Maharashtra

Bhandara

CC/17/99

PRASHANT RAMESH SATHVANE - Complainant(s)

Versus

MANAGER, SHANTI MOTORS SHUKRAWARI - Opp.Party(s)

23 Aug 2019

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM,BHANDARA
Near Akhil Sabhagruha, Ganeshpur Road,Bhandara
 
Complaint Case No. CC/17/99
( Date of Filing : 08 Dec 2017 )
 
1. PRASHANT RAMESH SATHVANE
HANUMAN WARD, PETROL PUMP, THANA, POST. JAWAHARNAGAR, TAH. BHANDARA
BHANDARA
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. MANAGER, SHANTI MOTORS SHUKRAWARI
TAH. BHANDARA. BHANDARA
BHANDARA
MAHARASHTRA
2. MANAGER, INDIA YAMAHA MOTORS PVT LTD
SURAJPUR INDUSTRIAL AREA NOYDA, DADRI ROAD, SURAJPUR-201306
BHANDARA
MAHARASHTRA
3. MANAGER, TAJSHREE MOTORS PVT. LTD
97 TAJSHREE ESTATE NANDANWAN MEAN ROAD. NAGPUR-440009
BHANDARA
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. BHASKAR B. YOGI PRESIDENT
 HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 23 Aug 2019
Final Order / Judgement

                                                           (पारीत व्‍दारा सौ.वृषाली गौरव जागीरदार, मा.सदस्‍या)

                                                                       (पारीत दिनांक 23 ऑगस्‍ट, 2019)   

01. तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या कलम 12 खाली विरुध्‍दपक्षां विरुध्‍द दोषपूर्ण सेवा दिल्‍याचे कारणावरुन प्रस्‍तुत ग्राहक मंचा समक्ष दाखल केलेली आहे.

02.  तक्रारीचा थोडक्‍यात आशय खालील प्रमाणे-      

           यातील विरुध्‍दपक्ष क्रं-1 शांती मोटर्स, भंडारा हे वाहन विक्रेता असून त्‍यांचेकडून तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष क्रं 2 इंडीया यामाहा मोटर्स प्रायव्‍हेट लिमिटेड कंपनीव्‍दारे निर्मित वादातीत मोटरसायकल विकत घेतली. (यापुढे निकालपत्रात विरुध्‍दपक्ष क्रं 1 चा उल्‍लेख सोईसाठी वाहन विक्रेता तर विरुध्‍दपक्ष क्रं-2 चा उल्‍लेख वाहन निर्माता कंपनी असा करण्‍यात येईल) तर विरुध्‍दपक्ष क्रं-3 ताजश्री मोटर्स प्रायव्‍हेट लिमिटेड, नागपूर यांनी तक्रारकर्त्‍याची वादातीत नादुरुस्‍त मोटरसायकल दुरुस्‍त करुन दिली होती.  तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष क्रं 1 भंडारा येथील वाहन विक्रेत्‍याच्‍या शोरुम मधून विरुध्‍दपक्ष क्रं 2  कंपनी व्‍दारे निर्मित मोटरसायकल यामाहा Model No.-FZ(FZS-FI) मोटरसायकल, Chassis No.-MEIRG0728G0231767 & Engine No.-G3C8E0353618 असा आहे एकूण रक्‍कम रुपये-95,059/- एवढया किमती मध्‍ये दिनांक-03.10.2016 रोजी विकत घेतली.

   तक्रारकर्त्‍याने पुढे असे नमुद केले की तो दिनांक-09.06.2017 रोजी नागपूर येथून त्‍याचे गावाला मोटरसायकलने येत असताना वाहनाचे इंजिन मधून आवाज येऊन गेअर बदलणे बंद झाले. दिनांक-10.06.2017 रोजी विरुध्‍दपक्ष क्रं 1 भंडारा येथील वाहन विक्रेत्‍यास दुरध्‍वनीवरुन सुचना देऊन तक्रारकर्त्‍याचे घरुन वाहन घेऊन जाण्‍यास सांगितले परंतु विरुध्‍दपक्ष क्रं 1 विक्रेत्‍याने वाहन तक्रारकर्त्‍यानेच वाहन आणावे असे सांगितले. विरुध्‍दपक्ष क्रं 1 विक्रेत्‍याचे शोरुम मधील तंत्रज्ञाने वाहनाची तपासणी करुन इंजिन उघडून पाहिले असता मोटरसायकलच्‍या इंजिन मधील Crank Case, स्‍क्रू पॅन हेड तुटले असल्‍याचे सांगितले. त्‍यानंतर विरुध्‍दपक्ष क्रं 1 वाहन विक्रेत्‍याने निर्माता कंपनी कडून नविन सुटे भाग बोलावून ते बसवून दिले व सर्व्‍हीसिंग करुन दिली. दरम्‍यानचे काळात तक्रारकर्त्‍याची मोटरसायकल ही दिनांक-10.06.2017 ते  24.06.2017 या दुरुस्‍तीचे कालावधीत बंद होती. परंतु नविन सुटे भाग बसविल्‍या नंतर वाहनाचे इंजिन मधून आवाज येणे सुरु झाले असता विरुध्‍दपक्ष क्रं 1 विक्रेत्‍याचे शोरुम मध्‍ये दिनांक-25.06.2017 रोजी वाहन दाखविले असता तेथील कर्मचा-याने वाहन 500 किलोमीटर पर्यंत चालविल्‍यास आवाज येणे बंद होईल असे सांगितले. परंतु 500 किलोमीटर पर्यंत वाहन चालवूनही वाहनाचे इंजिन मधून आवाज येणे बंद न झाल्‍यामुळे पुन्‍हा विरुध्‍दपक्ष क्रं 1 वाहनविक्रेत्‍याचे शोरुम मध्‍ये वाहन  दाखविले असता तेथील कर्मचा-याने वाहन 1000 किलोमीटर पर्यंत चालविण्‍याचा सल्‍ला दिला, त्‍याप्रमाणे 1000 किलोमीटर पर्यंत वाहन चालवून सुध्‍दा वाहनाचे इंजिन मधील आवाज येणे बंद झाले नाही.

    तक्रारकर्त्‍याने पुढे असे नमुद केले की, त्‍याने विकत घेतलेली मोटरसायकल नविन असल्‍याने वाहननिर्माता कंपनी इंडीया यामाहा मोटर्स प्रायव्‍हेट लिमिटेडच्‍या टोल फ्री क्रमांक-18004201600 वर संपर्क साधून वाहनाची तक्रार केली असता 06 दिवसा नंतर कंपनीचे इंजिनीयरने वाहनाची तपासणी केली परंतु इंजिन मधून आवाज येणे थांबले नाही परंतु ही बाब इंजिनियरने मान्‍य केली नाही.

