Maharashtra

Ahmednagar

CC/17/208

M/s. Salasar Wheels Pvt. Ltd, Director, Bhushan Govardhan Bihani - Complainant(s)

Versus

Manager, Royal Sundaram General Insurance company Ltd, - Opp.Party(s)

Kakani A.S.

11 Mar 2020

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अहमदनगर
पराग बिल्डींग,जिल्हाधिकारी कार्यालय आवार,अहमदनगर फोन नं. (0241) 2347917
आदेश
 
Complaint Case No. CC/17/208
( Date of Filing : 27 Jul 2017 )
 
1. M/s. Salasar Wheels Pvt. Ltd, Director, Bhushan Govardhan Bihani
E-1, Sahyadri Chowk, M.I.D.C. Ahmednagar
Ahmednagar
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Manager, Royal Sundaram General Insurance company Ltd,
Visharanthi Melaram Towers, No.2/319, Rajeevgandhi Sallai (O.M.R), Karapakkam , Chennai
Chennai
Tamilnadu
2. Manager, Royal Sunaram General Insurance Company Limited
Branch Office,Sai Midas Touch, Nagar Manmad Road, Near Big Bazar, Savedi, Ahmednagar
Ahmednagar
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V. C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. C. V.Dongare Member
 HON'BLE MR. M. N. Dhake MEMBER
 
For the Complainant:Kakani A.S., Advocate
For the Opp. Party: Sujata Gundeja, Advocate
Dated : 11 Mar 2020
Final Order / Judgement

निकालपत्र

निकाल दिनांक – ११/०३/२०२०

(द्वारा मा.सदस्‍य : श्री.महेश निळकंठ ढाके)


१.   तक्रारदार यांनी ग्राहक संरक्षण कायदा १९८६ कलम १२ प्रमाणे सदर तक्रार दाखल केलेली आहे.

२.   तक्रारदाराची थोडक्‍यात तक्रार अशी की, तक्रारदार ही कंपनी कायद्यानुसार नोंदवीलेली प्रायव्‍हेट लिमिटेड कंपनी असुन तक्रारदार हे सदरहु कंपनीचे डायरेक्‍टर आहेत. तक्रारदार कंपनी ही फोर्ड इंडिया लिमिटेड या चारचाकी वाहन उत्‍पादन करून विक्री करणा-या कंपनीचे अहमदनगर जिल्‍ह्याचे अधिकृत डिलर आहेत. सदरहु व्‍यवसाय तक्रारदार हे स्‍वतःच्‍या व कुटुंबाच्‍या  उदरनिर्वाहाचे साधन म्‍हणुन करतात. तक्रारदार यांच्‍याकडे फोर्ड कंपनीचे वेगवेगळ्या मॉडेलची वाहने विक्रीसाठी कंपनीकडून येतात. ग्राहकांना पुर्णतः माहीती होण्‍याचे दृष्‍टीकोनातुन कंपनीकडुन तक्रारदार यांना स्‍वतंत्र डेमो कार दिली जाते, जिचा वापर तक्रारदार हे त्‍यांचे नियोजीत ग्राहकांना टेस्‍ट ड्राईव्‍ह  इत्‍यादीसाठी फक्‍त वापर करतात. या वाहनापैकी तक्रारदार यांनी फोर्ड कंपनी लिमीटेड यांचेकडुन सदरचे इको स्‍पोर्ट १.५ डिझेल टायटेनियम डायमंड व्‍हाईट  डेमो कार क्रमांक एम.एच.१६ टी.सी.२२४, चेसीस क्रमांक MAJAXXMRKAGS75344, इंजीन क्रमांक GS75344 ही कार दिनांक १०-११-२०१६ रोजी खरेदी केली होती.  सदर कारच्‍या वापर करतांना कोणतेही नुकसान झाल्‍यास अगर ति-हाईत व्‍यक्‍तीस नुकसान भरपाई देणे लागल्‍यास ती भरून निघणे (Policy is only for Indemnification of actual loss)  यासाठी सामनेवाले क्र.१ कडे विमा उतरविला होता व त्‍यातुन कोणतेही उत्‍पन्‍न  मिळावे, असा तक्रारदाराचा उद्देश नव्‍हता. सदर विमा पॉलिसीचा क्रमांक VR00001568000100 असा असुन विमा कालावधी दिनांक ०१-०१-२०१६ ते ३१-१२-२०१६ असा होता.

