सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
वसुली प्रकरण क्र.10/2011
श्री राजेंद्र सखाराम महाजन
वय वर्षे 45, धंदा- व्यापार,
तर्फे कुलमुखत्यारी
श्री दत्तप्रसाद मनोहर महाजन
वय वर्षे 42, धंदा- व्यापार,
दोघेही रा. बांदा, ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग ... तक्रारदार/फिर्यादी
विरुध्द
1) सातेरी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित,
साटेली भेडशी तर्फे सरव्यवयस्थापक
श्री लक्ष्मण पांडुरंग मोरजकर
वय- सज्ञान, धंदा- नोकरी
रा.साटेली-भेडशी, ता.दोडामार्ग,जि. सिंधुदुर्ग
2) सातेरी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित,
साटेली भेडशी तर्फे चेअरमन
श्री कृष्णा पांडुरंग मोरजकर
वय- सज्ञान, धंदा- व्यवसाय
रा.भेडशी, ता.दोडामार्ग, जि. सिंधुदुर्ग ... विरुध्द पक्ष/आरोपी
गणपूर्तीः- 1) श्रीम. अपर्णा वा. पळसुले. अध्यक्ष
2) श्रीमती सावनी सं .तायशेटे सदस्य
3) श्री. कमलाकांत ध.कुबल, सदस्य.
तक्रारदारतर्फे – श्री दत्तप्रसाद महाजन
विरुद्ध पक्षातर्फे – व्यवस्थापक श्री लक्ष्मण पांडूरंग मोरजकर
आदेश नि.20 वर
(दि. 29/04/2014)
द्वारा : मा.अध्यक्ष, श्रीम. अपर्णा वा. पळसुले.
1) तक्रारदार/फिर्यादी यांनी विरुध्द पक्ष/आरोपी यांचेविरुध्द ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 27 अन्वये रक्कम वसुल होऊन मिळणेसाठी दरखास्त प्रकरण दाखल करण्यात आले आहे.
2) दरम्यान तक्रारदार/फिर्यादी यांनी नि.20 वर अर्ज देऊन विरुध्द पक्ष/आरोपी यांनी आदेशीत सर्व रक्कमेची परतफेड केली असल्याने सदरचे दरखास्त प्रकरण निकाली काढणेबाबत विनंती केली आहे. सदरच्या अर्जास अनुसरुन आम्ही खालील आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
1) तक्रारदार/फिर्यादी यांच्या नि.20 वरील अर्जास अनुसरुन सदरचे दरखास्त प्रकरण निकाली काढण्यात येते.
2) आरोपीचे बेलबॉंड रद्द करण्यात येतात.
ठिकाणः सिंधुदुर्गनगरी
दिनांकः 29/04/2014
Sd/- Sd/- Sd/-
(के. डी. कुबल) (ए. व्ही. पळसुले) (एस. एस. तायशेटे)
सदस्य, अध्यक्ष सदस्य
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग तथा न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग, सिंधुदुर्ग
प्रत तक्रारदार यांना हातपोहोच/रजि पोस्टाने रवाना दि.
प्रत विरुद्ध पक्ष यांना हातपोहोच/रजि. पोस्टाने रवाना दि.