    तक्रारकर्त्‍याने पुढे असे नमुद केले की, तो दिनांक-11.08.2017 रोजी परत नागपूर वरुन त्‍याचे गावाकडे येत असताना पेट्रोल पंप ठाणा येथे येत असताना नागपूर येथील पार्डी भागात चालत्‍या वाहनाची दोन्‍ही कडील चेन पडल्‍याने तो अपघातातून थोडक्‍यात बचावला. तक्रारकर्त्‍याने दुरध्‍वनी वरुन विरुध्‍दपक्ष क्रं 1 वाहन विक्रेता याचेशी संपर्क साधला असता त्‍यांनी 60 किलोमीटरवर सेवा देण्‍यास असमर्थता दर्शवून जवळपासच्‍या नंदनवन, नागपूर येथील ताजश्री मोटर्स यांचेकडे दुरध्‍वनी लावून वाहनाची तपासणी करण्‍यास सांगितले, त्‍यानुसार तेथील तंत्रज्ञ हा पारडी, नागपूर येथे पोहचला व त्‍याने वाहनाची चेन बसवून दिली. वाहनाचे इंजिन मधील आवाजा बाबत संबधित तंत्रज्ञाला सांगितले असता वाहन नंदनवन, नागपूर येथील ताजश्री शोरुम मध्‍ये आणण्‍यास सांगितले.

      तक्रारकर्त्‍याने पुढे असे नमुद केले की, दिनांक-31.08.2017 रोजी विरुध्‍दपक्ष क्रं 3  ताजश्री मोटर्स प्रायव्‍हेट लिमिटेड येथे मोटरसायकल दाखविली असता इंजिन मधून आवाज येत असल्‍याने तेथील तंत्रज्ञाने इंजिन उघडून पाहणी केली असता ब्‍लॉक पिस्‍टन, रॉकर आर्म, (Block Piston, Rocker Arm, Cram Shock) खराब झाले असल्‍याचे सांगून दुरुस्‍तीसाठी रुपये-9000/- ते रुपये-10,000/- अपेक्षीत खर्च येत असल्‍याचे सांगितले परंतु तक्रारकर्त्‍या जवळ पैसे नसल्‍याने वाहन तसेच ठेवण्‍यात आले. पुन्‍हा तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष क्रं 2 मोटरसायकल निर्माता कंपनीचे टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून माहिती दिली असता त्‍यांनी विरुध्‍दपक्ष क्रं 1 वाहन विक्रेत्‍याच्‍या शोरुम मध्‍ये मोटरसायकल नेण्‍यास सांगितले.

    तक्रारकर्त्‍याने पुढे असे नमुद केले की, दिनांक-31.08.2017 रोजी त्‍याचे भावाने विरुध्‍दपक्ष क्रं 1 वाहन विक्रेता यांचे शोरुमला भेट देऊन तेथील व्‍यवस्‍थापकास संपूर्ण माहिती दिली असता त्‍यांनी विरुध्‍दपक्ष क्रं 2 निर्माता कंपनीचे इंजिनियरला दुरध्‍वनी वरुन माहिती दिली व तक्रारकर्त्‍याचे भावाला सांगितले की, नादुरुस्‍त मोटरसायकलचे सुटे भाग बदलवून देण्‍यात येतील व त्‍याबद्यल पैसे लागणार नाहीत. परंतु  दिनांक-01.09.2017 रोजी विरुध्‍दपक्ष क्रं 3) ताजश्री मोटर्स प्रायव्‍हेट लिमिटेड नागपूर येथील सर्व्‍हीस सेंटरवर यामाहा निर्माता कंपनीच्‍या इंजिनियरने तेच पार्ट लावून दिले व दुस-यांदा इंजिन उघडून बसवून दिले परंतु तरी सुध्‍दा मोटरसायकलचे इंजिन मधून आवाज येणे बंद झाले नाही. दोनदा वाहनाचे इंजिन उघडून बांधल्‍या नंतर सुध्‍दा वाहनाचे इंजिन मधून आवाज येणे कमी झाले नसल्‍याने पुन्‍हा विरुध्‍दपक्ष क्रं 2 निर्माता कंपनीचे टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून माहिती दिली असता त्‍यांनी विरुध्‍दपक्ष क्रं 1 वाहन विक्रेत्‍याच्‍या शोरुम मध्‍ये जाण्‍याचा सल्‍ला दिला. त्‍यानुसार दिनांक-05.09.2017 रोजी विरुध्‍दपक्ष क्रं 1 वाहन विक्रेत्‍याच्‍या शोरुम मध्‍ये वाहन दाखविले असता तेथील तंत्रज्ञाने तिस-यांदा मोटरसायकलचे इंजिन उघडून प्रायमरी गेअर बदलवून दिले परंतु इंजिन मधून आवाज येणे थांबले नाही.

     तक्रारकर्त्‍याने पुढे असे नमुद केले की, दिनांक-07.09.2017 रोजी तो नागपूर वरुन गावाकडे येत असताना वाहनाचे इंजिन मधून वेगळाच आवाज येणे सुरु झाले असता इंजिन मधून ऑईल बाहेर येत असल्‍याचे दिसल्‍याने पुन्‍हा विरुध्‍दपक्ष कं 1 वाहन विक्रेत्‍याचे शोरुम मध्‍ये वाहन दाखविले असता इंजिन मधील नट घटट बसवून इंजिन ऑईलची लेव्‍हल मिळवून दिली व पुढे ऑईल गळणार नाही असे सांगितले. दिनांक-10.09.2017 रोजी वाहनाचे चेनची पाहणी केली असता वाहनाचा चेन लॉक तुटलेला दिसला असता त्‍याचा फोटो काढून व्‍हॉटसअप वरुन विरुध्‍दपक्ष क्रं 2 वाहन निर्माता कंपनीचे इंजिनयरला पाठविला. विरुध्‍दपक्ष क्रं 1 वाहन विक्रेत्‍याच्‍या शोरुम मधील तंत्रज्ञाने नविन चैन लॉक बसवून दिला परंतु मागणी करुनही मोटरसायकलचे संपूर्ण चैन सॉकेट बदलवून दिले नाही.

