नि.32
मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – श्री ए.व्ही.देशपांडे
मा.सदस्या - श्रीमती वर्षा शिंदे
ग्राहक तक्रार अर्ज क्र. 475/2010
तक्रार नोंद तारीख : 24/09/2010
तक्रार दाखल तारीख : 27/09/2010
निकाल तारीख : 24/07/2013
-------------------------------------------------
1. श्रीमती पार्वती रामचंद्र अब्दागिरे
2. सचिन रामचंद्र अब्दागिरे
दोघेही रा.श्री कृपा, पारिजात कॉलनी,
मार्ग क्र.3, सावंत प्लॉट, सांगली ....... तक्रारदार
विरुध्द
1. श्री बाहुबली जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था
शाखा सांगली तर्फे शाखाधिकारी
रा.सिव्हील हॉस्पीटलच्या दारासमोर, सांगली
2. श्री महावीर बाळीशा सकाप्पा
चेअरमन, श्री बाहुबली जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था
रा.दानोळी, ता.शिरोळ, जि.कोल्हापूर
3. श्री सिकंदर इस्माईल गैबान
व्हा.चेअरमन, श्री बाहुबली जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था
रा.गल्ली नं.9, जयसिंगपूर, ता.शिरोळ, जि.कोल्हापूर
4. श्री अजित आण्णासो देमापुरे
संचालक, श्री बाहुबली जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था
रा.गल्ली नं.9, जयसिंगपूर, ता.शिरोळ, जि.कोल्हापूर
5. श्री शरद श्रीपाल मगदूम
संचालक, श्री बाहुबली जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था
रा.गल्ली नं.6, जयसिंगपूर, ता.शिरोळ, जि.कोल्हापूर
6. श्री आण्णा बाबू परीट
संचालक, श्री बाहुबली जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था
रा.नांदणी, ता.शिरोळ, जि.कोल्हापूर
7. श्री बापू आप्पा पुजारी,
संचालक, श्री बाहुबली जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था
रा.निमशिरगांव, ता.शिरोळ, जि.कोल्हापूर
8. श्री विद्याधर शामराव मिणचे
संचालक, श्री बाहुबली जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था
रा.जयसिंगपूर, ता.शिरोळ, जि.कोल्हापूर
9. श्री अशोक भूपाल पाटील
संचालक, श्री बाहुबली जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था
रा.आळते, ता.हातकणंगले, जि.कोल्हापूर
10. श्री पायगोंडा नरसगोंडा पाटील,
संचालक, श्री बाहुबली जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था
रा.निमशिरगांव ता.शिरोळ, जि.कोल्हापूर
11. श्री सावकर दत्तू कांबळे
संचालक, श्री बाहुबली जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था
रा.निमशिरगांव, ता.शिरोळ, जि.कोल्हापूर
12. श्री सुहास भाऊसो मुरगुंडे
संचालक, श्री बाहुबली जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था
रा. जयसिंगपूर, ता.शिरोळ, जि.कोल्हापूर
13. सौ राजमती महावीर मगदूम
संचालिका, श्री बाहुबली जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था
रा.निमशिरगांव, ता.शिरोळ, जि.कोल्हापूर ........ सामनेवाला
तक्रारदार तर्फे : अॅड श्री एस.के.केळकर
सामनेवाला क्र.1, 2, 5 ते 8, 11 व 12 : नो से
सामनेवाला क्र. 3, 4, 9, 10 व 13 : एकतर्फा
- नि का ल प त्र -
द्वारा: मा. सदस्या : श्रीमती वर्षा शिंदे
1. प्रस्तुतची तक्रार सामनेवाला यांनी मागणी करुनही ठेव रक्कम अदा न केलेने दाखल केली आहे. सामनेवाला क्र.1 ते 13 यांना नोटीस आदेश झाला. सामनेवाला क्र.1 ते 13 यांना नोटीस लागू होवूनही ते हजर नसल्याने त्यांचेविरुध्द एकतर्फा आदेश करण्यात आला.
2. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात अशी –
सामनेवाला क्र.1 ही संस्था आहे व इतर सामनेवाला हे तीचे पदाधिकारी आहेत. सदर संस्थेच्या सिव्हील हॉस्पीटल शाखेत तक्रारदारांनी त्यांचे नावे काही दशकपूर्ती व दामदुप्पट ठेवी ठेवल्या. तसेच तक्रारदाराने त्यांचे नावे स्वतंत्र सेव्हिंग्ज खातीही उघडली. सदर सेव्हिंग्ज खातेचा नंबर अनुक्रमे 633 व 1673 आहे. दि.10/3/2010 अखेर सदर खात्यावर अनुक्रमे रु.5,55,906/- व 84,926/- इतकी रक्कम जमा आहे. तसेच तक्रारदाराने पावती नं.1480, 1500, 2361, 2362 अन्वये अनुक्रमे रु.25,000/- व उर्वरीत तीन पावत्यांची प्रत्येकी रु.50,000/- रकमेची मागणी केलेली आहे. मात्र नि.29 वरील आदेशानुसार दुरुस्ती करुन केवळ रु.1,89,076/- व त्यावर दि.10/9/10 पासून संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत व्याज मिळणेचे बाकी असलेचे नमूद केले आहे. सदर रकमांची मागणी करुनही तक्रारदारास रकमा न दिल्याने दि.8/9/10 रोजी सामनेवाला यांना वकीलांमार्फत नोटीस पाठविली. तरीही सदर रकमा अदा केल्या नाहीत त्यामुळे प्रस्तुतची तक्रार दाखल करणे भाग पडले. सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासह मंजूर करुन तक्रारदारास सेव्हिंग्ज खाते क्र.633 व 1673 वरील संपूर्ण रक्कम व्याजासहीत तसेच नमूद ठेव रकमेपोटी रक्कम रु.1,89,076/- इतकी रक्कम वसूल होईतोपर्यंत द.सा.द.शे.10 टक्के व्याजासहीत व सेव्हिंग्जची रक्कम 7 टक्के व्याजासहीत तसेच मानसिक, शारिरिक, आर्थिक त्रासापोटी रु.10,000/- व तक्रारीचा खर्च देणेबाबत सामनेवालांना हुकूम व्हावा अशी विनंती केलेली आहे.
3. तक्रारदाराने तक्रारीच्या पुष्ठयर्थ नि.3 वर शपथपत्र व नि.5 चे फेरिस्तसोबत 8 कागदपत्रे दाखल केली आहेत.
4. तक्रारदाराची तक्रार व पुराव्यादाखल कागदपत्रे यांचा विचार करता सदर प्रकरणी खालील मुद्दे आमच्या निष्कर्षाकरिता उपस्थित होतात.
मुद्दे उत्तरे
1. तक्रारदार हे सामनेवाला क्र.1 ते 13 यांचे ग्राहक होतात काय ? होय.
2. सामनेवाला क्र.1 ते 13 यांनी तक्रारदार यांना सेवा देण्यामध्ये त्रुटी
केली आहे काय ? होय.
3. तक्रारदार मागणीप्रमाणे रकमा व्याजासह मिळण्यास पात्र
आहेत काय ? होय.
4. अंतिम आदेश खालीलप्रमाणे
कारणे
मुद्दा क्र.1 ते 4
5. तक्रारदारांची सामनेवाला क्र.1 संस्थेत दोन सेव्हिंग्ज खाती आहेत. त्यांचा खाते क्रमांक अनुक्रमे 633 व 1673 असा आहे. सदर खातेवर त्यांची रक्कम शिल्लक आहे. सबब ते सेव्हिंग्ज खातेदार असल्याने सामनेवालांचे ग्राहक आहेत.
6. सामनेवाला क्र.1, 2, 5 ते 8, 11 व 12 यांना नोटीस लागू झालेनंतर ते हजर होऊनसुध्दा त्यांचे म्हणणे दाखल केले नाही. सबब त्यांचे विरुध्द नो से आदेश नि.1 वर पारीत करण्यात आला. जाबदार क्र.3, 4, 9, 10 व 13 यांना नोटीस लागू होऊनही ते हजर न झाल्याने त्यांचेविरुध्द नि.1 वर एकतर्फा आदेश पारीत करणेत आला. त्यामुळे त्यांना तक्रार मान्यच आहे असा निष्कर्ष काढणे चुकीचे होणार नाही. तक्रारदाराने सामनेवालाकडे सेव्हिंग्ज खातेतील रकमेची व्याजासहीत मागणी करुनही रक्कम अदा न करुन सेवात्रुटी केली आहे.
Lifting of Corporate veil चा विचार करता सामनेवाला क्र. 1 ते 13 वैयक्तिक व संयुक्तरित्या नमूद रक्कम देणेस जबाबदार आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच आले आहे. यासाठी मा.उच्च न्यायालय, मुंबई यांचेसमोरील रिट पिटीशन क्र.117/11, मंदाताई संभाजी पवार व इतर विरुध्द स्टेट ऑफ महाराष्ट्र यामधील आदेशाचा आधार घेतला आहे. तसेच मा.उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठ यांचेसमोरील रिट पिटीशन क्र. 11351/2010, चंद्रकांत हरी बधे विरुध्द युनियन ऑफ इंडिया व इतर यामधील आदेशाचाही आधार घेतला आहे.
7. तक्रारदारांनी दाखल केलेले तक्रारदार क्र.1 यांचे सेव्हिंग्ज खाते क्र.633 हे 2/9/2004 रोजी उघडलेले दिसून येते. मात्र तक्रारदाराने दाखल करताना दि.17/3/2008 ते 10/3/2010 एवढयाच कालावधीच्या पासबुकाच्या नोंदीची साक्षांकीत प्रत दाखल केलेली आहे. सदर खात्यावरती दि.18/6/2008 रोजी जमा दामदुप्पट ठेव रु.52,000/- ची नोंद दिसून येते. तसेच सदर दिवशी सदर रक्कम तक्रारदाराने उचल केली आहे. दि.18/2/2009 रोजी जमा ठेव म्हणून रु.5,16,852/- जमा केलेचे निदर्शनास येते. दि.5/11/2009 रोजी रक्कम रु.10,000/- जमा ठेव केलेचे दिसून येते. तसेच नमूद तारखान्वये वेळोवेळी ठेवीवरील व्याजही सदर ठेव तारखेस जमा केलेचे दिसून येते. सदर खात्यावर रक्कम रु.5,58,906/- दि.10/3/2010 रोजी शिल्लक असल्याचे दिसून येते.
