Maharashtra

Dhule

CC/12/184

Shri Nimba Zulal Patil & Other 1 - Complainant(s)

Versus

Manager, Shri Sandip U.Rajput, Shri Dhynraj Mauli Nagri sahkari patsanstha Ltd.Dhule - Opp.Party(s)

Shri D.D. Gangurde

30 Aug 2013

ORDER

DISTRICT CONSUMER FORUM DHULE
 
Complaint Case No. CC/12/184
 
1. Shri Nimba Zulal Patil & Other 1
R/o Avdhan, Post laling,tal.Dhule
Dhule
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Manager, Shri Sandip U.Rajput, Shri Dhynraj Mauli Nagri sahkari patsanstha Ltd.Dhule
14 Ekviranager,Nakane Rd. Devpur Dhule
Dhule
Maharashtra
2. Shri pankaj Sudhakar Bhokre, Chairman Shri Dhynraj Mauli Nagri sahkari patsanstha Ltd.Dhule
14 Ekviranager,Nakane Rd. Devpur Dhule
Dhule
Maharashtra
3. Shri Hukumrao Uttamrao Jadhav, Dy.Chairman ,Shri Dhynraj Mauli Nagri sahkari patsanstha Ltd.Dhule
R/o Siddhivinayak Hsg.Society,Tulsiramnager,Devpur Dhule
Dhule
Maharashtra
4. Shri Ravindra Vitthal Bhokre,Director,Shri Dhynraj Mauli Nagri sahkari patsanstha Ltd.Dhule
14 Ekviranager,Nakane Rd. Devpur Dhule
Dhule
Maharashtra
5. Shri Hemantkumar Lukesingh Patil,Director,Shri Dhynraj Mauli Nagri sahkari patsanstha Ltd.Dhule
Shradhanager,Nakane Rd. Devpur Dhule
Dhule
Maharashtra
6. Shri Arun Baburao Mali,Director,Shri Dhynraj Mauli Nagri sahkari patsanstha Ltd.Dhule
Gali No.14,Subhashnager,Old Dhule
Dhule
Maharashtra
7. Shri Ravindra Raghunath nankar,Director, Shri Dhynraj Mauli Nagri sahkari patsanstha Ltd.Dhule
At Post Borkund,Tal.Dhule
Dhule
Maharashtra
8. Shri Ravindra Ramchandra Kulkarni,Directoe, Shri Dhynraj Mauli Nagri sahkari patsanstha Ltd.Dhule
Santoshi Mata colony,Nakane Rd, Devpur Dhule
Dhule
Maharashtra
9. Sau.Hemlata Vitthalsingh Rajput,Director,Shri Dhynraj Mauli Nagri sahkari patsanstha Ltd.Dhule
48 Shradhanager,Nakane Rd.Devpur Dhule
Dhule
Maharashtra
10. Shri Adhar Zenda Wagh,Director,Shri Dhynraj Mauli Nagri sahkari patsanstha Ltd.Dhule
Santoshi Mata colony,Nakane Rd. Devpur Dhule
Dhule
Maharashtra
11. Shri Natwar Ramdas Khairnar,Director,Shri Dhynraj Mauli Nagri sahkari patsanstha Ltd.Dhule
Swami Vivekanand nager,Nakane Rd. Devpur Dhule
Dhule
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MRS. V.V. Dani PRESIDENT
 HON'ABLE MRS. S. S. Jain MEMBER
 HON'ABLE MR. S.S. Joshi MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच, धुळे.