     तक्रारदार यांचे कंपनीतील कर्मचारी म्‍हणजेच ड्रायव्‍हर श्री.सुजित विश्‍वनाथ शेट्टी रा. अहमदनगर यांचा ड्रायव्‍हींग लायसन्‍स क्रमांक एम.एच.१६-२००८००१८४२७ असा आहे. सदर ड्रायव्‍हर दिनांक १३-१२-२०१६ रोजी सायंकाळी सुमारे ७.०० वाजताचे दरम्‍यान फिर्यादी कंपनीचे प्‍लॉट नंबर जी-९, एम.आय.डी.सी. अहमदनगर येथील वर्कशॉप मधुन सदर कार त्‍यांचे शोरूम मध्‍ये  घेवुन येत असतांना सदरहु कार सुविधा हॉटेलच्‍या चौकात त्‍यांचे कारवरील नियंत्रण सुटल्‍याने सदरहु कार ही रस्‍ता सोडून सुमारे ४० ते ५० फुट खाली कच्‍च्‍या रस्‍त्‍यावर गेली. सदर अपघातामध्‍ये कारचे खुप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.  त्‍यामध्‍ये कारचे पुढील बाजुस असलेले इंजिन, बॉनेट, बंपर, सस्‍पेन्‍शन, टायर व्‍हील्‍स, ६ एअरबॅग्‍ज् तसेच पुढच्‍या बाजुचे हेड लॅम्‍प्‍स, उजव्‍या  बाजुकडील दरवाजे इत्‍यादींचे नुकसान झाले. सदरची बाब तक्रारदार यांनी सामनेवाले यांचे अधिका-यांना म्‍हणजेच सामनेवाले नंबर २ यांचे शाखाधिकारी श्री. अजय खुळे व त्‍यांनी नेमणुक केलेले सर्व्‍हेअर श्री.सतिष देवकर यांना दिनांक १३-१२-२०१६ रोजी फोनवरून कळविले व त्‍यानंतर दिनांक १४-१२-२०१६ रोजी सदरहु अपघाताची लेखी सुचना कंपनीला दिली. त्‍याचा क्‍लेम नंबर व्‍ही.आर.००००८३७६ असा आहे. सामनेवाले यांचे शाखाधिकारी व सर्व्‍हेअर यांनी सदरहु अपघाताचे ठिकाणी समक्ष दिनांक १४-१२-२०१६ रोजी सकाळी ११.०० चे सुमारास भेट दिली व गाडीचा स्‍पॉट सर्व्‍हे केला. त्‍यावेळस तक्रारदार यांनी त्‍यांना सदरहु अपघाताबाबत एम.आय.डी.सी. पोलीस स्‍टेशनला एफ.आय.आर. नोंदविण्‍याची आवश्‍यकता आहे का ? असे विचारले असता त्‍यांनी तशी कोणतीही जरूरी नाही. तुम्‍ही एम.आर.आर. नोंदवु नका असे सांगितले. कारण आम्‍ही आता स्‍वतः समक्ष पाहणी केलेली आहे व यामध्‍ये कोणतीही जीवीत हानी झालेली नाही अगर कोणास मार लागलेला नाही. त्‍यामुळे एफ.आय.आर. ची आवश्‍यकता नाही, असे सांगितले. त्‍यामुळे तक्रारदार यांनी याबाबत कोणतीही एफ.आय.आर. एमआयडीसी पोलीस स्‍टेशन येथे दिलेली नाही. तक्रारदार यांनी दिनांक १५-१२-२०१६ रोजी सामनेवाले यांना सदरहु कारचे दुरूस्‍तीसाठी लागणारे खर्चाचे इस्‍टीमेट म्‍हणजेच एकूण रक्‍कम रूपये ५,१०,२४४.८० चे सादर केले. सदरचे इस्‍टीमेट मिळाल्‍याबाबत सामनेवाले यांचे सर्व्‍हेअर यांनी तक्रारदारास सही करून दिलेली आहे. त्‍यानुसार त्‍यांचे संमतीने तक्रारदार यांनी सदरहू वाहन दुरूस्‍तीचे काम सुरू केले व सामनेवाले यांना याबाबत दिनांक १९-१२-२०१६ रोजी मेल पाठवून ५० टक्‍के खर्चाची रक्‍कम आगावु देणेबाबत विनंती केली. तसेच संपुर्ण क्‍लेम मंजुर करणेबाबत वेळोवेळी ई-मेल द्वारे तसेच फोन द्वारे विनंती केली. त्‍याप्रमाणे दिनांक ०४-०१-२०१७ रोजी तक्रारदाराने सामनेवाले यांचेकडे याबाबतचे बिल क्रमांक CRIAG0304300 ही रक्‍कम रूपये ५,५५,५१५/- हे बिल जमा केले. तक्रारदार यांनी वेळोवेळी सामनेवाले यांचेकडे सदरहु विम्‍याच्‍या रकमेची मागणी केली असता त्‍यांनी ती देऊ दिलाऊ करून दिली नाही व त्‍यानंतर दिनांक १०-०२-२०१७ रोजी सदरचा क्‍लेम हा क्‍लेम फॉर्ममध्‍ये नमुद केलेली घटना व अपघाताचे ठिकाण तसेच दिनांक यांचा मेळ होत नसल्‍याने रद्द केला आहे, असे कळविले. अशाप्रकारे सामनेवाले यांनी क्‍लेमची रक्‍कम देऊ लागू नये या एकमेव बेकायदेशिर उद्देशाने जाणुन बुजून उशीराने कळविले. त्‍यामुळे तक्रारदाराचे खुप मोठे नुकसान झालेले आहे व सदर तक्रार दाखल करणे भाग पडले आहे.    