     तक्रारकर्त्‍याचे असे म्‍हणणे आहे की, त्‍याला विक्री केलेली मोटरसायकल दोषपूर्ण असून 10 महिन्‍यात ती केवळ 15000 किलोमीटर चालली असताना  तीन वेळा वाहनाचे इंजिन खोलून बांधण्‍यात आले. त्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने  विरुध्‍दपक्ष क्रं 1 वाहन विक्रेता यांना आणि विरुध्‍दपक्ष क्रं 2 वाहन निर्माता कंपनीस  दिनांक-20.09.2017 रोजी रजिस्‍टर पोस्‍टाने लेखी नोटीस पाठविली परंतु विरुध्‍दपक्ष क्रं 1 वाहन विक्रेता व विरुध्‍दपक्ष क्रं 2 वाहन निर्माता कंपनी यांना रजिस्‍टर नोटीस मिळाली परंतु विरुध्‍दपक्ष क्रं 2 यांनी रजि. लेखी नोटीस स्विकारली नाही .विरुध्‍दपक्ष क्रं  1 व 2 यांना रजिस्‍टर पोस्‍टाची  नोटीस मिळूनही त्‍यांनी  लेखी उत्‍तर पाठविले नाही. अशाप्रकारे विरुध्‍दपक्षांनी तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा दिल्‍याने त्‍याला शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. म्‍हणून शेवटी त्‍याने प्रस्‍तुत तक्रार ग्राहक मंचा समोर दाखल करुन त्‍याव्‍दारे विरुध्‍दपक्षां विरुध्‍द खालील प्रमाणे मागण्‍या केल्‍यात-

(01) विरुध्‍दपक्षांना आदेशित करण्‍यात यावे की, त्‍यांनी तक्रारकर्त्‍याला नविन मोटरसायकल बदलवून द्यावी किंवा सदर यामाहा मोटरसायकलची रक्‍कम रुपये-95,059/- व्‍याजासह परत करावी.

 (02)  विरुध्‍दपक्षांचे दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्त्‍याला  झालेल्‍या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल नुकसान भरपाई म्‍हणून रुपये-1,00,000/- आणि नोटीस खर्च म्‍हणून रुपये-2000/-अशा रकमा व्‍याजासह विरुध्‍दपक्षांनी तक्रारकर्त्‍याला  देण्‍याचे आदेशित व्‍हावे.

 

03.   विरुध्‍दपक्ष क्रं 2 इंडीया यामाहा मोटर्स प्रायव्‍हेट लिमिटेड या मोटरसायकल निर्माता कंपनीने आपले लेखी उत्‍तर सर्वप्रथम ग्राहक मंचा समोर पान क्रं 62 ते 75 वर इंग्रजी भाषेमध्‍ये दाखल केले. परंतु त्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने मराठीतून लेखी उत्‍तर देण्‍यास ग्राहक मंचा समोर दिनांक-10.10.2018 रोजी अर्ज दाखल केला असल्‍याने त्‍याप्रमाणे उत्‍तर देण्‍यास विरुध्‍दपक्ष क्रं 2 कंपनीला मंचाव्‍दारे आदेशित करण्‍यात आले. ग्राहक मंचाचे आदेशानुसार विरुध्‍दपक्ष क्रं 2 वाहन निर्माता कंपनीने आपले लेखी उत्‍तराचा मराठी भाषेतील अनुवाद ग्राहक मंचा समक्ष पान कं 98 ते 105 वर दाखल केला. विरुध्‍दपक्ष क्रं 2 वाहन निर्माता कंपनीने लेखी उत्‍तरात तक्रारीत व्‍यवस्‍थापक इंडीया यामाहा मोटर प्रायव्‍हेट लिमिटेड यांना प्रतिपक्ष केलेले आहे परंतु व्‍यवस्‍थापक हे पद आवश्‍यक प्रतिपक्ष नसल्‍याने आणि कंपनीला प्रतिपक्ष न केल्‍याने  तक्रार चालू शकत नाही. मा.सर्वोच्‍च न्‍यायालयाने अनेक निवाडयांमध्‍ये कंपनीचे कृत्‍या बद्यल संचालक मंडळ जबाबदार राहिल असे नमुद केलेले आहे. विरुध्‍दपक्ष क्रं 2 निर्माता कंपनीचे अभिलेखा नुसार तक्रारकर्त्‍याला विरुध्‍दपक्ष क्रं 2 विक्रेत्‍या कडून दिनांक-30.09.2016 रोजी मोटरसायकलची संपूर्ण तपासणी करुन चालू स्थितीमध्‍ये यामाहा FZ-150 मोटरसायकल विक्री करण्‍यात आली. विक्री केलेल्‍या मोटरसायकलची वॉरन्‍टी दोन वर्षाची किंवा 30000 किलोमीटर पर्यंत अशी होती. निषकाळजीपणाने वाहन चालविल्‍यास व वाहनाला नुकसान पोहचल्‍यास  जसे टायर, बॅटरी स्‍पार्क प्‍लग, हेलमेट, चैन इत्‍यादी मध्‍ये दोष असल्‍यास वॉरन्‍टी कालावधीत दुरुस्‍त करुन मिळते परंतु नादुरुस्‍त वाहना ऐवजी नविन वाहन बदलवून देता येत नाही. वाहन निर्माता कंपनीव्‍दारे ग्राहकांना दिल्‍या जाणा-या जॉब कॉर्ड नुसार मोफत सर्व्‍हीस तीन वेळा दिली जाते परंतु सदर सर्व्‍हीसिंग ही कंपनीचे अधिकृत डिलर कडूनच करावयास हवी. अनधिकृत तंत्रज्ञा कडून वाहन दुरुस्‍त केल्‍यास निर्माता कंपनी जबाबदार राहणार नाही. निर्माता कंपनीचे अधिकृत डिलर मार्फतीनेच वाहनाची विक्री करता येते.