 

 


 

                                  ग्राहक तक्रार क्रमांक –   १८४/२०१२


 

                                  तक्रार दाखल दिनांक – ३१/१०/२०१२


 

                                 तक्रार निकाली दिनांक – ३०/०८/२०१३


 

१) श्री निंबा झुलाल पाटील


 

    वय ५५ वर्षे, धंदा– शेती


 

२) सौ.बेबाबाई निंबा पाटील


 

    वय ५० वर्षे, धंदा– घरकाम


 

    दोन्‍ही राहणार– अवधान, पो. लळींग,


 

    ता.जि. धुळे.                                 ................ तक्रारदार


 

 


 

        विरुध्‍द


 

 


 

१)          श्री ज्ञानराज माऊली नागरी सहकारी पतसंस्‍था म. धुळे


 

    १४, एकविरानगर, नकाणेराड, देवपूर, धुळे


 

    श्री संदीप उदेसिंग राजपूत – म. मॅनेजर


 

२)  श्री पंकज सुधाकर भोकरे - चेअरमन


 

    रा.१४, एकविरानगर, नकाणेराड, देवपूर, धुळे


 

३) श्री रविंद्र विठ्ठल भोकरे – संचालक


 

    रा.१४, एकविरानगर, नकाणेराड, देवपूर, धुळे


 

४) श्री हेमंतकुमार लुकेसिंग पाटील – संचालक


 

    रा. श्रध्‍दानगर, नकाणेरोड, देवपूर, धुळे.


 

५) श्री रविंद्र रघुनाथ नानकर – संचालक


 

    रा. मु.पो. बोरकुंड, ता.जि. धुळे.


 

६) श्री रविंद्र रामचंद्र कुलकर्णी – संचालक


 

    रा. संतोषी माता कॉलनी, नकाणेरोड, देवपूर, धुळे.


 

७) सौ.हेमलता विठ्ठलसिंग राजपूत – संचालिका


 

    रा.४८, श्रध्‍दानगर, नकाणेरोड, देवपूर, धुळे.       ............ जाबदेणार


 

 


 

न्‍यायासन  


 

 (मा.अध्‍यक्षा – सौ.व्‍ही.व्‍ही. दाणी)


 

 (मा.सदस्‍या – सौ.एस.एस.जैन)


 

(मा.सदस्‍य – श्री.एस.एस.जोशी)


 

 


 

उपस्थिती


 

(तक्रारदारा तर्फे – अॅड.डी.डी. गांगुर्डे)


 

(जाबदेणार  तर्फे – अॅड.एन.एल. रायते)


 

 


 

 


 

निकालपत्र


 


 (दवाराः मा.अध्‍यक्षा – सौ.व्‍ही.व्‍ही. दाणी)


 

 


 

तक्रारदार यांनी जाबदेणार  यांच्‍या पतसंस्‍थेत मुदत ठेव पावती अन्‍वये गुंतवलेली रक्‍कम मागणी करुनही परत दिली नाही म्‍हणून त्‍यांनी प्रस्‍तुत तक्रार या मंचात दाखल केली आहे.


 

 


 

१. तक्रारदार यांची थोडक्‍यात अशी तक्रार आहे की, तक्रारदार यांनी जाबदेणार  श्री ज्ञानराज माऊली नागरी सहकारी पतसंस्‍था म. धुळे(यापुढे संक्षीप्‍तेसाठी पतसंस्‍था असे संबोधण्‍यात येईल) या पतसंस्‍थेत मुदत ठेव पावती अंतर्गत रक्‍कम गुंतविली होती. त्‍याचा तपशील खालील प्रमाणे आहे.


 

 


 

 


 













































































मुदत ठेव पावती क्रं.

ठेव दिनांक

देय दिनांक

ठेव

रक्‍कम

मुदतीनंतर मिळणारी रक्‍कम

निंबा झुलाल पाटील यांचे नावे असलेल्‍या ठेव पावत्‍या


२६-१२-०४

२६-१२-१०

१००००

२००००


२६-१२-०४

२६-१२-१०

१००००

२००००


२६-१२-०४

२६-१२-१०

१००००

२००००


२६-१२-०४

२६-१२-१०

१००००

२००००

१०

२६-१२-०४

२६-१२-१०

१००००

२००००

बेबाबाई निंबा पाटील यांचे नावे असलेल्‍या ठेव पावत्‍या

११

२६-१२-०४

२६-१२-१०

१००००

२००००

१२

२६-१२-०४

२६-१२-१०

१००००

२००००

१३

२६-१२-०४

२६-१२-१०

१००००

२००००

१४

२६-१२-०४

२६-१२-१०

१००००

२००००

१५

२६-१२-०४

२६-१२-१०

१००००

२००००

                    एकुण रू.

