जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच बीड यांचे समोर
बैठक लातूर
ग्राहक तक्रार क्रमांक –183/2011 तक्रार दाखल तारीख –05/12/2011
श्रीमंत रामभाऊ ढाकणे
वय 33 वर्षे धंदा व्यापार .तक्रारदार
रा.अस्वल अंबा ता.परळी जि.बीड
विरुध्द
1. मॅनेजर,
श्रीराम जनरल इन्शुरन्स कंपनी लि.
इ-8, इ पी आय रिको, इंडस्ट्रीयल एरिआ,
सितपुरा, जयपुर राजस्थान. .सामनेवाला
को र म - पी.बी.भट, अध्यक्ष
अजय भोसरेकर, सदस्य.
तक्रारदारातर्फे :- अँड.डी.डी.वाघमारे
सामनेवाले तर्फे :- अँड.एस.एल.वाघमारे
निशानी क्र.01 वरील आदेश
सदरची तक्रार आज दिनांक 20.12.2011 रोजी तडजोडीसाठी बोर्डावर तक्रारदारांचे अर्जा वरुन घेण्यात आली.
तक्रारदारांचा दावा सामनेवालेनी नाकारला म्हणून तक्रारदारांनी सदरची तक्रार दाखल केलेली आहे. सदर तक्रारीत तक्रारदार आणि सामनेवाले यांच्यात न्यायमंचाबाहेर अपसात समझोता झालेला आहे. त्यानुसार सामनेवाले तक्रारदारांना रक्कम रु.3,80,000/- (अक्षरी रु.तिन लाख ऐंशी हजार रुपये फक्त) अंतिम आणि पूर्ण समाधानाने देण्यास तयार आहेत. तक्रारदार ही सदरची रक्कम घेण्यास तयार आहेत. तसे समझोतापत्र दाखल आहे.
तक्रारदार, त्यांचे वकील डी.डी.वाघमारे, सामनेवालेचे वकील व अधिकृत प्रतिनिधी वकील एस.एस.वाघमारे अधिकार पत्र, वकील पत्रासह हजर आहेत. तक्रारदार व सामनेवाले यांच्यात तडजोड पत्रात नमुद केल्याप्रमाणे तडजोड झालेली असल्याने त्याप्रमाणे निकाली करणे उचित होईल असे न्यायमंचाचे मत आहे.
सबब न्यायमंच खालील प्रमाणे आदेश देत आहे.
आदेश
1. तक्रारदार आणि सामनेवाले यांच्यातील तडजोडी प्रमाणे तक्रार निकाली.
1.
(अजय भोसरेकर ) (पी.बी.भट)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,लातूर