     विरुध्‍दपक्ष क्रं 2 वाहन निर्माता कंपनीने पुढे असे नमुद केले की, तक्रारकर्त्‍याचे म्‍हणण्‍या प्रमाणे मोटरसायकल विकत घेतल्‍या पासून तिचे इंजिनमध्‍ये दोष होता व त्‍यामुळे इंजिन मधून आवाज येत होता परंतु हे म्‍हणणे निर्माता कंपनीस मान्‍य नाही याचे कारण असे की, जर मोटरसायकल मध्‍ये दोष असता तर दिनांक-16.06.2018 पर्यंत मोटरसायकल ही 31,373 किलो मीटर पर्यंत चाललीच नसती. तक्रारकर्त्‍याने प्रथम फ्री सर्व्‍हीस विरुध्‍दपक्ष क्रं 1 यांचेकडे दिनांक-18.10.2016 रोजी केली होती, त्‍यावेळी मोटरसायकल 990 किलोमीटर चालली होती परंतु त्‍यावेळेस मोटर सायकलचे इंजिनमध्‍ये अथवा मोटरसायकल मध्‍ये दोष असल्‍या बाबत त्‍याने तक्रार केली नव्‍हती. आपले म्‍हणण्‍याचे पुराव्‍यार्थ प्रथम जॉ‍ब कॉर्ड क्रं 3444 ची प्रत दाखल करीत असल्‍याचे नमुद केले. दुसरी फ्री सर्व्‍हीस विरुध्‍दपक्ष क्रं 1 कडे दिनांक-14.12.2016 रोजी केली, त्‍यावेळी मोटरसायकल 4400 किलोमीटर चालली होती परंतु त्‍यावेळेस सुध्‍दा तक्रारकर्त्‍याने तक्रार केली नव्‍हती. आपले म्‍हणण्‍याचे पुराव्‍यार्थ दुसरी फ्री सर्व्‍हीस  जॉ‍ब कॉर्ड क्रं 1315 ची प्रत दाखल करीत असल्‍याचे नमुद केले. तिसरी फ्री सर्व्‍हीस विरुध्‍दपक्ष क्रं 1 कडे दिनांक-25.01.2017 रोजी केली होती, त्‍यावेळी मोटरसायकल 6969 किलोमीटर चालली होती परंतु त्‍यावेळेस सुध्‍दा तक्रारकर्त्‍याने तक्रार केली नव्‍हती. आपले म्‍हणण्‍याचे पुराव्‍यार्थ तिसरी फ्री सर्व्‍हीस  जॉ‍ब कॉर्ड क्रं 1631ची प्रत दाखल करीत असल्‍याचे नमुद केले. चौथी सर्व्‍हीस विरुध्‍दपक्ष क्रं 1 कडे दिनांक-24.04.2017 रोजी केली होती, त्‍यावेळी मोटरसायकल 8420 किलोमीटर चालली होती परंतु त्‍यावेळेस सुध्‍दा तक्रारकर्त्‍याने इंजिनमध्‍ये दोष असल्‍या बाबत तक्रार केली नव्‍हती. आपले म्‍हणण्‍याचे पुराव्‍यार्थ चौथी सर्व्‍हीस  जॉ‍ब कॉर्डची प्रत दाखल करीत असल्‍याचे नमुद केले.

      विरुध्‍दपक्ष क्रं 2 वाहन निर्माता कंपनी व्‍दारे  पुढे असे नमुद करण्‍यात आले की, तक्रारकर्ता हा दिनांक-24.06.2017 रोजी विरुध्‍दपक्ष क्रं 1 यांचेकडे आला होता, त्‍यावेळी मोटरसायकल 12,618 किलोमीटर चालली होती, त्‍यावेळेस सर्व्‍हीस जॉब कॉर्डचा क्रं 3135 असा होता आणि त्‍यावेळेस तक्रारकर्त्‍याने मोटरसायकलचे इंजिनमध्‍ये असाधारण आवाज येत असल्‍याची तक्रार केली होती. इंजिनियरने मोटरसायकलची पाहणी केली असता इंजिनमध्‍ये कुठल्‍याही प्रकारचा असाधारण आवाज अ‍थवा दोष आढळून आला नाही. सदर जॉब कॉर्डची प्रत पुराव्‍या दाखल सादर करण्‍यात येत असल्‍याचे नमुद केले. तक्रारकर्त्‍याने दिनांक-31.08.2017 रोजी ताजश्री मोटर्स, नागपूर येथे मोटरसायकल इंजिनयरला दाखविली व इंजिनमध्‍ये कर्कष आवाजा बद्दल सांगितले त्‍यावेळी सर्व्‍हीस इंजिनियरने वाहनाची संपूर्ण तपासणी करुन इंजिन मध्‍ये कुठलाही दोष नसल्‍याचे सांगितले परंतु तरीही तक्रारकर्ता बेकायदेशीरपणे नविन इंजिनची मागणी करीत आहे. तक्रारकर्त्‍याने सहावी फ्री सर्व्‍हीस केली नाही. तक्रारकर्त्‍याने अनुक्रमे सातवी व आठवी सर्व्‍हीसींग विरुध्‍दपक्ष क्रं 1 कडे दिनांक-12.12.2017 व 16.02.2018 रोजी केली परंतु त्‍यावेळेस देखील त्‍याने मोटरसायकलचे इंजिनमध्‍ये दोष असल्‍याची तक्रार केली नव्‍हती. आपले म्‍हणण्‍याचे पुराव्‍यार्थ ते दिनांक-16.02.2018 रोजीच्‍या जॉब कॉर्ड क्रं 3124 ची प्रत जोडत असल्‍याचे नमुद केले. तक्रारकर्ता हा पैसे देऊन सर्व्‍हीसिंग करण्‍या करीता दिनांक-16.06.2018 रोजी विरुध्‍दपक्ष क्रं 1 कडे आला होता, त्‍यावेळेस मोटरसायकल 31,373 किलोमीटर चालली होती, त्‍यावेळेस जॉब कॉर्ड क्रं 5985 नुसार सर्व्‍हीसिंग करण्‍यात आली होती. जर वाहनामध्‍ये दोष होता तर दरमहिन्‍यास 1800 किलोमीटरच्‍या हिशोबाने 30,000 किलोमीटर पर्यंत वाहन कसे चालले, यावेळी सुध्‍दा तक्रारकर्त्‍याने वाहनाचे इंजिनमध्‍ये दोष असल्‍या बाबत तक्रार केली होती, सदर जॉब कॉर्ड क्रं 5985 ची प्रत ते पुराव्‍यार्थ दाखल करीत असल्‍याचे नमुद केले. उपरोक्‍त पुराव्‍यां वरुन दिसून येईल की, मोटरसायकलचे इंजिनमध्‍ये कर्कष आवाज येत नव्‍हता परंतु पैसे उकळण्‍याचे दृष्‍टीने खोटी निराधार तक्रार तक्रारकर्त्‍याने ग्राहक मंचा समक्ष दाखल केलेली आहे,