३.   तक्रारदाराने तक्रारीसोबत दस्‍तऐवज यादी निशाणी ५ सोबत एकुण ५ दस्‍त दाखल केले आहेत. ते पुढीलप्रमाणे. तक्रारदार यांनी खरेदी केलेल्‍या कारचे बीलाची झेरॉक्‍स प्रत, तक्रारदार यांनी कारचा सामनेवालेकडे उतरविलेल्‍या विमा पॉलिसीची प्रत, सामनेवाले यांचे क्‍लेम रेण्‍युएशन पत्र, सदर कार दुरूस्‍तीचे बील, तक्रारदार यांनी सामनेवाले यांना केलेला ई-मेल.  निशाणी १५ सोबत तक्रारदाराने  क्रने ने गाडी उचलतांना घेतलेला फोटो, स्‍पॉट ऑफ अॅक्‍सीडेंट वर काढलेले पत्र, क्रेनचे बील दाखल केले आहे. निशाणी १७ ला इन्‍व्‍हेस्‍टीगेटर अजीतराव जगन्‍नाथ पाटील यांचे पुराव्‍याचे शपथपत्र दाखल केलेले आहे. निशाणी १८ ला सामनेवालेने लेखी युक्तिवाद दाखल केलेला आहे. तसेच लेखी युक्तिवादासोबत मा. सर्वोच्‍च न्‍यायालय यांचे Birla Technologies Ltd. Vs. Neutral Glass and Allied Industries Ltd. हा न्‍यायनिवाडा जोडलेला आहे. तक्रारदाराने निशाणी १९ ला मुळ तक्रार व त्‍या संदर्भात शपथपत्र दाखल केले आहे. निशाणी २० ला तक्रारदाराने दस्‍तऐवज यादीसोबत सामनेवाले यांचे ई-मेल व सामनेवाले यांचे विमा पॉलिसीचे ब्राऊचरची प्रत दाखल केली आहे.  

