Maharashtra

Additional DCF, Nagpur

CC/10/51

Manager, Dr. Rajendra Agrawal, Asha Institute of Medical Science & Reserch Centre Pvt.Ltd - Complainant(s)

Versus

Manager, Shri Piyush Seth, First Medical Services Pvt. Ltd - Opp.Party(s)

Adv. Shashikant Borkar

04 Dec 2010

ORDER


importMahashtraNagpur
Complaint Case No. CC/10/51
1. Manager, Dr. Rajendra Agrawal, Asha Institute of Medical Science & Reserch Centre Pvt.LtdAsha Hospital, Near 7 Lekhanagar, Kamthi Cantonment, Kamthi, Nagpur road, KamthiNagpurMaharastra ...........Appellant(s)

Versus.
1. Manager, Shri Piyush Seth, First Medical Services Pvt. LtdCivil Lines KanpurKanpurUttar Pradesh ...........Respondent(s)



BEFORE:
HONORABLE Shri V. N. Rane ,PRESIDENTHONABLE MRS. Jayashree Yangal ,MEMBER
PRESENT :

Dated : 04 Dec 2010
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

( आदेश पारित द्वारा : श्रीमती जयश्री यंगल, मा.सदस्‍या )     
आदेश
( पारित दिनांक : 04 डिसेंबर 2010 )
 
तक्रारकदार आशा इंन्स्टिटयुट ऑफ मेडीकल सायन्‍स अन्‍ड रिसर्च सेंटर प्रा.
लि.कामठी जि.नागपूर यांची  तक्रार विरुध्‍दपक्ष फस्‍ट मेडीकल सर्व्‍हिसेस प्रा. लिमीटेड, 16/81 (II) सिव्‍हील लाईन्‍स, कानपूर यांचे विरुध्‍द ग्राहक सरंक्षण कायदा 1986 कलम 12 अंतर्गत दाखल करुन उभय पक्षात झालेल्‍या कबुली पत्राचे अटी व शर्तीचे अनुसार विरुध्‍द पक्षाने त्‍यांची जबाबदारी पुर्ण न केल्यामुळे झालेल्‍या नुकसानी आणि मनस्‍तापापोटी नुकसान भरपाई रुपये 10,50,000/- मिळावे याकरिता सदर तक्रार दाखल केली आहे.
 तक्रारीचा तपशील खालीलप्रमाणे
 