१०००००

२०००००


 

२.   तक्रारदार यांनी जाबदेणार यांच्‍याकडे वरील देय रक्‍कमेची वेळोवेळी मागणी केली असता जाबदेणार  यांनी सदरील रक्‍कम तक्रारदार यांना दिली नाही. सबब तक्रारदार यांनी जाबदेणार यांच्‍याकडून मुदत ठेव पावतींमधील एकूण रक्‍कम रू.२,००,०००/- मिळावी. तसेच मानसिक, आर्थिेक व शारीरीक त्रासापोटी रू.२५,०००/- व तक्रार अर्जाचा खर्च रू.५,०००/- जाबदेणार यांचेकडून मिळावा, याकामी सदरचा तक्रार अर्ज दाखल करण्‍यात आला. 


 

 


 

     तक्रारदार यांनी आपल्‍या म्‍हणण्‍याच्‍या पृष्‍ठयार्थ मुदत ठेव पावत्‍यांच्‍या छायांकित प्रती दाखल केलेल्‍या आहेत.


 

 


 

३.   जाबदेणार  यांनी आपल्‍या लेखी खुलाश्‍यात असे म्‍हटले आहे की, तक्रारदार यांची तक्रार खोटी व बनावट असल्‍याने रदृ होण्‍यास पात्र आहे. तक्रारीतील कथने खोटी व लबाडीची असल्‍याने जाबदेणार  यांना मान्‍य व कबुल नाही. तसेच जाबदेणार  यांनी पुढे असे म्‍हटले आहे की, धुळे शहरातील काही पतसंस्‍थांच्‍या कारभारामुळे जाबदेणार नं.१ पतसंस्‍थेतील आर्थिक व्‍यवहार काही महिन्‍यांपासुन कर्जवसुली अभावी काही प्रमाणात कमी झालेले आहेत, त्‍यामुळे एकाच वेळेला सर्व ठेवीदारांना एकदम रक्‍कम देणे जाबदेणार यांना अशक्‍य झालेले आहे. तक्रारदारांच्‍या व्‍यतिरिक्‍त अन्‍य ठेवीदारांच्‍या ठेवीदेखील दरम्‍यानचे काळात मॅच्‍युअर्ड झालेल्‍या असुन जाबदेणार यांनी सदर ठेवीदारांना क्रमाने सदर मुदतठेवींची रक्‍कम देण्‍यास सुरूवात केलेली आहे. तसेच जाबदेणार  हे तक्रारदार यांस इतर ठेवीदारांना ज्‍या क्रमाने ठेवीची रक्‍कम देत आहेत त्‍याप्रमाणेच तक्रारदार यांना देखील क्रमाने रक्‍कम देण्‍यास तयार आहेत.  


 

 


 

४.   तक्रारदार यांचा तक्रार अर्ज, शपथपत्र, पुराव्‍यासाठी दाखल कागदपत्रे पाहता व विदवान वकीलानी केलेला युक्तिवाद ऐकल्‍यानंतर, आमच्‍यासमोर निष्‍कर्षासाठी खालील मुददे उपस्थित होतात व त्‍याची उत्‍तरे आम्‍ही सकारण खालील प्रमाणे देत आहोत.