४.   तक्रारदाराची तक्रार स्विकृत करून सामनेवाले यांना मे. मंचातर्फे नोटीस काढण्‍यात आली. सदर नोटीस प्राप्‍त झाल्‍यानंतर सामनेवाले या प्रकरणात हजर झाले. सामनेवाले यांनी निशाणी १० ला त्‍यांची कैफीयत दाखल केलेली आहे. सामनेवालेने तक्रारदाराची तक्रार ही बेकायदेशीर असुन त्‍यातील म्‍हणणे व कथन हे सामनेवालेला मान्‍य नाही. सामनेवाले हे ग्राहक संरक्षण कायद्यातील कलम   २ (१) (ड) प्रमाणे ग्राहक नाही. तक्रारदाराने तक्रारीत नमुद केलेली पॉलिसी ही    ‘ मोटर ट्रेड पॅकेज पॉलिसी ’ म्‍हणुन घेतली आहे. त्‍यामुळे तक्रारदार हे सामनेवालेचे ग्राहक नाहीत. तक्रारदार हे सामनेवालेचे ग्राहक नाहीत. तक्रारदार हे या मे. मंचात स्‍वच्‍छ  हाताने आलेले नाहीत. तक्रारदार हे व्‍यपारी उद्देशाने व्‍यवसाय करतात. तक्रारदाराचे नुकसानग्रस्‍त वाहन हे व्‍यवसायीक उद्देशाने घेतलेले असुन ‘ मोटर ट्रेड पॅकेज पॉलिसी ’ या अंतर्गत सदरची विमा पॉलिसी तक्रारदाराने घेतली आहे. यावरून तक्रारदार याची तक्रार फेटाळण्‍यात यावी, अशी विनंती केली आहे. सामनेवाले यांनी Laxmi Engineering Works Vs. P.S.G. Industrial Institue cited in 1995 AIR 1428 (equiv 1995 SCC (3) 583) या न्‍यायनिवाड्याचा ऊहापोह करून व्‍यवसायाकरीता उद्देश व ग्राहक या संदर्भात व्‍याख्‍येमधील मुद्दा नमुद केलेला आहे. तक्रारदार हा वाहन विक्रेता असुन व्‍यवसायीक प्रक्रीयेत गुंतलेला आहे. त्‍यामुळे तक्रारदाराची तक्रार खारीज करण्‍यात यावी, अशी मागणी सामनेवालेने केली आहे.  

     सामनेवाले यांनी निशाणी ११ वर दस्‍तएवेज यादीसोबत एकुण ५ कागदपत्र दाखल केलेले आहेत. ते पुढीलप्रमाणे आहे. पॉलिसीच्‍या अटी व शर्तींची प्रत, क्‍लेम फॉर्म, सर्व्‍हे रिपोर्ट, इन्‍व्‍हेस्‍टीगेशन रिपोर्ट, नामंजुरीचे पत्र दाखल केले आहे. निशाणी १३ ला तक्रारदाराने पुराव्‍याचे शपथपत्र दाखल केलेले आहेत. निशाणी १४ ला साक्षीदार/ ड्रायव्‍हर सुजित विश्‍वनाथ शेट्टी यांचे पुराव्‍याचे शपथपत्र दाखल केलेले आहे. तसचे नि.१८ वर लेखी युक्तिवाद दाखल केला आहे व त्‍यासोबत मा.वरिष्‍ठ न्‍यायालयाचा न्‍यायनिवाडा दाखल केले आहे.

