशी विनंती गैरअर्जदारास करु शकतील. ज्यांचा विचार गैरअर्जदार हे माणूसकीच्या व उदारतेच्या दृष्टीने नक्कीच करतील. वरील सर्व बाबीचा विचार केला तर अर्जदार यांनी कराराचा वेळोवेळी भंग केल्याचे दिसून येते, तसेच कर्जाची रक्कम भरणे त्यांना अपरिहार्य असताना त्यांनी कर्जाची रक्कम भरलेली नाही. कर्ज न भरल्यामूळे गैरअर्जदार यांनी ट्रक नेला असे करुन त्यांनी कोणतीही सेवेत ञूटी केलेली नाही या नीर्णयास्तव हे मंच आलेले आहे.त्यामुळे त्यांच्या विरुध्द अर्जदाराची वरील मागणी मंजूर होऊच शकत नाही. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज फेटाळण्यात येतो. 2. खर्च ज्यांचा त्यांनी आपआपला सोसावा. 3. पक्षकारांना आदेश कळविण्यात यावा. श्री.बी.टी.नरवाडे पाटील श्रीमती सुवर्णा देशमूख अध्यक्ष सदस्या जयंत पारवेकर लघूलेखक.
| [HON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh] MEMBER[HON'BLE President B.T.Narwade] PRESIDENT | |