 

 


 

              मुददे                                   निष्‍कर्ष


 

१.     तक्रारदार हे जाबदेणार  यांचे ग्राहक आहेत काय ?                होय


 

२.     जाबदेणार  यांनी तक्रारदार यांना सेवा देण्‍यात    


 

कमतरता केली आहे काय ?                                                   होय


 

३.     तक्रारदार हे जाबदेणार  यांच्‍याकडून देय रक्‍कम


 

व त्‍यावरील व्‍याज मिळण्‍यास पात्र आहेत काय ?           होय


 

४.     तक्रारदार हे जाबदेणार  यांच्‍याकडून मानसिक


 

त्रास व तक्रार अर्जाच्‍या खर्चापोटी रक्‍कम वसुल होऊन


 

मिळण्‍यास पात्र आहेत काय ?                           होय


 

५.     अंतिम आदेश ?                                 आदेशाप्रमाणे


 

 


 

विवेचन


 

५.   मुद्दा क्र.१-  तक्रारदार यांनी मुदत  ठेव  पावत्‍यांच्‍या  छायांकित प्रती दाखल केलेल्‍या आहेत. जाबदेणार  यांनी तक्रारदार यांच्‍या  मुदत ठेव पावत्‍यांमधील रक्‍कमा नाकारलेल्‍या नाही. मुदत ठेव पावत्‍यांमधील असलेली रक्‍कम याचा विचार होता तक्रारदार हे जाबदेणार  यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे  मत  आहे.  म्‍हणून  मुद्दा क्र.१  चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत.



 

६.   मुद्दा क्र.२- प्रस्‍तुत प्रकरणात तक्रारदार यांनी तक्रारीचे अनुषंगाने दाखल केलेली कागदपत्रे पाहता त्‍यांनी पतसंस्‍थेत मुदत ठेव पावती अन्‍वये रक्‍कम गुंतविली होती ही बाब सिध्‍द होते. तक्रारदार यांनी जाबदेणार  यांच्‍याकडे गुंतवलेली रक्‍कम परत करणे हे पतसंस्‍थेचे कर्तव्‍य होते. परंतू मागणी करुनही रक्‍कम न देणे ही जाबदेणार  यांची तक्रारदार यांना द्यावयाच्‍या सेवेतील त्रुटी आहे असे या मंचाचे मत आहे. म्‍हणून मुद्दा क्र.२ चे  उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत.


 

 


 

७. मुद्दा क्र.३- तक्रारदार यांनी दाखल केलेल्‍या मुदत ठेव पावत्‍यांमधील व्‍याजासह होणारी रक्‍कम जाबदेणार मॅनेजर/चेअरमन/ संचालक’ श्री ज्ञानराज माऊली नागरी सहकारी पतसंस्‍था म. धुळे यांच्‍याकडून मिळावी अशी मागणी केलेली आहे. परंतू या संदर्भात मा.मुंबई उच्‍च न्‍यायालय खंडपिठ औरंगाबाद यांनी रिट याचिका क्र.5223/09 सौ.वर्षा रविंद्र ईसाइ विरुध्‍द राजश्री राजकुमार चौधरी या न्‍यायिक दृष्‍टांतामध्‍ये पुढील प्रमाणे मत व्‍यक्‍त केले आहे.


 

        As has been recorded above, I am of the view that a society registered under the provision of Maharashtra Co-operative Societies Act 1960, although can be proceededagainst and a complaint under the provision of Consumer Protection Act is entertain ableagainst the society, the Directors of members of the managing committee cannot be heldresponsible in view of the scheme of Maharashtra              Co-operative Societies Act. To holdthe Directors of the banks/members of the managing committee of the societiesresponsible, without observing the procedure prescribed under the Act, would also beagainst the principles of   co-operation, which is the very foundation of establishment oftheco-operative societies.


 

 


 

    वरील न्‍यायिक दृष्‍टांतामध्‍ये संचालकांना रक्‍कम देण्‍यासाठी  वैयक्‍तीकरित्‍या जबाबदार ठरविता येणार नाही असे तत्‍व विषद करण्‍यात आले आहे. त्‍यामुळे जाबदेणार  नं. जाबदेणार यांना वैयक्तिकरित्‍या जबाबदार ठरविता येणार नाही.   या सर्व बाबींचा विचार होता तक्रारदार हे जाबदेणार पतसंस्‍था श्री ज्ञानराज माऊली नागरी सहकारी पतसंस्‍था म. धुळे यांचेकडून मुदत ठेव पावत्‍यांमधील एकूण  रक्‍कम रू.२,००,०००/- सदर  आदेश  तारखे  पासून  रक्‍कम फीटेपर्यंत द.सा.द.शे.६ टक्‍के दरा प्रमाणे व्‍याजासह, अशी एकूण रक्‍कम मिळण्‍यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे. म्‍हणून मुद्दा क्र.३ चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत.