1.      दिनांक 29.8.2007 रोजी उभयपक्षात सी.टी स्‍कॅनर मॉडेल (जीई प्रोस्‍पीड एस.एक्‍स.सी.टी.) बसविण्‍याकरिता कबुली पत्र तयार करण्‍यात आले. आणि त्‍या अनुषंगाने विरुध्‍द पक्षाने दिनांक 27.11.2007 रोजी सी.टी स्‍कॅनर मॉडेल (जीई प्रोस्‍पीड एस.एक्‍स.सी.टी.) बसवुन दिले त्‍याकरिता तक्रारदारातर्फे रुपये 25,00,000/- एवढी रक्‍कम विरुध्‍द पक्षाला देण्‍यात आली. तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार कुबली पत्रातील अट क्रं. 10 अनुसार विरुध्‍द पक्ष यांनी सदर सी.टी स्‍कॅनर मॉडेल (जीई प्रोस्‍पीड एस.एक्‍स.सी.टी.) उपकरणाचा 2 वर्षाचा, सीटी टयुब सहीत आणि इतर संपूर्ण उपकरणांच्‍या भागांची देखभाल करणे इत्‍यादी बाबीची कबुली केली होती.
2.      दिनांक 16.11.2009 रोजी तक्रारदाराला विरुध्‍द पक्षाने पुरविलेल्‍या सी.टी स्‍कॅनर मॉडेल (जीई प्रोस्‍पीड एस.एक्‍स.सी.टी.)उपकरणाच्‍या एक्‍स-रे मशिन मध्‍ये बिघाडाबाबतची तक्रार केली. त्‍याअनुषंगाने विरुध्‍द पक्षातर्फे दिनांक 9.12.2009 रोजी तज्ञांने तक्रारदाराकडे भेट दिली आणि सी.टी स्‍कॅनर मॉडेल (जीई प्रोस्‍पीड एस.एक्‍स.सी.टी.) उपकरणाचे निरिक्षण करुन सदर तज्ञ व्‍यक्तिने बिघाडाबाबत सांगीतले. तसे त्‍यांनी त्‍यांचे सेवा अहवालात तसे नमुद केले की, एक्‍स-रे मशीन चालु आहे पण काही वेळेस छाती व पोटाच्‍या केसेस मध्‍ये एक्‍स जी एरर ’  येतो. टयुब बदलविणे आवश्‍यक आहे असा शेरा दिला.
3.      तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍या प्रमाणे उभयपक्षात झालेल्‍या कबुली पत्रातील अट क्रमांक 10 अनुसार सी.टी स्‍कॅनर मॉडेल (जीई प्रोस्‍पीड एस.एक्‍स.सी.टी.)   संपुर्ण उपकरणाचा 2 वर्षाचा देखभाल, सीटी टयुब सहीत आणि इतर संपूर्ण उपकरणांच्‍या भागांची देखभाल करण्‍यात येईल असे ठरलेले होते.त्‍या अनुषंगाने कबुली पत्राचा कालावधी दिनांक 29.11.2009 पर्यत होता आणि तक्रारदाराची सदर उपकरण बिघाडाबाबतची तक्रार दिनांक 16.11.2009 ला दाखल करण्‍यात आली होती. त्‍यामुळे तक्रारदाराची तक्रार कबुली पत्राचे देखभालीचे कालावधीत होती. त्‍यामुळे विरुध्‍द पक्षाने तक्रारदाराकडे बसविलेले सी.टी स्‍कॅनर मॉडेल (जीई प्रोस्‍पीड एस.एक्‍स.सी.टी.) उपकरणाची सी.टी टयुब बदलवुन देणे आवश्‍यक होते. परंतु त्‍याऐवजी तक्रारदाराचे म्‍हणण्‍याप्रमाणे विरुध्‍द पक्षाने जाणुनबुजुन व हेतुपुरस्‍सरपणे तज्ञाला पाठविण्‍याकरिता टाळाटाळ केली आणि कबुली पत्रात नमुद अटी व शर्तींचा भंग केला.
4.      तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार जेव्‍हा तज्ञांनी त्‍यांचा तपासणी अहवाल सादर केला आणि त्‍यात सी.टी.टयुब बदलविणे आवश्‍यक आहे असा शेरा अहवाल नमुद केला. तेव्‍हा विरुध्‍द पक्षाने कबुली पत्रातील अटी व शर्ती नुसार बदलवुन देणे आवश्‍यक होते. परंतु विरुध्‍द पक्षाने तसे न करता उलट दिनांक 4.12.2009 रोजी तक्रारदाराला ईमेल द्वारे नविन सी.टी.टयुबची किमंत 9,68,000/- आहे व त्‍याबद्दलच्‍या अटी व शर्तीचे प्रपत्र सुध्‍दा त्‍यासोबत पाठविले आहे.