तसेच तक्रारदार क्र.2 यांचे सेव्हिंग्ज खाते क्र.1673 दि.10/6/2006 रोजी उघडलेले दिसून येते. सदर खात्याच्या तक्रारदाराने दि.10/6/2006 ते 10/3/2010 एवढया कालावधीच्या पासबुकाच्या नोंदीची साक्षांकीत प्रत दाखल केलेली आहे. सदर खात्यावरती दि.10/6/2006 जमा ठेव तारण म्हणून रु.25,000/- ची नोंद दिसून येते व त्याचदिवशी सदर रक्कम तक्रारदाराने उचल केली आहे. दि.16/10/2007 रोजी जमा ठेव व्याज म्हणून रु.1,750/- जमा केलेचे निदर्शनास येते. दि.18/2/2009 रोजी जमा ठेव रक्कम रु.80,280/- जमा केलेचे दिसून येते. तसेच सदर खात्यावर रक्कम रु.84,926/- दि.10/3/2010 शिल्लक असल्याचे दिसून येते.
वरील दाखल पुराव्यांवरुन तक्रारदाराच्या ठेव रकमा व्याजासहीत नमूद तक्रारदार यांच्या सेव्हिंग्ज खातेवर जमा केल्याच्या दिसून येतात. तक्रारदाराने नि.29 वर पुरसिस दाखल करुन तक्रारदार यांना सामनेवालांकडून बरीचशी रक्कम मिळाली असून तक्रारदारांना सामनेवालांकडून आता रुपये 1,89,076/- व त्यावर दि.10/9/2010 पासून संपूर्ण रक्कम मिळेपर्यंतचे व्याज मिळणे बाकी असलेबाबत नमूद केलेले आहे. सदर पुरसीसवर तक्रारदाराने आपली मागणी सीमीत केल्याबाबत तक्रारदाराने नि.1 वर दुरुस्ती करावी असा या मंचाने आदेश पारीत केला व त्यानुसार तक्रारदाराने नि.1 वर दुरुस्तीही केली आहे. सदरची बाब विचारात घेता नि.29 वरील मागणी नुसार तक्रारदार हे सदर रक्कम रुपये 1,89,076/- दि. 10/9/2010 पासून संपूर्ण रक्कम मिळेपावेतो द.सा.द.शे. 6 टक्केप्रमाणे व्याजासह मिळणेस पात्र आहेत. सामनेवाला यांच्या सेवात्रुटीमुळे तक्रारदारास प्रस्तुतची तक्रार दाखल करणे भाग पडले आहे, त्यामुळे झालेल्या मानसिक त्रासापोटी तसेच तक्रारीच्या खर्चापोटी रकमा मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे व खालील आदेश पारीत करण्यात येत आहे.
आदेश
1. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज मंजूर करणेत येत आहेत.
2. तक्रारदार यांना सामनेवाला क्र.1 ते 13 यांनी वैयक्तिक व संयुक्तरित्या रक्कम रु.
1,89,076/- दि.10/9/2010 पासून संपूर्ण रक्कम मिळेपावेतो द.सा.द.शे. 6 टक्केप्रमाणे
व्याजासह अदा करावी.
3. तक्रारदार यांना सामनेवाला क्र.1 ते 13 यांनी वैयक्तिक व संयुक्तरित्या मानसिक ञासापोटी
रुपये 5,000/- अदा करावेत.
4. तक्रारदार यांना सामनेवाला क्र.1 ते 13 यांनी वैयक्तिक व संयुक्तरित्या वैयक्तिक व
संयुक्तरित्या तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 2,000/- अदा करावेत.
5. जर सामनेवाला यांनी या आदेशाचे तारखेपूर्वी तक्रारदार यांना वर नमूद खात्यातील काही
रक्कम अदा केली असेल तर सदरची रक्कम वळती करुन घेण्याचा सामनेवाला यांचा हक्क
सुरक्षित ठेवण्यात येतो.
6. वर नमूद आदेशाची पुर्तता सामनेवाला यांनी या आदेशाच्या तारखेपासून 45 दिवसांत
करणेची आहे.
7. सामनेवाला यांनी आदेशाची पुर्तता विहीत मुदतीत न केल्यास तक्रारदार त्यांचे विरुध्द
ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदींनुसार दाद मागू शकतील.
सांगली
दि. 24/07/2013
( वर्षा शिंदे ) ( ए.व्ही.देशपांडे )
सदस्या अध्यक्ष