     आपले वर नमुद म्‍हणण्‍याचे  समर्थनार्थ विरुध्‍दपक्ष क्रं 2 वाहन निर्माता कंपनीने मा.राष्‍ट्रीय ग्राहक आयोग, न्‍यु दिल्‍ली यांचे 1997 (II) CPJ-81 (NC) “Punjab Tractor Limited-Versus-Veer Pratap” या ठिकाणी प्रसिध्‍द निवाडयावर भिस्‍त ठेऊन नमुद केले की, सदर निवाडयामध्‍ये वाहना मध्‍ये दोष असल्‍या बद्दल सबळ पुरावा न आल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याची  मागणी फेटाळण्‍यात आली होती. त्‍याच बरोबर मा.सर्वोच्‍च न्‍यायालय, दिल्‍ली यांचे AIR-1996 “Bharathi Knitting Company vs Dhl Worldwide Express Courier” या प्रसिध्‍द निवाडयावर आपली भिस्‍त ठेऊन नमुद केले की, सदर निवाडया प्रमाणे तक्रारकर्त्‍यास गाडीची किम्‍मत अथवा नविन गाडी मागण्‍याचा अधिकार नसल्‍याचे स्‍पष्‍ट नमुद आहे. मा.राज्‍य ग्राहक वाद निवारण आयोग, चंदिगढ पंजाब यांचे 2012 (1) CPR 365 “Hind Motors India Ltd.-Versus-Surindar Sinha” या प्रसिध्‍द निवाडयावर भिस्‍त ठेऊन नमुद केले की, मोटरसायकलचे इंजिन मध्‍ये दोष अथवा असाधारण आवाजा बद्यल तज्ञ अभियंत्‍याचे प्रमाणपत्र घेतले नसल्‍याने तक्रारकर्त्‍याची मागणी नामंजूर करण्‍यात आली होती. त्‍याच बरोबर मा.राष्‍ट्रीय ग्राहक आयोग, न्‍यु दिल्‍ली यांचे-III (2013) CPD 273 (NC) “Rajiv Gulati-Versus-Engineering & Locomotive Company Ltd.,”  या प्रसिध्‍द निवाडयावर आपली भिस्‍त ठेवली. उपरोक्‍त नमुद न्‍यायनिवाडयां मधील वस्‍तुस्थिती व पारीत निर्णय विचारात घेता तक्रारकर्त्‍याने कोणत्‍याही सबळ पुराव्‍याशिवाय खोटी व निराधार तक्रार ग्राहक मंचा समोर दाखल केलेली असल्‍याने तक्रार खारीज करण्‍याची विनंती विरुध्‍दपक्ष क्रं 2 वाहन निर्माता कंपनी तर्फे करण्‍यात आली.

04.   तक्रारकर्त्‍याने पान क्रं 20 वरील दस्‍तऐवज यादी नुसार अक्रं 01 ते 10 प्रमाणे दस्‍तऐवजाच्‍या प्रती दाखल केल्‍यात, ज्‍यामध्‍ये प्रामुख्‍याने मोटरसायकल खरेदीचे बिल, वाहनाचा विमा, वाहनाची नोंदणी, वाहन परवाना, मोटर सायकल सर्व्‍हीसिंगचे जॉबकॉर्ड प्रती, हमी कालावधीत सुध्‍दा दिनांक-23.03.2017 रोजी घेतलेल्‍या रकमेचे बिल, दिनांक-16.09.2017 रोजी नॅशनल कंझुमर हेल्‍पलाईन यांचेकडे नोंदविलेली तक्रार, विरुध्‍दपक्ष क्रं 1 ते 3 यांना रजि.पोस्‍टाने पाठविलेली नोटीस, विरुध्‍दपक्ष क्रं 1 व 2 यांना रजि.नोटीस मिळाल्‍या बाबत पोस्‍टाचा अहवाल, विरुध्‍दपक्ष क्रं 3 यांनी नोटीस स्विकारली नसल्‍याने परत आलेले रजि. पोस्‍टाचे पॉकीट अशा दस्‍तऐवजाचे प्रतींचा समावेश आहे. तक्रारकर्त्‍याने  पान क्रं 106 ते 115  वर स्‍वतःचे शपथपत्र दाखल केले. त्‍याच बरोबर पान क्रं 116 वरील दस्‍तऐवज यादी नुसार अक्रं 1 ते 11 दस्‍तऐवजाच्‍या प्रती दाखल केल्‍यात ज्‍यामध्‍ये प्रामुख्‍याने  सर्व्‍हीस क्रं 6 चा रेकॉर्ड व बिल, 7 व्‍या सर्व्‍हीसिंगची पावती, दिनांक-23.06.2017, दिनांक-31.08.2017, दिनांक-01.09.2017, दिनांक-05.09.2017 अशा दिनांकास त्‍याचे मोटरसायकलचे इंजिन उघडल्‍या बाबत मूळ फोटो, तिस-यांदा दिनांक-07.09.2017 रोजी इंजिन उघडून फीट केल्‍या नंतर सुध्‍दा इंजिन मधून ऑईल गळत असल्‍या बाबतचा मूळ फोटो, वॉरन्‍टी कालावधीत रुपये-240/- घेतल्‍या बाबत दिनांक-09.12.2017 रोजीचे बिल, फोटोग्राफरचे प्रमाणपत्र अशा दस्‍तऐवजांचा समावेश आहे.

05.   विरुध्‍दपक्ष क्रं 2 मोटरसायकल निर्माता कंपनीने पान क्रं 78 वर दाखल केलेल्‍या दस्‍तऐवज यादी नुसार अक्रं 1 ते 10 दसतऐवजाच्‍या प्रती दाखल केल्‍यात, ज्‍यामध्‍ये अधिकारपत्र, फ्री सर्व्‍हीस वॉरन्‍टी पत्र, जॉब कॉर्ड क्रं 3144 दिनांक-18.10.2016, जॉब कॉर्ड क्रं 1315 दिनांक-14.12.2016, जॉब कॉर्ड क्रं 1315 दिनांक-14.12.2016, जॉब कॉर्ड क्रं 1631 दिनांक-25.01.2017, जॉब कॉर्ड क्रं 2259 दिनांक-24.04.2017, जॉब कॉर्ड क्रं 3135 दिनांक-24.06.2017, जॉब कॉर्ड क्रं 3124 दिनांक-12.12.2017, जॉब कॉर्ड क्रं 4924 दिनांक-16.02.2018, जॉब कॉर्ड क्रं 59854 दिनांक-16.06.2018 अशा दसतऐवजाच्‍या प्रती दाखल केल्‍यात.