5.      तक्रारदाराचे म्‍हणण्‍याप्रमाणे हा कबुली पत्रातील अटी व शर्तींचा विरुध्‍द पक्षाने भंग केल्‍यामुळे तक्रारदाराला खुल्‍या बाजारातुन सदरचे सीटी टयुब विकत घ्‍यावी लागली आणि त्‍यामुळे तक्रारदारास नुकसान आणि मानसिक त्रास सोसावा लागल्‍यामुळे तक्रारदाराने सदर तक्रार मंचात दाखल करुन विरुध्‍द पक्षाने रुपये 10,50,000/- तक्रारदाराने नविन बसविलेल्‍या सीटी टयुबची किंमत विरुध्‍द पक्षाकडुन मिळावी अशी मंचास मागणी केली आहे.
6.      तक्रारकर्तीने तिचे तक्रारीसोबत एकुण 14 कागदपत्रे दाखल केली आहे. त्‍यात      
कबुली पत्र, (Memorandum of understanding ), यंत्र बसविल्‍याचा अहवाल, नविन टयुब बसविल्‍याचा अहवाल, सर्व्हिस रिपोर्ट , गैरअर्जदारास पाठविलेली नोटीस, गैरअर्जदाराने पाठविलले प्रोफारमा इनव्‍हाईस, सर्व्हिस रिपोर्ट आफ मेडीरेज सर्व्हिसेस, खरेदी ऑर्डर, विप्रो जीई हेल्‍थ केअरचे इनव्‍हाईस, धनाकर्षाची प्रत,सर्व्हिस रिपोर्ट आफ मेडीरेज सर्व्हिसेस, तक्रारदारातर्फे पाठविलेली नोटीस, इत्‍यादी कागदपत्रांचा समावेश आहे.
7.      तक्रार दाखल झाल्‍यावर मंचाने विरुध्‍द पक्षास नोंदणीकृत डाकेने नोटीस पाठविण्‍यात आली. नोटीस मिळुनही विरुध्‍द पक्ष हजर झाले व आपला लेखी जवाब दिनांक 28.6.2010 रोजी दाखल केला.
8.      विरुध्‍द पक्षाने त्‍यांचे उत्‍तरात प्राथमिक आक्षेपासह दाखल केले.त्‍यांचा पहीला आक्षेप असा आहे की, सदर तक्रार ही ग्राहक सरंक्षण कायद्यात बसत नाही कारण तक्रारदार ही एक कंपनी असुन त्‍यांचा व्‍यवहार हा व्‍यावसाईक आहे त्‍यामुळे तक्रारदार हा ग्राहक नाही
9.      विरुध्‍द पक्षाचा दुसरा आक्षेप असा आहे की, उभयपक्षात झालेल्‍या कबुली पत्रास आरबिट्रेशन कॉजची बाधा असल्‍यामुळे ग्राहक मंचाला सदर तक्रार चालविण्‍याचे अधिकार क्षेत्र नाही त्‍यामुळे तक्रार खारीज करावी अशी विनंती केली.
10. विरुध्‍द पक्षाने उभयपक्षात झालेल्‍या कबुली पत्र, त्‍यांचेद्वारे पाठविलेल्‍या तज्ञांच्‍या सेवा अहवाल, तसेच तक्रारदारास ईमेल द्वारे पाठविलेल्‍या उपकरणाची निवीदा (कोटेशन ) या सर्व बाबी मान्‍य केल्‍या आहेत. परंतु विरुध्‍द पक्षाचे म्‍हणणे असे आहे की, सदर उपकरणात बिघाड वॉरन्‍टी पिरेड संपल्‍यानंतर उदभवला. त्‍यामुळे विरुध्‍द पक्षास कबुली पत्र बंधनकारण नाही. त्‍यामुळे त्‍यांनी नविन सी.टी स्‍कॅनर मॉडेल (जीई प्रोस्‍पीड एस.एक्‍स.सी.टी.) उपकरणाची निवीदा तक्रारदारास पाठविली.
11. विरुध्‍द पक्ष नमुद करतो की, तक्रारदाराने नविन सी.टी.टयुब उपकरण फेब्रुवारी-2010 ला बसविले. त्‍यावरुन असे सिध्‍द होते की,  तोपर्यत सिटी स्‍कॅन उपकरण चालु होते. त्‍यामुळे तक्रारदाराचे तक्रारीत तथ्‍य नाही म्‍हणुन सदर तक्रार खारीज करावी अशी विनंती केली.
12. दिनांक 25.11.2010 रोजी मंचाने उभयपक्षांचा युक्तिवाद ऐकला व रेकॉर्डवरील कागदपत्रांचे सुक्ष्‍म अवलोकन केले असता मंचाचे निरिक्षणे व निष्‍कर्ष खालीलप्रमाणे.
 