५.   तक्रारदाराने दाखल केलेली तक्रार, त्‍यांनी दाखल केलेले दस्‍तऐवज, पुराव्‍याचे शपथपत्र तसेच सामनेवालेने दाखल केलेली कैफीयत, त्‍यांनी दाखल केलेले कागदपत्र. तक्रारदाराने दाखल केलेले साक्षीदाराचे शपथपत्र, सामनेवालेंची कैफीयत, सामनेवालेने दाखल केलेले कागदपत्र, सामनेवाले दाखल केलेले विमा दावा तपासणीचे शपथपत्र तसेच सामनेवालेने दाखल केलेला लेखी युक्तिवाद यांचे अवलोकन केले असता न्‍यायनिर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्‍यांचे उत्‍तर आम्‍ही सकारण खालील कारणमिमंसेप्रमाणे देत आहोत.

अ.नं.

मुद्दे

निष्‍कर्ष

(१)

तक्रारदार हे सामनेवालेचे ग्राहक आहेत काय ?

होय

(२)

सामनेवालेंनी तक्रारदार यांना सेवा देण्‍यात त्रुटी ठेवली आहे काय ?

होय

(३)

आदेश काय ?

अंतिम आदेशा प्रमाणे

कारणमिमांसा

६.  मुद्दा क्र. (१) :  तक्रारदार यांनी सामनेवालेकडे विमा पॉलिसी उतरविली होती. सदरील विमा पॉलिसीचा कालावधी हा दिनांक ०१-०१-२०१६ ते  ३१-१२-२०१६ असा असुन तक्रारदाराने निशाणी ५/२ यावर सदर विमा पॉलिसी दाखल केली आहे. सदरील विमा पॉलिसी वर ‘ Motor Trade Package Policy (Road Risk Only) ’ असे नमुद आहे. त्‍याचप्रमाणे सामनेवाले यांनी तक्रारदार यांनी पॉलिसी घेतल्‍याचे मान्‍य केले असुन सामनेवलेने निशाणी ११ सोबत विमा पॉलिसी दाखल केलेली आहे. त्‍यात तक्रारदाराचे नाव नमुद आहे. तक्रारदाराने सामनेवालेकडे वरील कागदपत्रांवरून परिवलीत जोखीम होणेसाठी नुकसान भरपाई मिळणेकरीता तक्रारदाराने विमा पॉलिसी घेतली आहे व तक्रारदाराने सदरील विमा पॉलिसीचा प्रिमीयम सामनेवालेकडे भरलेला आहे. यावरून तक्रारदार हा या सामनेवालेचा कंपनीचा ग्राहक आहे, हे मंचाचे मत आहे. सबब मुद्दा क्रमांक १ चे उत्‍तर होकारार्थी देण्‍यात येत आहे.