06.   तक्रारकर्त्‍याने पान क्रं 132 वर अर्ज दाखल केला, ज्‍यामध्‍ये शासकीय तंत्रनिकेतन नागपूर ऑटोमोबाईल यांचे कडून वाहन तपासणी करण्‍या बाबत अर्ज दाखल केला, त्‍यानुसार पान क्रं 133 वर दाखल दिनांक-16 मे, 2019 पत्रान्‍वये शासकीय तंत्रनिकेतन साकोली येथील प्रार्चाय यांनी ग्राहक मंचास कळविले की, शासकीय तंत्रनिकेतन साकोली येथे उपकरणे उपलब्‍ध नसल्‍याने तपासणी करणे शक्‍य नसून ते नागपूर येथून तपासून घ्‍यावे असे नमुद केले.  त्‍यानुसार शासकीय तंत्रनिकेतन नागपूर येथे वाहन तपासणीसाठी पत्र ग्राहक मंचाव्‍दारे पाठविण्‍यात आले असता पान क्रं 138 वर दाखल शासकीय तंत्र निकेतन नागपूर येथील प्राचार्य यांनी त्‍यांचे दिनांक-10.07.2019 रोजीचे पत्रान्‍वये वाहन तपासणी करीता आवश्‍यक असणारी यंत्रसामुग्री त्‍यांचे संस्‍थेमध्‍ये उपलब्‍ध नसल्‍याने वाहन तपासणी करता येणे शक्‍य नसल्‍याचे नमुद केले.

07  तक्रारकर्ता श्री प्रशांत साठवणे याचा  मौखीक युक्‍तीवाद ऐकण्‍यात आला. विरुध्‍दपक्षां तर्फे कोणीही मौखीक युक्‍तीवादाचे वेळी उपस्थित नव्‍हते.

08.   तक्रारकर्त्‍याची तक्रार, शपथपत्र,  दाखल केलेले दस्‍तऐवज, तसेच विरुध्‍दपक्ष क्रं 2 निर्माता कंपनीचे लेखी उत्‍तर व दाखल दस्‍तऐवज इत्‍यादीचे अवलोकन ग्राहकमंचाव्‍दारे करण्‍यात आले, त्‍यावरुन ग्राहक मंचा समोर न्‍यायनिवारणार्थ खालील मुद्ये उपस्थित होतात-

 

अक्रं

मुद्या

उत्‍तर

1

तक्रारकर्ता हा विरुध्‍दपक्ष क्रं 1 व 2 चा ग्राहक होतो काय?

-होय-

2

विरुध्‍दपक्ष क्रं 2 वाहन निर्माता कंपनीव्‍दारा निर्मित मोटरसायकल मध्‍ये उत्‍पादकीय दोष असल्‍याची बाब सिध्‍द होते काय ?

-होय-

3

विरुध्‍दपक्ष क्रं 1 स्‍थानिक डिलर/वाहन विक्रेता आणि विरुध्‍दपक्ष क्रं 2 वाहन निर्माता कंपनी यांनी तक्रारकर्त्‍यास दोषपूर्ण सेवा दिल्‍याची बाब सिध्‍द होते काय ?

-होय-

4

काय आदेश?

अंतिम आदेशा नुसार

                                                                     :: कारण मिमांसा ::

मुद्दा क्रं 1 ते 4 -

09.   तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष क्रं 1 भंडारा येथील वाहनविक्रेत्‍याच्‍या शोरुम मधून विरुध्‍दपक्ष क्रं 2  कंपनीव्‍दारे निर्मित मोटरसायकल यामाहा Model No.-FZ(FZS-FI) मोटरसायकल, Chassis No.-MEIRG0728G0231767 & Engine No.-G3C8E0353618 असा आहे एकूण रक्‍कम रुपये-95,059/- एवढया किमती मध्‍ये दिनांक-03.10.2016 रोजी विकत घेतली होती या बाबी उभय पक्षांमध्‍ये विवादास्‍पद नसून वाहनाचे बिलाची प्रत तक्रारकर्त्‍याने पुराव्‍यार्थ अभिलेखावर दाखल केलेली आहे.

10.    तक्रारकर्त्‍याचे तक्रारी नुसार त्‍याला विक्री केलेली मोटरसायकल दोषपूर्ण असून 10 महिन्‍यात ती केवळ 15000 किलोमीटर चालली असताना  अनुक्रमे दिनांक-23.06.2017, दिनांक-31.08.2018, दिनांक-01.09.2017 आणि दिनांक-05.09.2017 रोजी वाहनाचे इंजिन खोलून बांधण्‍यात आले परंतु इंजिनमधून आवाज येणे बंद झालेले नाही तसेच इंजिन मधील ऑईल गळणे बंद झाले नाही,  त्‍यामुळे त्‍यामध्‍ये उत्‍पादकीय दोष आहे. आपले म्‍हणण्‍याचे समर्थनार्थ तक्रारकर्त्‍याने उपरोक्‍त दिनांकास त्‍याने विकत घेतलेल्‍या मोटरसायकलचे इंजिन उघडल्‍या बद्यल मूळ फोटोग्राफस  पान क्रं 119 ते 123 वर पुराव्‍यार्थ दाखल केलेले आहेत.

11.   या उलट विरुध्‍दपक्ष क्रं 2 वाहन निर्माता कंपनीने आपले लेखी उत्‍तरात विक्री केलेल्‍या मोटरसायकलची वॉरन्‍टी दोन वर्षाची किंवा 30000 किलोमीटर पर्यंत अशी होती vlsअसे नमुद केले आहे. तक्रारकर्त्‍याने मोटरसायकल दिनांक-03.10.2016 रोजी विकत घेतल्‍याचे बिलाचे प्रतीवरुन दिसून येते म्‍हणजे खरेदीपासून दोन वर्षा पर्यंत म्‍हणजे दिनांक-03.10.2018 पर्यंत अथवा 300000 किलोमीटर पर्यंत चाले पर्यंत मोटरसायकलची वॉरन्‍टी होती.