//-//-//- निरिक्षणे व निष्‍कर्ष  -//-//-//
 
13. विरुध्‍द पक्षाने घेलेला प्राथमिक आक्षेप मंचाचे मते संयुक्तिक नाही कारण वरिष्‍ठ न्‍यायालयांनी वेळोवेळी दिलेल्‍या अनेक निकालपत्रात नमुद केले आहे की, ग्राहक सरंक्षण कायद्याअंतर्गत तक्रार दाखल करतेवेळी त्‍यास आरबिट्रेशनची बाधा येणार नाही. त्‍यामुळे सदर तक्रार चालविण्‍याचे या मंचास अधिकारक्षेत्र आहे.
14. उभयपक्षात कबुली पत्र झालेले होते आणि त्‍यातील अट क्रं.10 नुसार विरुध्‍द पक्षाने उपकरणाचे देखभाली व इतर दुरुस्‍तीकरिता 2 वर्षाचा करार झाला होता ते दाखल कागदपत्रांवरुन सिध्‍द होते.
15. तक्रारदाराने उपकरणातील बिघाडाबद्दलची तक्रार दिनांक 16.11.2009 ची होती आणि त्‍याबद्दलचे तज्ञांचा निरिक्षण अहवाल दिनांक 1.12.2009 रोजीचा आहे व त्‍यात तज्ञांनी सी.टी. टयुब मध्‍ये बिघाड आहे व ती बदलविणे आवश्‍यक आहे असा शेरा असल्‍यामुळे मंचाचे मते उपकरणात बिघाड हमी कालावधीमधे झाला होता हे सिध्‍द होते असे मंचाचे मत आहे. त्‍यामुळे उपकरण बदलवुन देणे हे विरुध्‍द पक्षावर बंधनकारक आहे आणि ते न केल्‍यामुळे विरुध्‍द पक्षाने कबुली पत्राचे उल्‍लघन केले आहे व ही त्‍यांचे सेवेतील त्रुटी ठरते.
16. विरुध्‍द पक्षाचे म्‍हणणे की, उपकरण फेब्रुवारी 2010 पर्यत चालु स्थितीत होते ते म्‍हणण्‍यात तथ्‍य वाटत नाही व ते पुराव्‍या अभावी मान्‍य करता येणार नाही.
17. तक्रारदाराचे म्‍हणणे की उपकरणात बिघाड होता. विरुध्‍द पक्षातर्फे तज्ञांनी दाखल केलेल्‍या दोन्‍ही सेवा अहवालावरुन सिध्‍द होते की, सीटी स्‍कॅन टयुब मधे बिघाड झाला होता कारण गैरअर्जदारातर्फे तज्ञांनी घेतलेल्‍या सेवा अहवालात एकाच दिवशी एकाच वेळी निरिक्षण होऊनही वेगवेगळे रिडींग दाखविले आहे. यामध्‍ये मंचाला तथ्‍य वाटते. सबब आदेश.
 
            -// अं ति म आ दे श //-
1.     तक्रार अंशतः मंजूर.
 
2.    विरुध्‍द पक्षाने तक्रारदारास नविन सीटी स्‍कॅन टयुबची खरेदी किंमतीपोटी रुपये 10,50,000/- द्यावे.
3.    तक्रारीचा खर्च रुपये 1,000/-(रुपये एक हजार फक्‍त) विरुध्‍द पक्षाने तक्रारदारास दयावे.
सदर आदेशाचे पालन उभयपक्षकारांनी आदेशाची प्रत मिळाल्‍यापासुन 30 दिवसाचे आत करावे.
 
         (जयश्री यंगल)           ( विजयसिंह ना. राणे )
                 सदस्‍या                      अध्‍यक्ष   
   अतिरिक्‍त जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, नागपूर

[HONABLE MRS. Jayashree Yangal] MEMBER[HONORABLE Shri V. N. Rane] PRESIDENT