सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
वसुली प्रकरण क्र.08/2011
(मूळ तक्रार क्रमांक 41/2009)
सौ.माया दत्तप्रसाद महाजन
वय 40 वर्षे, धंदा- गृहीणी,
तर्फे कुलमुखत्यारी,
श्री दत्तप्रसाद मनोहर महाजन
वय वर्षे 42, धंदा – व्यापार,
दोघेही रा.बांदा, ता.सावंतवाडी,
जि. सिंधुदुर्ग ... अर्जदार/तक्रारदार
विरुध्द
1) सातेरी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत,
साटेली भेडशी तर्फे सरव्यवस्थापक,
श्री लक्ष्मण पांडूरंग मोरजकर
वय – सज्ञान, धंदा- नोकरी,
रा.साटेली-भेडशी, ता.दोडामार्ग,
जि. सिंधुदुर्ग
2) सातेरी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत,
साटेली भेडशी तर्फे चेअरमन,
श्री कृष्णा पांडूरंग मोरजकर
वय – सज्ञान, धंदा – व्यवसाय,
रा. भेडशी, ता.दोडामार्ग,
जि. सिंधुदुर्ग ... ... विरुध्द पक्ष/आरोपी
गणपूर्तीः- 1) श्रीम. अपर्णा वा. पळसुले. अध्यक्ष
2) श्री. कमलाकांत ध.कुबल, सदस्य, . 3) श्रीमती वफा ज. खान, सदस्य तक्रारदारतर्फे – कोणीही नाही
विरुद्ध पक्षातर्फे – प्रतिनिधी हजर.
नि. 1 खालील आदेश
(दि.29/04/2015)
द्वारा : मा. सौ.अपर्णा वासुदेव पळसुले, अध्यक्ष
प्रस्तुतची दरखास्त तक्रारदाराने मुळ तक्रार अर्ज 41/2009 मधील तडजोड आदेशानुसार पारीत केलेल्या निकालानुसार विरुध्द पक्ष यांचेकडून रक्कम रु.1,52,500/- व त्यावरील व्याज द.सा.द.शे.9% दराने वसुल होऊन मिळणेसाठी दाखल केली आहे. विरुध्द पक्षाने नि.30 कडे अर्ज देऊन या मंचाच्या आदेशानुसार संपूर्ण ठेवीची रक्कम अदा केलेली आहे. त्यामुळे सदरची दरखास्त निकाली काढावी अशी विनंती केलेली आहे. विरुध्द पक्षाने अर्जासोबत तक्रारदारांना वेळोवेळी दिलेल्या रक्कमांबाबतचे विवरणपत्र दाखल केलेले आहे. तक्रारदारांनी नि.30 च्या अर्जावर पुरेशी संधी देऊन देखील म्हणणे दाखल केलेले नाही. सदर अर्जासोबतचे विवरणपत्र पाहता या मंचाच्या आदेशानुसार संपूर्ण रक्कम फेड केल्याचे दिसून येते. तसेच विरुध्द पक्षाने सदरच्या सर्व रक्कमा तक्रारदारांना दिलेबाबतचे व त्याबाबत तक्रारदारांच्या पोचपावत्या म्हणून सही असलेचे कागदपत्र या मंचासमोर दाखल केलेले आहेत. ही सर्व कागदपत्रे तक्रारदारांनी नाकारलेली नाहीत. तसेच तक्रारदार हे दि.29/09/2014 पासून या मंचासमोर हजर राहिलेले नाहीत. सबब विरुध्द पक्ष यांनी दिलेला नि.30 चा अर्ज मंजूर करणेत येतो व सदरचा वसुली अर्ज निकाली काढणेत येतो. खर्चाबाबत आदेश नाही. नि.3/3 च्या पुरसीसमधील अट नं.3 नुसार तक्रारदारांनी मूळ ठेव पावत्या विरुध्द पक्ष पतसंस्थेस आदेश दिनांकापासून 4 आठवडयात परत कराव्यात. विरुध्द पक्ष यांचे बेलबॉंड रद्द करण्यात येतात.
ठिकाणः सिंधुदुर्गनगरी
दिनांकः 29/04/2015
(वफा जमशीद खान) (अपर्णा वा. पळसुले) (कमलाकांत ध.कुबल)
सदस्य, अध्यक्ष, सदस्य,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग तथा न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग, सिंधुदुर्ग