12.  मोटरसायकलचे वॉरन्‍टी कालावधीत अनुक्रमे दिनांक-23.06.2017, दिनांक-31.08.2018, दिनांक-01.09.2017 आणि दिनांक-05.09.2017 रोजी वाहनाचे इंजिन खोलून बांधण्‍यात आले परंतु इंजिनमधून आवाज येणे बंद झालेले नाही तसेच इंजिन मधील ऑईल गळणे बंद झाले नाही या बाबी तक्रारकर्त्‍याने वर नमुद केल्‍या प्रमाणे दस्‍तऐवजी पुराव्‍यानिशी ग्राहक मंचा समोर सिध्‍द केलेल्‍या आहेत.

13.   विरुदपक्ष वाहन निर्माता कंपनीने  असा बचाव घेतलेला आहे की, जॉब कॉर्ड प्रमाणे तक्रारकर्त्‍याने मोटरसायकलचे इंजिनमध्‍ये आवाज येत असल्‍याचे सांगितलेले नाही. आम्‍ही अभिलेखावरील दाखल जॉब कॉर्डचे अवलोकन केले असता दिनांक-25.01 चे जॉब कॉर्ड मध्‍ये इंजिन ऑईल चेंज  तसेच दिनांक-24.04 चे जॉब कॉर्ड मध्‍ये ऑईल चेंज, ऑईल फील्‍टर, दिनांक-24.06.17 रोजी इंजिनचे काम केल्‍याचे तसेच Crank case, Screw, Gasket, Engine Oil, Oil Filter अशी कामे केल्‍याचे नमुद आहे. दिनांक-12.12.2017 रोजी चेनचे काम केल्‍याचे नमुद आहे. दिनांक-16.02 रोजी पुन्‍हा ऑईल चेंज, ऑईल फील्‍टर कामे केल्‍याचे नमुद आहे. दिनांक-16.06 रोजी इंजिन ऑईल चेंज  केल्‍याचे नमुद आहे. या सर्व दस्‍तऐवजी जॉब कॉर्ड वरुन असे दिसून येते की, प्रत्‍येक वेळी इंजिन संबधात काम करण्‍यात आले. त्‍यामुळे विरुध्‍दपक्ष क्रं 2 निर्माता कंपनीचे लेखी उत्‍तरातील बचावा मध्‍ये तक्रारकर्त्‍याने मोटरसायकलचे इंजिन मध्‍ये दोष असल्‍याची तसेच कर्कश आवाज येत असल्‍या बाबत तक्रार केली नाही हा विरुध्‍दपक्ष निर्माता कंपनीने  घेतलेला बचाव निराधार, तकलादू स्‍वरुपाचा आहे असे ग्राहकमंचाचे मत आहे.

14.    वाहन विकत घेतल्‍या पासून वॉरन्‍टी कालावधीतच (Within Warranty Period) सुमारे सात ते आठ वेळा वाहन बंद पडणे, चेन तुटणे, ऑईल गळती होणे, इंजिन मधून आवाज येणे हा सर्व प्रकार पाहता तसेच तीन वेळा इंजिन उघडणे व दुरुस्‍ती करणे (Continuously Engine Repairing) पाहता विरुध्‍दपक्ष क्रं 2 निर्माता कंपनीचे निर्मित मोटर सायकल मध्‍ये उत्‍पादकीय दोष होता व आहे (Manufacturing Defects) या बाबी पुराव्‍यानिशी सिध्‍द झालेल्‍या आहेत, मोटरसायकल विकत घेतल्‍या पासून इंजिनमध्‍ये वारंवार  दुरुस्‍ती करावी लागली असल्‍यामुळे तज्ञांचे मत (Expert Opinion) सुध्‍दा मागविण्‍याची गरज ग्राहक मंचास दिसून येत नाही. जर मोटरसायकल मध्‍ये  उत्‍पादकीय दोष नसता तर एवढया कमी कालावधीत एवढया वेळेस दुरुस्‍त करण्‍याची गरजच भासली नसती. विरुध्‍दपक्ष क्रं 1 वाहन विक्रेत्‍याचे सुध्‍दा वाहनात उत्‍पादकीय दोष असल्‍याची बाब लक्षात आल्‍या नंतरही वारंवार थातूरमातुर दुरुस्‍ती (Temporary Repair) करण्‍याचा केविलवाणा प्रयत्‍न केला. विरुध्‍दपक्ष क्रं 1 विक्रेत्‍याने, विरुध्‍दपक्ष क्रं 2 निर्माता कंपनीस उत्‍पादकीय दोष असल्‍या बाबत  स्‍पष्‍ट कल्‍पना (Regarding Manufacturing Defects give clear cut ideas)  देणे जरुरीचे होते. विरुध्‍दपक्ष क्रं 2 निर्मित उत्‍पादकीय दोष असलेले वाहन, विरुध्‍दपक्ष क्रं 1 विक्रेत्‍याने तक्रारकर्त्‍याला विक्री केले परंतु त्‍यानंतरही योग्‍य ती पाऊले (Proper Steps) विरुध्‍दपक्ष क्रं 1 विक्रेत्‍याने उचलली नाहीत. या सर्वप्रकारा मध्‍ये तक्रारकर्त्‍याचा नाहक वेळ खर्ची गेला (Waste of time) व त्‍याला वारंवार वाहन दुरुस्‍तीसाठी न्‍यावे लागले परंतु एवढे झाल्‍या नंतरही वाहनातील दोष दुर झालेले नाहीत. वर नमुद विवेचना वरुन आम्‍ही मुद्या क्रं 1 ते 3 याचे उत्‍तर होकारार्थी नोंदवित आहोत.