७.   तक्रारदाराने त्‍याची लेखी युक्तिवादात असे म्‍हटले आहे की, तक्रारदाराचा विमाधारक कारचा दिनांक १३-१२-२०१६ रोजी अपघात झाला. सदर अपघातामध्‍ये  कारचे नुकसान झाले. तक्रारदाराने सामनेवाले नंबर २ यांचे शाखाधिकारी व सर्व्‍हेअर यांनी सदरहु अपघताचे ठिकाणी समक्ष दिनांक १४-१२-२०१६ रोजी सकाळी ११.०० चे सुमारास भेट दिली व गाडीचा स्‍पॉट सर्व्‍हे केला. त्‍यावेळस तक्रारदार यांनी त्‍यांना सदरहु अपघाताबाबत एम.आय.डी.सी. पोलीस स्‍टेशनला एफ.आय.आर. नोंदविण्‍याची आवश्‍यकता आहे का ? असे विचारले असता त्‍यांनी तशी कोणतीही जरूरी नाही. तुम्‍ही एम.आर.आर. नोंदवु नका असे सांगितले. कारण आम्‍ही आता स्‍वतः समक्ष पाहणी केलेली आहे व यामध्‍ये कोणतीही जीवीत हानी झालेली नाही अगर कोणास मार लागलेला नाही. त्‍यामुळे एफ.आय.आर.ची आवश्‍यकता नाही, असे सांगितले. त्‍यामुळे तक्रारदार यांनी याबाबत कोणतीही एफ.आय.आर. एमआयडीसी पोलीस स्‍टेशन येथे दिलेली नाही. तक्रारदार यांनी दिनांक १५-१२-२०१६ रोजी सामनेवाले यांना सदरहु कारचे दुरूस्‍तीसाठी लागणारे खर्चाचे इस्‍टीमेट म्‍हणजेच एकूण रक्‍कम रूपये ५,१०,२४४.८० सर्व्‍हेअर यांचेकडे दिले व सामनेवाले यांना विनंती केली ५० टक्‍के  खर्चाची रक्‍कम आगावु द्यावी किंवा त्‍यांना क्‍लेम अॅप्रुव्‍हलसाठी वेळ लागेल, तुम्‍ही काम पुर्ण करा तुमचा क्‍लेम लवकरच मंजुर होईल, असे सांगितले. परंतु सामनेवाले यांचेकडे सदरहु विम्‍याच्‍या रकमेची मागणी केली असता त्‍यांनी ती दिली नाही आणि क्‍लेम क्‍लेम फॉर्ममध्‍ये नमुद केलेली घटना व अपघाताचे ठिकाण तसेच दिनांक यांचा मेळ होत नसल्‍याने रद्द केला आहे, असे दिनांक १०-०२-२०१७ रोजी सांगितले. तक्रारदार यांनी सामनेवालेकडुन कोणत्‍याही प्रकारे उत्‍पन्‍न मिळावे यासाठी सदरचा विमा घेतलेला नाही. याउलट वाहन दुरूस्‍तीमध्‍ये वाहनाचे नुकसान झाले आहे. त्‍याची भरपाई मिळणेसाठी सामनेवालेने सदरची पॉलिसी घेतली आहे. त्‍यामुळे या तक्रार अर्जास ग्राहक संरक्षण कायदा १९८६ ची बाधा येत नाही. त्‍याचप्रमाणे सर्व्‍हेअरचा रिपोर्ट तक्रारदारास मान्‍य नाही. सामनेवाले यांचे इन्‍व्‍हेस्‍टीगेटर यांनी कोणत्‍याही प्रकारे नीट अपघाताची चौकशी केलेली नव्‍हती व नाही. याबाबत सी.सी.टी.व्‍ही. मध्‍ये अपघाताचे छायाचित्रण आलेली नाही. तसेच कोणत्‍याही साक्षीदाराचा सदर अपघात न झालेबाबतचा लेखी जबाब नाही. तक्रारदार यांची गाडी शोरूम मधुन बाहेर पडली व त्‍यानंतर ती केव्‍हा परत शोरूम मध्‍ये आली यांची नोंद गेट पासमध्‍ये आढळुन आली नाही, असे खोटे म्‍हटले आहे. हे सर्व खोटे असुन तक्रारदार यांच्‍या वर्कशॉपचे दिनांक १३-१२-२०१६ चे गेट पासचीप्रत दाखल केली आहे. असा लेखी युक्तिवाद करून तक्रारदाराचा क्‍लेम मंजुर करण्‍यात यावा, अशी विनंती केली आहे. तक्रारदाराने अपघातासमयी अपघातग्रस्‍त वाहन चालवीत असलेला ड्रायव्‍हर यांचे शपथपत्र दाखल केले आहे. त्‍यामध्‍ये त्‍यांनी अपघाताविषयी सविस्‍तर कथन केले आहे. सदर शपथपत्र निशाणी १४ ला दाखल केले असुन ते ड्रायव्‍हर सुजित विश्‍वनाथ शेट्टी यांचे शपथपत्र आहे.