 

 


 

. मुद्दा क्र.४- तक्रारदार यांनी दाखल केलेली मुदत ठेव पावत्‍यांमधील व्‍याजासह होणारी रक्‍कम जाबदेणार  यांच्‍याकडुन परत मिळावी म्‍हणून तक्रारदार यांना जाबदेणार पतसंस्‍था श्री ज्ञानराज माऊली नागरी सहकारी पतसंस्‍था म. धुळे यांच्‍या विरुध्‍द या मंचात दाद मागावी लागली आहे. त्‍यामुळे मानसिक त्रास सहन करावा लागलेला आहे व अर्ज दाखल करण्‍यासाठी खर्चही करावा लागलेला आहे. सबब तक्रारदार हे जाबदेणार  यांच्‍या कडून मानसिक त्रासापोटी रु.१०००/- व अर्जाच्‍या खर्चापोटी रक्‍कम रू.५००/- वसुल होऊन मिळण्‍यास पात्र आहे असे या मंचाचे मत आहे. म्‍हणून मुदद क्रं.४ चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत.


 

 


 

. मुद्दा क्र.५-  वरील सर्व विवेचनावरून पुढील प्रमाणे आदेश करण्‍यात येत आहे.


 

आ दे श


 

 


 

१. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज मंजूर करण्‍यात येत आहे.


 

 


 

२. जाबदेणार श्री ज्ञानराज माऊली नागरी सहकारी पतसंस्‍था म. धुळे यांनी, सदर आदेशाचे तारखेपासून पुढील तीस दिवसांचे आत, तक्रारदारांना खालील प्रमाणे रक्‍कमा दयाव्‍यात.


 

 


 

(१) मुदत ठेव पावतींमध्‍ये असलेली एकूण देय रक्‍कम  रू.२,००,०००/- (अक्षरी रूपये दोन लाख मात्र) व या रकमेवर आदेश दिनांकापासुन द.सा.द.शे. ६ टक्‍के दराने संपूर्ण रक्‍कम फिटेपर्यंत व्‍याज दयावे.


 

(२) मानसिक त्रासापोटी रक्‍कम रू.१,०००/- (अक्षरी रू. एक हजार मात्र) व


 

 अर्जाचे खर्चापोटी रक्‍कम रू.५००/- (अक्षरी रू. पाचशे मात्र) दयावेत.


 

 


 

३.  वर नमुद आदेशाची अमंलबजावणी (अध्‍यक्ष/संचालक/व्‍यवस्‍थापक/अवसायक) यापैकी वेळोवेळी जे कोणी पतसंस्‍थेचा कारभार पाहात असतील त्‍यांनी करावी.  तसेचक्र.मधीलरकमेपैकीकाहीरक्‍कम अगर व्‍याज दिले असल्‍यास, त्‍यावर कर्ज दिले असल्‍यास सदरची रक्‍कम वजावट करुन उर्वरित रक्‍कम अदा करावी.  


 

 


 

धुळे


 

दि.३०/०८/२०१३


 

           (श्री.एस.एस. जोशी)  (सौ.एस.एस. जैन)  (सौ.व्‍ही.व्‍ही. दाणी)


 

                सदस्‍य            सदस्‍या           अध्‍यक्षा


 

                    जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच, धुळे.
 
 
[HON'ABLE MRS. V.V. Dani]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. S. S. Jain]
MEMBER
 
[HON'ABLE MR. S.S. Joshi]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.