15    मुद्या क्रं-4 बाबत- वाहनामध्‍ये उत्‍पादकीय दोष असल्‍याची बाब सिध्‍द झाल्‍यास नविन वाहन बदलवून देण्‍याची अथवा वाहनाची संपूर्ण किम्‍मत परत करण्‍याची जबाबदारी निर्माता कंपनीची असल्‍या बाबत वेळोवेळी मा.राष्‍ट्रीय ग्राहक आयोग, दिल्‍ली यांनी अनेक न्‍यायनिवाडे पारीत केलेले आहेत,  त्‍यामुळे तक्रारकर्ता त्‍याने केलेल्‍या मागणी प्रमाणे विरुध्‍दपक्ष क्रं 2 वाहन निर्माता कंपनी कडून त्‍याने विरुध्‍दपक्ष क्रं 1 विक्रेता यांचे कडून विकत घेतलेली परंतु उत्‍पादकीय दोष असलेली मोटरसायकल यामाहा Model No.-FZ(FZS-FI)  बदलवून त्‍याऐवजी त्‍याच मॉडेलची नविन मोटरसायकल आवश्‍यक दस्‍तऐवजांसह परत मिळण्‍यास पात्र आहे परंतु विरुध्‍दपक्ष क्रं 2 निर्माता कंपनीस अशी यामाहा मोटरसायकल तक्रारकर्त्‍याला बदलवून देणे शक्‍य नसल्‍यास त्‍या परिस्थितीत तक्रारकर्ता हा यामाहा मोटरसायकलची संपूर्ण अदा केलेली रक्‍कम रुपये-95,019/- रक्‍कम आणि सदर रकमेवर अदा केल्‍याचा दिनांक-03.10.2016 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.9 टक्‍के दराने व्‍याज विरुध्‍दपक्ष क्रं 2 वाहन निर्माता कंपनी कडून मिळण्‍यास पात्र आहे. तसेच तक्रारकर्त्‍यास झालेल्‍या शारिरीक, मानसिक त्रासा बद्यल नुकसान भरपाई म्‍हणून रुपये-10,000/- आणि तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये-5000/- विरुध्‍दपक्ष क्रं 1 वाहन विक्रेता आणि विरुध्‍दपक्ष क्रं 2 वाहन निर्माता कंपनी कडून वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्‍या मिळण्‍यास पात्र आहे. विरुध्‍दपक्ष क्रं 3 ताजश्री मोटर्स प्रा.लि. नागपूर यांनी दोषपूर्ण सेवा दिल्‍याचे तक्रारकर्त्‍याचे म्‍हणणे नसल्‍याने त्‍यांचे विरुध्‍दची तक्रार खारीज होण्‍यास पात्र आहे असे ग्राहक मंचाचे मत आहे.

16.  उपरोक्‍त नमुद सर्व वस्‍तुस्थितीचा विचार करुन आम्‍ही तक्रारीत खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत-

                                                                             :: अंतिम आदेश ::

 

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार विरुध्‍दपक्ष  क्रं 1) शांती मोटर्स, भंडारा वाहन विक्रेता आणि विरुध्‍दपक्ष क्रं 2 इंडीया यामाहा मोटर्स प्रायव्‍हेट लिमिटेड, सुरजपूर वाहन निर्माता कंपनी यांचे विरुध्‍द खालील प्रमाणे अंशतः मंजूर करण्‍यात येते.
  2. विरुध्‍दपक्ष  क्रं 2 इंडीया यामाहा मोटर्स प्रायव्‍हेट लिमिटेड या वाहन निर्माता कंपनीला आदेशित करण्‍यात येते की, तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष क्रं 1 विक्रेता यांचे कडून विरुध्‍दपक्ष क्रं 2 निर्मित  विकत घेतलेली परंतु उत्‍पादकीय दोष असलेली मोटरसायकल यामाहा Model No.-FZ(FZS-FI) बदलवून देऊन त्‍याऐवजी त्‍याच मॉडेलची नविन मोटरसायकल आवश्‍यक दस्‍तऐवजांसह बिल, वॉरन्‍टी इत्‍यादीसह तक्रारकर्त्‍यास परत करावी आणि अशा नविन वाहनावर नविन वाहन दिल्‍याचे तारखे पासून नव्‍याने वॉरन्‍टी द्यावी तसेच आदेशानुसार नविन मोटरसायकल आवश्‍यक दस्‍तऐवजांसह मिळाल्‍यावर तक्रारकर्त्‍याने त्‍याचे कडील जुनी मोटरसायकल विरुध्‍दपक्ष क्रं 1 वाहन विक्रेत्‍याचे मार्फतीने विरुध्‍दपक्ष क्रं 2 वाहन निर्माता कंपनीस परत करावी. परंतु  विरुध्‍दपक्ष क्रं 2 वाहन निर्माता कंपनीला तक्रारकर्त्‍यास नविन मोटरसायकल बदलवून देणे शक्‍य नसल्‍यास विरुध्‍दपक्ष क्रं 2 वाहन निर्माता कंपनीने तकारकर्त्‍यास यामाहा मोटरसायकलची संपूर्ण रक्‍कम रुपये-95,019/- (अक्षरी रुपये पंच्‍च्‍याण्‍णऊ हजार एकोणीस फक्‍त) परत करावी आणि सदर रकमेवर दिनांक-03.10.2016 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.9 टक्‍के दराने व्‍याज तक्रारकर्त्‍याला द्यावे. तक्रारकर्त्‍याला अशी वाहनाची संपूर्ण किम्‍मत व्‍याजासह परत मिळाल्‍या नंतर त्‍याने  दोषपूर्ण वाहन विरुध्‍दपक्ष क्रं 1 वाहन विक्रेत्‍याचे मार्फतीने, विरुध्‍दपक्ष क्रं 2 वाहन निर्माता कंपनीस परत करावे.
  3. विरुध्‍दपक्ष क्रं 1 शांती मोटर्स भंडारा वाहन विक्रेता आणि विरुध्‍दपक्ष क्रं 2 इंडीया यामाहा मोटर्स प्रा.लि.या वाहन निर्माता कंपनीने वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्‍या तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या मानसिक व शारिरीक त्रासापोटी रुपये-10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्‍त) आणि तक्रारीचा खर्च रुपये-5000/- (अक्षरी रुपये पाच हजार फक्‍त) अशा नुकसान भरपाईच्‍या रकमा तक्रारकर्त्‍याला द्याव्‍यात.
  4. विरुध्‍दपक्ष क्रं -3 ताजश्री मोटर्स प्रा.लि. नागपूर यांचे विरुध्‍दची तक्रार खारीज करण्‍यात येते.
  5. सदर आदेशाचे अनुपालन विरुध्‍दपक्ष क्रं 1 शांती मोटर्स भंडारा वाहन विक्रेता आणि विरुध्‍दपक्ष क्रं 2  इंडीया यामाहा मोटर्स प्रा.लि.या वाहन निर्माता कंपनीने प्रस्‍तुत निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्‍त झाल्‍याचे दिनांकापासून 30 दिवसांचे आत करावे.
  6. निकालपत्राच्‍या प्रमाणित सर्व पक्षकारांना निःशुल्‍क उपलब्‍ध   करुन देण्‍यात याव्‍यात.
  7. तक्रारकर्त्‍याला  “ब” व “क” फाईल्‍स परत करण्‍यात याव्‍यात.

 

 

 
 
[HON'BLE MR. BHASKAR B. YOGI]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.