८.   सामनेवाले यांनी त्‍यांच्‍या लेखी युक्तिवादात, कैफीयतीमध्‍ये व त्‍यासोबत दाखल केलेल्‍या कागदपत्रांमध्‍ये असे म्‍हटले आहे की, तक्रारदाराची तक्रार ही मंजुर होणेस पात्र नाही. सामनेवालेने तक्रारदारास दिलेली पॉलिसी ही ‘ Motor Trade Package Policy (Road Risk Only) ’ असुन ती विक्रेता यांना दिलेली आहे आणि सदर तक्रारदार हे गाडी विक्री करून व्‍यवसाय करता व त्‍यावर नफा कमावीतात त्‍यामुळे ते कायदेशीपणे ग्राहक ठरत नाही. तक्रारदार हा वाणिज्‍यीक हेतुन व्‍यवसाय करतो. तक्रारदार व सामनेवाले यांच्‍या उभयतांमध्‍ये  कोणत्‍याप्रकारे ग्राहक व व्‍यापारी असा संबंध नाही. या कारणामुळे तक्रारदाराची तक्रार खारीज करण्‍यात यावी. तसेच सामनेवालेने त्‍याचे इन्‍व्‍हेस्‍टीगेटरचे शपथपत्र निशाणी १७ वर दाखल केलेले आहे. त्‍यात विमा दावा तपासणीमध्‍ये  तक्रारदाराने दाखल केलेल्‍या रेकॉर्डमध्‍ये बनावट मोठ्या प्रमाणात आढळली आणि तपासणीमध्‍ये फेरफार केल्‍याचे आढळले, असे नमुद केलेले आहे.  सामनवालेने यांनी नि.१८ वर दाखल केलेल्‍या लेखी युक्तिवादात मा.वरीष्‍ठ न्‍यायालयांचे पुढील न्‍यायनिवाडे नमुद केले आहेत.

  1. Birla Technologies Ltd. Vs. Neutral Glass and Allied, 

2011, CPR (1), Supreme Court

  1. Wimco Ltd. Vs. Ashok Sekhon

2008 (2) CPJ, Page 210, National Commission

  1. United India Insurance Co. Vs. S.V. Engg.

2010 (2) CPR, page 99, Andhra Pradesh

  1. Jaswant Hans Vs. Ashok Kumar,

2011 (3), CPR, page 115 Himachar Pradesh 

     वरील न्‍यायनिवाड्यांमधील व सदर प्रकरणात तथ्‍ये वेगळी असल्‍यामुळे सदरील न्‍यायनिवाडे सदर प्रकरणात लागु होत नाही. तक्रारदाराने सदर प्रकरणात  पुढील न्‍यायनिवाडे दाखल केलेले आहेत.

     National Consumer Disputes Redressal Commission,

     New Delhi –I (2005) CPJ 27 (NC) – Dt.03-12-2004

     Harsolia Motors Vs. National Insurance Co. Ltd.

     सदरील न्‍यायनिवाड्यामध्‍ये वाणिज्‍यीक उद्देश म्‍हणजे विक्रेत्‍याने घेतलेली वस्‍तु आणि सेवा घेतलेल्‍या वस्‍तुचा उपयोग फक्‍त नफा मिळविण्‍यासाठी केला जातो तो वाणिज्‍यीक हेतु असतो. जसे वस्‍तु विकत घेतली आणि अशी सेवा जी भाड्याने घेतली आहे त्‍यातुन फक्‍त नफा मिळवला नाही, अशी वस्‍तु किंवा सेवा वाणिज्‍यीक होणार नाही. विमाधारक जोखीम कव्‍हर करणेसाठी त्‍याचे वाहनाचा वापर करीत नाही. पॉलिसी केवळ प्रत्‍यक्ष नुकसान भरपाईसाठीची आहे, नफा मिळविण्‍याच्‍या उद्देशाने नाही, असे मत व्‍यक्‍त करण्‍यात आले आहे.

  1. National Consumer Disputes Redressal Commission,

     New Delhi – R.P.No.4506 of 2010 Dt.09-03-2012

     Ashish Vishwakarma Vs. National Insurance Co. Ltd.

     सदरील न्‍यायनिवाड्यामध्‍ये विक्रेता व विमा कंपनीचा करार हा नुकसान भरपाई संदर्भाबाबत करार आहे आणि यामध्‍ये व्‍यवसायिक उद्देशाचा प्रश्‍नच उद्भवत नाही. यापुढे असेही म्‍हटले आहे की,  इन्‍शुरन्‍स अॅक्‍ट कलम ३ अन्‍वये विमा पॉलिसी संदर्भात विमाधारक कुठल्‍याही प्रकारची वाणिज्‍यीक किंवा कुठल्‍याही प्रकारची व्‍यवसायीक क्रिया करू शकत नाही. सदर कलम ३ ची ग्राहक संरक्षण कायदा १९८६ ला या प्रकरणात बाधा येत नाही, असे म्‍हणुन मा.राज्‍य आयोगाचा निर्णय खारीज केला आहे.

     सदरील न्‍यायनिवाडे हे या प्रकरणात लागु होत आहे, असे मंचाचे मत आहे. सामनेवालेने तक्रारीत विमा दावा चुकीचे कारणाने नाकारला असुन सामनेवाले क्र.१ हे विमा कंपनीचे मुख्‍यालय असुन सामनेवाले क्र.२ हे अहमदनगर जिल्‍हा शाखा आहे. सामनेवाले यांनी तक्रारदारास द्यावयाचे सेवेत त्रुटी दिली आहे, असे मंचाचे मत आहे. त्‍यामुळे मुद्दा क्रमांक २ चे उत्‍तर होकारार्थी देण्‍यात येत आहे.

   सामनेवाले यांनी सेवेत त्रुटी दिली असल्‍याने सामनेवालेंनी तक्रारदारास सर्व्‍हेअरच्‍या रिपोर्टप्रमाणे वाहन  दुरूस्‍तीसाठी झालेली रक्‍कम रूपये २,८५,५४९/- व त्‍यावर दिनांक  ०३-०९-२०१५ पासून संपुर्ण रक्‍कम मिळेपावेतो द.सा.द.शे. ९ टक्‍के दराने व्‍याज द्यावे, या निर्णयाप्रत हे मंच येत आहे.  

९.  मुद्दा क्र. (३) : मुद्दा क्रमांक १ व २ वरील विवेचनावरून खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्‍यात येत आहे. 

आदेश

१. तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येत आहे.

२.  सामनेवाले यांनी तक्रारदारास सर्व्‍हेअरच्‍या रिपोर्टप्रमाणे वाहन दुरूस्‍तीसाठी झालेली रक्‍कम रूपये २,८५,५४९/- (अक्षरी दोन लाख पंच्‍याऐंशी हजार पाचशे एकुणपन्‍नास मात्र) व त्‍यावर दिनांक  ०३-०९-२०१५ पासून संपुर्ण रक्‍कम मिळेपावेतो द.सा.द.शे. ९ टक्‍के दराने व्‍याज द्यावे.

३. सामनेवाले यांनी तक्रारदार हिस शारीरिक व मानसिक त्रासाबद्दल रूपये २५,०००/- (अक्षरी पंचवीस हजार मात्र) व  सदर तक्रार अर्जाचा खर्च रूपये ७,०००/- (अक्षरी सात हजार मात्र) द्यावा.

४. वर नमूद आदेशाची पुर्तता सामनेवाले यांनी आदेशाची प्रत मिळण्‍यापासून ३० दिवसाच्‍या आत करावी.

५. या आदेशाची प्रथम प्रत उभय पक्षकार यांना निःशुल्‍क देण्‍यात यावी.

६. तक्रारदार यांना या प्रकरणाची ‘’ब’’ व ‘’क’’ फाईल परत  करावी.

 
 
[HON'BLE MR. V. C. Premchandani]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. C. V.Dongare]
Member
 
 
[HON'BLE MR. M. N. Dhake]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.